"शनीचे प्रताप":
शनीचे प्रताप:
शनि हा एक अत्यंत महत्त्वाचा ग्रह आहे. त्याची साडेसाती ही सर्वांना परिचित आहे. शनीचे महत्त्व विवाह जुळवताना, शनीचा दाब असला, की मंगळाचा दोष ही जातो त्यामुळे आहे. याव्यतिरिक्त शनीचे काय प्रताप आहेत ते या लेखात सांगण्याचा प्रयत्न करत आहोत.
प्रत्येक पत्रिकेमध्ये बारा स्थाने असतात प्रत्येक स्थानाचे काहीना काही महत्त्व असते. ते आपण नियतीचा संकेत ह्या लेखमालेत आधी पाहिले आहे. पत्रिकेमध्ये ६, ८, १२ ही स्थाने अनिष्ट मानली जातात, त्यापैकी आठवे स्थान त्याला मृत्यू स्थान असेही म्हणतात. ज्या स्थानापासून ते आठवे असते, त्या स्थानाच्या फळांमध्ये बाधा किंवा ती फळे वाईट मिळतात.
याच पार्श्वभूमीवर आपल्या पत्रिकेमध्ये शनि ज्या स्थानी आहे, ते स्थान ज्या स्थानापासून आठवे असेल, त्या स्थानाचे फळ वाईट त्रासदायक मिळते हा मुद्दा या लेखात मांडला आहे. प्रत्येक स्थानात शनी असला तर तो कोणत्या स्थानाबद्दल, कशी वाईट फळे देईल त्याचे दिग्दर्शन या लेखात करण्यात आले आहे.
पत्रिकेमध्ये प्रत्येकाला आपला शनी कुठे आहे हे पाहून आपल्याला कोणत्या स्थानाची जास्त वाईट फळे मिळतील याची कल्पना त्यामुळे येऊ शकेल. कुणाला नोकरीत व्यवसायात त्रास होतो, कुणी सारखा आजारी, तर कुणाची पैशाच्या बाबतीत, चणचण निर्माण होते, कुणाच्या प्रवासात त्रास होतात, तर कुणाचे वैवाहिक जीवन असमाधानकारक असते. अशी अनेक फळे ही त्या त्या स्थानाच्या पासून शनि कुठे आहे त्यामुळे मिळू शकतात. हा लेखामुळे, त्यादृष्टीने आपल्या जीवनात पत्रिकेप्रमाणे कोणती कमतरता कोणत्या विषयात आहे ते समजू शकेल. शनिमहात्म्य हे असे आहे!


सुधाकर नातू
४/९/'१८
ब्लॉगची लिंक:
http//moonsungrandson.blogspot.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा