"राशीभविष्य: अनुकूल गुणपद्धत":
कालचक्र अव्याहत फिरत असते, माणसाच्या आयुष्यात काही दिवस सुखाचे तर काही दु:खाचे असतात. हा क्रम प्रत्येकाला अनुभवाला येतो. उद्याचा दिवस, आजच्यापेक्षा अधिक चांगला जावा ह्या आशेवर माणूस जगत असतो. उद्याचे पुढचे पाऊल कसे असेल, येणारा काळ कसात असेल, अनुकूल वा प्रतिकूल आणि तोही किती प्रमाणात हे कळण्याच्या इच्छेने तो दर वर्षी उत्सुकतेने राशीभविष्य पहात असतो.
माणूस उंच वा बुटका आहे, जाडा किंवा बारिक आहे, तो गरिब वा श्रीमंत आहे अशा विधानांवरुन आपल्याला निश्चित अशी काही कल्पना येत नाही. ती येण्यासाठी कोणते तरी त्या विषयाशी संबंधित असे अनुरूप संख्यात्मक परिमाण आवश्यक असते. जसे उंची सेंटी मीटर, वजनासाठी किलोग्राम, आर्थिक स्थितीसाठी रुपये असे परिणाम संख्यात्मक द्रुष्टिने दाखवता येते. ह्याच पद्धतीने आपले आगामी दिवस कोणाला कसे जातील, हे भविष्याच्या ज्ञानाच्या आधारे सांगण्याची पद्धत म्हणजे राशीभविष्य होय.
आम्ही गेले तीन दशके त्याकरता अभिनव अशा अनुकूल गुणांच्या पद्धतीचा उपयोग करत आहोत. प्रत्येक राशीला सहा प्रमुख ग्रहांच्या बदलत जाणार्या स्थितीचा अभ्यास करून ज्योतिषांतील पुढील नियमांचा आधार घेऊन वर्षभरात प्रत्येक माहवार किती दिवस अनुकूल आहेत त्याचे गणित मांडून अनुकूल गुण देतो. ते नियम असे आहेत:
रवि: ३,६, १० व ११ वा शुभ
मंगळ: ३,६, व ११ वा शुभ
बुध: २,४,६,८,१० व ११ वा शुभ
गुरू: २,५,७,९, व ११ वा शुभ
शुक्र: १,२,३,४,५,८,९,११ व१२ वा शुभ
शनी: ३,६, व ११ वा शुभ
आता एका महिन्याचे-समजा जून'१८ मधील ग्रहस्थितीचा आढावा घेऊन प्रत्येक राशीला हे गुण कसे दिले जातात ते गणित पाहू. १ जून ते ३० जून'१८ ह्या कालखंडात वरील सहा ग्रहांचा प्रवास असा आहे:
रवि: १५ जूनला व्रुषभेतून मिथूनेत
मंगळ: महिनाभर मकरेत
बुध: १० जून मिथूनेत २५ला कर्केत
गुरू: महिनाभर तुळेत
शुक्र: ८जूनला मिथूनेतून कर्केत
शनी: महिनाभर धनुमध्ये
आता एका प्रातिनिधिक राशीचे, समजा मेष राशीचे जून'१८ करीता ग्रहांच्या अनुकूलतेनुसार कसे गुण काढतात ते पाहू:
वर दिलेल्या नियमांप्रमाणे मेष राशिला कोणते ग्रह, किती दिवस जून'१८ ह्या महिन्यात शुभ आहेत ते पाहू:
रवि: १५ ते ३० जून मिथूनेत ३रा शुभ-१५दि.
मंगळ: महिनाभर मकर-दहावा-०दि शुभ
बुध: प्रथम ९ दि व्रुषभेत २रा व नंतर २५ ते ३०जून कर्केत ४था असे एकूण १५ दि शुभ
गुरू: पूर्ण महिना तुळेत ७वा शुभ-३० दि.
शुक्र: प्रथम ८जूनपर्यंत मिथूनेत ३रा व नंतर कर्कैत ३०ता पर्यंत कर्केत ४था शुभ-३०दि.
शनी:धनु मध्ये महिनाभर ९वा-०दि.
आता ह्यांची बेरीज आपल्याला मेष राशीला किती गुण जून'१८ मध्ये मिळतील ते सांगेल:
रवि-१५, बुध-१५ तर गुरू शुक्र मिळून ६० असे ९०अनुकूल दिवस अर्थात ९० गुण.
ही पद्धत अजून नीट समजावी, ह्यासाठी आता मकर राशीचे जून'१८ करीता ग्रहांच्या अनुकूलतेनुसार कसे गुण काढतात ते पाहू:
वर दिलेल्या नियमांप्रमाणे मकर राशिला कोणते ग्रह, किती दिवस जून'१८ ह्या महिन्यात शुभ आहेत ते पाहू:
रवि: व्रुषभेत१५ पर्यंत ५वा-० नंतर ३० जून मिथूनेत ६वा शुभ-१४दि.
मंगळ: महिनाभर मकर-१ला-०दि शुभ
बुध: प्रथम ९ दि व्रुषभेत ५वा-०दि शुभ, नंतर २५ पर्यंत मिथूनेत ६वा-१६दि शुभ पुढे ३०जून कर्केत ७वा-०दि असे एकूण १६ दि शुभ
गुरू: पूर्ण महिना तुळेत १०वा-० दि शुभ
शुक्र: प्रथम ८जूनपर्यंत मिथूनेत ६वा-०दि शुभ व नंतर कर्केत ३० पर्यंत ७वा शुभ-०दि.
शनी महिनाभर धनुत १२वा-०दि.शुभ
आता ह्यांची बेरीज आपल्याला मकर राशीला किती गुण जून'१८ मध्ये मिळतील ते सांगेल:
रवि-१५, बुध १६, असे मिळून मकर राशीला जून'१८ मध्ये ३० अनुकूल दिवस-३० गुण.
ह्याच पद्धतीने बारा राशींकरता जून तसेच उरलेल्या अकरा महिन्यांचे अनुकूल गुण काढता येतील. सर्व राशींकरता हे गणित करण्यासाठी, प्रत्येक महिन्याचे गुण काढण्यासाठी जो तक्ता वापरला जातो, तो जून'१८ महिन्याकरता कसा असेल ते ह्या लेखाच्या अखेरीस दाखवले आहे.
दिवाळी अंकाकरता, वार्षिक भविष्य लिहीताना १नोव्हे. ते त्या वर्षांच्या पुढील वर्षाच्या ३१ डिसें असे १४ महिन्याचे कोष्टक मी तयार करतो. ह्या गुणांची विभागणी पाच सुलभ गटात अशी केली जाते:
पहिला उत्तम गट
दुसरा उजवा गट
तिसरा मध्यम गट
चौथा डावा गट
पाचवा तळाचा गट
वरील पद्धतीने जून'१८ ची राशीनिहाय चित्र:
Jun'18. अनुकूल गुण गट
Mesh ९० १
Vrishabh ४५ ४
Mithun ६५ ३
Kirk ८५ २
Sinha ११५ १
Kanya ९५ १
Tula ५३ ४
Vrishchik ७५ ३
Dhanu ८२ २
Makar ३० ५
Kumbha ८३ २
Meen ६० ३
अशा अनुकूल गुणामुळे आपल्याला हे वर्ष (वा महिनाही) मागील वर्षाच्या ( वा महिन्याच्या) तुलनेत किती चांगला वा त्रासाचा ते समजेल. इतर राशींच्या-म्हणजेच व्यक्तींच्या तुलनेत आपली काय स्थिती आहे तेही ह्या अनुकूल गुण व गट ह्या आधारे समजेल. आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता किती जास्त प्रयत्न करावे लागतील त्याचा अंदाज घेता येतो. जीवनात समाधान मिळण्यासाठी प्रयत्न व अपेक्षा ह्यांचा योग्य समतोल आपल्या राशीला मिळालेल्या अनुकूल गुणांवरून ठरवता येते.
अनुकूल गुण पद्धतीचा उपयोग, व्यवस्थापन शास्त्र, संख्या शास्त्र आणि ज्योतिषज्ञान ह्यांचा त्रिवेणी संगम घालण्यासाठी करून मी अभिनव वार्षिक राशीभविष्य दर वर्षी दिवाळी अंकासाठी लिहीतो. ह्या लेखाद्वारे मी ही अनुकूल गुण पद्धती वाचकांच्या सोयीसाठी जास्तीत जास्त सोप्या शब्दात येथे मांडण्याचा यत्न केला आहे.
धन्यवाद.
सुधाकर नातू,
जून'१८: अनुकूल गुण तक्ता:
व २०१७/१८ चा तक्ता:
अनुकूल गुण पद्धतीचा उपयोग, व्यवस्थापन शास्त्र, संख्या शास्त्र आणि ज्योतिषज्ञान ह्यांचा त्रिवेणी संगम घालण्यासाठी करून मी अभिनव वार्षिक राशीभविष्य दर वर्षी दिवाळी अंकासाठी लिहीतो. ह्या लेखाद्वारे मी ही अनुकूल गुण पद्धती वाचकांच्या सोयीसाठी जास्तीत जास्त सोप्या शब्दात येथे मांडण्याचा यत्न केला आहे.
धन्यवाद.
सुधाकर नातू,
जून'१८: अनुकूल गुण तक्ता:
व २०१७/१८ चा तक्ता:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा