"माहितीचा खजिना-१":
गेल्या सत्तर वर्षात देशात जणु काहीच चांगले घडले नाही असा प्रचारकी थाटाचा डंका पुकारला जातो. तो किती अप्रस्तुत आहे, ह्याची प्रचिती देणारी उद्बोधक माहिती पहाण्यात आली. ह्या कालखंडात विविध क्षेत्रातील कितीतरी उत्तम देणार्या संस्था, आस्थापने निर्माण झाली, त्यांचाच हा लेखाजोखा पुढे दिला आहे.आज आपण इतकी प्रगती करून इथवर येऊन पोहोचलो आहोत, ह्यामागे हजारो पूर्वसूरींची दूरद्रुष्टि ज्ञान कौशल्य आणि परिश्रम कारणीभूत आहेत, ह्याचे भान ठेवणे आवश्यक आहे. त्यांच्या अशा असामान्य योगदानाबद्दल क्रुतज्ञता जरी कोणी व्यक्त केली नाही तरी एकवेळ चालू शकेल, परंतु केवळ विरोधासाठी विरोध करण्याचा असा अट्टाहास अक्षम्य व अश्लाघ्य आहे, कारण ती आपल्या इतिहासाची जाणून बुजून केलेली मोडतोड आहे.
एकदा नजरेखालून घाला हा माहितीचा खजिना:
संस्था स्थापना
ताज हाँटेल्स १९०३
हिंदुस्थान युनीलिव्हर १९३३
ओबेरॉय १९३४
CSIR रिसर्च १९४२
महेंद्र & महेंद्र १९४५
ग्रासीम सिमेंट १९४७
एअर इंडिया १९४६
NDA संरक्षण १९५४
टायटन घड्याळे १९८४
झंडू बाम १९९०
कँम्लिन स्टेशनरी १९८०
इंडियन पोस्ट १८५४
दिल्ली मेट्रो १९९५
मारूती मोटर्स १९८१
BARC अणुविज्ञान १९५४
हिरो सायकल्स १९८४
भारती एअर टेल १९९५
गोदरेज १८९७
इंडियन आँईल १९५९
ONGC पेट्रोलियम १९५६
टाटा स्टील १९०७
BSES Stock Exchange १८७५
MMTC मिनरल्स & मेटल्स १९६३
भाक्रा नान्गल धरण १९६३
BHEL वीज क्षेत्र १९५६
Larson & Toubro १९३८
SAIL स्टील १९७३
NTPC. वीज क्षेत्र १९७५
हिंदाल्को अँल्युमिनियम १९५८
C DoT. कम्प्युटर १९८४
AIIMS हाँस्पिटल १९५६
अपोलो हाँस्पिटल्स १९५१
IIT तंत्रविज्ञान खरगपूर १९६१
IIM व्यवस्थापन क्षेत्र १९६१
केंद्रीय विद्यालये १९६३
BEST वहातूकव्यवस्था वीज १९०५
मुंबई पुणे एक्सप्रेस वे १९९९
SBI बँकिंग १८०६
HDFC ग्रहकर्ज १९७७
बालाजी टेलिफिल्मस् १९९४
Indian Institute of Science १९०९
TIFR संशोधन १९४५
National I of Design १९६१
TISS समाजविज्ञान १९३६
फिल्म इंस्टिट्युट १९६०
NSD रंगभूमी १९५९
NHAI राष्ट्रीय महामार्ग १९८८
इंडिगो विमानसेवा २००६
कोचीन शिपयार्ड १९७२
निर्वाचन आयोग १९५०
अमूल दुग्धव्यवसाय १९४६
Infosys माहिती तंत्रज्ञान १९८१
झी एंटरटेनमेंट १९९२
आधार कार्ड २००९
रिलायन्स इंडस्ट्रीज् १९८२
खादी ग्रामोद्योग १९५७
BCCI क्रिकेट १९२८
TCS कम्प्युटर सर्विस १९६८
अग्नी क्षेपणास्त्र विभाग १९८९
Iconic Indian Brands
दीपस्तंभ असे भारतीय ब्रँडस्:
Lifebuoy. 1964.
हाँकीन्स प्रेशर कुकर १९६६
अमूल बटर १९६६
कँम्पा कोला १९७०
कायनेटिक लूना १९७२
विमल १९७५
ग्लुकोज बिस्कीट १९७६
प्रेस्टीज प्रेशर कुकर १९८०चे दशक
निरमा साबण १९८०
लिज्जत पापड १९९०
बजाज स्कुटर्स १९८१
रसना १९८४
इ.इ..........
साहित्यिकांच्या नवलकथा:
आता, अगदी वेगळ्या विषयांवर-निवडक साहित्यिकांसंबंधी गोळा केलेली अवखळ, नवलपूर्ण माहिती:रविकिरण मंडळामधले बुजुर्ग कवि यशवंत ज्यांची आई ही डोळ्यातून पाणी काढणारी चिरस्मरणीय कविता प्रसिद्ध आहे, ते प्रथम कारकून नंतर शिक्षक होते, त्यांचा निव्रुत्तीचे वेळी ऐशी रुपये पगार होता आणि त्यांना २७ रुपये पेन्शन मिळे. कवि यशवंत ह्यांना बडोद्याचे राजकवी म्हणूनही मान होता आणि त्यांना महिना ५० रुपये मानधन प्राप्त होई. गंमतीची बाब ही की, त्याना पत्ते खेळण्याचा खूप नाद होता.
"ती पहा ती पहा बापूंजींची प्राणज्योती" हे अजरामर काव्य लिहीणारे लोककवी मनमोहन नातू, ही एक मनस्वी व अवलिया असामी होती. ते शाळेत खूप द्वाड होते. त्यांच्या झपूर्झा ह्या कादंबरीवर अश्लिलतेचा आरोप करून खटला भरण्यात आला होता. पत्नी निधन पावल्यानंतर दु:खातिरेकाने ह्या विक्षिप्त माणसाने अंगावर बादल्यामागून बादल्या ओतून घेतल्या होत्या.
नवकथाकारांच्या मांदियाळीत प्रसिद्धी परांगभूत असलेले दिवाकर क्रुष्ण ह्यांनी ३५ कथा व २ कादंबर्या-किशोरीचे ह्रदय आणि विद्या व वारुणी ह्या लिहील्या. ते व्यवसायाने वकील असून हैद्राबाद येथे रहात.
तरुण भारत नागपूरचे संपादक गं.त्र्य. माडखोलकरांना शाळेत असताना एकदा गणितात शून्य मार्क मिळाले होते. ते मँट्रिकला नापास झाले. प्रथम कविता करत नंतर कादंबरीकार, पत्रकार टीकाकार म्हणून प्रसिद्ध पावले. माडखोलकरांनीच मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र विषयक ठराव मांडला होता.
विख्यात लघुनिबंधकार, कथाकार व कादंबरीकार आणि ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झालेले वि.स. खांडेकर, ह्याना त्यांच्या काकांनी दत्तक घेतले होते. शिक्षक म्हणून लोकप्रिय असे खांडेकर गुणग्राहक होते, त्यांनीच कविराज कुसुमाग्रजांचा विशाखा हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला होता. श्रीपाद क्रुष्ण कोल्हटकरांना ते गुरु मानत.
शंभराहून अधिक कादंबर्या लिहिणारे ना.सी.फडके उत्तम वक्ते आणि विद्यार्थ्यांप्रिय प्राध्यापक होते. त्यानी पहिली कथा मेणाचा ठसा ही वयाच्या अठराव्या वर्षी लिहीली. त्याबद्दल मिळालेला मानधनाचा चेक त्यांनी पुना बँकेत भरला. पण दुर्दैवाने नंतर आठच दिवसात ती बँक बुडाली!
श्रीमती दुर्गाबाई भागवत ह्या विद्यार्थीदशेत विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवून पीएचडी करण्यासाठी एकट्याच मध्य प्रदेशात आदिवासी भागात वास्तव्यास होत्या. दुर्दैवाने तेव्हा त्यांना विषबाधा होऊन प्रक्रुती चिंताजनक झाली होती. परिश्रम घेऊन त्यांनी पाचशे पानी प्रबंध लिहीला खरा, पण त्यांचे गाईडबरोबर तीव्र मतभेद झाल्याने त्यानी तो प्रबंध विद्यापीठकडे सादरच केला नाही. ग अशी की, त्यामुळे त्यांच्या वडिलांनी दुर्गाबाईना मिळालेल्या शिष्यवृत्तीची संपूर्ण रक्कम विद्यापीठाला परत केली!
पाणकळा, सराई अशा ग्रामीण शेतकी पार्श्वभूमीवर कादंबर्या लिहीणारे र.वा.दिघे बी.ए. एल्एलबी होते व वकीली करत. त्यानी कायम खेड्यात वास्तव्य केले. ते जर रशियात असते, तर त्यांना मानमरातब मिळून त्यांचे चांगले नांव झाले असते. वयाच्या अवघ्या ९व्या वर्षी त्यांनी सूर्य उगवला ही कविता लिहीली होती!
अजातशत्रू विख्यात लघुनिबंधकार अनंत काणेकरांनी आयुष्यात कोळशाची वखार काढून बदामी कोळशाचा व्यापार, जाहिरातसंस्था काढणे, चित्रा सारखे लोकप्रिय साप्ताहिक काढणे असे नाना उद्योग केले. नंतर ते सिद्धार्थ महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यांचा चांदरात हा काव्यसंग्रह व नाटक निशिकांताची नवरी गाजले. काणेकरच त्याकाळी कोणत्याही कार्यक्रमाचे अध्यक्ष असत. अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहीण्याचे कामही त्यांनी नेकीने केले.
'तेथे कर माझे जुळती' सारखी संस्मरणीय कविता लिहीणारे बाकीबाब बोरकर मराठी व पोर्तुगीज २ यत्ता, इंग्रजी ३ यत्ता पास झाले आणि शिक्षक बनले. केवळ २० व्या वर्षी त्यांचा प्रतिभा हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला होता.
सुधाकर नातू
22/6//'18
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा