"जन्मपत्रिकेवरुन नशिबाची गोळाबेरीज"
"ग्रहांच्या महादशांचा भाग्यांक":
प्रत्येकाचे जीवन चक्र वेगळे असते किंवा सुरुवात केव्हा अंत याची कल्पना आपल्याला नसते. हा जणू एका गाडीचा प्रवास आहे आणि तो प्रवास नऊ ग्रहांच्या महादशा पार करत आपण करत असतो. अर्थात सहसा कोणालाच या नऊच्या नऊ महादशा जीवनात येतातच असे नाही. त्यापैकी अनिष्ट ग्रहांच्या महादशा तुम्हाला अनिष्ट फळे देतात. शनि मंगळ राहू केतू हे अनिष्ट ग्रह मानले आहेत. बुध शुक्र गुरू यांच्या महादशा त्यामानाने चांगली फळे देतात. रवीची महादशा तो कोणत्या स्थानाचा अधिपती आहे त्यावरून तिचा दर्जा कळू शकतो. पत्रिकेमध्ये 6 8 12 ही अनिष्ट स्थाने.
सहावे म्हणजे रोग स्थान, शत्रू स्थान आठवे स्थान म्हणजे मृत्यू स्थान किंवा एखाद्या गोष्टीचा अंत होणे, बारावे व्ययस्थान अशी ही तीन अनिष्ट स्थाने आहेत. प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या स्थानांच्या अधिपतीच्या महादशा येत असतात. प्रत्येक स्थानाचे एक विशिष्ट फळ असते.
ह्या लेखात जन्मपत्रिकेतील स्थानपरत्वे ग्रह व त्यांच्या जीवनात येणार्या महादशा ह्यांच्या शुभशुभत्वाचा सखोल आढावा घेऊन, तिचा गुणात्मक दर्जा काढण्याची अभिनव पद्धत आम्ही चिकीत्सा करून मांडली आहे.
आम्ही गेले तीन दशके जसा राशीभविष्यासाठी, अभिनव अशा अनुकूल गुणांच्या पद्धतीचा उपयोग करत आहोत, तसाच एक प्रयत्न जीवनातील नशिबाची गुणात्मक गोळाबेरीज काढण्याच्या पद्धतीसाठी ह्या लेखात केला आहे. तो नवी दिशा देईल अशी आशा आहे
10/9/'18
My blog’s link:
http//moonsungrandson.blogspot.com






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा