नियतीचा संकेत-६:
स्थान महत्व-ग्रह पत्रिकेतली फळे:
पत्रिकेत एकूण बारा स्थाने असतात: चार चौकोन व आठ त्रिकोण. ह्या विविध स्थानांची उपयुक्त विभागणी अशा प्रकारे गटांमध्ये केली जाते. त्या स्थानांतील ग्रह व स्थानेशांची पत्रिकेतील स्थिती ह्यावरुन कोणत्या फळांचा विचार केला जातो, ते येथे दर्शविले आहे. ढोबळ मानाने ह्या मार्गदर्शनाखाली आप आपल्या पत्रिकेचा अभ्यास करुन निष्कर्ष काढणे सुलभ होऊ शकेल:
१ ४ ७ १० ही केंद्र स्थाने कर्तृत्व यश व प्रसिद्धि
५ व ९ ही सर्वात महत्वाची त्रिकोण स्थाने-सहाय्य दैव नशीब
६ ८ व १२ ही त्रिक स्थाने दुस्थाने मानली जातात नाश कटकटी चिंता
१ ३ ९ ही बुद्धी कला संस्कार
३ ६ १० ११ ही उपचय स्थाने, उत्कर्ष भरभराट
१ २ ४ ५ ७ ८ ९ १२ ही अनुपचय स्थाने अशुभ ग्रह र्हास पीडा
२ ७ ही मारक स्थाने देहपीडा पैसा भोग मारकेशाची दशा अशुभ फळे
२ ५ ८ ११ ही पणफर स्थाने परावलंबित्व आयुष्यातली गती
३ ६ ९ १२ अपोक्लीम स्थाने मित्रपरिवार सामाजिक बांधिलकी
३ व ८ ही स्थाने आयुष्य दर्शक पीडा शारिरीक कष्ट कमनशिब
४ व ८ जीवनातील संकटे
चार त्रिकोण: धर्म त्रिकोण:१ ५ ९
अर्थ त्रिकोण: २ ६ १०
काम त्रिकोण: ३ ७ ११
मोक्ष त्रिकोण: ४ ८ १२
ग्रह व राशींचा संबंध:
प्रत्येक राशीमध्ये कोणता उच्चीचा ग्रह आणि नीचीचा ग्रह आणि ती रास कोणत्या ग्रहाची आहे याचा आपण आता अभ्यास करू:
१ मेष रास मंगळाची रास आहे, रवी उच्चीचा तर शनी नीचीचा असतो.
२ व्रुषभ ही शुक्राची रास तर येथे चंद्र उच्चीचा कोणीही नीचीचा नाही.
३. मिथुन राशीत कोणताही ग्रह उच्चीचा आणि नीचीचा होत नाही आणि ही रास बुधाची आहे
४. कर्क राशि मध्ये मंगळ नीचीचा तर गुरु उच्चीचा होतो व ही चंद्राची रास आहे
५ सिंह रवीची रास असून येथे कोणीही उच्चीचा वा नीचीचा होत नाही.
६ कन्या राशीचा मालक तसेच तेथे तो उच्चीचा आणि शुक्र नीचीचा होतो
७ तूळ राशीत शनी उच्चीचा तर रवी निचीचा. व ही शुक्राची रास.
८ वृश्चिक राशीत चंद्र निचीचा होतो आणि ही रास मंगळाची आहे, कोणीही उच्चीचा ग्रह नाही.
९ धनु राशी गुरूची रास असून येथे कोणीही उच्चीचा वा नीचीचा होत नाही.
१० शनीच्या मकर राशीत मंगळ उच्चीचा तर गुरु नीचीचा
११ कुंभ शनीची रास, कोणी उच्चीचा नाही आणि निचीचाही नाही.
१२ मीन रास गुरूची रास येथे शुक्र उच्चीचा तर बुध नीचीचा होतो.
ह्या प्रमाणे आपल्याला आपल्या पत्रिकेत कोणता ग्रह शुभ आहे, तर कोणता ग्रह त्रासदायक अवस्थेत आहे याचा आढावा घेता येईल.
जन्मपत्रिका व ग्रहांचे निष्कर्ष:
आता इतक्या पार्श्वभूमीवर, आमच्या चाळीस वर्षांच्या ज्योतिषाच्या अभ्यासावरून काही परामर्ष वा अंदाज, आम्ही येथे मांडू इच्छितो. विविध पत्रिकांचा अभ्यास करून त्यावरून आम्ही आमचे हे आडाखे मांडत आहोत ज्याचे त्याने त्यांची पडताळणी घ्यावी. ते बरोबर आले तर उत्तम, नाही तर सोडून द्यावे. प्रत्येक ग्रह आणि प्रत्येक स्थान यांचा आम्ही येथे आम्ही विचार करत आहोत.
प्रथम स्थान:
१ लग्न स्थान हे पहिले स्थान तुमच्या स्वतःचा पूर्ण भूमिकेचा आरसा असतो. इथे कोणताच ग्रह नसला तरी काही बिघडत नाही. गुरु ज्यांच्या पत्रिकेत लग्नी असतो, ती माणसे
सुशील, मिळून-मिसळून वागणारी आणि त्यांचे जीवन बरेचसे शुभ फलदायी असते.
समाधानी वैवाहिक जीवनात ह्या शुभ गुरूचा नक्कीच हातभार लागतो.
शनी जर लग्न असेल तर अशी व्यक्ती चंचल आणि काही मानसिक चिंता, अस्वस्थता असणारी असू शकते. रोग स्थानापासून हे स्थान आठवे असल्यामुळे ही व्यक्ती अधून मधून सातत्याने आजारी पडत असते आणि त्यांना जीवनात मानसोपचार तज्ञाकडे जावे लागू शकते.
बुध जर स्वगृही असेल आणि लग्नी अर्थात प्रथम स्थानी असेल, तर अशी माणसे अतिशय बुद्धिमान, खंबीर आणि आपली बाजू उत्तम प्रकारे मांडणारी असू शकतात. ते वकील, आँडीटर वा अभिनेते होऊ शकतात. ही मंडळी विचार योग्य दिशेने करणारी असल्यामुळे इतरांशी चांगले जुळवून घेऊ शकतात लग्न स्थानाचा मालक स्वगृही असल्यामुळे तब्येतही त्यांची चांगली राहते.
रवी हा सर्व ग्रहांमध्ये महत्वाचा आहे आणि रवी लग्नात असणे हे उत्तम तब्येत आणि उद्योगी असण्याचे लक्षण आहे. त्यातून तो स्वग्रुही असेल तर सोन्याहून पिवळे. शारिरीक मानसिक आरोग्य उत्तम. प्रभावी व्यक्तिमत्त्व असून, नेत्रुत्वाचे गुण असतात. लष्कर पोलीस खात्यात अधिकारी होऊ शकतात.
मंगळ प्रथमस्थानात असला तर अशा व्यक्तीला मंगळ दोष आहे असे मानतात त्यामुळे विवाह जुळवताना तसेच पत्रिका मंगळ दोष असणारी लागते अथवा शनीचा दाब आवश्यक असतो मंगळ लग्न असल्यामुळे तापट स्वभाव हट्टी मात्र दीर्घोद्योगी असतात त्यातून तो जर उच्चीचा म्हणजे मकर राशीचा असेल तर तिरसट स्वभाव असू शकतो आणि अशा माणसांची जुळवणे कठीण होऊन बसते रक्तदोष किंवा मानसिक दोष वा रोग होऊ शकतात.
शुक्र लग्न असेल तर ती व्यक्ती आकर्षक व्यक्तिमत्वाची छानछोकीची आवड असणारी कलाक्षेत्र अभिनय व आर्किटेक यामध्ये यश मिळवू शकणारे असते शुक्र जर मी नेता अथवा तूळ व वृषभेत असेल तर सोन्याहून पिवळे कारण अशा व्यक्ती आपल्या वागण्यामुळे आणि सौजन्यामुळे इतरांवर प्रभाव पाडू शकतात याउलट जर शुक्र नीचीचा म्हणजे कन्या राशीत असेल तर वैवाहीक जीवनात चिंता, काही ना काही अडचणी येणारी असे नशीब असू शकते.
चंद्र लग्न असणे म्हणजे भरपूर प्रवास नशिबी असू शकतो वृषभेचा उच्चीचा चंद्र असला तर अतिशय हळवी व उत्साही असतात. लेखक कवी होऊ शकतात. त्यातून कर्क राशीत प्रथम स्थानी चंद्र असेल तर भावनाप्रधान तरल कल्पनाशक्ती असते. संसारात खूप रस घेऊन जोडीदाराच्या कलेने वागतात.
राहू व केतू लग्न असणे मात्र चांगले नसते धरसोड वृत्ती असते. अतिशय चंचल स्वभाव हट्टाग्रही आणि जीवनामध्ये अडचणी निर्माण होऊ शकणारी असतात. वैवाहिक जीवनात असमाधान कुरबुरी व चढ उतार, तसेच मानसिक आरोग्यही तितकेसे चांगले नसते.
ह्याच अनुषंगाने आमच्या ज्योतिष चिकीत्सेचे निष्कर्ष आम्ही पत्रिकेतील इतर स्थानांचे बाबतीत पुढील काही लेखात मांडू.
हा अभ्यास उपयुक्त होईल अशी आम्हाला खात्री आहे.
सुधाकर नातू
१३/९/'१८
ब्लॉगची ही लिंक उघडा व इतर लेख जरूर वाचा:
http//moonsungrandson.blogspot.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा