मंगळवार, २६ मार्च, २०१९

"'शतपावली', वाचायला भावली":

"शतपावली",वाचायला भावली!: व्यक्तिचित्र किंवा आत्मचरित्र वाचायला मला खूप खूप आवडतात. विविध माणसांचा तितक्याच विविध काळांतील वावर, 'व्यक्ती तितक्या प्रक्रुती' हे पटविणारी, पारदर्शक स्वभाववैशिष्ट्ये, गतकाळातील स्वयंभू माहोल आणि हेही पुरे नाही म्हणून की काय, शोभादर्शकातील क्षणोक्षणी बदलणार्या रंगबिरंगी नक्षीकामासारखे अनेकानेक प्रसंग तसेच अनुभव अशा वाचनातून आपल्यापुढे जीवंत होत जातात. त्यातील व्यक्तिचित्रे लिहावीत आणि आपण ती वाचावीत, तर ती रविंद्र पिंगे ह्यांचीच! साध्या सोप्या मायाळू भाषेतील जिव्हाळ्याने उलगडत गेलेली ती अनुपम, पिंग्याच्या शब्दांत नक्षत्रलख्ख जीवनचित्रे आपल्या सजग मनाशी सहजतेने ह्रदयसंवाद साधतात, असा माझा त्रुप्तीचा अनुभव आहे. मला आठवते की, मी रविंद्र पिंग्यांचे त्याच जातकुळीतले 'शतपावली' हे विभिन्न क्षेत्रातील बारा नामवंत व्यक्तिंचे आलेखन, एका बैठकीत वाचून काढले होते. ह्या त्या बारा जीवनदिशा: १ कुमार गंधर्व: सूरमाधुर्याची खाण २ दुर्गाबाई भागवत: विद्याव्रती ३ वि.स. खांडेकर: साहित्यातील अम्रुतवेल ४ डी.जी. तेंडूलकर: अवलिया चरित्रकार ५ झाबवाला: तपस्वी कामगार नेता ६ हंसा वाडकर: अनोखी जीवनकहाणी ७ अ.का.प्रियोळकर: रुषितुल्य संशोधक ८ केशवराव दाते: ऱंगभूमीचे भीष्माचार्य ९ कुसुमाग्रज: कीर्तिवंत भाषाप्रभु १० प्रभाकर कोल्हटकर-श्रीपाद क्रुष्ण कोल्हटकरांचा मुलगा: दिव्याखालचा अंधार ११ दीनानाथ दलाल: रसिक रंगचित्रकार १२ ना.ह. आपटे: विपरीत भाग्यचक्र "शतपावली" मधील बारा व्यक्तींच्या जीवनरेखा अवलोकिताना जे जाणवले त्याचे मर्म व सार हे असे आहे: प्रत्येकाची जीवनगाथा ही एक अद्भूत, कल्पना करता येणार नाही, अशी स्वतंत्र कादंबरीच जणु असते. अनेक चढ उतार, सुख दु:खे आणि आव्हाने, पेचप्रसंग ह्यानी प्रत्येकाचे भावविश्व वेगवेगळी आंदोलने स्विकारत मार्गक्रमण करत असते. असे असले तरी एकाची कहाणी, कधीही कोणत्याच दुसर्यासारखी नसते. धन, मान सन्मान, प्रसिद्धी आणि लोकप्रियता लोकमान्यता तर फारच थोड्यांच्याच वाट्याला येते. सगळ्यांनाच सुदैव व संधी प्राप्त होतातच असे नाही. काही अभाग्यांच्या जीवनांत फासे विपरीत पडून भरकटत जाणार्या जहाजासारखे काही बाही होत रहाते. आयुष्यात स्वत:ची अचूक ओळख जेव्हा होते आणि आपण काय उत्तम करू शकतो, आपल्याला काय केल्यामुळे आंतरिक समाधान मिळते, त्याच बरोबर आपल्या मर्यादा कशा व कोणत्या आहेत ह्याची जाण ज्याना होते, ते आपला जीवनमार्ग योग्य त्या दिशेला वळवत, योग्य निर्णय योग्य वेळी घेत त्याबरहुकूम जे अहर्निश प्रयत्न करतात, त्याना यशश्री माळ घालते हे चिरंतन सत्यही 'शतपावली'चे वाचन आपल्याला करून देते. ह्या बारा जणांपैकी झाबवाला व ना.ह. आपटे ह्याना त्यांच्या गुणवत्तेनुसार व कष्टांच्या तुलनेत खूपच कमी नांव व मान लाभला. थोर कर्तबगार बापाच्या पदरी जन्म घेऊनही प्रभाकरपंत कोल्हटकर जीवनात सर्वथैव अपयशी ठरले. 'सांगत्ये ऐका' सारखे प्रक्षोभक पण प्रांजल आत्मव्रुत्त लिहीणार्या हंसा वाडकरांची जीवनकहाणी तर कोणाच्याही डोळ्यात अश्रु आणणारी आहे. बाकीचे आठ दिग्गज आपआपल्या क्षेत्रातील उच्च श्रेणीची कामगिरी करते झाले आणि त्यांना त्यानुसार क्रुतार्थ जीवन जगण्याची बक्षिशीही मिळाली. सारांश, काळाची पावले ओळखून अंगभूत प्रतिभा व गुणवत्ता, निर्णयशक्ती व प्रयत्नांची सातत्यता ह्यांची यथातथ्य सांगड जे घालू शकतात, त्यांच्या आयुष्याचा जमाखर्च बेरजेचा रहातो. त्या उलट निर्णय व क्रुतीचा हिशोब ज्यांचा चुकतो, त्यांच्या वाट्याला अपयशाची वजाबाकी येते. आता काही माणसेच अचूक वेळचे अचूक निर्णय व प्रयत्न कोणत्या अद्रुष्य प्रेरणेने करू शकतात, ह्या प्रश्नाला खरोखरच उत्तर नाही! नशिब दैव वा प्रारब्ध म्हणून जे काही असते, ते बहुदा ही चांगली वा वाईट प्रेरणाच असावी, असे म्हणणे भाग आहे. जाता जाता, दोन वैयक्तिक नोंदी: मला मुंबईत रूईया महाविद्यालयातील जिमखान्याच्या प्रांगणात एका कार्यक्रमाचे वेळी, कुमार गंधर्वानी त्यांची जन्मतारीख वेळ व स्थळ शिवपुत्र कोमकळी ह्या नांवासकट स्वत:च्या अक्षरात लिहून दिली होती आणि तो सुयोग माझी ज्योतिष अभ्यासाची कळकळ व अंगभूत धीटाईमुळे आला होता. लेखक रविंद्र पिंग्यांचाही स्नेह मला प्रत्यक्ष काही काळ लाभला होता. चतुरंग प्रतिष्ठानच्या रंगसंमेलनात जीवनगौरव पुरस्कार मिळविणार्यांना द्यावयाचे मानपत्र सातत्याने पिंगेसाहेब शब्दबद्ध करत असत, ही आठवणही ह्या "शतपावली" ने जागी केली. त्यांच्या लेखनाला मी वेळोवळी नेहमीच दाद देत आलो खरा, पण इतक्या विलंबाने मी त्यांचे "शतपावली" हे पुस्तक वाचल्यामुळे, माझा हा असा दाद देणारा प्रतिसाद वाचायला, आता रविंद्र पिंगे आपल्यात नाहीत, ही खंत मात्र मला बाळगावी लागत आहे, हे माझे दुर्भाग्य. सुधाकर नातू.

"ठेवा, डोके गहाण!":

"ठेवा, डोके गहाण!": "साथ दे तू मला" या मालिकेमध्ये, ज्या मुलीचे अगदी अनुरूप मुलाशी नुकतेच लग्न ठरते आहे, अशी कोणती तरुण मुलगी, संपूर्ण अनोळखी असलेल्या, "लव गुरु" सो काँल्ड सल्लागार तरूणाशी, वेळ काळाचे भान न ठेवता, सदान् कदा बोलत बसेल, आणि तेही कां अन् कशाकरता? दुसरे असे की, कोणत्या होतकरू मुलीचा बाप, आपल्या भावी विहीणीला अवेळी मध्यरात्री आगांतुकासारखा फोन करून, आपल्या इतर दोन विवाहीत मुलींबद्दल आणि जावयांच्या नको त्या प्रतापांबद्दल, नको ती माहिती पुरवेल? सारे काही अतर्क्य आणि विचित्रच! इथे "सबकुछ चलता है"!: "कलर्स" वाहिनीवर तर मालिकांमध्ये "आजी" आपले केस काळेभोर करण्यासाठी वाहिनीच्या नावाप्रमाणे कलर लावून घेतात, हे नवलच आहे! उदाहरणार्थ "घाडगे आणि सून" "सुखांच्या सरींनी हे मन बावरे" या मधल्या, तरूण दिसण्याचा नाहक हट्ट धरणार्या दोन आज्या! हा पोरखेळ कां व कशासाठी? इथे "सबकुछ चलता है"!: "सुखांच्या सरींनी हे मन बावरे" या मालिकेमध्ये एका सात वर्षे विधवा असलेल्या आणि मुल गमावलेल्या सर्वसाधारण कुटुंबातील आपल्यहून वयाने मोठ्या मुलीच्या प्रेमात, कोणता उद्योगपती श्रीमंत घराण्यातील देखणा तरुण मुलगा पडेल? हे मुळी पटण्याजोगे नाही. तेवढे तर तेवढेच, पण त्याच्या आजी-आजोबांना देखील ही अशी मुलगी आवडावी, आपल्या तरुण तडफदार नातवासाठी जोडीदार म्हणून योग्य वाटावी आणि त्यांनी आपल्या कर्तबगार सुनेला चुकीचे ठरवत कायम तिच्याशी पंगा घ्यावा, हेही अचंबा वाटण्याजोगे! तरुण मैत्रीण नेहा तर ह्या दोघांचा विवाह कधी होईल ह्याची प्रतिक्षा जणु देव पाण्यात ठेवत करत आहे. ह्या तिघांनी आपली डोकी गहाण ठेवण्याजोगेच नव्हे कां? विधवा विवाह दाखवणे तसे चूक नाही परंतु त्यासाठी इतके अशक्यप्राय विरोधाभास दाखवणे गरजेचे जसे नाही तसेच ते तर्काला धरून नाही. ह्या विधवा अनुश्रीला आपल्या नवर्‍याच्या आठवणीत रमावेसे वाटतेय आणि रंगांचा तिला जर कमालीचा इतका तिटकारा आहे, तर अशी मुलगी रंगपंचमीला सगळ्यांना जेवायला बोलावते, हे मुळीच पटण्याजोगे नाही. एवढी ऐपतही त्यांची दिसत नाही. तर मग हा अट्टाहास कां? रंगपंचमी असल्यामुळे रंगांची उधळण होऊ शकणार याची कल्पना असूनही हा असा आग्रह कां व कशासाठी! ह्या सगळ्या ड्रामेबाजी आधी, सिद्धार्थने आपली ओळख खोटीच दाखवल्यामुळे व ती उघडकीला येऊन अपमानास्पद तमाशा होऊनही ज्याचे नांव नको दर्शन नको त्याच्याशीच पुन्हा मैत्री करत जवळीक साधणे कशासाठी? त्या वेड्याने नको तितका जीवघेणा आग्रह करतो म्हणून? अनुश्रीबद्दल एवढी चीड असल्यामुळे दुर्गाबाईंनी आपल्या अधिकारात पोलीस बोलवून तिला धडा शिकवायचे ठरवणे आणि त्याप्रमाणे पोलिसांनी कुठल्याही कायद्याला धरून नाही तरीही येणे हा तर एक अपराधच नव्हे कां? सिनेमँटिक लिबर्टी किती व कशी घ्यायची ह्याचे तारतम्य नको कां! "सबकुछ चलता है" हेच खरे! मालिकांमधली पात्रे, त्यांना जेव्हा हवे असेल, तेव्हा ती अंतर्धान पावतात. हा अनुभव "राधा प्रेम रंगी रंगली" मधील माधव निंबाळकर यांच्या बाबतीत तर नेहमीच घेतला होता. आज पण आता मालिकांमधील आयांवर ही वेळ आली आहे. राधाची आई घरी एवढा हलकल्लोळ, गडबड गोंधळ सुरू असतानाही कुठे गेली कोण जाणे! "सुखांच्या सरींनी... मध्ये अनुश्रीची आई अशीच गायब आहे. घाडगे अँड सून मध्ये तर कहरच! अमृता चे आई वडील काका जे केव्हांचेच गायब झाले वा कुठे परग्रहावर गेले देव जाणे! "घाटगे अँड सून" मध्ये नायक अक्षय, अमृता व टीयरा यांच्याबरोबर जो तळ्यात मळ्यात खेळ मालिका सुरू झाल्यापासून करतोय, तो काही केल्या संपायला तयार नाही! घटस्फोट घेऊनही हटवादी आजी माईंच्या दुराग्रहापोटी, अक्षयची पहिली बायको अमृताला त्याच घरात वास्तव्याला ठेवली जाणे हेही बिलकूल न पटण्याजोगे! एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावा अक्षयच्या बाबतीत आणि मालिका संपवा असं सांगून सगळे कंटाळले, पण हा पोरखेळ काही केल्या संपतच नाही याला काय म्हणायचे? "सबकुछ चलता है" दुसरं काय! बहुतेक सर्व मालिकांची अशीच कहाणी आहे. एखाद्या नवीन पात्र मध्येच आणायचे व कथेला काहीतरी वेगळे वळण द्यायचे आणि मालिका पुढे नेत राहायची. बुद्धीला जे पटणार नाही असेच काही ना काही दाखवत राहायचं, चांगुलपणाचा अतिरेक प्रेक्षकांना अगदी नको वाटून, संताप येईपर्यंत "झी युवा" वरच्या "सूर राहू दे" मधल्या आरोही सारखा दाखवत रहायचा, अशा अनेक गोष्टी सांगता येतील. त्यामुळे मालिका मर्यादित षटकांच्या ठराविक कालमर्यादेत च्या असाव्यात हा आग्रह धरला गेला पाहिजे. जाहिरातदार हे बहुदा मराठी भाषिक नसल्यामुळे, त्यांना मालिका कशी चालू आहे त्यात कसे पाणी घातले जात आहे, ह्याची त्यांना कल्पना नसते. सहाजिकच मालिकांना जाहिराती मिळत राहतात. अशा रीतीने प्रेक्षकांच्या बरोबरच जाहिरातदारांचे ही एक प्रकारे नुकसान होत असते. हे सारे केव्हा ना केव्हा थांबायला हवे. टाईमपास म्हणून मालिका बघायच्या असतात, हे मान्य आहे. पण त्यासाठी काहीतरी सर्वसामान्य विचार बुद्धीला पटेल रुचेल असे न दाखवता अशक्यप्राय अशाच गोष्टी दाखवण्याची हौस अखेरीस या मालिकांच्या मुळावर येईल यात वाद नाही. खरं म्हणजे अशा तऱ्हेने भरकटत जाणाऱ्या मालिकांची, कोणतीही दखलच घेण्याची गरज नाही. पण हे प्रभावी माध्यम अधिक चांगल्या तऱ्हेने वापरता येऊ शकते अशी तळमळ असल्यामुळे, हा सारा अट्टाहास. पण लक्षात कोण घेतो? सारांश, ठराविक कालमर्यादा असणाऱ्या मालिका हव्यात आणि त्यांच्यावर प्रदर्शनपूर्व सेन्साँर किंवा निरीक्षण मंडळ हवे असा साऱ्याच प्रेक्षकांनी आग्रह धरायला हवा. अथवा इडियट बॉक्सवर पूर्ण बहिष्कार टाकून वाट चुकलेल्या मंडळींना योग्य त्या मार्गावर परत आणायला हवे. सुधाकर नातू

मंगळवार, १९ मार्च, २०१९

"जन्मगांठीचं रहस्य!":

"जन्मगांठीचं रहस्य!": जीवनात कधी कधी असे अनुभव येतात की, काही विवाह एखादा धक्का देऊन जमलेले दिसतात व तेव्हा आपल्याला जन्मगांठी ह्या स्वर्गात बांधल्या जातात, यावर विश्वास बसतो. बहुधा, प्रत्येकाचा विवाह हा कादंबरीपेक्षा चमत्कृतीपूर्ण घटनांनी, तुम्हाला कल्पनाही येणार नाही अशा रितीने जमतो. बहुतांश विवाह जमण्यात, कोणता तरी एकमेकांशी संबधीत व्यक्ती किंवा घटना अथवा जागा ह्यांचा अतर्क्य असा गूढ संबध असतो किंवा त्यामागे काहीतरी पूर्वाश्रमीची इच्छा असू शकते. असा निष्कर्ष मी कसा व कां काढला असावा? तर त्याचे असे झाले की ह्या विषयावर एका ज्योतिषी मित्राबरोबर गप्पा मारत असताना, तो मला म्हणाला की, त्याच्या मुलाचा विवाह कुणालाही नवल वाटेल अशा तर्हेने जुळून आला. होता. आमच्या गप्पांत, माझ्या मित्राने त्या चमत्क्रुतीपूर्ण जन्मगांठीची सांगितलेली गोष्ट उदाहरण म्हणून, मी त्याच्याच शब्दात थोडक्यात येथे सांगतो : "जन्मगांठीचं रहस्य!": "तेव्हा माझा मुलगा उत्तम शिक्षण पार करून चांगल्या नोकरीत सेटल झाला होता. सहाजिकच त्याचा विवाह जुळविण्याच्या प्रयत्नात आम्ही होतो. आमच्या घरी अशाच एका संध्याकाळी, एक ग्रहस्थ अचानकच आले. आमच्याकडे येण्याची काहीही पूर्वसूचना त्यांनी दिली नव्हती व एखाद्या आंगतूकासारखे ते आले होते. तेव्हा आम्ही कुठेतरी बाहेर जाणार होतो. तो शनीवारचा दिवस होता आणि माझ्या मुलीचा विवाह नुकताच झालेला असल्यामुळे आणि ती दोघं, महाबळेश्वरला जाणार असल्यामुळे आम्ही गडबडीत होतो. येता येताच, मी नको नको म्हणत असताना, त्या ग्रहस्थांनी माझ्या हातात त्यांच्या मुलीच्या पत्रिकेचा कागद टेकवला. नंतर मी आतल्या खोलीत बसलेल्या माझ्या मुलाला तो दाखवला. पण त्यावरील माहीती पाहून तो मला म्हणाला "त्यांना आत्ता नको असे कळवा व काही करून जायला सांगा". आम्ही गडबडीत असूनही हा माणूस आमचे काही ऐकत नाही आणि आमच्या हातात मुलीची पत्रिका बळेबळेच टेकवितो, याचा मलाही तसा रागच आला होता. त्यामुळे बाहेर येऊन मी कशीबशी त्या माणसाची बोळवण केली. नंतर मुलाशी गप्पा मारताना लक्षात आले की, तो जिथे कामाला होता, तेथे एक मित्र होता त्याच्या बरोबर काम करणारा, त्याचीच ही मुलगी चुलत मेहुणी होती. त्यामुळे उद्या आपण जर ह्या मुलीला कदाचित नकार दिला, तर मित्राबरोबरचे आपले संबंध बिघडू शकतील असे वाटल्याने, तो त्या गृहस्थांना नको सांगून, बाहेर पाठवा असे म्हणाला होता. दुसरा दिवस रविवार होता. सकाळी मी सहज म्हणून त्या मुलीची पत्रिका हातात घेतली अन् नजर टाकताच मला स्वग्रहीचा गुरु लग्नस्थानी असलेला दिसला. हा एक अत्यंत शुभयोग असल्याने मी प्रभावित झालो व लगेच वेळ न दवडता, ती पत्रिका माझ्या मुलाच्या पत्रिकेशी जुळते कां ते अभ्यासिले. आता आश्चर्य करण्याची पाळी माझी होती! त्या दोन्ही पत्रिका उत्तम जुळत होत्या. अचानक मला वाटू लागले की, काही झालं तरी ह्या मुलीला पहाण्यासाठी आम्ही जायलाच हवे. अनायसे तो रविवार होता, आणि त्या दिवशी दुसरी कोणतीच एंगेजमेंट आमची नव्हती. मी वेळेचा आपण नेहमी अचूक उपयोग करावा असे व्यवस्थापन मॅनेजमेंटची आवड असल्यामुळे वाटणारा माणूस, त्यामुळे मी ठरविले की why waste this Sunday, आपण आजच सायंकाळी त्या मुलीला पहायला सगळ्यांनी जाऊ या! मी लगेच फोन उचलला आणि त्या गृहस्थांना सांगितले:"काल तुम्ही आम्हाला, जी पत्रिका दिली ती तुमच्या मुलीची पत्रिका, माझ्या मुलाच्या पत्रिके बरोबर जुळते. त्यामुळे आज संध्याकाळी आम्ही तुमच्याकडे मुलगी बघायला येऊ कां?" आता, गंमत बघा, काल नको नको म्हणत नकार दिला आणि ज्यांची बोळवण केली, त्यांनाच आज मी सांगत होतो की आम्ही तुमच्याकडे येतो! कोणता मुलीचा बाप असा प्रश्न विचारल्यावर, तुम्ही येऊ नका म्हणून सांगेल? सहाजिकच त्यांनी आम्हाला जरूर या असे सांगितले. आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी त्यांच्याकडे मुलगी बघायला गेलो. मुलाने मुलगी पाहणे वगैरे प्रोग्राम झाला आणि गंमत अशी की मुलाला मुलगी पसंत पडली! यथावकाश त्या दोघांचा विवाहही झाला. जन्मगांठीचं रहस्य खरोखर गुढ असतं हे जे मी म्हणतो ते यामुळेच! जी पत्रिका नको म्हणून नाकारत होतो आणि जे गृहस्थ कधी एकदा बाहेर जातात असे आम्हाला वाटत होतं, त्यांच्याच मुलीशी माझ्या मुलाचं लग्न ठरलं गेलं! होत्याच नव्हतं होतं, तसंच नव्हत्याचं होतं, सुद्धा अशा योगायोगाने होऊ शकतं, हा अनुभव ह्या विवाहजुळणीच्या कहाणी वरून मला ध्यानांत आला. ह्या घटनेपायी, सहाजिकच मला नवल वाटलं की, असं का व्हावं? मी विचार करू लागलो. नंतर काही दिवसांनी मला ध्यानात आलं की, माझे वडील आणि आम्ही सगळे कुटुंबीय ज्या बरॅक्स मध्ये रहात होतो, त्या तोडून तिथे एखादी सहकारी सोसायटी बनवून इमारत बांधायचा यशस्वी प्रयत्न केला गेला होता. आपल्या आयुष्याची सारी पुंजी, आपल्या स्वतःच्या सदनिकेत माझ्या वडिलांनी घातली होती. त्या इमारतीसाठी जो प्लॉट या सोसायटीला मिळाला तो ह्या मुलीच्या आजोबांचा होता! गंमत बघा ज्या आजोबांच्या प्लॉटवरील इमारतीत ज्यांची सदनिका होती, त्यांच्याच नातवाशी त्यांच्या नातीचा पुढे विवाह जुळला. विवाहानंतर माझ्या मुलाची उत्तरोत्तर खूप भरभराट झाली आणि आता त्याचे चौकोनी कुटुंब युरोपमध्ये चांगले स्थायिक झाले आहे!" ह्या रंजक कहाणीवरुन आपली खात्री होऊ शकते की, "जन्मगांठी स्वर्गात जुळतात"हे काही उगाच म्हंटले जात नसावे. आपल्या संस्कृतीमध्ये सात जन्म हाच नवरा मिळू दे अशी जी प्रार्थना केली जाते आणि तसंच होतं अशी समजूत आहे, ती सुद्धा कदाचित खरी असावी. मुलाकडचे किंवा मुलीकडचे कुठल्या ना कुठल्या प्रकारे जागेमुळे म्हणा किंवा माणसांमधल्या संबंधांमुळे म्हणा, काहीना काहीतरी पूर्वी ऋणानुबंध जुळलेले असतात अन् पुन्हा पुन्हा जन्मोजन्मी अशाच प्रकारे जन्मगांठी जुळून येतात, असंच म्हणायचं कां या कथेवरून? तुम्ही स्वत: विचार करा आणि बघा, वेगवेगळे विवाह कसे जमले ते. त्यामध्ये एकमेकांशी अशा तऱ्हेचे ऋणानुबंध पूर्वी होते कां याचा अभ्यास करा. मला खात्री आहे की, त्यांत काहीतरी तथ्य आहे हे तुमच्या लक्षात येईल. तर असे आहे जन्म गाठीचे रहस्य! ह्या लेख मालिकेमध्ये, मी म्हणूनच अशा तर्‍हेच्या रंजक आणि चमत्कृतीपूर्ण विविध विवाहजुळणीच्या कहाण्या तुम्हाला सांगणार आहे. धन्यवाद. सुधाकर नातू.

गुरुवार, १४ मार्च, २०१९

सुधा" दिवाळी अंक-२०१८: "पुढचं पाऊल" १ नोव्हें'१८ ते ३१ डिसें'१९ चे संपूर्ण राशी भविष्य:

‘सुधा’-दिवाळी अंक:2018: 'नियतीचा संकेत': "पुढचे पाऊल" अर्थात राशीभविष्य: १नोव्हे.१८ ते ३१ डिसें'१९ भारतीय ज्योतिष चंद्राला महत्व देते तर पाश्च्यात्य ज्योतिष रविला. त्यामुळे, आपल्या जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो, ती आपली जन्मरास मानली जाते. चंद्र सर्वसाधारणपणे एका महिन्यात बाराही राशींचा प्रवास पूर्ण करतो, त्यामुळे आपली जन्मरास ठरविताना, जन्मतारिख महिना वर्ष व जन्मवेळ माहीत असावी लागते. चंद्रावर आधारित भारतीय ज्योतिष अधिक सूक्ष्मपणे वस्तुनिष्ठ, तसेच व्यक्तिनिष्ठ विचार करते. आपले आयुष्य ही विशिष्ठ परिस्थितींत घेतलेले वा न घेतलेले निर्णय आणि त्यानुसार केलेली क्रुती वा न केलेली क्रुती ह्यांच्या परिणामांची अखंडीत श्रुंखला असते. परिस्थितीदेखिल नित्य नव्याने बदलत रहात असते. ह्या सर्व घडामोडींमागे आपले मन एखाद्या सारथ्याची भूमिका बजावत असते. मानवी मनावर चंद्रभ्रमणाचा यथोचित परिणाम होत असतो आणि प्रुथ्वीवरील समुद्राच्या भरती ओहोटीचा संबंध चंद्राच्या दररोजच्या भ्रमणावर अवलंबून असतो हे सर्वश्रुत आहे. आपल्या शरिरात सुमारे सत्तर टक्के पाणी असते. सहाजिकच चंद्रभ्रमण आपले विचार निर्णय व क्रुतीवर प्रभाव पाडत असते, हे ओघाने आले. ह्या विचारमंथनामुळे चंद्रभ्रमणाला केंद्रीभूत मानणारे भारतीय ज्योतिष तर्कशास्त्राला पटू शकेल असे तथ्य आहे. अनुकूल गुण पद्धती: कालचक्र अव्याहत फिरत असते, माणसाच्या आयुष्यात काही दिवस सुखाचे तर काही दु:खाचे असतात. हा क्रम प्रत्येकाला अनुभवाला येतो. उद्याचा दिवस, आजच्यापेक्षा अधिक चांगला जावा ह्या आशेवर माणूस जगत असतो. उद्याचे पुढचे पाऊल कसे असेल, येणारा काळ कसा असेल, अनुकूल वा प्रतिकूल आणि तोही किती प्रमाणात हे कळण्याच्या इच्छेने तो दर वर्षी उत्सुकतेने राशीभविष्य पहात असतो. माणूस उंच वा बुटका आहे, जाडा किंवा बारिक आहे, तो गरिब वा श्रीमंत आहे अशा विधानांवरुन आपल्याला निश्चित अशी काही कल्पना येत नाही. ती येण्यासाठी कोणते तरी त्या विषयाशी संबंधित असे अनुरूप संख्यात्मक परिमाण आवश्यक असते. जसे उंची सेंटी मीटर, वजनासाठी किलोग्राम, आर्थिक स्थितीसाठी रुपये असे परिणाम संख्यात्मक द्रुष्टिने दाखवता येते. ह्याच पद्धतीने आपले आगामी दिवस कोणाला कसे जातील, हे भविष्याच्या ज्ञानाच्या आधारे सांगण्याची पद्धत म्हणजे राशीभविष्य होय. नशिबाच्या परिक्षेची टक्केवारी: पहिल्या स्तंभात प्रत्येक राशीच्या खाली डाव्या बाजूला त्या राशीचा नशिबाचा ह्या वर्षीचा तर उजव्या बाजूस मागील वर्षीचा अनुक्रम दाखवला आहे. ३१ दिवसांचा महिन्यांचे प्रत्येक महिन्याचे जास्तीत जास्त गुण १८६, तर 30 दिवसांच्या महिन्यांचे जास्तीत जास्त गुण १८० आणि फेब्रुवारी २०१९ चे जास्तीत जास्त अनुकूल गुण १६८. याप्रमाणे प्रत्येक महिन्याला ग्रह किती शुभ दिवस आहेत ते अनुकूल गुण, त्या त्या महिन्याला शेकडा किती टक्के आहेत हे प्रत्येक राशीच्या शेवटी दाखवलेले आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्यात आपले नशिब किती टक्के गुण मिळवते, हे समजू शकेल आणि त्या आधारे प्रयत्न आणि अपेक्षा यांचा समतोल राखत समाधान मिळवण्याची युक्ती तुम्हाला मिळू शकेल अशी अनुकूल गुणांची कल्पना आहे. अनुकूल गुणांच्या पद्धती: नियम आम्ही गेले तीन दशके त्याकरता अभिनव अशा अनुकूल गुणांच्या पद्धतीचा उपयोग करत आहोत. प्रत्येक राशीला सहा प्रमुख ग्रहांच्या बदलत जाणार्या स्थितीचा अभ्यास करून ज्योतिषांतील पुढील नियमांचा आधार घेऊन वर्षभरात प्रत्येक माहवार किती दिवस अनुकूल आहेत त्याचे गणित मांडून अनुकूल गुण देतो. ते नियम असे आहेत: रवि: ३,६, १० व ११ वा शुभ मंगळ: ३,६, व ११ वा शुभ बुध: २,४,६,८,१० व ११ वा शुभ गुरू: २,५,७,९, व ११ वा शुभ शुक्र: १,२,३,४,५,८,९,११ व१२ वा शुभ शनी: ३,६, व ११ वा शुभ "नशिबाची गटवारी": आगामी १४ महिन्यांच्या कालखंडात वरील महत्वाच्या ग्रहांच्या विविध राशीप्रवेशानुसार ह्या नियमांचे आधारे ते किती दिवस शुभ आहेत, ते आजमावून माहवार शुभदिवस अर्थात अनुकूल गुण देऊन, त्याप्रमाणे राशीनिहाय अनुकूल गुण कोष्टक पुढे दिलेले आहे. तशीच एकूण संपूर्ण कालखंडातील गुणांच्या बेरजेवरून पुढील पाच सुलभ गटात त्यांची विभागणी केली आहे: १.उत्तम पहिला गट: तुळा, कर्क व कुंभ राशी. २.उजवा दुसरा गट: मकर, व्रुषभ राशी. ३.मध्यम तिसरा गट: मीन राशी. ४.डावा चौथा गट: मिथून, धनु, सिंह व कन्या. ५.त्रासदायक पाचवा गट: मेष व व्रुश्चिक राशी. शनीची साडेसाती: साडेसाती म्हणजे काय? गोचरीचा शनि जेव्हां तुमच्या चंद्रराशीच्या मागील राशीत येतो, तेव्हा साडेसाती सुरू होते व तुमच्या राशीच्या पुढील राशीनंतर येणार्या राशींत जातो, तोपर्यंत साडेसाती असते..... उदा: सध्या धनु राशींत शनी आहे, म्हणून आता व्रुश्चिक, धनु व मकर राशींना साडेसाती आहे. शनी कुंभेत जेव्हा प्रवेश करेल, तेव्हा व्रुश्चिक राशीची साडेसाती संपेल. ✴८. वृश्चीक▪५ नोव्हेंबर २०११ रोजी सुरु सुरु झालेली असुन दिनांक २४ जानेवारी २०२० रोजी संपेल. ✴९. धनु▪ २ नोव्हेंबर २०१४ रोजी सुरु सुरु झालेली असुन दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी संपेल. ✴१०. मकर▪२६ जानेवारी २०१७ रोजी सुरु सुरु झालेली असुन दिनांक २९ मार्च २०२५ रोजी संपेल. "राशीनिहाय संक्षिप्त राशीभविष्य": मागील व यंदाच्या एकूण अनुकूल गुणांचा विचार करता, राशीनिहाय नशिबाचा चढ उतार हा असा असेल: १मेष रास आठव्या क्र. वरून ११व्या क्रमांकावर घसरलेली आहे. २.व्रुषभ राशीने हनुमान उडी घेऊन तळाच्या बाराव्या स्थानावरून चक्क ५व्या अधिक शुभफळे देणार्या क्र.वर आपली जागा निश्चित केली आहे. ३.मिथून राशीच्या नशिबी मागील ३र्या स्थानावरून आता ७ व्या स्थानी जाण्याची वेळ आली आहे. ४. कर्क राशीचे नशीब ४थ्या क्र.वरुन आता दुसर्या स्थानी अधिक फळफळलेले दिसेल. ५ सिंह मंडळी कर्कराशीच्या उलटा अनुभव ७ ते ९वी जागा मिळेल व नशीबाची आणखीनच फरफट होताना पहाणार आहेत. ६ कन्या रास सहाव्या समतोल साधणार्या जागेवरून कटकटी वाढवणार्या दहाव्या स्थानी ढकलेले जाईल. ७ तुळा राशीने ह्या वर्षी विक्रमी गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला आहे. ८ व्रुश्चिक रास दहाव्या क्र.वरुन तळाच्या बाराव्या स्थानी नशिबात अधिक अडचणी आलेल्या पाहील. ९ धनु राशीच्या गुणांमध्ये खूप घसरण झाल्यामुळे आता ५व्या क्रमांकावरुन कटकटी वाढविणार्या ८ व्या स्थानी फेकली जाईल. १० मकर राशीचे नशीब गुणांमध्ये उत्तम वाढ झाल्याने ११व्या स्थानावरुन सुखदायी ४ थे स्थान मिळवेल. ११ कुंभ राशीच्या गुणांमध्ये घसरण आहे, सहाजिकच मागील सर्वोच्च जागेवरून आता तिसर्या स्थानी नशीब आजमावणार आहे. १२ मीन रास त्रासाच्या नवव्या स्थानावरुन सहाव्या स्थानी समतोल साधेल. राशीनिहाय राशीभविष्य": १. मेष: अंधे जहाँके, अंधे रास्ते, जाए तो जाए कहाँ!: मेष रास मंगळाची रास आहे रवी येथे उच्चीचा होतो त्यामुळे तुम्ही शीघ्रकोपी महत्त्वाकांक्षी असतात उद्योग करत राहणे हा तुमचा स्थायीभाव असतो येथे शनी नीचेचा होत असल्याने शनीच्या साडेसातीचा तुम्हाला जास्त असतो वय वर्ष 28 नंतर सर्वसाधारणपणे तुमचा भाग्यदय येतो विवाह हे दृष्टीने तुला राशि तुमचे चांगले धागेदोरे बोलतात सिंह धनू राशीच्या व्यक्ती तुमचा संसार गोडीचा होऊ शकतो कारण त्यांच्याशी नवपंचम योग होतो मात्र मृत्यू षडाष्टक आतील कन्या रास मात्र तुम्हाला त्याकरता पूर्ण वर्ज्य असते. मेष रास आठव्या क्र. वरून ११व्या क्रमांकावर ह्या कालखंडात घसरलेली आहे. तेव्हाच्या ९७३ अनुकूल गुणांवरून तुम्ही ८३८ गुणांची यंदा नशिबाची पिछेहाट अनुभवणार आहात. मागील वर्षी शुभस्थानी असलेल्या गुरुची आठव्या व्रुश्चिक राशीतले भ्रमण मनाविरुद्ध परिस्थिती निर्माण करून तुमची परिक्षा पाहील. मनस्थिती संभ्रमित राहिल्याने योग्य ते निर्णय घेणे कठीण बनेल. त्यातले त्यात, गुरु आगामी वर्षी भाग्यांत धनु राशीत असेल तो काळ विस्कळित घडी काही अंशी सावरू शकेल. राहू केतुचे अनुक्रमे तिसर्या व नवव्या स्थानातले प्रवेशही अडचणींशी खंबीरपणे मुकाबला करण्याचे धैर्य देतील. विवाहोत्सुकांना विलंब, समजूतीचे घोटाळे अशी प्रतिकूल स्थिती आहे. नोकरी व्यवसायात वरिष्ठ नाराज वा स्पर्धेत दमछाक होऊ शकते. प्रवास काळजीपूर्वक करावेत, दौरे वा पर्यटनाचे मनसुबे लाबणीवर टाकावे लागतील. विद्यार्थ्यांनी परिश्रम अधिक घेऊनही अपेक्षित यश लपंडाव खेळेल. पोटदुखी वा डोकेदुखी सारखी अनारोग्याची वेळीच तपासणी करून घ्यावी. महिलावर्गाला घरातील अशांत वातावरणात मनाला मुरड घालावी लागेल. अनुकूल गुणांचा विचार करता फेब्र, जून जुलै व नोव्हे'१९ हे महिने नशीबाच्या रखरखीत उन्हाळ्यात ओअँसीस भासतील. एकंदर अंधारात प्रकाशाचे कवडसे शोधत मार्गक्रमणा करायची तयारी ठेवा. २. व्रुषभ: मज काय कमी, सुख आले माझ्या दारी!: क्रुत्तिका नक्षत्राचे तीन, पूर्ण रोहिणी व म्रुगाचे दोन चरण ह्यांनी ही शुक्राची रास बनली आहे. चंद्र इथे उच्चीचा होतो व कुणीही ग्रह नीचीचा नाही. त्यामुळे तुम्ही नेहमी उत्साही आनंदी असून उद्योग मग्नता हे तुमचे वैशिष्ट्य आहे. रसिकता विलासी व्रुत्ती व खिलाडूपणा असतो. नेहमी नीटनेटके व प्रसंगानुसार व्यवस्थित रहाणे पसंत करता. आळस नसतो, तारुण्यात अडचणींवर मात करून तुम्ही स्वबळावर जीवनात स्थैर्य व प्रगती साधता. म्रुत्युषडाष्टकातील धनु राशी, विवाहासाठी वर्ज्य आणि व्रुश्चिक ह्या मंगळाच्या राशीबरोबर तसेच नवपंचम योग साधणार्या कन्या मकर राशीच्या जोडीदारांबरोबर संसार सुख समाधानाचा होऊ शकतो. वृषभ राशी ला या वर्षी चांगले गुण मिळाले आहेत त्यामुळे त्यांचा पाचवा क्रमांक आलेला आहे मागच्या वर्षी तो तळाला होता. सहाजिकच यावर्षी तुमची विविध क्षेत्रामध्ये प्रगती होणार आहे. तुमच्या राशीने मागील ६७७ गुणांवरून १११२ गुण अशी, हनुमान उडी घेऊन तळाच्या बाराव्या स्थानावरून चक्क ५व्या अधिक शुभफळे देणार्या क्र.वर आपली जागा निश्चित केली आहे. वृषभ राशी ला या वर्षी चांगले गुण मिळाले आहेत कारण गुरू आता तुमच्या शुभफलदायी अशा सप्तम स्थानी रहाणार आहे. सहाजिकच यावर्षी तुमची विविध क्षेत्रामध्ये प्रगती होणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये चांगले यश मिळवून स्पर्धात्मक अशा निवडीमध्ये अपेक्षापूर्ती होईल. विवाहोत्सूकांना, हे वर्ष गोड बातमी देणारे आहे. नोकरी धंद्यामध्ये तुमच्या कल्पना प्रत्यक्षात आल्यामुळे आर्थिक भरभराट संभवते. काही भाग्यवंतांना अपेक्षित प्रमोशन मिळू शकेल. प्रवासाचे योग येऊन नवीन ओळखी होतील. त्यांचा तुम्ही युक्तीने आपल्या प्रगतीसाठी उपयोग कराल. मात्र काही काळ पुन्हा षडाष्टक योगात जात असल्यामुळे तुम्हाला सावधानतेने निर्णय घ्या असे सांगतो. महिलांना आणि एकंदरच कुटुंबामध्ये खेळीमेळीचे वातावरण राहील आणि संततीबाबत उत्साहवर्धक बातमी कानावर येईल. 3.मिथून: "मन मनास उमगत नाही, आधार कसा हा शोधू?": मिथुन रास हि विचारही बुद्धिमान बुद्धाची रास आहे. स्त्री-पुरुषाचे युगुल असे बोधचिन्ह असल्याने स्त्रीची कोमलता व तर पुरुषाचा अहंकार असे द्विस्वभावी रूप तुमच्या राशीचे असते. कोणताही ग्रह येथे उच्चीचा वा नीचीचा होत नाही. आपल्या मनात काय चाललंय हे तुम्ही कुणालाच कधी जाणवू देत नाही. बोलघेवडेपणा मिश्किल थट्टा तुम्हाला आवडते. तूळ व कुंभ या नवपंचम योगातल्या राशीचे जोडीदार तुमच्याशी संसार चांगला करतात, मात्र वृश्चिक ही बुधाचा शत्रू असलेल्या आणि तुमच्या षडाष्टकात असलेल्या मंगळाची रास तुम्हाला विवाह साठी टाळावी लागते. म्रुगाचे दोन चरण रोहिणी पूर्ण व पुनर्वसु नक्षत्राचे तीन चरण मिळून ही राशी बनते. मिथुन राशीला यावर्षी अनुकूल गुणांमध्ये खुप घट झाल्यामुळे अतिशय त्रासदायक असे अनुभव येणार आहेत मागच्या वर्षीच्या १२५३ गुणांवरून आता ८७८ इतके गुण कमी झाल्यामुळे ही वेळ आली आहे. सहाजिकच तिसरे स्थान सोडून, सातव्या स्थानावर जायची वेळ आली आहे. गुरु षडाष्टकात गेल्यामुळे त्यांचे पाठबळ नाही, तसेच नाराज शनि देखील सप्तमस्थानी संपूर्ण कालखंड आहे. त्यात भर म्हणून पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये राहू तुमच्या राशीत येत आहे. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक पावले टाकावी लागतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची खप्पामर्जी होईल व बाजारामध्ये स्पर्धा वाढल्यामुळे तुमच्या नफ्यात घट होऊन तोटा सहन करावा लागू शकतो. म्हणून अतिशय काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. विद्यार्थी वर्गाला प्रयत्न वाढवावे लागतील, तेव्हा कुठे कसेबसे यश मिळेल. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये मात्र जास्त अपेक्षा ठेवू नये. विवाहोत्सुकांना हा कालखंड प्रतिकूल आहे, त्यातल्या त्यात मे१९ च्या आसपास काही काळ गुरू धनु राशीत म्हणजे तुमच्या सप्तमस्थानात असल्यामुळे त्या काळात कदाचित अपेक्षापूर्ती होऊ शकेल. प्रवासामध्ये काळजी घ्यावी लागेल, आर्थिक नुकसानीची दाट शक्यता आहे, तसेच छोटे-मोठे अपघात होऊ शकतात. संसारामध्ये अभिमन्यूसारखी चक्रव्यूहात अडकल्यासारखी परिस्थिती निर्माण होईल. जोडीदार नाराज असेल आणि संततीचे बाबतीत आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. सारांश कठीण काळ भविष्यात जाणार आहे हे मनात घोकत कष्ट व सहन शक्ती वाढवणे हेच गरजेचे आहे. ४ कर्क: जिंदगी एक सफर, है सुहाना!: कर्क रास ही चंद्राची रास असल्यामुळे भावनाप्रधान कल्पक व प्रतिभा माणसांची राशी आहे. मंगळ येथे नीचीचा तर गुरु उच्चीचा होतो. संसारात तुम्हाला खूप गोडी असते. तुम्हाला माणसे हवीहवीशी असतात. प्रेमात तुमच्या चंचल स्वभावामुळे नुकसान फसगत होऊ शकते. कवी-लेखक कलावंतांची ही रास जीवनात सुखदुःखाचे वादळवारे नेहमी पचवत असते. विवाह करता मृत्यू षडाष्टकातील कुंभ रास वर्ज्य, तर मीन व वृश्चिक राशी नवपंचम योगामुळे शुभ फळे संसारात देतात. पुनर्वसु चा एक चरण तर सर्वात शुभ नक्षत्र पुष्य पूर्ण व अनिष्ट आश्लेषा नक्षत्राने ही रास बनते. कर्क राशीचे नशीब ४थ्या क्र.वरुन आता दुसर्या स्थानी अधिक फळफळलेले दिसेल. ११८९ वरून अनुकूल गुणांमध्ये वाढ होऊन ते १४४८ इतके झाल्यामुळे तुम्हाला विविध क्षेत्रांमध्ये काय करू आणि काय नको असा उत्साह निर्माण होऊ शकतो. संपूर्ण कालखंड प्रगतीपथावर नेणारा असेल. अडचणी आणि विरोध त्याला योग्य प्रकारे तोंड देऊन तुम्ही नोकरी व्यवसायात आपली प्रगती कराल. यावर्षी गुरु तुमच्या नवपंचम योगात असल्यामुळे, नोकरीमध्ये प्रमोशन व्यवसायात चांगली भरभराट होऊ शकते. काही भाग्यवंतांना परदेशगमनाचे योग आहेत. मात्र कुठलाही अतिरेक करू नका व तब्येतीस जपावे लागेल. संसारामध्ये वडीलधाऱ्यांच्या प्रकृतीची वेळीच काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थी वर्गाला चांगले यश मिळणार आहे, तसेच स्पर्धात्मक परीक्षांमध्ये ते आघाडीवर राहतील. महिलांना आणि कुटुंबामध्ये नवीन पाहुणे येणे, त्यांचा पाहुणचार करणे आणि एकंदरच खेळीमेळीचे वातावरण राहणे, मंगल कार्य होण्याची शक्यता अशी शुभ फळे आहेत. थोडक्यात, संयम ठेवला तर आनंद सौख्य मिळणार आगे बढो! ५ सिंह: राही मनवा, दुखकी चिंता क्यूं सताती है!: वनराज सिंहाची ही रास, सर्वांवर अधिकार गाजवते कुणाकडे हार जाणे तुम्हाला आवडत नाही. आपला शब्द हा अंतिम असावा असा तुमचा आग्रह असतो. एक प्रकारचा हट्टी स्वभाव हे तुमचे वैशिष्ट्य असते. मात्र तुम्ही दीर्घोद्योगी निश्चय व महत्त्वाकांक्षी असल्यामुळे जीवनात नेहमी अग्रेसर राहून यश मिळवू शकता. नवपंचम योगातील मेष व धनु राशीचे जोडीदार विवाहासाठी अनुकूल ठरतात, तर मृत्यू षडाष्टकातील मकर रास चालत नाही, पूर्ण बघा आणि पूर्ण पूर्वा नक्षत्र तर उत्तरा नक्षत्राचा एक चरण मिळून ही रास बनते. जीवनात मध्यम वयात तुम्हाला स्थैर्य व भरभराट अनुभवास येते. सिंह मंडळी कर्कराशीच्या उलटा अनुभव ७ ते ९वी जागा मिळेल व नशीबाची आणखीनच फरफट होताना पहाणार आहेत. ९८३ गुणांवरून आता ८७० गुण तुम्हाला मिळाले आहेत त्यामुळे काळजी घेऊन निर्णय घ्यायला लागतील गुरूचे पाठबळ पुष्कळ काय नाही शनि देखील पंचमात आहे आणि तुमचा भाग्येश मंगळ राशीच्या षडाष्टकात मकर राशीत असल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत दिवस काढायचे आहेत कालचक्राचा महिमा अगाध व तर के असतो वाढत्या जबाबदाऱ्या आजारपण व चुकलेले आर्थिक निर्णय यामुळे आर्थिक बाजू सावरता ना तुमची दमछाक होईल नोकरी व्यवसायात कामात मन न लागणे नको ते काम नको त्या ठिकाणी बदली अशी प्रतिकूल स्थिती असेल ंसारात जोडीदाराशी मतभेद वडीलधार्या तब्येतीची काळजी संतती विषयक समस्या यांनी आगामी वर्ष कसोटी पाहणारे आहे मनःशांती झाल्यामुळे डोकेदुखी पोटदुखी प्रवासात विलंब होऊ शकतात विद्यार्थीवर्गाला प्रयत्न अधिक वाढवायला लागतील तरी अपेक्षा पूर्ण होतील याची खात्री नाही थोडक्यात रखरखीत वाळवंटात तळपत्या उन्हात तुम्हाला वाटचाल करायचे आहे ६. कन्या: जब दिल ही टूट गया, हम जी कर क्या करेंगे?: अत्यंत चिकित्सक कन्या राशीची माणसे संशयी व आतल्या गाठीची असतात अकाउंट्स ऑडिट वकिली पेशात उत्तम यश मिळवतात ही बुद्धाची रास असून बुद्ध येथे उच्चीचा होतो मात्र शुक्र येथे नीतीचा होतो शैक्षणिक यश वाद-विवादात तुम्ही छाप पाडतात मात्र तुम्ही नेहमी काळजी किंवा चिंता करत असतात त्यामुळे कपाळावर कायमच्या असे हे माणसांचे स्वरूप असते निर्भेळ सुख मिळवणे तुम्हाला कठीण होते विवाह हे दृष्टीने मृत्यू षडाष्टक आतील मेष रास टाळावी तर बुद्ध व मकर हे नवपंचम रात्रीतले जोडीदार तुमच्या बरोबर संसार आनंदाचा करू शकतात उत्तरा नक्षत्रातील पूर्ण हस्त व चित्रा नक्षत्राचे दोन चरण यांनी कन्या रास बनते. कन्या रास सहाव्या समतोल साधणार्या जागेवरून कटकटी वाढवणार्या दहाव्या स्थानी ढकलेले जाईल. मागील वर्षीच्या अकराशे चार अशा समाधानकारक गुणांवरून ८५४ अशी गुणांची पिछेहाट झाल्यामुळे यावेळेला सहाव्या क्रमांकावरून दहाव्या क्रमांकावर तुम्ही ढकलले गेले आहात. ग्रहमान प्रतिकूल असले की घराचे वासेही कसे फिरतात, त्याचा अनुभव या वर्षी घ्यायचा आहे. नोकरी-व्यवसायात प्रतिकुल घटना व विरोधकांच्या कारवायांमुळे त्रस्त व्हाल. आर्थिक ओढाताण तुमच्या कौटुंबिक स्वास्थ्यांत अडथळे निर्माण करेल. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निकालाची धास्ती वाटू शकेल अधिक नेटाने अभ्यास करायला हवा. घरातील वडीलधारी तुमच्याशी वाद घालून मनस्ताप वाढवतील. प्रवास तसेच नवीन गुंतवणूक सांभाळून करा नाहीतर फसवणूक होऊ शकेल. तुमच्या संशयी स्वभावामुळे अडचणीचे तसेच गैरसमजाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. विवाहोत्सुकांना विलंब स्विकारावा लागेल, घाई गर्दी नको. सगळेच फासे उलटे पडत आहेत असे म्हणायची वेळ आली, तरी धीर सोडू नका, केवळ श्रद्धा संयम आणि सबुरी या जोरावर दिवस काढायचे आहे. ७ तुळा: आनंदाचे डोही आनंदतरंग!: चित्रा नक्षत्राचे दोन चरण स्वाती पूर्ण व विशाखा नक्षत्राचे तीन चरण यांनी बंधारे तुला रास शुक्राची असून शनि येथे उच्चीचा व रवि नीचीचा होतो, त्यामुळे तुम्हाला शनीच्या साडेसातीचा त्रास तितकासा जाणवत नाही. तराजू हे बोधचिन्ह विवेकबुद्धी व सारासार विचार करून विवेकाने कोणताही निर्णय घेण्याची वृत्ती तुमची असते. टापटीप छान दिसण्याची हौस व मौज-मजा तुम्हाला आवडते. वयाच्या तिशीनंतर उत्तम प्रगती होते. नाट्य-चित्रपट व प्रसिद्धी क्षेत्रात तुम्हाला चांगले यश मिळते. विवाहाचे दृष्टीने मेष राशीबरोबर, तुमचे चांगले सूत जुळतंय तर मिथुन या नवपंचम राशीचे जोडीदार आनंदी समाधानी संसार दर्शवितात. मात्र मीन रास अष्टका मृत्यू षडाष्टक योगामुळे तुम्हाला वर्ज्य असते. तुळा राशीने ह्या वर्षी विक्रमी गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला आहे. मागच्या वर्षीच्या १३७४ या गुणांमध्ये भरघोस वाढ होऊन सोळाशे १६२९ एवढे उत्तम गुण मिळाल्यामुळे तुमची पहिल्या क्रमांकावर बढती झालेली आहे. गुरु तुमच्या धनस्थानात यावर्षी बहुतेक काळ असल्यामुळे आणि शनीसारखा महत्त्वाचा ग्रह पराक्रमस्थानी संपूर्ण कालखंड असल्यामुळे तुम्हाला यावर्षी गेमचेंजर असल्यासारखा काळ आनंदात अनुभवायचा आहे. नोकरी-व्यवसायात अनुकूल घटना आणि परदेशगमनाची संधी तुम्ही हस्तगत करू शकाल. तसेच अधिकार पद मिळू शकेल, तर व्यवसायात आर्थिक भरभराट होईल. विवाहोत्सुकांना अनुरूप जोडीदार निवडण्यात यश मिळेल. विद्यार्थी परीक्षांमध्ये आघाडीवर राहून त्यांचे कौतुक होईल. प्रवास मनाजोगते. आर्थिक गुंतवणूक हुशारीने कराल. स्थावर विषयक समस्या दूर होतील. पुढील भवितव्यासाठी योग्य ते निर्णय आत्ताच दूरदृष्टीने घेऊन मजबूत पाया घालू शकणारे हे वर्ष आहे. ग्रहांच्या अनुकूलतेमुळे तुम्ही पहिला क्रमांक मिळवला असल्याने आगामी कालखंडात तुम्ही मिळालेल्या संधीचे सोने करा. माझे शुभ आशीर्वाद तुम्हाला आहेत. ८ व्रुश्चिक: कठीण समय येता, कोण कामास येतो?: सगळ्यात गुढ व आपल्या मनातील खळबळ इतरांना जाणवून देणारी ही मंगळाची रास, शक्यतो एकला चालो रे अशा वृत्तीची असते. चंद्र नीचीचा होतो. अतिरेकी अरेरावी तुमचा घात करू शकते. महत्त्वाकांक्षी, आपलाच अधिकार गाजवण्याच्या ईर्षैमुळे तुम्ही सुरक्षा क्षेत्रात व इंजिनीअरिंगमध्ये यश मिळवता. मात्र जीवनात वैफल्याचा धोका अधिक असतो, कारण तुमची सहनशक्ती मर्यादित असते. विवाहाचेदृष्टीने मिथुन रास मृत्यूषडाष्टक योगामुळे वर्ज्य. वृश्चिक राशीची माणसे वृश्चिक राशी बरोबरच विवाहाचे दृष्टीने योग्य ठरतात. येथे कोणतेही ग्रह उच्चीचे होत नाहीत. विशाखा एक चरण पूर्ण अनुराधा व जेष्ठा नक्षत्र यांनी ही रास बनते. व्रुश्चिक रास दहाव्या क्र.वरुन तळाच्या बाराव्या स्थानी नशिबात अधिक अडचणी आलेल्या पाहील. वरची मागील वर्षी तुम्हाला ७८६ गुण मिळाले होते, तर आता ८२१, त्यामुळे तुमची ही थोडीशी सुधारणा झाली आहे. परंतु एकंदर काळ हा प्रतिकूल आहे, हे विसरून चालणार नाही. धनस्थानी शनि आणि राहू केतू यासारखे महत्त्वाचे ग्रह षडाष्टक योगात, प्रतिकूल असल्यामुळे मनस्थिती ठीक राहणार नाही. निर्णय वेळेत न घेणे वा चुकणे असा अनुभव घ्याल. रहाटगाडग्याप्रमाणे नशिबाचे चक्र गोलाकार फिरत असते. आज उंचावर असलेले उद्या खाली, तर आजचे तळाला तर उद्या उंचावर, हे नशिबाचे खेळ अव्याहत चालतात. त्याचाच क्लेशदायक अनुभव तुम्हाला यावर्षी घ्यायचा आहे. काळ कठीण आहे, रात्र वैऱ्याची आहे. तुम्हाला सुख शांती मिळवताना खूप धडपड करावी लागेल, तर दुःख तुम्हाला नेहमीच आपलंसं करेल अशी परिस्थिती आहे. प्रवास अडचणीचे तब्येतीची विशेष काळजी घ्या. प्रवासामध्ये अपघाताचा धोका. अचानक मनाविरुद्ध नुकसान करणारे वादाचे प्रसंग तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाहीत. नोकरीधंद्यात प्रयत्नांचे फळ मनाप्रमाणे मिळणारे नाही तर व्यवसायात आडाखे चुकल्यामुळे एखादा मोठा नुकसानीचा फटका बसू शकतो. विवाहोत्सुकांना पुढील वर्षाच्या मध्यंतरात गुरुस्थित्यंतयामुळ थोडा फार काळ अनुकूल आहे बाकी फसगत गैरसमज असे अनुभव येऊ शकतात संसारात एकमेकांशी वाद विवाद अपेक्षाभंग पाहुण्यांची उगाचच वर्दळ यामुळे त्रस्त रहा तब्येतीची वेळीच काळजी घ्यावी अशी परिस्थिती आहे विद्यार्थ्यांचा अपेक्षाभंग असल्यामुळे त्यांनी अधिक प्रयत्न करावेत अपेक्षा कमी ठेवाव्यात एक लक्षात ठेवा कठीण काळ भविष्यात केव्हा तरी जाणारच आहे तोपर्यंत प्रयत्न कष्ट हाच मंत्र आपल्याला जपायला हवा. ९. धनु: आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास!: ही गुरूची रास असून येथे कोणताही ग्रह उच्चीचा व नीचीचा होत नाही. मूळ पूर्वाषाढा ही नक्षत्रे पूर्ण व उत्तराषाढा चा एक चरण यांनीही राशी बनते. मूळ नक्षत्री जन्म असेल तर त्याची शांती करावी लागते. सोशिकता चांगुलपणा व कष्टाळू वृत्ती यामुळे अडचणीतून मार्ग काढून तुम्ही पस्तिशीनंतर जीवनात स्थैर्य मिळवता. मेष व सिंह राशीचे जोडीदार संसारात नवपंचम योगामुळे उत्तम साथ देतात. तर शुक्राची रास मृत्यू षडाष्टका मुळे चालत नाही. मागील वर्षी तुम्हाला ११५६ गुण आता झाले ते ८५८ झाले आहेत. साहजिकच तुमचा क्रमांक पाच वरून आठ असा घसरला आहे. गुरु तुमच्या व्ययात आल्यामुळे त्याचे सहाय्य मिळणार नाही तसेच राहू राशी व राशीपासून मार्चमध्ये सातवा आणि शनी राशीवर त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीशी तोंड द्यावे लागणार आहे मागच्या वर्षीची मृगजळासारखी परिस्थिती संपली आणि आता खरोखर वाळवंट सुरू झाले आहे अपेक्षा कमी ठेवून प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागेल नोकरीधंद्यात त्रासाचे अडचणीचे असे प्रसंग येतील व्यवसायामध्ये अपेक्षापूर्तीचा शक्यता नाही तिचे आरतीचा तुम्हाला मानसिक त्रास होईल जोडीदाराच्या प्रकृती संबंधित नवीन काळजा निर्माण होऊ शकतात विद्यार्थी वर्गाला परीक्षांमध्ये विस्मरण किंवा ऑप्शनला टाकलेला भाग येणे असे अनुभव यावे प्रवास संभाळून करावेत त्यामध्ये विलंब व वाद-विवाद संभवतो वक्त ने क्या किया क्या हसी सितम अशी तुमची यावरची परिस्थिती झालेली आहे शेवटी कालाय तस्मै नमः हेच खरे! १०. मकर: चली, चलीरे पतंग मेरी चलीरे...होके बादलोंके पार.... उत्तराषाढा नक्षत्राचे तीन चरण पूर्ण श्रवण व धनिष्ठा नक्षत्राचे दोन चरण मिळून ही रास बनते. मकर रास ही शनिची रास असल्याने तुम्हाला, त्याच्या साडेसातीचा खास असा त्रास होत नाही. तिथे मंगळ उच्चीचा तर गुरु निश्चित होतो. ध्येय गाठेपर्यंत चिवटपणा, त्याला कष्टाची जोड यामुळे नोकरी-व्यवसायात धीम्या गतीने तुमची प्रगती होते. आपली फुशारकी तुम्ही मारत नाही. कर्तबगार थंड डोक्याने काम करणारी ही माणसे असतात. सिंह रास मृत्यू षडाष्टक योगामुळे विवाहासाठी अयोग्य. तर नव पंचमातील व्रुषभ व कन्या जोडीदार संसारात गोडी आणतात. मकर राशीचे नशीब गुणांमध्ये मागील वर्षीच्या ७०८ गुणांमध्ये ११८९ ह्या कालखंडात अशी उत्तम वाढ झाल्याने ११व्या स्थानावरुन सुखदायी ४ थे स्थान मिळवेल. ह्या बढतीचे कारण म्हणजे लाभात असलेला गुरु होय. गुरू लाभात असल्यामुळे आता काळजी नको. विवाहोत्सुकांना चांगले जोडीदार मिळावेत. तर अपत्यप्राप्तीची इच्छा असणाऱ्या दांपत्याची मनोकामना यंदा पुरी होईल. नोकरी-व्यवसायात आतापर्यंत जे अपमान सहन केले, कष्ट घेतले त्याचे आता चीज होईल. व्यवसायात तुमचे आडाखे योग्य ठरून आर्थिक घडी नीट बसू शकेल. स्थावर विषयक निर्णय व कृती वर्षाच्या मध्यंतरी करणे उत्तम असेल. घरामध्ये वडीलधाऱ्यांचा सल्ला घेत राहा, त्यातच तुमचे हित आहे. मात्र व्ययातील शनी तुमच्या मनाच्या काळज्या वाढवू शकतो व खर्चावर नियंत्रण घालायला लागेल. पोटाच्या दुखण्याची वेळीच काळजी घ्या. विघ्नसंतोषी माणसांबरोबर वाद वाढवू नका, तसेच जोडीदाराबरोबर जुळवून घ्या. प्रवासामध्ये नवे परिचय होतील आणि त्यातून एखादी संधी मिळू शकेल. एकंदर काय परिस्थिती तुम्हाला अनुकूल आहे, त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून आपली प्रगती करून घ्या. Best luck! ११.कुंभ: हसले गं मनी चांदणे!: मातीचा घडा असे कुंभ राशीचे चिन्ह आहे. ज्ञानाचा माहितीचा जणू सागर असे तुमचे स्वरूप असते. काहीशा अबोल पण हुशार माणसांची ही रास शनीने आपली मानली आहे. येथे कोणताही ग्रह उच्चीचा वा नीचीचा होत नाही. कुंभ व्यक्तीनाही साडेसातीचा तेवढा त्रास होत नाही. संसाराबाबतीत आपण उदास असता व एकंदर निरीच्छ. संशोधन अभ्यास वृत्ती व ज्ञानलालसा ही तुमची खास वैशिष्ट्ये. कर्क रास मृत्यू षडाष्टकामुळे विवाहासाठी टाळावी. मिथुन व तुला राशीचे जोडीदार तुमच्याशी कसेबसे जुळवून घेतात. कुंभ राशीच्या गुणांमध्ये १६६० ते १३०४ अशी घसरण आहे, सहाजिकच मागील सर्वोच्च जागेवरून आता तिसर्या स्थानी नशीब आजमावणार आहे. ह्या कालखंडात देखील उत्साहवर्धक घटना घडतील. जवळजवळ संपूर्ण कालखंड विशेष चढ-उतार न होता प्रगतीपथावर नेणारा असेल. लाभातील शनी तुमचा उत्साह वाढवेल व येणाऱ्या अडचणी व विरोध यांच्याशी यशस्वी मुकाबला करू शकाल. नोकरी-व्यवसायात अपेक्षित बदली बढती व तुम्हाला आवडते काम मिळू शकेल. व्यवसायामध्ये शुभवार्ता आहे. नवीन उद्योगाची मुहूर्तमेढ घालू शकाल आणि आपल्या कुटुंबीयांना उर्जितावस्थेत नेऊ शकाल. विद्यार्थीवर्गाला अभ्यासाचा ताण आला तरी शेवटी त्यात चांगले यश मिळणार आहे. विवाहोत्सक मंडळी खुश होतील अशी परिस्थिती आहे. प्रवास वेळेवर होतील आणि त्यातून नव्या ओळखी होऊ शकतील. कौटुंबिक व्यवहारात मात्र थोडा वाणीवर ताबा ठेवा, नाहीतर गैरसमज होऊ शकतात. कुटुंबामध्ये वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन मिळेल. संसारात मुलांकडून एखादी चांगली बातमी कळू शकेल. जोडीदाराचेही तुम्हाला प्रोत्साहन राहील. एकंदर तथ्यांश हा की, उत्साहाचा अतिरेक करू नका प्रकृती सांभाळून नवीन योजना आखा. १२. मीन: सुख दु:खा, समे क्रुत्वा, लाभा लाभे, जया जयौ!: दोन विरुद्ध दिशेला धावणारे मासे असे तुमचे बोधचिन्ह आहे ही गुरूची रास असल्याने साधी सरळ माणसं धार्मिक व आध्यात्मिक प्रवृत्तीचे असतात चंचलता व धरसोड वृत्ती तुमचे नुकसान करू शकते शुक्र येथे उच्चीचा तर बुध्दीची चाहो तो सहसा तुम्ही कुणावर विश्वास ठेवत नाही व्यावहारिक जीवनात ठेचा खात खात पुढे जावे लागते तूळ राशीचे जोडीदार मृत्यू षडाष्टक or मुळे मीन व्यक्तींना चालत नाही कर्क व कन्या रास विवाह हे दृष्टीने नवपंचम योग होत असल्याने चांगल्या असतात. ८५५ गुणांवरुन १०६७ अशी वाढ आहे, म्हणून मीन रास त्रासाच्या नवव्या स्थानावरुन आता सहाव्या स्थानी समतोल साधेल. गुरुची तुमच्यावर चांगली कृपा राहणार आहे. कारण या कालखंडात गुरु तुमच्या भाग्यस्थानी असणार आहे त्यामुळे केंद्रातील शनी या कारवाया ताप तुम्हाला विचलित करू शकणार नाही व्यावसायिक जीवनात तुम्हाला अनेक संधी मिळतील विवाह चूक मंडळींची स्वप्ने पुरी होण्यासाठी पूर्वार्ध अनुकूल आहे तसेच विद्यार्थ्यांना या वर्षी चांगले गुण मिळतील तुमच्या चंचल वृत्तीचा अतिरेक मात्र तुम्ही करू नका त्यामुळे नाहक शत्रुत्व ओढवून घ्यावी व नुकसान सोसावे लागेल कोणती गोष्ट किती मर्यादेपर्यंत आणायचे याचा विचार करा आता आर्थिक बाजू सुधारणार असल्याने मागील देऊ शकाल नवीन महत्त्वाच्या खरेदी बद्दल निर्णय घ्याल व्यवहार मार्गी लागतील प्रवास थोडेफार अडखळत काही अडचणी येत पूर्ण होती संसारात नातेवाईकांबरोबर मतभेद संतती विषयक काही चांगली बातमी मिळू शकेल जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या स्वतःला शारीरिक स्वास्थ्य तरी लाभले तरी मानसिक शांती मिळणे अवघड असते तुम्ही साधाल थोडक्यात तारेवरची कसरत करत विवेकबुद्धीने प्रतिकूल परिस्थितीवर मात कराल. सुधाकर नातू Link for Astro Table:

मंगळवार, १२ मार्च, २०१९

"दाद, प्रतिसाद व संवाद!"

"दाद, प्रतिसाद व संवाद!": "कवडसे सोनेरी अंतरीचे" पुस्तक: श्री. विश्वास देशपांडे, मी जे जे काय वाचतो, बघतो, वा ऐकतो, त्यातून जर मला काही मनापासून भावले, तर त्याची पोचपावती, जमेल तशी देण्याची माझी पद्धत आहे, नव्हे तो माझा छंद आहे, असेच म्हणा ना! हा माझा अनाहूत संदेश त्याचाच एक भाग आहे. " आपले"सुखी माणसाचा सदरा जणू घालणारे ग़जाननराव कुलकर्णी काय, किंवा घराच्या गच्चीत चक्क आपल्या कल्पनेतले विमान प्रत्यक्ष बनवणारा हा जिद्दी अमोल यादव काय, अथवा अपंग असूनही, स्वकष्टाने केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे तर अनेक कुटुंबांची पोशिंदी होत विस्मयकारी योगदान देणारी, आधारवड मीनाक्षी निकम काय, अथवा मोबाईल शाप की वरदान? या प्रश्नाचे उत्तर आपल्या आपणच शोधायला हवे, हे वाचकांच्या गळी उतरवण्याची तुमची सहजसुंदर सोप्या भाषेतील शैली काय, किंवा आत्मविश्वास असेल तर काय काय होऊ शकते आणि सुरवंटाचे पहाता पहाता फुलपाखरू होऊन माणूस, असामान्य कर्तृत्व गाजवत आकाशभरारी कसा घेऊ शकतो, ते सांगणं काय, हे सारं तुमचे "कवडसे सोनेरी अंतरीचे" हे पुस्तक हातात आल्यावर, त्यातील सहज म्हणून ५/६ धडे, होय धडेच म्हणतो, कारण प्रत्येक लेख हा आपल्याला काही ना काही तरी शिकवून जातो. आपल्याला नवी दृष्टी देऊन जातो. म्हणून तर मी म्हणतो, शितावरून भाताची परीक्षा करावी, त्याप्रमाणे जर हे चार-पाच लेखच मला जाणिवेचे असे मोठे अद्भुत विश्व समोर निर्माण करून गेले, तर संपूर्ण पुस्तक वाचल्यावर तर अर्जुनाला, श्री भगवंताचे जसे विश्वरूप दर्शन झाले, त्याचप्रमाणे माझे काहीसे होईल, असे मला मनापासून वाटते. ज्या वाचनालयाचा मी सभासद आहे तिथे गेल्यावर पुस्तके शोधता-शोधता सहज हे पुस्तक हातात आले आणि तेच घेऊन मी घरी आलो. त्यामध्ये एवढे काही अनुभव भांडार असेल, असे काही वाटले नव्हते. पण सारं काही वेगळंच झालं. धडे वाचायला फार तर अर्धा-पाऊण तास लागला असेल, पण त्या वाचनातून मला खूप खूप भरून पावलं. And my day was made! आपल्या पुस्तकाने मला जो आनंद दिला आणि नव्या विचारांची दिशा, द्रुष्टी दिली, त्याबद्दल आपले आभार अभिनंदन आणि शुभेच्छा. धन्यवाद. सुधाकर नातू माहीम मुंबई १६ २. म.टा. मधील लेख: "पत्रिका जुळलेली व न जुळलेली" श्री. अशोक कोठावळे, मँजेस्टिक प्रकाशन, सादर वंदन. आजच्या 'महाराष्ट्र टाईम्स' मध्ये तुमचा "पत्रिका जुळलेली व न जुळलेली" हा स्वानुभव सांगणारा लेख, मी वाचला. तो आवडला. विवाह ही एक अत्यंत महत्त्वाची घटना, जीवनामध्ये घडत असते. प्रत्येकाचा विवाह जुळतो, तो नाट्यमय रीतीने. तुमच्याही विवाहाची कथा, आपण अतिशय प्रांजळपणे सहजसुंदर भाषेमध्ये, वाचकांशी संवाद साधत ,सांगितली आहे. तुमचे अभिनंदन व शुभेच्छा. ह्याच संदर्भातील "जन्म गाठीचे रहस्य" या माझ्या चॅनेल वरील व्हिडीओची लिंक सोबत पाठवत आहे. ती उघडून जरुर पहावी. त्यावरून तुम्हाला विवाह कसे गमतीशीर रीतीने जुळतात, त्याची कल्पना यावी. धन्यवाद सुधाकर नातू माहीम मुंबई १६ ३. "कालनिर्णय मोठे पंचांग" श्री. जयराज साळगांवकर, सादर वंदन. एक हौशी ज्योतिषी म्हणून मी नेहमी आतापर्यंत दाते पंचांग वापरत आलो आहे. मात्र आज दादरला आयडियल बुक डेपोमध्ये गेलो असताना, ते पंचांग संपल्याचे समजले आणि त्यामुळे मी आपले "कालनिर्णय मोठे पंचांग" विकत घेतले. घरी आल्यावर, ते नीट चाळून बघितले आणि मला लक्षात आले की अतिशय आकर्षक पद्धतीने आपण अत्यंत उपयुक्त माहिती मांडली आहे. अशा तर्हेची इतकी विस्तृत व नित्योपयोगी माहिती मला वाटते, खचितच कुठल्या पंचांगामध्ये असेल. माझ्यासारख्याने सखोल अभ्यास करावा असेच हे पंचांग आहे. मला आता यापुढे आपल्याच पंचांगाचा नेहमी उपयोग करावा असे वाटत आहे. पुढील पाच वर्षाचे ग्रहबदल, हा माझ्यासारख्या वार्षिक राशीभविष्य अनुकूल गुण पद्धतीने लिहीणार्या लेखकासाठी जणू वरदान आहे. ह्या उत्तम पंचांगनिर्मीतीसाठी तुमचे मनापासून आपले आभार आणि अभिनंदन, तसेच शुभेच्छा. सुधाकर नातू माहीम मुंबई१६ ३. "भाग्यनिर्णय" दिवाळी अंक१८": श्री. शशिकांत पात्रुडकर, सादर वंदन. "भाग्यवान कोण?" या शीर्षकातील आपल्या खास दिवाळी अंकाच्या प्रश्नांचे उत्तर, मला तुमच्या अतिशय सहज सुंदर शैलीत, सोप्या भाषेत लिहिलेल्या "सहवास भाग्यवंतांचा" ह्या लेखामुळे मिळाले. आपल्याला फोटो ग्राफी चा छंद आहे आणि त्या छंदात तुम्ही अनेक नामवंतांचे फोटो काढू शकलात, हे त्यामुळे समजले. कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व "पुल", प्रा.वसंत बापट आणि शांताबाई शेळके अशा दिग्गजांच्या भेटीचे अतिशय हृद्य वर्णन आपण आपल्या लेखात केले आहे. त्यामुळे तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच हे उत्तर मिळाले. कर्तृत्ववान माणसांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी हेही सहाजिक आहे. परंतु अशा कीर्तिमान व्यक्तींच्या सहवासात येणे, यासारखे भाग्य दुसरे नाही आणि ते तुम्हाला लाभले, ह्याचा मनापासून आनंद झाला आपले अभिनंदन व शुभेच्छा.
सुधाकर नातू, माहीम मुंबई१६ 4. "लोकसत्ता-चतुरंग पुरवणी": हेमलता अंतरकर सादर वंदन. आजच्या लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणींत "वसा स्वायत्ततेचा" हा कै. अनंतराव अंतरकरांच्या व्यक्तीगत व साहित्यिक संपादकीय कारकीर्दीची, वैशिष्ट्ये उलगडून दाखविणारा, आपला लेख मी वाचला. मोहिनी, हंस व नवल अशी प्रत्येकी स्वतंत्र विविधा जोपासणारी मासिके त्यांनीत निर्माण करून, मराठी वाचकांची वर्षानुवर्षे जी बौद्धिक व भावनिक भूक भागवली, त्याला तोड नाही. ह्या त्रिमूर्तींच्या साठ वर्षांच्या वाटचालीपैकी, निदान तीन दशकांचा मी वाचक म्हणून एक साक्षीदार आहे. हे असे एकसंध, आपआपली गुणवैशिष्ट्ये संभाळणार्या मासिकांमागे, संपादकाचाच सिंहाचा वाटा कसा असतो ते तुमच्या लेखामुळे समजले. अभिंनंदन व शुभेच्छा. जवळ जवळ अशाच तर्हेचे योगदान मेनका, माहेर व जत्राचे संपादक कै. पु.वि.बेहेरे ह्यांनीही दिले होते, त्याचे त्यांतील एक सदर लेखक म्हणून मला स्मरण झाले. तो'जादूभरा आणि आज स्वप्नवत वाटणारा काळ अन् कल्पनाविश्वात वाचकांना गुंतवून टाकणारा तो माहोल आणि त्याचे चोखंदळ आस्वादक आज इतिहासजमा झाले आहेत. कालाय तस्मै नम:, दुसरं काय! सुधाकर नातू, माहीम मुंबई-१६ ह्याला आलेले उत्तर: "तुमचा अभिप्राय वाचून लेखाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. तुम्ही जुने, जाणते वाचक आणि लेखक. त्या काळाबद्दल नव्या पिढीसाठी काहीतरी लिहून ठेवलं पाहिजे तुम्ही. धन्यवाद. कधीतरी भेटू." -हेमलता ५. "श्री दीपलक्ष्मी दिवाळी अंक'१८" संपादक, श्री दीपलक्ष्मी दिवाळी अंक'१८ सादर वंदन. मराठीतील दिवाळी अंक ही चोखंदळ वाचकांसाठी एक पर्वणीच असते. वर्षातून एकदाच येणारा हा साहित्यशारदेचा सोहळा, आज अनेक दशके टिकून आहे, ही गोष्ट कौतुकास्पद आहे. आत्ताच आपला दीपलक्ष्मी दिवाळी अंक'१८ वाचला. त्यातील रंगसम्राट श्री रघुवीर मुळगावकर ह्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त खास सादर केलेला विभाग तर एका बैठकीत वाचून काढला. खरोखरच इतका तो सुरस रंजक आणि माहितीपूर्ण आहे की, त्यामुळेच मला आपणास हे अनाहूत खुशीपत्र पाठविण्याची प्रेरणा मिळाली. बाकीचा अंक चाळला आणि लक्षात आले की नेहमीच्या परंपरेप्रमाणे दीपलक्ष्मी दर्जेदार साहित्य देण्यात यशस्वी झाली आहे. पुल, गदिमा, गुलाम मोहमद, शैलेंद्र, मुमताज, कलकत्ता इ.इ. वैविध्यपूर्ण विषय इतक्या अभ्यासपूर्ण रीतीने सादर करणारा हा अंक खरोखर दुर्मिळच गणला जावा. चक्क तीनशे पृष्ठांचा रंगबिरंगी व खुसखुशीत साहित्याची मेजवानी देणारा हा अंक निर्माण केल्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा. ह्या निमित्ताने माझ्या मनांत अचानक दोन आठवणी जाग्या झाल्या. पहिली म्हणजे, माझे छापील असे नाव, कोणत्या तरी स्पर्धेच्या निमित्ताने, प्रथम आपल्याच दीपलक्ष्मीच्या मासिक अंकात कित्येक दशकांपूर्वी आले होते ही आठवण. त्यामुळे नंतर पुढे चार दशके मी जी काही लेखन सेवा केली, त्याची मुहूर्तमेढ दीपलक्ष्मींतून झाली, ह्या योगायोगाचे मला खरोखर नवल वाटले. दुसरी आठवण म्हणजे, तुम्ही आणि श्री.अनिल कोठावळे ही जोडगोळी एकोणिसशे ऐशींच्या दशकांत दिवाळी अंकांच्या मोसमात मला भेटायला, गप्पा मारायला आमच्या ऑफिसमध्ये यायची ती. काही अंशी मिश्कील बटूमूर्ती वाटावी अशी आपली प्रतिमा, माझ्या मनावर तेव्हा जी पडली, ती अजूनही कायम आहे. अर्थात् आपण आता श्री.दीपलक्ष्मी सारख्या अनेक दशकांची परंपरा असलेल्या दर्जेदार नियतकालिकाचे संपादक जसे आहात, तसेच जयहिंद प्रकाशनसारख्या यशस्वी संस्थेचे चालकही आहात. त्यामुळे तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असो. यानिमित्ताने मी आपल्या दिवाळी अंकाचा सखोल रसास्वाद यथावकाश घेईनच. धन्यवाद आपला सुधाकर नातू