सोमवार, ७ ऑक्टोबर, २०२४

" बोल अमोल-243 to 253 !":

💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-243 !":👌 😄 "सोशल मीडिया हा मेटाकुटीला आणणारा आहे असे म्हणणे, हा ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे. त्या उलट सोशल मीडिया हा जीवनातील मेटाकुटीला विसरून, विरंगुळा देणारा आणि आपल्या जाणिवा विस्तारित करणारा, सातत्याने नवीन शिकत राहावं असा विशाल प्लॅटफॉर्म जसा आहे, त्याशिवाय प्रत्येकाच्या कल्पनाशक्तीला आव्हान देऊन, प्रेरणा देणारा नवनिर्मितीचा आनंदोत्सव आहे ! दृष्टिकोन बदला आणि या नवनवलोत्सवात सामील व्हायला शिका !":😄 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-244 !":👌 😄 "माणसाचा मेंदू हा एक सुपर डुपर कॉम्प्युटर आहे आणि त्यामध्ये शेकडो ट्रिलियनच्याहून कितीतरी अधिक असे न्यूरॉन कनेक्शन्स असतात. आपले सारे जीवन कार्य त्यांच्या व्यवस्थेवर चालू असते. आपण विविध प्रकाराने मोबाईलचा डेटा वापरून जसे कार्य करतो, त्याचप्रमाणे मेंदूमधील डेटा कोणत्या कार्यासाठी खर्च करायचा आणि कोणत्या कार्यासाठी खर्च नाही करायचा हे प्राधान्य आणि निवड अत्यावश्यक असते. मन स्थिर आणि सक्षम राहण्यासाठी आपल्या आवडत्या कामात हा डेटा वापरणे, हे कौशल्य असावे लागते !":😄 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-245 !":👌 😄 " कॉम्प्युटर, इंटरनेट आणि माहितीचे मायाजाल हे आधुनिक युगातले जणू ऋषीमुनी. ध्येयलक्षी संगणकीय कार्यक्रम अर्थात apps म्हणजे एकाच वेळी अनेक गोष्टी साध्य करणारे ऋषीमुनींचे मंत्र ! याचा पाया 1742 मध्ये ब्लेझ पास्कल याने गणकयंत्रचा adding machone चा शोध लावला आणि हेच यंत्र पुढे विकसित करून 1823 मध्ये चार्ल्स बॅबेज नावाच्या इंग्लिश शास्त्रज्ञाने विश्लेषक यंत्र अर्थात अनालिटिकल मशीन निर्माण केलं, त्याला गणित करण्याचं शास्त्र त्याने शिकवलं आणि आधुनिक संगणकीय पर्वाचा जन्म झाला !":😄 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-246 !":👌 🤣 "हायकू !":🤣 🤣"केला असंगाशी संग, रहाती आपल्यातच दंग, होणार त्यांचा अपेक्षाभंग !":🤣 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-247 !":👌 😇 "जनमानसाला हवीहवीशी प्रतिमा निर्माण करणे, खूप खूप कठीण असतं. चांगुलपणाच्या हितकारक कृत्यामुळे ती अथक प्रयत्नांनी निर्माण होते. पण अशा प्रतिमेचा चुराडा करायला, एखादेच दुष्कृत्य पुरेसे असते. त्यानंतर ती पुनश्च उभी करणे, केवळ अशक्यप्राय असते !":😇 🤣 " 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-248 !":👌 😀 "कोणत्याही कार्याला आरंभ करताना, अथवा शुभकार्याला सुरुवात करताना मुहूर्त पाहिला जातो. मुहूर्त म्हणजे इच्छित कार्य यशस्वी व्हावे याकरता निश्चित केलेली ध्येयवेळ होय. निसर्ग अविरत गतिमान आहे आणि विश्वाच्या विशालते पुढे काळ ही एक केवळ संकल्पना जरी असली, तरी प्रत्येक क्षणाच्या परिणामांची परिणीती वेगवेगळी होत असते. याचे कारण त्या त्या वेळची आगळीवेगळी निसर्ग-परिस्थिती. साहजिकच ध्येयवेळ अर्थात मुहूर्त हा त्यासंबंधी सखोल विश्लेषण करून निवडला जातो. पूर्वापार मुहूर्त परंपरा चालू आहे ती याचमुळे ! साडेतीन मुहूर्त असलेले दिवस अर्थातच महत्त्वाचे. त्यामधील विजयादशमी अर्थात दसरा लवकरच आपण साजरा करणारा आहोत !":😀 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-249 !":👌 😀 "जीवन एक अतर्क्य, न सुटलेले कोडे आहे, प्रत्येकाची आयुर्मर्यादा वेगवेगळी असते. विज्ञानाद्वारे कितीही प्रगती झाली तरी अमरत्वाचा वर कोणालाही मिळालेला नाही. निसर्ग अखेरीस शरीरावर मात करतोच करतो. प्रत्येक जण आपले जीवन कशा पद्धतीने व्यतीत करतो, सवयी कोणत्या आणि नियमितता की अनियमितता यावर त्याची पुढची वाटचाल अवलंबून असते. शिवाय संपर्कात येणाऱ्या व्यक्तींबरोबरच्या बऱ्या वाईट संबंधांचेही मानसिक परिणाम त्याच्यावर होत असतात. साहजिकच त्याची किंमत त्याला स्वतःला द्यावी लागते. आणि... म्हणूनच कदाचित प्रत्येकाचे आयुष्य ठराविक मर्यादेतच राहते. 'करावे तसे भरावे' हा शाश्वत नियम आहे, हे ध्यानात ठेवा !":😁 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-250 !":👌 😇 "दर्जेदार साहित्य लिहिणारे लेखक आणि वाचणारे वाचक दुर्मिळ होत चालल्यामुळे 'अंतर्नाद' सारखे अभिजात जातकुळी जपणारे मासिक बंद पडले. असेच एकेकाळी 'सत्यकथा' मासिक बंद पडले होते.... आणि...... आजची बातमी तर अधिकच व्यथित करणारी आहे. 'शारदोत्सवा'ची ही वैभवशाली गाथा अधिक समृद्ध करणारे 'शब्द'रुची हे 'ग्रंथाली'तर्फे प्रसिद्ध होणारे मासिकही आगामी वर्षापासून बंद होणार ही ! एकीकडे अभिजात भाषा म्हणून मराठीचा सन्मान होत असताना, हे काय घडते आहे? 'कुठेतरी काहीतरी चुकते आहे' !!":😇 👍"बोल, अमोल-251 !":👌 😊 " कोणत्याही भाषेचं व्याकरण हा तिचा मूलभूत गाभा आणि पाया असतो. तेच संगीतातही, शास्त्रीय संगीत हे संगीताचे व्याकरण होय ! व्याकरण हे समान असते, शब्द बदलू शकतात, स्वरांच्या मात्रा बदलू शकतात. तसंच माणसातील शरीररचना आणि त्या रचनांबरंहुकूम कार्य करण्याची पद्धत अथवा सिस्टीम ही सर्वत्र समान असते. पण माणसाच्या बाबतीत मन आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भावना हा सातत्याने बदल घडविणारा, नवनवी दिशा देणारा अथांग,अगम्य प्रवास असतो तोच जीवनाचा ड्रायव्हिंग फोर्स असतो. विवेकाने भावनांवर नियंत्रण ठेवता येते हे ध्यानात ठेवा !":😊 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-252 !":👌 😄 "इतरांच्या वागण्याचा आपल्याला जेव्हा त्रास होतो, तेव्हा हे ध्यानात घ्यावे की, त्यांनी कसे वागावे हे आपल्या हातात नसते. त्या उलट त्यांच्या वागण्याचा आपल्यावर कुठलाही विपरीत परिणाम होऊ नये, याची खबरदारी घेणे गरजेचे असते कारण आपणच आपल्या वागण्याची दिशा ठरवू शकत असतो. महत्त्वाचे हे की, भावनांवर नियंत्रण ठेवता येते, हे ध्यानात ठेवा !":😄 [10/10, 8:25 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल 👍"बोल, अमोल-253!":👌 💐"प्रत्येकाच्या काही ना काही सवयी असतात आणि त्या काटेकोरपणे पाळल्या जातात. आर्थिक जमाखर्च, वेळेचे नियोजन आदि सवयींमुळे जशी आर्थिक शिस्त पाळली जाते, तसंच वेळेच्या हिशोबामुळे वैयक्तिक आत्मविकास साधता येतो !":💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा