सोमवार, ६ ऑक्टोबर, २०२५

"सोशल मीडियावरील माझी सरमिसळ भाग 2 !":

👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍" स्वरानंद 124 ! ":👌 💐 आठवणीतली साठवण !":💐 👍 मोबाईल मध्ये जुने व्हिडिओज सर्फिंग करत असताना आजच्या ना एक आठवणीतली साठवण गवसली. दूरदर्शनवर तरुण तरतरीत श्री सुधीर गाडगीळ आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यामधील खुसखुशीत संवाद आणि त्याबरोबरच मधुर स्वरातील लतादीदींनी सादर केलेले श्रवणीय गीत यावेळच्या स्वरानंदासाठी !👍 त्यासाठी पुढील लिंक उघडा.... https://youtube.com/playlist?list=PLqYtyoVujYRVEk9JxYE8j0gn__I6A9Kvx&si=H-ryiQwaSPmN0LM4 धन्यवाद श्री सुधाकर नातू ता. क. 💐ह्या विडिओमध्ये तरूण वयातील अस्मादिकही पहायला विसरू नका !":💐 अभिजात मराठीची भाषाभगिनी अभिजात बंगाली, यांचा अपूर्व संगम, यावेळचा खास स्वरानंदा !: 👍"दूरे आकाश.. (बंगालीत) + तिन्हीसांजा सखे.. (मराठीत) स्वरसाज : आनंदी जसराज जोशी. "आनंदी" चा अप्रतिम कलाविष्कार !":👍 वरील गाणे ऐकल्यावर अक्षरशः अंगावर कोणीतरी अलगदपणे मोरपीस फिरवील्यासारखे वाटेल !"💐 धन्यवाद श्री सुधाकर नातू 😇 "इकडे तिकडे वाकडे तिडके !":😇 😭 "कुठेतरी काहीतरी चुकतंय !":😭 👍"महाराष्ट्र टाइम्स 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल !":👌 😀 "संघर्ष करणारे आपण एकटेच नसतो. लहान थोर सारेच संघर्षयात्री असतात. अडचणीच कर्तबगार माणसं घडवतात 😀 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल !":👌 😀 "निष्क्रियता व चालढकलीचे, दुष्परिणाम होतात. 'जेव्हांचं तेव्हा, ज्याचं त्याला, जिथली गोष्ट जिथल्या तिथे.' हा मंत्र नेहमी उत्तम !"😀 👍"जुने ते सोने- 'सुधा' डिजिटल दिवाळी अंक'20 !":👌 💐 वैविध्यपूर्ण ह्रदयसंवाद, आजोबांचा बटवा', रंगांची दुनिया" अशा विभागांनी सजलेला उत्कृष्ट दिवाळी अंक ! मूल्य केवळ रु. १००/- डिजिटल अंक मिळाल्यावरच online payment करायचे........ ह्या शिवाय...... व्यावसायिक जीवनात अत्यंत उपयुक्त असा....online payment मिळाल्यावरच डिजिटल Management Musings हा अंक व आगामी वर्षाचे ग्रह बदलानुसार अनुकूल गुण आधारित संपूर्ण राशिभविष्य पीडीएफ फाईलही विनामूल्य खास दिवाळी भेट...... व्हिडिओ पाहण्यासाठी.... पुढील लिंक उघडा..... 👌👌 https://youtu.be/JQFPsdMZvm0?si=jmUdM-yIhUKSc2mJ आजच आपले नाव व व्हाट्सअप मोबाईल नंबर देऊन होकार कळवा...💐 👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच!:👌 😄 "मुक्तसंवाद-'आत्मनिर्भर व्हा-तुम्हीच तुमच्या व्यवसायाचे मालक व्हा- भाग 1" :😀 "अभिवाचन क्रमांक 405 !": .💐"दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी महत्त्वाचा सण. आत्मविकासासाठी आणि प्रगतीसाठी श्री सरस्वती पूजन अर्थात अविरत विद्याभ्यास आणि शस्त्रपूजन अर्थात कौशल्यवर्धन करण्याचा प्रारंभ ! या निमित्ताने ही मुक्तसंवादाची मालिका श्री सुधाकर नातू सादर करत आहेत. सध्या जागतिक आणि आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती अनिश्चित आणि आव्हानांची झाली आहे. अशावेळी स्वदेशी व आत्मनिर्भरतेचा नारा अत्यावश्यक होत आहे. केवळ तेवढेच नव्हे, तर सध्याच्या विचित्र परिस्थितीमुळे आधीच भेसूर बेकारीची खाई असताना, हजारोंच्या नोकऱ्या गमावल्या जात आहेत. अशावेळी वैयक्तिक ज्ञान आणि कौशल्य यांचा यथोचित उपयोग करून आत्मनिर्भर कसे व्हायचे हे येथे सोदाहरण उलगडले आहे !":.💐 मार्गदर्शक आणि प्रेरणादायी मुक्त संवाद ऐकण्यासाठी पुढील ध्वनीफित उघडा....!":.💐 👍"शारदोत्सव-वाचता वाचता, वेचलेले भावलेले !":👍 💐"गीतरामायण'कार अर्थात आधुनिक ' 'वाल्मिकी'गदिमा अर्थातच ग दि माडगूळकर, मराठी चित्रपट व साहित्य शारदेतील प्रत्येक अंगामध्ये आपल्या बावन्नकशी प्रतिभेची मोहोर उमटवणारे व्यक्तिमत्व. 'नक्षत्रांचे देणे' हा 14/15 वर्षांपूर्वी त्यांच्या गीतांवर आधारित TV वरील कार्यक्रम विलक्षण लोकप्रिय होता आणि त्याचाच नवा आविष्कारही रसिकांच्या प्रेमामुळे आता साजरा होत आहे. मी सहसा कथासंग्रह वाचत नाही, परंतु अचानक मला 'गदिमां'चे " कृष्णाची करंगळी" या मजेशीर नांवाचे पुस्तक वाचायला मिळाले. त्यामध्ये विशेषतः ग्रामीण भागातील वातावरणाच्या बारा कथा आहेत. प्रत्येक कथा वाचताना 'गदिमा' आपल्याला स्वतःबरोबर घेऊन जात, संपूर्ण चित्रमय अशा घटना उलगडत जातात. सोपी रसाळ भाषा आणि प्रत्येक कथेच्या शेवटी अचानक खटका मारावा असा वेगळेच वळण देणारा झटका तुम्हाला अचंबित करतो. ह्याच पुस्तकामध्ये 'साकेत' प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांची यादी पाहून मी त्यातील 'तीळ आणि तांदूळ' तसेच 'तुपाचा नंदादीप' ही दोन्ही पुस्तके लगोलग वाचली आणि मला ह्या भाषाप्रभूंचे शब्दांवरील श्रेष्ठत्व नजरेस आले. आपणही 'गदिमां'ची गद्य पुस्तके जरूर वाचावीत !":💐 माझ्या ब्लॉगवर मी गेली 4/5 वर्षे विविध विषयांवर लेख लिहीत आलो आहे आणि आता त्यांची संख्या 650 हून अधिक झाली आहे. 'ह्या हृदयीचे ज्ञान उदय त्या हृदयी' जाणीवा विस्तारित करण्याच्या माझ्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून अधून मधून मी माझ्या लेखांच्या लिंक्स सादर करत आहे. त्यातीलच ही लिंक उघडा आणि लेख जरूर वाचा.... https://moonsungrandson.blogspot.com/2025/08/2_27.html 🤣 "रुखरुखणारी लक्षवेधी नोंद !":🤣 😇 "अ. भा. नाट्य परिषदेच्या दादरमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची उपेक्षा!":😇 💐 "मराठी नाटकांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत हे सोबतच्या शतक महोत्सवी नाटकांच्या वृत्तामुळे समजून येईल. तसेच दररोजच्या वर्तमानपत्रांच्या पुरवणीमध्ये पानपानभर नाटकांच्या जाहिराती असतात, त्यामानाने मराठी सिनेमा जाहिरात शोधावीच लागते. नाटकांचा सध्या अक्षरशः महापूर आला आहे आणि ही एक निश्चितच आनंदाची बाब आहे !":💐 😀 "पण जरा बारकाईने बघितले तर एक लक्षवेधी नोंद प्रत्येकाला घ्यावीच लागेल. ह्या सर्व जाहिरातींमध्ये होणारे नाट्य प्रयोग, अभावानेच मराठी नाटकांची अग्रगण्य संस्था अखिल भारतीय नाट्य परिषद यांचे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आढळतेञ!"🤣 आटापिटा करून वर्षानुवर्षे पाठपुरावा करून ज्या थोर नाट्यकर्मींनी हे नाट्यगृह व्हावे आणि हक्काचे असे नाटकांच्या प्रयोगासाठी ते उपलब्ध व्हावे, या उद्देशाने अखेर यश मिळूनही, सध्या त्याची अशी उपेक्षा कां बरे होत आहे, याचा रसिकांनी तसेच समस्त नाट्यकर्मींनी गांभीर्याने विचार करावा असेच सुचवावेसे वाटते !":🤣 🤣"कुठेतरी काहीतरी चुकतंय !":🤣 तीळ तांदूळ, तुपाचा नंदादीप 👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच!:👌 😄 "मुक्तसंवाद-'पेराल तसे उगवेल'!":😀 " अभिवाचन क्रमांक 404!": 😀 " दररोज 'अस्मिता वाहिनी' मुंबई आकाशवाणीच्या केंद्रावर सकाळी साडेसहा वाजता 'चिंतन' हा प्रेरणादायी कार्यक्रम होत असतो. 'ह्या हृदयीचे त्या हृदयी' करत अनेक मार्गदर्शक विचार आपल्याला ऐकता येतात आणि प्रत्येक दिवस अर्थपूर्ण करता येऊ शकतो. हे समजण्यासाठी अशाच एका चिंतन कार्यक्रमाचे सार या व्हिडिओत व्यक्त केले आहे....😀 त्यासाठी पुढील लिंक उघडा....😀 https://youtu.be/AOBE11SU9qM?si=U6pbzm2gCZPxw7dk 👍" एक अंतिम सत्य- अपरिहार्य परस्परावलंबन !":👌 💐 "सध्या आत्मनिर्भरतेचे गोडवे गाणे आवश्यक आहे, ह्यात शंकाच नाही. मात्र अशा परिस्थितीतही आपण एकमेकांवर किती, किती अवलंबून असतो ते विसरू नये. अनेक माणसे आपल्या जीवनात कधीही येत नाहीत आणि तरीही ती आपल्याला त्यांच्या परीने आपले जीवन सुकर, सुलभ होण्यासाठी मदत करत असतात, कष्ट घेत असतात, ते उलगडणारा हा विडीओ......💐 त्यासाठी पुढील लिंक उघडा... 💐 https://youtu.be/ItuHKhHyl7o?si=ngPXCxi6GUFsk1AX 👍मुक्तसंवाद- 'माणसाला मिळालेले अलौकिक वरदान वाणी आणि शब्द!":👍 💐"वाणीआणि शब्द या माणसाला मिळालेल्या सर्वोत्तम वरदानामुळे त्याच्या आयुष्यात क्रांती झाली आणि उत्तरोत्तर संपूर्ण निसर्गावर राज्य करायची संधी या दोन शक्तीमुळे त्याला मिळत गेली या दोन किमयागार शक्तींची माहिती देणारा हा व्हिडिओ अंतर्मुख करणाराच आहे !":💐 त्यासाठी पुढील लिंक उघडा... 💐 https://youtu.be/ekqQoRN4bs4?si=mb8GF1pKBNgIZ3ZL 👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच!:👌 😄 " आहे मनोहर तरी- भाग 47 !": " अभिवाचन क्रमांक 406 !": 💐 " पहिल्या 'खोगीरभरती' या पुस्तकाचे प्रकाशन करण्याची कहाणी सांगता सांगता, श्रीमती सुनीताबाई देशपांडे यांनी, वैविध्यपूर्ण बहुरूपी असे सर्वांगीण कौशल्ये असणारे, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेले त्यांचे पतीराज 'पुल- उर्फ भाई आणि त्यांच्या स्वभावांमधला, जीवनशैलीमधला फरक तसेच विरोधाभास ह्या भागामध्ये पारदर्शक पद्धतीत उलगडला आहे. संसारामध्ये असेच एकमेकांना पुरक असणे आवश्यक असते, हाच त्यावरून मिळणारा बोध होय. या अभिवाचनासाठी वाचकस्वर असलेल्या अनामिकेचे आभार. ऐकण्यासाठी पुढील लिंक उघडा....💐 https://drive.google.com/file/d/17D83JL59qtmugA4bOK0xWlmqqxl96hCG/view?usp=drivesdk

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा