"मनांतले, जनांत-२":
"आज हरलो, पण उद्या जिंकणार नाही कशावरून?"
ह्या जाहिरातीच्या धर्तीवर,
"काल हरलो, पण आज जिंकणार नाही कशावरून?
# "घराणेशाही होती, आहे आणि रहाणारच आहे.
अगदी 'घराणेशाहीला नाकं मुरवडणार्यांकडे'ही!"
# "बिचारी लाचारी":
स्वाभिमानाच्या राणा भीमदेवी थाटात वल्गना करत, लाचारी एकदा स्विकारली की, ती सुटता सुटत नाही.
आपल्या अकार्यक्षमतेची आपणच दिलेली ती कबुली असते. परिस्थितीवर धैर्याने मात करणं आपल्याला अशक्य असल्याची ती दवंडी असते.
लाचारांची जागा, नेहमीच घराबाहेर असते.
# "तोट्यात जाणार्या खाजगी उद्योगांप्रमाणे, सद्यस्थितीत सरकारी नोकरांचीही योग्य त्या प्रमाणात नोकर कपात केली जाणे,
आवश्यक आहे कां?"
# राजकीय वळणाचे संदेश "सोमि" वर लिहावयाच्याच नाहीत हा माझा निग्रह गेले काही दिवसच टिकला. पण आर्थिक आघाडीवर सर्वसामान्य जनतेचे हाल करणारे घोटाळे व जे काही अप्रिय घडतंय ते पाहून संयम सुटला. आज परिस्थिती आता हाताबाहेर लौकरच जाणार अशी भीती निर्माण झाल्याने हा विचार प्रदर्शित करत आहे. तो योग्य कां अयोग्य हे ज्याचे त्याने ठरवावे. नाहीतर एक विडंबनात्मक साहित्यक्रुती समजून दुर्लक्ष करावे!:
"करायला गेले एक आणि झाले भलतेच!
द्यायला गेले नोकरी, पण भडकली की हो बेकारी!
करायला गेले नोटबंदी, पण झाली 'व्यवसायबंदी'!!
ज्यांना काल निंदती , पायघड्या त्यांना आज घालती!!!
दाखवले स्वप्न 'अच्छे दिन'चे,
पण आता तोंड कुठे कसे बरे लपवायचे?!"
# ब्रेकची गरज?
कोणत्याही सार्वजनिक उत्सवांना सध्या उन्मादाच्या अतिरेकापायी जे बाजारु, अश्लाघ्य स्वरुप आले आहे, ते पहाता खरोखरच सार्वजनिक ठिकाणी काय व कशाकरता किती दिवस कोणताही उपक्रम चालू ठेवावा, ह्याचा गांभीर्याने, सर्वांनीच विचार करण्याची वेळ आली आहे. केवळ अनेकानेक उत्सवातले धांगडधिंगे, मौज मजा आदी गोष्टीत कितीतरी करोडो मनुष्य-तास आपण वाया घालवून काय भले साधतो, ह्याचाही त्या अनुषंगाने आढावा घेणेही गरजेचे झाले आहे. तसे आताच केले नाही, तर सर्व नीतीमूल्यांचा र्हास होऊन भवितव्य अंध:कारमय व्हायला वेळ लागणार नाही. हा वेक अप् काँल आहे.
# "घडतंय, ते ते बिघडतंय!":
एखादा दिवस असा येतो की एका पाठोपाठ गोष्टी बिघडू लागतात. सकाळी पाहुणे गांवी जाणार तर धो धो पाऊस सरू झाला. वहान मिळणे कठीण झाले. घरी गँस सिलीडर रिकामा झाला व नवीन लावला तर गँस लिक होत होता.
मेकँनिक आला व वाँल्व लिक होत आहे, हा सिलीडर वापरु नका असे सागून गेला. डिलरला फोन करुन करुन थकलो, तेव्हां कुठे नवीन सिलींडर घेवून माणूस आला. हे सारे ठीक होईतो कपडे धुण्याचे मशिन बिघडले! त्याचा मेकँनिक येतो कधी, ती वाट पहावी लागली. विसावा म्हणून चहा गरम करायला घेतला, तर ओव्हनचा नन्ना.
काही कामाचे कागद छापायला गेलो, तर कार्ट्रिजची शाई सपलेली.
अखेर कुणाला तरी फोन करावा, तर फोनची बँटरी आऊट व चार्ज करताना फोन गरम,,,..
"जे जे घडतंय, ते ते बिघडतंय!"
# जगाला फसवले तरी,
कुणी, कधीही,
आपल्या मनाला फसवू शकत नाही.
देहबोली मनातल्या भावभावना प्रकट करतच असते.
# समस्या तसेच गरजा, नेहमी आव्हान उभे करतात. नवकल्पना निर्माण होतात,अशाच आव्हानांतून सुचतात. छोट्या बदलातून अधिक फायदा वा सोय कशी होईल, हे प्रयत्नपूर्वक शोधणे, हयाकरता आपण जरूर काही वेळ रोज द्यावा आणि येथे ती कल्पना शेअर करावी, ही विनंती. निरीक्षणशक्ति, विचार आणि बुद्धि, ह्या जोडीला कल्पकता वापरून दैनंदिन जीवनात अधिक सुलभता व सोयी त्यामुळे निर्माण होऊ शकतील. विचारमंथनाला नवी दिशा देत, ह्या संदेश माध्यमाचा चांगला उपयोग, हा हेतु आहे. उदाहरण म्हणून, माझा स्पिड पोस्ट वरील संदेश पुन्हा वाचा.
# "लेखन व वाचन ह्यांची आवड माणसाला स्वत:च्या विश्वात गुंतवून ठेवू शकते."
# सार्वजनिक ठिकाणी बिनदिक्कतपणे धुम्रपान करणारे, आपल्या आनंदासाठी इतरांच्या आरोग्याची हानी कां करत रहातात?
कधी व कसे,
ते सुधारणार?
# जे सुधारणे आवश्यक व शक्यही आहे,
अशा मुद्दयांवर
"सोमि" मध्ये विधायक संदेश प्रदर्शित करणे, सार्वजनिक हिताचे द्रुष्टिने गरजेचं आहे.
# जन्म आणि मरण ह्यांत,
असतं फक्त एका श्वासाचं अंतर.
तर, आवडणारा संदेश आणि दखलच न घेतला जाणारा संदेशामध्ये काय असूं शकतं?
संघर्ष करणारे आपण एकटेच नसतो.
लहान थोर सारेच संघर्षयात्री असतात.
अडचणीच कर्तबगार माणसं घडवतात.
# अनेक सुलभ अँपस् उपलब्ध असूनही काहींचा, "सोमि" वर मराठी,
धेडगुजरी इंग्रजीतून लिहीण्याचा अट्टाहास कां?
इतका आळस बरा नव्हे!
सुधाकर नातू
१०/१०/२०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा