👍"अनन्यसाधारण "अनन्या !":👌
☺️"आज "अनन्या" हे 'सुयोग" चे नाटक पाहिले.
दुर्दैवाने अपघात होऊन दोन्ही हात गमावणार्या अनन्या ह्या जिद्दी तरुणीची ही मेलोड्रँमँटिक कहाणी आहे. नायिकेची झट मंगनी, झटपट अपघात आणि पटकन ब्रेक अप्, खटाखट स्वयंपूर्ण होत सीए , चटाचट प्रेमाचा ट्रँगल आणि obvious असा गोड शेवट असे ह्या नाटकाचे स्वरुप आहे. खरे म्हणजे सारा फिल्मी मामलाच आहे.
👍पण येथे, जगावेगळे आहे ते, दोन्ही हात गमावलेल्या, नायिकेच्या भूमिकेत रूजूता बागवेने कमालीची मेहनत घेऊन स्वयंप्रेरणेच्या जोरावर अत्यंत बिकट अवस्थेवर मात कशी करता येते, ते द्रुष्ट लागावी असे सादर केले आहे, ते. अपंगत्वामुळे घरातील माणसांवर आपण आता ओझे बनलो आहोत असे वाटून तिच्यापुढे यक्षप्रश्न पडतो की, स्वाभिमान विसरून, लाचारी पत्करून दुय्यम भूमिका स्वीकारावी, की, निधड्या छातीने स्वबळावर एकला चालोरे? अशा विचित्र अवस्थेत तिला जाणीव होते की आपल्याला दोन हात नसले तरी आपण आपल्या दोन पायांचा उपयोग करून पुनश्च हरी ओम् करू शकतो. ही जाणीव म्हणजे काही वेगळे अवघड क्रुत्य करण्याची स्वयंप्रेरणा! ह्या अवस्थेला Achievement Motivation म्हणतात. त्यानंतर तिच्या असामान्य इच्छाशक्तीचे जे अदभूत् दर्शन रंगभूमीवर घडलेले पहाणे हा एक खरोखरच चित्तथरारक अनुभव आहे.
खरोखरच तिचे हात गमावले आहेत असेच वाटते आणि हे बेमालूमपणे कसे काय जमले, हा प्रश्न रसिकांच्या मनात शेवटपर्यंत अनुत्तरित रहातो. हेच ह्ना नाटकाचे यश आहे. प्रेक्षक हे तसे रन आँफ द मिल नाटक बघावयाला येतात, ते बहुदा रूजूताच्या असामान्य जीवंत सादरीकरणामुळे. नाटकाचे नेपथ्य, प्रकाशयोजनाही ह्या ह्रदयस्पर्शी नाट्याला अनुरुप होते.
अचानक आगांतूकासारखे येऊन अनन्यावर एकतर्फी प्रेम करणार्या तरूणाची भूमिका करणार्या अभिनेत्याची बुलेट ट्रेनस्पीडची संवादफेक खटकते. तो काय बोलतो ते स्पष्टपणे मुळीच कळत नाही. शिवाय त्याच्या एंट्री नंतर, सारा खेळ एका गंभीर नाटकाला विनोदी टच देण्यासाठी, पूर्णपणे अस्थानी व ओढून ताणून जमवलेला वाटतो. त्यामध्ये थोडेतरी गांभीर्य व संयमाचे भान ठेवणे गरजेचे आहे.👌
👍मात्र संकटांना न घाबरता ताकदीने तोंड कसे द्यावयाचे, हे चटका लावत पेश करणारे हे नाटक, तरुण पिढीसाठी प्रेरणादायी व दिशादर्शक असल्याने निश्चितच अनन्य आहे.💐
👍"शेवटी जीवनात जर समाधान मिळवायचे असेल, तर आपले अपेक्षा आणि प्रयत्न ह्यांच्यात बदलत्या परिस्थितीत अचूक समतोल साधता येण्याचे कौशल्य अंगी हवे. तुमची द्रुष्टी बदला, एक नवी स्रुष्टी दिसेल. जे नाही, त्याचा विचार करत चिंता करण्यापेक्षा जे आहे, त्यात आनंद शोधायला शिका....👌💐💐
☺️ "अनन्या" नाटकाच्या जाहिरातीसाठी पुढील मजकूर मला सुचला:
👍"स्वाभिमान विसरून, लाचारी पत्करून दुय्यम भूमिका न स्वीकारता, स्वबळावर एकला चालोरे यशस्वी करणारी "अनन्या"........👌💐
☺️" स्वयंप्रेरणा! असामान्य इच्छाशक्तीचे जे अदभूत् दर्शन "अनन्या" रंगभूमीवर उभे करते,हा एक खरोखरच चित्तथरारक अनुभव आहे.......👌😊
👍जाता जाता....निरिक्षण...😊
पुण्यात नाट्यप्रयोग: दुपारी १२-३०, रात्री ९-३० गैरसोयीच्या वेळा. मुंबई प्रमाणेच सकाळी १०-३० व रात्री८वाजता नाट्यप्रयोग कां नाहीत?
मराठी नाटकं, एखाद दुसरा अपवाद वगळता कधीही वेळेवर सुरू होत नाहीत. त्यामुळे अनाठायी किती तरी समुह-वेळाचा अपव्यय होतो. प्रेक्षकांच्या सहनशक्तीची परिक्षा अशी बिनदिक्कतपणे पहाणे सर्वथैव गैर नव्हे कां?
☺️"डोळे उघडणारा "क्लोरोफाँर्म": 😊
दोन संपूर्ण विभिन्न क्षेत्रातील नामवंत माणसांची आत्मव्रुत्तांसारखी पुस्तके वाचनात आली. पहिले एक १९७८ साली प्रसिद्ध झालेले डॉ. अरुण लिमयांचे "क्लोरोफाँर्म" हे "आधुनिक अश्विनीकुमार" डॉक्टरमंडळी आणि आरोग्य सेवेशी संबंधित समस्त स्टेक होल्डर्स ह्यांच्या विश्वातली "आतल्या गोटातील" (पुष्कळशी) वेदनादायी रहस्ये उघडी करुन वाचकांना भयग्रस्त करू शकणारं खुलम् खुल्ला बिनधास्त पुस्तक. खरं म्हणजे "क्लोरोफाँर्म" हे गुंगी आणून माणसाला बेशुद्ध करणारं रसायन, मात्र हे पुस्तक जर चार दशकांपूर्वीचे आरोग्यसेवेचे वाभाडे काढणारे वस्तुनिष्ठ चित्र असेल, तर आताच्या सर्वथैव बाजारु माहोलांत अक्षरश: म्रुत्युशय्येवरील माणसालाही खडबडून जागे करणारा भयपट तर, चालू नसेल ना, अशी शंका येऊ शकते. स्वत: डॉक्टर असूनही आपल्याच क्षेत्रातील अयोग्य गोष्टी अशा उघड्या करण्याचे डॉ. लिमयांचे धैर्य असामान्य नाही कां?👍"अनन्यसाधारण 'महास्वप्न " :👌
ह्याच्या अगदी उलट असणारी, विलक्षण प्रेरणादायी आणि अभिमान वाटणारी कहाणी आहे भारतात काँप्युटर आणि डिजीटल विश्व आणणार्या डॉ. सँम पिट्रोडांची "महास्वप्न" ही आत्मकथनाची! ओरिसातील कोपर्यातल्या खेड्यात एका सुतारकाम करणार्या माणसाचा हा कर्तृत्ववान सुपुत्र कल्पना करता येणार नाही अशा अडचणींवर मात करुन साता समुद्रापलिकडे जावून अमेरिकेत जातो
काय आणि स्वर्गीय राजीवजींच्या प्रोत्साहनामुळे टेलिकॉम-क्रांतीचे महास्वप्न अथक परिश्रमांती जिद्दीने प्रत्यक्षात आणतो काय, सारेच चित्तथरारक व अद्भूत! लेखकाच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अक्षरश: पान अन् पान आवर्जून वाचावे असा सुमारे चारशे पानी अनुवाद श्रीमती शारदा साठे ह्यांनी ओघवत्या भाषेत केला आहे.
"क्लोरोफाँर्म" हे जर झोपी गेलेल्याला खडबडून जागे करणारे पुस्तक असेल, तर हे महास्वप्न त्याला आत्मप्रेरणेची संजिवनी देवून स्वयंविकासच्या एक्सप्रेस वे वर घोडदौड करायला लावणारे संप्रेरक असेल.
एका पाठोपाठ ही अशी विस्मयकारी पुस्तके मला अवचितपणे वाचायला मिळावी, हा एक "सोने पे सुहागा" योगायोगच नव्हे कां?
👍काही वाचनीय पुस्तके:👌
झगमगत्या दुनियेत: सुधीर गाडगीळ
कुणा एकाची भ्रमणगाथा: गो. नी. दांडेकर
प्रथम पुरुषी एकवचनी: पु भा भावे
जीवलग: विजय पाडळकर
टिवल्या बावल्या: शिरीष कणेकर
जीनियस: अच्युत गोडबोले
कार्यमग्न: अनिल अवचट
आठवणींचे असेच असते: अरुण शेवते
अध्यात आणि मध्यात: हेमंत कर्णिक
अन्यथा: गिरीश कुबेर
"क्लोरोफाँर्म" हे जर झोपी गेलेल्याला खडबडून जागे करणारे पुस्तक असेल, तर हे महास्वप्न त्याला आत्मप्रेरणेची संजिवनी देवून स्वयंविकासच्या एक्सप्रेस वे वर घोडदौड करायला लावणारे संप्रेरक असेल.
एका पाठोपाठ ही अशी विस्मयकारी पुस्तके मला अवचितपणे वाचायला मिळावी, हा एक "सोने पे सुहागा" योगायोगच नव्हे कां?
👍काही वाचनीय पुस्तके:👌
झगमगत्या दुनियेत: सुधीर गाडगीळ
कुणा एकाची भ्रमणगाथा: गो. नी. दांडेकर
प्रथम पुरुषी एकवचनी: पु भा भावे
जीवलग: विजय पाडळकर
टिवल्या बावल्या: शिरीष कणेकर
जीनियस: अच्युत गोडबोले
कार्यमग्न: अनिल अवचट
आठवणींचे असेच असते: अरुण शेवते
अध्यात आणि मध्यात: हेमंत कर्णिक
अन्यथा: गिरीश कुबेर
धन्यवाद
सुधाकर नातू
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा