सोमवार, ६ ऑक्टोबर, २०२५

"सोशल मीडियावरील माझी सरमिसळ भाग एक

👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच!:👌 👍""पुढचं पाऊल':1 नोव्हेंबर'25 ते 31 डिसेंबर'26 चे एकमेकाद्वितीय प्रत्येक राशीचे राशीभविष्य- भाग 4 !":👌 " अभिवाचन क्रमांक 402 !": 💐"नवरात्रीच्या आपल्या या 4 थ्या दिवशी आपल्या अभिवाचन मंचाचा 402 वा भाग प्रकाशित करताना आम्हाला खरोखर आनंद होत आहे. या भागात पुढील तीन राशींचे वरील कालखंडाचे संपूर्ण राशिभविष्य लिहिले आहे, श्री सुधाकर नातू यांनी आणि त्याचे अभिवाचन श्री उदय पिंगळे करत आहेत....💐 येथे मकर कुंभ आणि मीन राशीचे राशीभविष्य, पुढील लिंक उघडून ऐका !":💐 https://drive.google.com/file/d/1CUHtCqndmA_fsL3_TcaeG_A_NvRe2UlE/view?usp=drivesdk 👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच!:👌 👍""पुढचं पाऊल':1 नोव्हेंबर'25 ते 31 डिसेंबर'26 चे एकमेकाद्वितीय प्रत्येक राशीचे राशीभविष्य- भाग 3 !":👌 " अभिवाचन क्रमांक 401 !": 💐" 👍" छाप पडलेले शब्द !": 😀 "नको रे मनोरे, असे हे मनोरे !":😀 👍 " मुंबईसारख्या शहरात जमिनीची अपुरी उपलब्धतता आणि प्रचंड लोकसंख्या याचा विचार करता उंचच उंच मनोरेंसारख्या शेेकडो इमारती बांधल्या जात आहेत. त्या इमारतीमधील जवळजवळ सगळेच सदनिकामालक प्रवेश करण्यापूर्वी आपआपल्या सदनिकेची सजावट करतात. पण अशा वेळेस मूळ संरचनेला कुठलाही धोकादायक धक्का न पोचवणे, हे नितांत गरजेचे कसे असते याकडेच सोबतचा वाचनीय लेख अधोरेखित करतो. बेदरकारपणे आपल्या इच्छेनुसार संरचनेमध्ये अनिष्ट असा बदल केल्यामुळे अशा इमारती धोकादायक बनतात, काही इमारती कोसळल्याचे आणि त्यापायी जिवितहानी आणि वित्तहानी झाल्याची वृत्ते आपण अधून मधून वाचत असतो. त्याकरता, अशा प्रत्येक उंच उंच मनोऱ्यामधील सहकारी सहनिवासाने आपल्या सदस्यांसाठी सजावट आणि दुरुस्ती यासाठी निश्चित अशी आचारसंहिता बनवून तिचे काटेखोरपणे पालन करणे किती आवश्यक आहे, हेच ह्या लेखावरून संबंधित सहनिवासांच्या नियमकमंडळाने ध्यानात घ्यावे !":👍 त्यासाठी पुढील लिंक उघडा... https://youtu.be/PG_1lukPV84?si=fyv3Q5RG2wvWdEJs // हा व्हिडिओ आपण मोबाईलवर तसेच अधिक परिणामकारक रीतीने पाहण्यासाठी घरातील टीव्हीवर देखील शेअर करून पाहू शकता // 👍"वाचता वाचता, वेचलेले भावलेले !":👍 😀 'तोंडाळासि भांडो नये I वाचाळासी तन्डो नये I संतसंग खंडो नये I अंतर्यामी II' # संतवचन- विक्रमादित्य न पणशीकर 👍 "राजकारणाचा विशेषता महाराष्ट्रातील गढूळलेल्या वातावरणात नेतेमंडळींनी सातत्याने जपावा अंतर्यामी असेच हे संत वचन !":👍 @@@@@@@@@!!!!! 😀 "जो गतीत तो प्रगतीत !" # प्रवीण दवणेंच्या पुस्तकाचे शीर्षक 👍 सध्याच्या स्वदेशी आणि आत्मनिर्भर होण्याच्या दवंडी साठी चपखल असा संदेश !":👍 @@@@@@@@@@@!!!!! 👍 "छाप (पड)लेले शब्द @ 1":👌 ☺️"आता तरी, डोळे उघडा !":😢 "विविध संणांचे वेळी, कानठळ्या बसतील इतक्या आवाजांत ढोल ताशे आणि इतर वाद्ये, असंबंधित गाणी वाजवत सार्वजनिक शांतता भंग करून आपण इतरांचे नकळत जीवन असह्य करत असतोच, शिवाय त्यामुळे सर्वांच्या आरोग्याला धोका पोहोचवत असतो. आनंद घेताना संयम व मर्यादा पाळणे आपण कधी शिकणार? समंजस विचारी सुसंस्कृत जबाबदार नागरिक आपण कधी बनणार? सहाजिकच सोबतच्या बातमीमुळे सध्या सर्वच उत्सव हे बाजारू तमाशा कसे बनले आहेत आणि त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच कसे भोगावे लागत आहेत, हे या लेझरच्या प्रखर किरणांच्या, तसेच डीजेंच्या कानठळ्या बसणाऱ्या आवाजाच्या अतिरेकामुळे डोळ्यांवर अनिष्टच परिणाम व बहिरा धोका, अशा गोष्टी होत आहेत हे दुर्दैव ! वर्षभर आनंद साजरा करायला इतके उत्सव आपल्या येथे असतात की, त्यामुळे खरं तर, आनंदी देश या जागतिक क्रमवारीत आपला वरचा क्रमांक हवा. पण आपण मात्र खूप खूप खाली आहोत याचा कोण विचार करणार? ह्या पार्श्वभूमीवर मला फेसबुकवरील माझा नुकताच प्रसिद्ध केलेला इंग्रजीमधला हा संदेश आठवला: "La Tamasha !": Our Festivals seem to hv lost their original purpose and they hv become Events a La Tamasha and most importantly Nuisance of Noise pollution. Like there is a policy consideration of banning cigarette smoking in public places in festivals too, programmes should not be in open places with music playing thruout the day and upto almost midnight, as the desired levels of decibles of noise and the time limit are never controlled to the extent required. Who is going to take a note seriously to the fact that Like cigarette smoke, loud continuous loud noise too damages heath. Moreover such noise disturbs students' studies and patients too. When are we all going to be wise and learn the fundamental principle of a cooperative living, ' to do only that which is at least not harmful to others.' Honestly, why others should suffer, just for your own enjoyment?" सारांश, "सार्वजनिक उत्सवां"तील उन्माद व विक्रुतीकरण पाहून, स्वर्गात माननीय "लोकमान्य" विषादाने म्हणतील: "हेचि फळ काय मम तपाला?"! आता तरी जागे व्हा आणि डोळे उघडा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा