शनिवार, २६ ऑक्टोबर, २०२४

"बोल अमोल 254 ते 267 !":

💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-254 !":👌 👍( सोमी वर गवसलेली कविता):👌 💐"भारत अनमोल रतन !":💐 "स्वर्गी उमटता सूर वाद्यांचे देवही ऐकती थबकून कोण येतसे पृथ्वीवरुनि बघती सारे वाकून स्वर्गाच्या या वाटेवरुनी कोण येतसे खरोखरी ज्याच्यासाठी आज सजली सारी पहा ही इंद्रनगरी नाही वाद्ये नाही घोषणा कोण चला हा पाहू तरी भारताचा उद्योगभूषण परि पावले जमिनीवरी कोण येतसे पहा पहा हो भारत भूचा अनमोल हिरा नव्हे नव्हे हो हा तर आहे माणुसकीचा जिवंत झरा लाखांचा पोशिंदा गेला प्राणाहून ज्यास प्रिय वतन आला आला स्वर्गी पहा भारत भूचा अनमोल रतन" -इरावती 💐"भारत अनमोल रतन !":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-255 !":👌 💐"कालप्रवाह अव्याहत सातत्याने आपल्या विहित गतीने पुढे पुढे जात असतो. त्याचबरोबर माणसाचे बाल्य, कौंमार्य, तारुण्य, प्रौढत्व आणि वृद्धत्व अशा क्रमाने आपले विविध रंग आवडीनिवडी, हौशीमौजी बदलत्या काळानुसार साजरे केले जातात. विविध पारंपारिक परंपरा, रूढी, सणवार तशीच कालानुरूप रंगत आणत जातात. 'पुढे जाण्यासाठी, मागे वळून पाहताना' हे इंद्रधनुषी जीवन रंग, आपल्याला मनभावन क्षण देत असतात. 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-256 !":👌 😇 "मी आणि फक्त मीच अशी मनोवृत्ती, अहंकाराला जन्म देते. अहंकारातून निजस्वार्थ फक्त निजस्वार्थ निर्माण होतो. त्यामुळे स्वतःपलीकडे न बघता केवळ आपलेच हित जास्तीत जास्त पहात, आपल्या स्थानाप्रमाणे असलेली विहित कर्तव्य अशी माणसं दुर्लक्षित करतात. हे जसे कुटुंबात तसेच समाजात आणि सार्वजनिक जीवनात घडत असते. नैसर्गिकरित्या या एक प्रकारच्या चुकाच असतात आणि 'करावे तसे भरावे !' हा शाश्वत न्याय असल्यामुळे, त्या त्या व्यक्तींना त्याची फळे या जन्मात कधी ना कधी भोगावेच लागतात, हे त्यांनी आणि सर्वांनी ध्यानात घ्यावे असे सत्य आहे !":😇 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-257 !":👌 😄 "मतभेद होणं हे नैसर्गिक आणि साहजिकच असते. मतभेद म्हणजे सजग विचारधारेचा जातिवंत आविष्कार. पण मनभेद ही न परतीची चिंताजनक वाट असते. त्या अवस्थेत एकमेकांच्या मनांतल्या प्रतिमा नाकारल्या जातात. मतभेदापासून मनभेदापर्यंतचा प्रवास साहजिकच ज्याने त्याने प्रयत्नपूर्वक टाळणे गरजेचे असते. निकोप कौटुंबिक व सामाजिक भवताल निर्माण करण्यासाठी ते अत्यावश्यक असते!:😄 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-258 !":👌 🤣 'खाऊजा' संस्कृती सुरू झाल्यापासून पैसा हेच सारं सर्वस्व झाले आहे. जो तो पैशाच्या मागे धावतो आहे. खरं म्हणजे पैसा हे साधन आहे, समाधान, शांती मिळवण्याचा एक फक्त मार्ग. पण आता पैसा हेच साध्य झाल्यामुळे, साधन कुठलही असलं, तरी त्याचा विधीनिषेध न बाळगता पैशासाठी आयुष्य वेचणे सुरू होणे आणि त्यातून भ्रष्टाचाराचा ब्रह्मराक्षस निर्माण होणे, यामुळे राजकीय, सामाजिक आणि मानसिक भवताल हा रसातळाला चाललेला आपण बघत आहोत. जीवनातील शाश्वत मूल्यांना विसरत चाललो आहोत. त्यांची किंमत आज शून्यवत होणे, हे चिंताजनकच आहे !":🤣 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-259 !":👌 😇 " काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही.... काही सांगायचे आहे, पण सांगणार नाही..... काही ठरवायचे आहे, पण ठरवणार नाही..... 'कोडे' 'हे' सोडावयाचे आहे, पण, 'ते' सुटणारे नाही......!":😇 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-260 !":👌 🤣" कारे भुललासी, वरलिया रंगा' !', वरवरच्या निरीक्षणाने आणि आपल्या गृहीत धरण्यामुळे खूप वेळा वरील प्रसिद्ध वाक्याचा मतितार्थ समजण्याची वेळ येते. दिखाउ अशा प्रतिमा किती चुकीच्या होत्या, हे लक्षात आल्यावर आपल्याला दुःख होते, व्यथित होणे साहजिक असते. अशी वेळ येऊ नये म्हणून, आपण कुणाही बद्दल काहीही मत बनवण्यापूर्वी '360 डिग्री दृष्टिकोन' ठेवून मगच पुढील निर्णय घ्यावेत, हेच शहाणपण !":🤣 👍"बोल, अमोल-261 !":👌 🤑 " विशिष्ट परिस्थिती, अपेक्षा, निर्णय, कृती आणि फळ अशा पाच गोष्टींच्या साखळीमुळे आपला व्यवहार होत असतो. त्यामध्ये विशिष्ट परिस्थितीत घेतलेला निर्णयच पुढे आपल्याला अडथळा निर्माण करू शकतो आणि त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. ( डिजिटल व्यवहारामध्ये हा अनुभव अधून मधून येत राहतो आणि) आपल्याला पुनश्च पूर्वीचा निर्णय बदलणे जमत नाही. घेतलेल्या निर्णयाचा पुढे अडथळा होऊ नये, असे जर वाटत असेल तर निर्णय घेताना साधक बाधक दूरदृष्टी हवी, त्याच्या संभाव्य परिणामांची कल्पना हवी !":🤑 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-262 !":👌 😂 "कालगणनेची दोन सहस्त्रके पूर्ण झाली आहेत. आता आपण तिसऱ्या सहस्त्रकाच्या प्रारंभीची काही वर्षे पार केली आहेत. मागे वळून पाहताना ध्यानात येते की, गेल्या शतकात व त्यामागेही दोन जागतिक महायुद्ध सोडता जगरहाटी आपल्या पद्धतीने मार्गक्रमणा करत गेली. परंतु 'वाय टू के' चे संक्रमण पार पाडल्यानंतर, गेली 24 वर्षे जे काही जगामध्ये घडून गेले आहे, घडत आहे त्यामधून लक्षात येते की, अशी चित्रविचित्र उलथापालथ व मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना आणि नैतिक अध:पतनाची परिसीमा कधीही पूर्वी झालेली नव्हती. काळाच्या महिमेचे हे प्रताप जर असे भयानक, तर त्याच्या तिप्पट काळात हे शतक पूर्ण होईपर्यंत, अजून काय काय जगाला सहन करावे लागणार आहे त्याची कल्पनाच करता येत नाही ! अशावेळी वाटते जे मागच्या शतकापर्यंत जिवंत होते आणि आता नाहीत, त्यांच्या तुलनेत आपण सारे भाग्यवान की, अभागी हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे !":😂 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-263 !":👌 😊 "माणसाच्या आयुष्यात साऱ्याच गोष्टी त्याला हव्यात अशा जमतातच असे नाही, किंवा होतातच असे नाही. अशावेळी आपल्याला नको असलेली गोष्ट जर घडली, त्यातून ती जर दुसऱ्या कोणाच्या कडून अपेक्षित असेल तर मनाला अस्वस्थता येणं, राग निर्माण होणं हे साहजिक असतं. परंतु अशा वेळेला त्याच अनपेक्षित नको त्या गोष्टीचा सारखा विचार करत राहिलं, तर त्याचे रूपांतर संताप आणि नंतर चक्रवाढ व्याजाप्रमाणे क्रोधात होते. अशावेळी तो क्रोध ज्या व्यक्तीमुळे हे नको ते घडले तिच्याबरोबर व्यक्त करणे टाळावे. कारण त्यातून काहीच साध्य होत नाही. उलट 'घडले तेच पसंत !' अशी दृष्टी ठेवून आपण नंंतर आपल्याला हवाय तसा त्यात बदल करून अपेक्षित असलेले साध्य करू शकतो कां एवढाच प्रयत्न करावा, तोच समंजसपणा असतो !":😊 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-264 !":👌 😄 "दाद प्रतिसाद !":😄 💐 "सोशल मीडियावर संचार करताना जे जे काही मनाला भावणारे आपल्या जाणिवा विस्तारित करणारे गवसते त्याला दाद देणे, हे एका संवेदनशील रसिक मनाचे लक्षण असते. पण दाद ही मागून मिळत नाही, ती देणार्याला आतून व्यक्त करावीशी वाटणे गरजेचे असते. दाद मिळो वा न मिळो, 'या हृदयीचे त्या हृदयी' करणार्याने व्यक्त होतच राहायचे. कारण तो हे जे काही करत आहे, ते त्याला आनंद होत असतो म्हणून !":💐 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽 💐II(अ) मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-265 !":👌 🤣 "कलियुगाने आपले भीषण पाश सर्वदूर, सार्वत्रिक पसरवायला वेगाने सुरुवात केली आहे, अशा तऱ्हेचाच माहोल आहे. पूर्वी कधीही न घडलेल्या अवचित, अनाठाई मने विषण्ण करणाऱ्या घटना विविध क्षेत्रात घडत आहेत. भ्रष्टाचाराचा भस्मासुर, अनाचाराचा शिष्टाचार आणि षडरिपुंचे थैमान, हे सांगत आहे की 'कुठेतरी काहीतरी चुकते आहे' ! अशावेळी प्रामाणिक सज्जन सरळमार्गी माणसांच्या पुढे अंध:कार पसरलेला असताना, एका गीताचे शब्द आठवतात: 'ना कोई हमदम ना रहा !, ना कोई सहारा रहा !! ना हम किसी के रहे !!! ना कोई हमारा रहा !!!!":🤣 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-266 !":👌 😃 "आमदार अपात्रते विषयी निकाल लागण्या अगोदरच गेल्या पाच वर्षात जे काही भले बुरे योग्य अयोग्य घडून गेले आणि राजकारणाचा जो चिखल झाला, तो सारा विसरून निवडणुकांच्या माहोलात इच्छुकांसाठी संगीत खुर्चीचा खेळ चालू आहे. 'तिकिटे' आणि इच्छुक व्यस्त प्रमाणात असल्यामुळे, प्रत्येक वेळेला भरपूर इच्छुकांना नाराजीने बाहेर पडावे लागत आहे. लगेच ते दुसऱ्या पक्षाच्या संगीत खुर्चीत हजेरी लावत आहेत ! एकदा का तिकीट मिळाले की, जणू काही जग जिंकले असा आनंद होणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की, खरी प्रतिक्षा अजून दूरच आहे, कारण उमेदवारांप्रमाणेच मतदारांचीही मोठी कठीण कसोटी आहे ! सत्तेचा सोपान चढून जाऊन कोण यशस्वी होतो ते 23 नोव्हेंबर पर्यंत गुलदस्त्यातच राहणार आहे !":😃 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-267 !":👌 😚 "निवडणुकांचा खेळ हा देखील विक्रीव्यवस्थेसारखाच (marketing management) असल्यामुळे तेथील नियम खरं म्हणजे येथे लागू व्हायला हवा. 'In open free competition, ultimately only first three brands remain' ! इंग्लंड अमेरिकेसारख्या प्रगत देशातील लोकशाहीमध्ये हा नियम अस्तित्वात असलेला दिसतो. परंतु हा नियम येथे लागू होत नाही असे दिसते. कारण पावसाळ्यात जशा विविधरंगी छत्र्या उघडल्या जातात, त्याप्रमाणे येथे एक नाही, दोन नाही तर जवळजवळ दहा पक्ष एकमेकांशी स्पर्धा करत आपले नशीब जमावताना दिसत आहेत. शिवाय अपक्ष ते वेगळेच ! याचाच अर्थ अजून आपली लोकशाही बाल्यावस्थेत आहे, तसेच हा सारा पूर्वापार चालत आलेल्या सरंजामशाहीचा व घराणेशाहीचा प्रताप आहे, दुसरे काय ?":😚

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा