बुधवार, ३० ऑक्टोबर, २०२४
"मल्लिनाथी 1 ते 5 !":
🤣 "मल्लिनाथी !":🤣
🤑 "आधीच उल्हास,
त्यात फाल्गुन मास !": 🤑
😇 "दररोजच्या वर्तमानपत्रांमध्ये आधीच जाहिरातींचा सुळसुळाट जागोजागी असतो, पान पानभर जाहिरातीने अक्षरशः डोळे दुखतात. त्यात भर म्हणून अधून मधून, वर्तमानपत्राच्या आकाराबाहेर पूर्ण लांबीच कॉलमभर जाहिरातींचं शेपूट लावलेलं असतं !
बाजारू वृत्तीची ही परिसिमा नव्हे का? अशा शेपटामुळे वर्तमानपत्र वाचताना गैरसोय होते वाचकाची, त्याकडे कोण लक्ष देणार?
जाहिरातदारांना प्राधान्य, वाचकांना मात्र बॅकसीट असे असल्यावर, दुसरे काय होणार ?":😇
🤣 "मल्लिनाथी-2 !":🤣
🤑 " नाव मोठं लक्षण खोटं !": 🤑
😁 "एका दशकाहून अधिक वर्षे प्रतीक्षेनंतर अखेरीस 'गंगेत घोडं नहालं' आणि मराठी भाषेला अभिजात भाषा हा दर्जा मिळाला. या विलंबामागे राजकीय हेतू किती, ते प्रथम तपासण्याची गरज आहे.
अभिजात दर्जा जरी मराठी भाषेला मिळाला असला, तरी सध्याची मराठी भाषा वापरात आणण्याची, साहित्याची आणि वाचनसंस्कृतीची अवस्था बघता, असेच म्हणावेसे लागते की,
"नाव मोठे झाले खरे, पण लक्षण खोटे"!:😁
: 🤣 "मल्लिनाथी-3 !":🤣
🤑 " 'अर्था'चा 'अनर्थ'-'नाव मोठं, लक्षण खोटं !": 🤑
🤣🤣🤣 "नुकतेच मी श्री अच्युत गोडबोले यांनी खूप कष्ट घेऊन, सखोल संशोधन करून आणि 127 संदर्भ ग्रंथांचा, शिवाय अनेक वेबसाईटस् आधार घेऊन 'अनर्थ' हे चार विभागात- (सद्यस्थिती, 'हवामान बदल-पर्यावरण प्रश्न, 'चंगळवाद' आणि 'समारोप') लिहिलेले पुस्तक वाचले.
त्यामधून जे जाणवले, ते खरोखर चिंताजनक असे आहे. पुस्तकामध्ये जागोजागी विविध विषयांवरील आकडेवारीसह जी माहिती चौकटीमध्ये उद्धृत केली आहे, त्यावरून आपण अर्थनियोजनाच्या बाबतीत अंध:कारात आहोत, जगात पाचवी अर्थव्यवस्था ते तिसरी अर्थव्यवस्था या भ्रमात आहोत, असेच प्रत्येक ठिकाणी पीछेहाट हा दर्शवणारी ही माहिती आहे.
थोडक्यात आर्थिक विषमतेची परिसीमा गाठण्यात मात्र आपल्याला यश आले आहे. श्रीमंत, अधिकाधिक श्रीमंत होत आहेत आणि तळागाळातले 90% लोक अक्षरशः कष्टप्रद जीवन जगत आहेत, असेच त्यावरून निष्कर्ष काढले जाऊ शकतात. जास्तीत जास्त वाचकांनी हे पुस्तक वाचले पाहिजे आणि वास्तवतेचा 'अनर्थ' कसा होत चालला आहे, ते समजून घेतले पाहिजे.
सारांश आपले अर्थतज्ञ, जो अर्थाचा अर्थ काढतात तो अर्थ नसून 'अनर्थ'आहे ! अर्थात 'नाव मोठे लक्ष लक्षण खोटं असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल !":🤣🤣
🤣🤣 "मल्लिनाथी 4 !":🤣🤣
"75 वर्षांहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठांना जेव्हा ST बसने मोफत प्रवास करण्याची, तसेच महिलांना सरसकट अर्ध्या तिकिटाची ST प्रवासासाठी सुविधा देण्यात आली, तेव्हा कोणालाही ते गैर वाटले नव्हते. कदाचित 'लाडकी बहीण' ही योजना "येन केन प्रकारेण' सत्ता मिळविल्यानंतर ताबडतोब सुरू केली असती, तर त्यामागील हेतूंबद्दल शंका घेता आली नसती.
परंतु आता चक्क ऐन निवडणुकीच्या तोंडावर कुठल्याही वस्तू व सेवा निर्मिती शिवाय, विनाश्रम सर्वच महिलांना महिना पंधराशे रुपयाची खिरापत वाटणे हे एक प्रकारे अर्थविषयक असंतुलनाला हातभार लावणे जसे ठरते, तसेच हा चक्क 'आयजीच्या जीवावर बायजी उदार !' असा प्रकारच नव्हे कां? त्यापेक्षा रोजगार हमी योजनेप्रमाणे श्रम करू शकणाऱ्या साठ वर्षापर्यंतच्या महिलांसाठी अशा तऱ्हेची एखादी योजना सुरू करता येणे शक्य होते आणि साठ वर्षाहूून अधिक अशा ज्येष्ठ महिलांना विनाश्रम महिना पंधराशे रुपयाची सानुग्रह रक्कम देणे रास्त होते.
सहाजिकच या अनाठायी, अयोग्य समयी सुरू केलेल्या योजनेच्या मोबदल्यात काय मिळवायचे, तो सत्ताधाऱ्यांचा अंतस्थ हेतू आपोआपच उघड होत आहे. दुर्दैव असे की तो हेतू आड वळणाने ते प्रचारात मांडतही आहेत !
निवडणुकीच्या स्पर्धेत सर्वांना 'समान मैदान' याचेही त्यामुळे उल्लंघन होत नाही कां ?
सर्वात वाईट ह्याचे वाटते की, हा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे, हे समजून समजूनही तो विधिवत कायदेशीर आणि शिष्टसंमत ठरत आहे ह्याचे !":🤣🤣
🤣🤣"मल्लिनाथी 5 !":🤣🤣
😝"महाराष्ट्राचे राजकारण इतक्या खालच्या थराला गेल्यापासून, काही शब्द हे परवलीचे झाले आहेत. 'गद्दार', '50 खोके आणि ओके' 'दिलासा' आणि 'धक्का' ! 2019 मध्ये सत्तारंभ करण्याच्या वेेळीच,प्रथम नीच पातळीवरच्या राजकारणाने भयानक 'धक्का' दिला, तेव्हापासून'गद्दार'या शब्दाचा उदय झाला !
कौरवांनी वचन न पाळल्यामुळे, पुढचे सारे 'महाभारत' घडले हे सर्वज्ञात आहे. त्याचप्रमाणे 'बंद खोलीत जो शब्द दिला' तो न पाळल्यामुळे पुढचे सत्तेसाठीचे राजकारण सुरू झाले. साहजिकच 'आद्य गद्दार' कोण ठरू शकतो, हे उघड आहे.
नंतर अडीच वर्षांनी सत्ता लालसे पोटी जे घडवण्यात आले, त्यामुळे '50 खोके आणि ओके' हा शब्द प्रकाशात आला. पक्ष फोडून बाहेर पडलेल्या या समूहाने जर 2019 मध्येच पक्षप्रमुखांची विचारधारा न पटल्याने सत्तेत सामील व्हायचे नाकारले असते आणि मूळ पक्षाच्याच नावाचे कुंकू लावले नसते आणि स्वतंत्र समूह म्हणून अस्तित्व राखण्याचे धार्ष्ट्य दाखवले असते, तर त्यांच्या नशिबी 'गद्दार' शब्द आलाच नसता.
आदल्या दिवशी भ्रष्टाचाराचा ज्यांच्यावर केला आरोप, लगेच दुसऱ्या दिवशीच त्यांना सन्मानाने सत्तेमध्ये घेणारे आणि ज्या कुटुंबप्रमुखाच्या छत्रछायेखाली राजकारणात एवढी उडी मारणारे, नंतर 'विकास' (कुणाचा ?!) करायचाय असा न पटणारा बहाणा करत सत्तेेत सामील होणारे, कुठल्या पातळीवरचे 'गद्दार' म्हणावयाचे ?
पाचही वर्ष सत्तेची पोळी भाजून खाणारे
हे 2 समुह आणि त्यांना हे सारे करायला भाग पाडणारे सारेच एका माळेचे मणी !
या साऱ्या नाट्यात दिलासा एवढाच की, यासाठी एवढा अट्टाहास करणाऱ्यांना शेवटी दुय्यम पदावर निमूटपणे राहावे लागले हा !
मात्र राजकारणाला काळ्याकुट्ट अंधारात गेली पाच वर्षे ढकलणाऱ्यांना जबरदस्त धक्का देण्याची संधी 20 नोव्हेंबरला मतदारांच्या हातात आली आहे, हाच खराखुरा दिलासा !":😝
शनिवार, २६ ऑक्टोबर, २०२४
"बोल अमोल 254 ते 267 !":
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-254 !":👌
👍( सोमी वर गवसलेली कविता):👌
💐"भारत अनमोल रतन !":💐
"स्वर्गी उमटता सूर वाद्यांचे
देवही ऐकती थबकून
कोण येतसे पृथ्वीवरुनि
बघती सारे वाकून स्वर्गाच्या या वाटेवरुनी
कोण येतसे खरोखरी
ज्याच्यासाठी आज सजली
सारी पहा ही इंद्रनगरी नाही वाद्ये नाही घोषणा
कोण चला हा पाहू तरी
भारताचा उद्योगभूषण
परि पावले जमिनीवरी
कोण येतसे पहा पहा हो
भारत भूचा अनमोल हिरा
नव्हे नव्हे हो हा तर आहे
माणुसकीचा जिवंत झरा
लाखांचा पोशिंदा गेला
प्राणाहून ज्यास प्रिय वतन
आला आला स्वर्गी पहा
भारत भूचा अनमोल रतन"
-इरावती
💐"भारत अनमोल रतन !":💐
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-255 !":👌
💐"कालप्रवाह अव्याहत सातत्याने आपल्या विहित गतीने पुढे पुढे जात असतो. त्याचबरोबर माणसाचे बाल्य, कौंमार्य, तारुण्य, प्रौढत्व आणि वृद्धत्व अशा क्रमाने आपले विविध रंग आवडीनिवडी, हौशीमौजी बदलत्या काळानुसार साजरे केले जातात.
विविध पारंपारिक परंपरा, रूढी, सणवार तशीच कालानुरूप रंगत आणत जातात. 'पुढे जाण्यासाठी, मागे वळून पाहताना' हे इंद्रधनुषी जीवन रंग, आपल्याला मनभावन क्षण देत असतात.
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-256 !":👌
😇 "मी आणि फक्त मीच अशी मनोवृत्ती, अहंकाराला जन्म देते. अहंकारातून
निजस्वार्थ फक्त निजस्वार्थ निर्माण होतो. त्यामुळे स्वतःपलीकडे न बघता केवळ आपलेच हित जास्तीत जास्त पहात, आपल्या स्थानाप्रमाणे असलेली विहित कर्तव्य अशी माणसं दुर्लक्षित करतात. हे जसे कुटुंबात तसेच समाजात आणि सार्वजनिक जीवनात घडत असते.
नैसर्गिकरित्या या एक प्रकारच्या चुकाच असतात आणि 'करावे तसे भरावे !' हा शाश्वत न्याय असल्यामुळे, त्या त्या व्यक्तींना त्याची फळे या जन्मात कधी ना कधी भोगावेच लागतात, हे त्यांनी आणि सर्वांनी ध्यानात घ्यावे असे सत्य आहे !":😇
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-257 !":👌
😄 "मतभेद होणं हे नैसर्गिक आणि साहजिकच असते. मतभेद म्हणजे सजग विचारधारेचा जातिवंत आविष्कार. पण मनभेद ही न परतीची चिंताजनक वाट असते. त्या अवस्थेत एकमेकांच्या मनांतल्या प्रतिमा नाकारल्या जातात. मतभेदापासून मनभेदापर्यंतचा प्रवास साहजिकच ज्याने त्याने प्रयत्नपूर्वक टाळणे गरजेचे असते. निकोप कौटुंबिक व सामाजिक भवताल निर्माण करण्यासाठी ते अत्यावश्यक असते!:😄
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-258 !":👌
🤣 'खाऊजा' संस्कृती सुरू झाल्यापासून पैसा हेच सारं सर्वस्व झाले आहे. जो तो पैशाच्या मागे धावतो आहे. खरं म्हणजे पैसा हे साधन आहे, समाधान, शांती मिळवण्याचा एक फक्त मार्ग.
पण आता पैसा हेच साध्य झाल्यामुळे, साधन कुठलही असलं, तरी त्याचा विधीनिषेध न बाळगता पैशासाठी आयुष्य वेचणे सुरू होणे आणि त्यातून भ्रष्टाचाराचा ब्रह्मराक्षस निर्माण होणे, यामुळे राजकीय, सामाजिक आणि मानसिक भवताल हा रसातळाला चाललेला आपण बघत आहोत.
जीवनातील शाश्वत मूल्यांना विसरत चाललो आहोत. त्यांची किंमत आज शून्यवत होणे, हे चिंताजनकच आहे !":🤣
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-259 !":👌
😇 " काही बोलायचे आहे,
पण बोलणार नाही....
काही सांगायचे आहे,
पण सांगणार नाही.....
काही ठरवायचे आहे,
पण ठरवणार नाही.....
'कोडे' 'हे' सोडावयाचे आहे,
पण, 'ते' सुटणारे नाही......!":😇
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-260 !":👌
🤣" कारे भुललासी, वरलिया रंगा' !', वरवरच्या निरीक्षणाने आणि आपल्या गृहीत धरण्यामुळे खूप वेळा वरील प्रसिद्ध वाक्याचा मतितार्थ समजण्याची वेळ येते. दिखाउ अशा प्रतिमा किती चुकीच्या होत्या, हे लक्षात आल्यावर आपल्याला दुःख होते, व्यथित होणे साहजिक असते. अशी वेळ येऊ नये म्हणून, आपण कुणाही बद्दल काहीही मत बनवण्यापूर्वी '360 डिग्री दृष्टिकोन' ठेवून मगच पुढील निर्णय घ्यावेत, हेच शहाणपण !":🤣
👍"बोल, अमोल-261 !":👌
🤑 " विशिष्ट परिस्थिती, अपेक्षा, निर्णय, कृती आणि फळ अशा पाच गोष्टींच्या साखळीमुळे आपला व्यवहार होत असतो. त्यामध्ये विशिष्ट परिस्थितीत घेतलेला निर्णयच पुढे आपल्याला अडथळा निर्माण करू शकतो आणि त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. ( डिजिटल व्यवहारामध्ये हा अनुभव अधून मधून येत राहतो आणि) आपल्याला पुनश्च पूर्वीचा निर्णय बदलणे जमत नाही.
घेतलेल्या निर्णयाचा पुढे अडथळा होऊ नये, असे जर वाटत असेल तर निर्णय घेताना साधक बाधक दूरदृष्टी हवी, त्याच्या संभाव्य परिणामांची कल्पना हवी !":🤑
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-262 !":👌
😂 "कालगणनेची दोन सहस्त्रके पूर्ण झाली आहेत. आता आपण तिसऱ्या सहस्त्रकाच्या प्रारंभीची काही वर्षे पार केली आहेत. मागे वळून पाहताना ध्यानात येते की, गेल्या शतकात व त्यामागेही दोन जागतिक महायुद्ध सोडता जगरहाटी आपल्या पद्धतीने मार्गक्रमणा करत गेली. परंतु 'वाय टू के' चे संक्रमण पार पाडल्यानंतर, गेली 24 वर्षे जे काही जगामध्ये घडून गेले आहे, घडत आहे त्यामधून लक्षात येते की, अशी चित्रविचित्र उलथापालथ व मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना आणि नैतिक अध:पतनाची परिसीमा कधीही पूर्वी झालेली नव्हती.
काळाच्या महिमेचे हे प्रताप जर असे भयानक, तर त्याच्या तिप्पट काळात हे शतक पूर्ण होईपर्यंत, अजून काय काय जगाला सहन करावे लागणार आहे त्याची कल्पनाच करता येत नाही !
अशावेळी वाटते जे मागच्या शतकापर्यंत जिवंत होते आणि आता नाहीत, त्यांच्या तुलनेत आपण सारे भाग्यवान की, अभागी हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे !":😂
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-263 !":👌
😊 "माणसाच्या आयुष्यात साऱ्याच गोष्टी त्याला हव्यात अशा जमतातच असे नाही, किंवा होतातच असे नाही. अशावेळी आपल्याला नको असलेली गोष्ट जर घडली, त्यातून ती जर दुसऱ्या कोणाच्या कडून अपेक्षित असेल तर मनाला अस्वस्थता येणं, राग निर्माण होणं हे साहजिक असतं. परंतु अशा वेळेला त्याच अनपेक्षित नको त्या गोष्टीचा सारखा विचार करत राहिलं, तर त्याचे रूपांतर संताप आणि नंतर चक्रवाढ व्याजाप्रमाणे क्रोधात होते.
अशावेळी तो क्रोध ज्या व्यक्तीमुळे हे नको ते घडले तिच्याबरोबर व्यक्त करणे टाळावे. कारण त्यातून काहीच साध्य होत नाही. उलट 'घडले तेच पसंत !' अशी दृष्टी ठेवून आपण नंंतर आपल्याला हवाय तसा त्यात बदल करून अपेक्षित असलेले साध्य करू शकतो कां एवढाच प्रयत्न करावा, तोच समंजसपणा असतो !":😊
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-264 !":👌
😄 "दाद प्रतिसाद !":😄
💐 "सोशल मीडियावर संचार करताना जे जे काही मनाला भावणारे आपल्या जाणिवा विस्तारित करणारे गवसते त्याला दाद देणे, हे एका संवेदनशील रसिक मनाचे लक्षण असते. पण दाद ही मागून मिळत नाही, ती देणार्याला आतून व्यक्त करावीशी वाटणे गरजेचे असते.
दाद मिळो वा न मिळो, 'या हृदयीचे त्या हृदयी' करणार्याने व्यक्त होतच राहायचे. कारण तो हे जे काही करत आहे, ते त्याला आनंद होत असतो म्हणून !":💐
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
💐II(अ) मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-265 !":👌
🤣 "कलियुगाने आपले भीषण पाश सर्वदूर, सार्वत्रिक पसरवायला वेगाने सुरुवात केली आहे, अशा तऱ्हेचाच माहोल आहे. पूर्वी कधीही न घडलेल्या अवचित, अनाठाई मने विषण्ण करणाऱ्या घटना विविध क्षेत्रात घडत आहेत.
भ्रष्टाचाराचा भस्मासुर, अनाचाराचा शिष्टाचार आणि षडरिपुंचे थैमान, हे सांगत आहे की 'कुठेतरी काहीतरी चुकते आहे' !
अशावेळी प्रामाणिक सज्जन सरळमार्गी माणसांच्या पुढे अंध:कार पसरलेला असताना,
एका गीताचे शब्द आठवतात:
'ना कोई हमदम ना रहा !,
ना कोई सहारा रहा !!
ना हम किसी के रहे !!!
ना कोई हमारा रहा !!!!":🤣
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-266 !":👌
😃 "आमदार अपात्रते विषयी निकाल लागण्या अगोदरच गेल्या पाच वर्षात जे काही भले बुरे योग्य अयोग्य घडून गेले आणि राजकारणाचा जो चिखल झाला, तो सारा विसरून निवडणुकांच्या माहोलात इच्छुकांसाठी संगीत खुर्चीचा खेळ चालू आहे. 'तिकिटे' आणि इच्छुक व्यस्त प्रमाणात असल्यामुळे, प्रत्येक वेळेला
भरपूर इच्छुकांना नाराजीने बाहेर पडावे लागत आहे. लगेच ते दुसऱ्या पक्षाच्या संगीत खुर्चीत हजेरी लावत आहेत !
एकदा का तिकीट मिळाले की, जणू काही जग जिंकले असा आनंद होणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की, खरी प्रतिक्षा अजून दूरच आहे, कारण उमेदवारांप्रमाणेच मतदारांचीही मोठी कठीण कसोटी आहे !
सत्तेचा सोपान चढून जाऊन कोण यशस्वी होतो ते 23 नोव्हेंबर पर्यंत गुलदस्त्यातच राहणार आहे !":😃
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-267 !":👌
😚 "निवडणुकांचा खेळ हा देखील
विक्रीव्यवस्थेसारखाच (marketing management) असल्यामुळे तेथील नियम खरं म्हणजे येथे लागू व्हायला हवा.
'In open free competition, ultimately only first three brands remain' ! इंग्लंड अमेरिकेसारख्या प्रगत देशातील लोकशाहीमध्ये हा नियम अस्तित्वात असलेला दिसतो.
परंतु हा नियम येथे लागू होत नाही असे दिसते. कारण पावसाळ्यात जशा विविधरंगी छत्र्या उघडल्या जातात, त्याप्रमाणे येथे एक नाही, दोन नाही तर जवळजवळ दहा पक्ष एकमेकांशी स्पर्धा करत आपले नशीब जमावताना दिसत आहेत. शिवाय अपक्ष ते वेगळेच !
याचाच अर्थ अजून आपली लोकशाही बाल्यावस्थेत आहे, तसेच हा सारा पूर्वापार चालत आलेल्या सरंजामशाहीचा व घराणेशाहीचा प्रताप आहे,
दुसरे काय ?":😚
मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०२४
"पुढचे पाऊल" अर्थात अनुकूल गुणांवर आधारित एकमेवाद्वितीय संक्षिप्त वार्षिक राशीभविष्य: १नोव्हे.24 ते ३१ डिसें'25"
पुढचे पाऊल"
अर्थात अनुकूल गुणांवर आधारित एकमेवाद्वितीय संक्षिप्त वार्षिक राशीभविष्य:
१नोव्हे.24 ते ३१ डिसें'25
प्रास्ताविक:
भारतीय ज्योतिष चंद्राला महत्व देते तर पाश्च्यात्य ज्योतिष रविला. त्यामुळे, आपल्या जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो, ती आपली जन्मरास मानली जाते. चंद्र सर्वसाधारणपणे एका महिन्यात बाराही राशींचा प्रवास पूर्ण करतो, त्यामुळे आपली जन्मरास ठरविताना, जन्मतारिख महिना वर्ष व जन्मवेळ माहीत असावी लागते. चंद्रावर आधारित भारतीय ज्योतिष अधिक सूक्ष्मपणे वस्तुनिष्ठ, तसेच व्यक्तिनिष्ठ विचार करते.
आपले आयुष्य ही विशिष्ठ परिस्थितींत घेतलेले वा न घेतलेले निर्णय आणि त्यानुसार केलेली क्रुती वा न केलेली क्रुती ह्यांच्या परिणामांची अखंडीत श्रुंखला असते. परिस्थितीदेखिल नित्य नव्याने बदलत रहात असते. ह्या सर्व घडामोडींमागे आपले मन एखाद्या सारथ्याची भूमिका बजावत असते. मानवी मनावर चंद्रभ्रमणाचा यथोचित परिणाम होत असतो आणि प्रुथ्वीवरील समुद्राच्या भरती ओहोटीचा संबंध चंद्राच्या दररोजच्या भ्रमणावर अवलंबून असतो हे सर्वश्रुत आहे. आपल्या शरिरात सुमारे सत्तर टक्के पाणी असते. सहाजिकच चंद्रभ्रमण आपले विचार निर्णय व क्रुतीवर प्रभाव
पाडत असते, हे ओघाने आले. ह्या विचारमंथनामुळे चंद्रभ्रमणाला केंद्रीभूत मानणारे भारतीय ज्योतिष तर्कशास्त्राला पटू शकेल असे तथ्य आहे.
अनुकूल गुण पद्धती:
कालचक्र अव्याहत फिरत असते, माणसाच्या आयुष्यात काही दिवस सुखाचे तर काही दु:खाचे असतात. हा क्रम प्रत्येकाला अनुभवाला येतो. उद्याचा दिवस, आजच्यापेक्षा अधिक चांगला जावा ह्या आशेवर माणूस जगत असतो. उद्याचे पुढचे पाऊल कसे असेल, येणारा काळ कसा असेल, अनुकूल वा प्रतिकूल आणि तोही किती प्रमाणात हे कळण्याच्या इच्छेने तो दर वर्षी उत्सुकतेने राशीभविष्य पहात असतो.
माणूस उंच वा बुटका आहे, जाडा किंवा बारिक आहे, तो गरिब वा श्रीमंत आहे अशा विधानांवरुन आपल्याला निश्चित अशी काही कल्पना येत नाही. ती येण्यासाठी कोणते तरी त्या विषयाशी संबंधित असे अनुरूप संख्यात्मक परिमाण आवश्यक असते. जसे उंची सेंटी मीटर, वजनासाठी किलोग्राम, आर्थिक स्थितीसाठी रुपये असे परिणाम संख्यात्मक द्रुष्टिने दाखवता येते. ह्याच पद्धतीने आपले आगामी दिवस कोणाला कसे जातील, हे भविष्याच्या ज्ञानाच्या आधारे सांगण्याची पद्धत म्हणजे राशीभविष्य होय.
ह्या विचारमंथनामुळे चंद्रभ्रमणाला केंद्रीभूत मानणारे भारतीय ज्योतिष तर्कशास्त्राला पटू शकेल असे तथ्य आहे.
नशिबाच्या परिक्षेचा निकाल:
प्रथम या परीक्षेमध्ये पाच गटांमध्ये राशींची परिस्थिती काय आहे नशिबाची ते दर्शवले आहे. नंतर दिलेले दोन्ही तक्ते माहवार राशीनिहाय गुणांची चिकित्सक अशी स्थिती दर्शवली आहे ती नीट समजून घ्या.
पहिल्या तक्त्यामध्ये प्रत्येक राशीसाठी शेवटच्या स्तंभामध्ये यावर्षीचे गुण नंतर मागच्या वर्षीचे गुण कमी का जास्त आणि मागच्या वर्षीचा क्रमांक दाखवला आहे तर दुसऱ्या तक्त्यामध्ये प्रत्येक राशीची पाच गटातील प्रत्येक महिन्याला गटवारी दाखवली आहे आणि शेवटच्या तीन तक्त्यांमध्ये यावर्षीचा क्रमांक मागच्या वर्षीचा क्रमांक आणि किती फरक झाला ते दाखवले आहे.
३१ दिवसांचा महिन्यांचे प्रत्येक महिन्याचे जास्तीत जास्त गुण १८६, तर 30 दिवसांच्या महिन्यांचे जास्तीत जास्त गुण १८० आणि फेब्रुवारी 2025 चे जास्तीत जास्त अनुकूल गुण १६८. याप्रमाणे प्रत्येक महिन्याला ग्रह किती शुभ दिवस आहेत. ते अनुकूल गुण, त्या त्या महिन्याला किती गुण आहेत हे प्रत्येक राशीसाठी दाखवलेले आहेत. तसेेच प्रत्येक महिन्यात आपले नशिब कोणत्या गटात आहे, हे समजू शकेल आणि त्या आधारे प्रयत्न आणि अपेक्षा यांचा समतोल राखत समाधान मिळवण्याची युक्ती तुम्हाला मिळू शकेल अशी अनुकूल गुणांची कल्पना आहे.
अनुकूल गुणांच्या पद्धती: नियम
आम्ही गेले तीन दशके त्याकरता अभिनव अशा अनुकूल गुणांच्या पद्धतीचा उपयोग करत आहोत. प्रत्येक राशीला सहा प्रमुख ग्रहांच्या बदलत जाणार्या स्थितीचा अभ्यास करून ज्योतिषांतील पुढील नियमांचा आधार घेऊन वर्षभरात प्रत्येक माहवार किती दिवस अनुकूल आहेत त्याचे गणित मांडून अनुकूल गुण देतो. ते नियम असे आहेत:
रवि: ३,६, १० व ११ वा शुभ
मंगळ: ३,६, व ११ वा शुभ
बुध: २,४,६,८,१० व ११ वा शुभ
गुरू: २,५,७,९, व ११ वा शुभ
शुक्र: १,२,३,४,५,८,९,११ व१२ वा शुभ
शनी: ३,६, व ११ वा शुभ
"नशिबाची गटवारी":
आगामी १४ महिन्यांच्या कालखंडात वरील महत्वाच्या ग्रहांच्या विविध राशीप्रवेशानुसार ह्या नियमांचे आधारे ते किती दिवस शुभ आहेत, ते आजमावून माहवार शुभदिवस अर्थात अनुकूल गुण देऊन, त्याप्रमाणे राशीनिहाय अनुकूल गुण कोष्टक पुढे दिलेले आहे. तशीच एकूण संपूर्ण कालखंडातील गुणांच्या बेरजेवरून पुढील पाच सुलभ गटात त्यांची विभागणी केली आहे:
१.उत्तम पहिला गट: व्रुषभ, कन्या व मकर
राशी.
२.उजवा दुसरा गट: धनु कन्या राशी
राशी.
३.मध्यम तिसरा गट: कुंंभ व मेष राशी.
४.डावा चौथा गट: सिंह मिथुन व कर्क
५.त्रासदायक पाचवा गट: व्रुश्चिक व मीन राशी.
शनीची साडेसाती:
साडेसाती म्हणजे काय? गोचरीचा शनि जेव्हां तुमच्या चंद्रराशीच्या मागील राशीत येतो, तेव्हा साडेसाती सुरू होते व तुमच्या राशीच्या पुढील राशीनंतर येणार्या राशींत जातो, तोपर्यंत साडेसाती असते.....
उदा: सध्या कुंभ राशींत शनी आहे, म्हणून आता मकर, कुंभ व मीन राशींना साडेसाती आहे. शनी मीन राशीत जेव्हा प्रवेश करेल, तेव्हा मकर राशीची साडेसाती संपेल, तर मेष राशीची सुरू होईल.
# 14 मे रोजी गुरू मिथुनेत, 18 ऑक्टोबर कर्क आणि 5 डिसेंबर वक्री परत मिथुन येतो.
# 29 मार्च रोजी शनी कुंभेतून मीन राशीत जाईल आणि त्यामुळे मकर राशीची साडेसाती 29 मार्च 2025 ला संपेल. पण मेष राशीची साडेसाती सुरू होते.
तर कुंभ राशीची साडेसाती 23 फेब्रुवारी 2018 आणि मीन राशीची साडेसाती सात एप्रिल 2030 ला संपेल.
"राशीनिहाय संक्षिप्त राशीभविष्य":
मागील व यंदाच्या एकूण अनुकूल गुणांचा विचार करता, राशीनिहाय नशिबाचा चढ उतार हा असा असेल:
१मेष रास 3 क्र. वरून 7 क्रमांकावर आली आहे. तुमचे एकूण गुण 1252 वरून 1078 झाले आहेत साहजिकच 174 गुणांचा फटका तुम्हाला बसला आहे. मागच्या वर्षी पेक्षा तुम्हाला अपेक्षा कमी ठेवाव्या लागतील आणि त्या प्रमाणात प्रयत्न वाढवायला लागतील त्यामुळे समाधानाचा मार्ग मिळेल.
२.व्रुषभ राशीने हनुमान उडी घेऊन तळाच्या बाराव्या स्थानावरून चक्क 1 ल्या सर्वोत्तम शुभफळे देणार्या क्र.वर आपली जागा निश्चित केली आहे. याला कारण म्हणजे मागच्या वर्षी 699 गुण मिळवून तळाला होतात तर आता 684 गुण अधिक मिळवून 1343 सर्वोच्च गुणसंख्या मिळाल्याने तुमचे नशीब यावर्षी फळफळणार आहे उत्साह वाढणार आहे प्रयत्नांना यश येणार आहे.
३.मिथून राशीच्या नशिबी मागील 5 व्या स्थानावरून आता 9 व्या स्थानी जाण्याची वेळ आली आहे. मागच्या वर्षीतून यावर्षी 159 गुण कमी होऊन 845 गुण मिळाले आहेत साहजिकच स्थिती कठीण होत जाणार आळसोडा झपाट्याने काम केली तरच काही निभाव लागेल
४. कर्क राशीचे नशीब 8 क्र.वरुन आता 10व्या स्थानी. कारण 957 गुणांवरून 842 गुण मिळाल्याने 115 गुणांचा घाटा आहे सहाजिकच तुमच्या परिस्थिती मध्ये त्रासदायक घटना अधिक घडण्याची शक्यता आहे सावध रहा.
५ सिंह मंडळी 6 वरून थोडे गड खाली जाऊन आठव्या क्रमांकावर राहतील अनुकूल गुणांत फक्त 13 गुण कमी झाल्यामुळे ही परिस्थिती आहे साहजिकच मागच्या वर्षी सारखेच हे वर्ष जाईल. थोडीशी कुठेतरी रुख रुख राहील एवढेच.
६ कन्या रास 1ल्या स्थानावरुन घसरू 5 व्या स्थानी जाते. कारण अनुकूल गुण १३५५ वरून यावर्षी 1108 असे 287 घसरत गुणांनी खाली येणार आहे. परिस्थिती आलबेल अशी नाही, हे ध्यानात ठेवा. अपेक्षा थोड्या कमी ठेवा आणि प्रयत्नांची गती वाढवा.
७ तुळा राशीने ह्या वर्षी 4थ्या स्थानावरुन
चांगली सुधारणा होऊन दुसऱ्या स्थानी विराजमान होईल तर त्यांचे गुण 250 गुणांनी वाढवून यावर्षी 1279 होतील. उत्साह वाढेल प्रयत्नांना यश मिळवून नव्या संधी प्राप्त होतील.
८ व्रुश्चिक रास मागील प्रमाणे दहाव्या क्र.वरून किंचित खाली म्हणजे 11 व्या स्थानी जाईल शंभर गुण कमी होऊन यावर्षी 770 गुण तुम्हाला मिळणार आहेत विरोधकांच्या कारवाया वाढतील, अपेक्षाभंग होईल आहे त्या परिस्थितीत समाधान मानणे इष्ट ठरेल.
९ धनु राशीच्या गुणांमध्ये खूप घसरण झाल्यामुळे आता 2 र्या क्रमांकावरुन कटकटी वाढून 4 स्थानी जाईल.
1265 वरून 145 गुणांनी घसरून सात 1120 गुण मिळतील. मागच्या वर्षीचा तोरा आता चालणार नाही. अपेक्षा किंचित कमी करा, प्रयत्न वाढवा.
१० मकर राशीचे नशीब गुणांमध्ये उत्तम वाढ झाल्याने 7 व्या स्थानावरुन सुखदायी
3 रे स्थान मिळवेल. याला कारण म्हणजे मागच्या वर्षीच्या 962 गुणांमध्ये 273 गुणांची भर पडून 1235 गुण मिळवून पहिल्या गटात नशीब चांगले राहणार आहे. अडचणी दूर होऊन परिस्थिती मधले मळभ निघून जाऊन निरभ्र असे आकाश तुमच्या वाट्याला आले आहे. या संधीचा फायदा घ्या.
११ कुंभ राशी 9व्या जागेवरून आता 6 व्या स्थानी नशीब आजमावणार आहे. 912 गुणांमध्ये 173 गुणांची भर पडून यंदा 1085 गुण मिळाले आहेत. साहजिकच कुचंबणा दूर होईल आणि उत्साहाने कामाला लागून समतोल साधाल.
१२ मीन रास त्रासाच्या 11 स्थानावरुन 12 तळाच्या स्थानी घसरेल. 792 गुणांवरून 74 गुण कमी होऊन 718 गुण या कालखंडात मिळाले आहेत. तळाच्या राशीचे दुर्दैव तुमच्या वाट्याला आले आहे. एखाद्या अभिमन्यू सारखी चक्रव्यूहात सापडलेली स्थिती असू शकेल
त्या दृष्टीने संयम बाळगा, अपेक्षा ठेवू नका.
II शुभम् भवतु II
सोमवार, ७ ऑक्टोबर, २०२४
" बोल अमोल-243 to 253 !":
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-243 !":👌
😄 "सोशल मीडिया हा मेटाकुटीला आणणारा आहे असे म्हणणे, हा ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे. त्या उलट सोशल मीडिया हा जीवनातील मेटाकुटीला विसरून, विरंगुळा देणारा आणि आपल्या जाणिवा विस्तारित करणारा, सातत्याने नवीन शिकत राहावं असा विशाल प्लॅटफॉर्म जसा आहे, त्याशिवाय प्रत्येकाच्या कल्पनाशक्तीला आव्हान देऊन, प्रेरणा देणारा नवनिर्मितीचा आनंदोत्सव आहे ! दृष्टिकोन बदला आणि या नवनवलोत्सवात सामील व्हायला शिका !":😄
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-244 !":👌
😄 "माणसाचा मेंदू हा एक सुपर डुपर कॉम्प्युटर आहे आणि त्यामध्ये शेकडो ट्रिलियनच्याहून कितीतरी अधिक असे न्यूरॉन कनेक्शन्स असतात. आपले सारे जीवन कार्य त्यांच्या व्यवस्थेवर चालू असते.
आपण विविध प्रकाराने मोबाईलचा डेटा वापरून जसे कार्य करतो, त्याचप्रमाणे मेंदूमधील डेटा कोणत्या कार्यासाठी खर्च करायचा आणि कोणत्या कार्यासाठी खर्च नाही करायचा हे प्राधान्य आणि निवड अत्यावश्यक असते. मन स्थिर आणि सक्षम राहण्यासाठी आपल्या आवडत्या कामात हा डेटा वापरणे, हे कौशल्य असावे लागते !":😄
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-245 !":👌
😄 " कॉम्प्युटर, इंटरनेट आणि माहितीचे मायाजाल हे आधुनिक युगातले जणू ऋषीमुनी. ध्येयलक्षी संगणकीय कार्यक्रम अर्थात apps म्हणजे एकाच वेळी अनेक गोष्टी साध्य करणारे ऋषीमुनींचे मंत्र !
याचा पाया 1742 मध्ये ब्लेझ पास्कल याने गणकयंत्रचा adding machone चा शोध लावला आणि हेच यंत्र पुढे विकसित करून 1823 मध्ये चार्ल्स बॅबेज नावाच्या इंग्लिश शास्त्रज्ञाने विश्लेषक यंत्र अर्थात अनालिटिकल मशीन निर्माण केलं, त्याला गणित करण्याचं शास्त्र त्याने शिकवलं आणि आधुनिक संगणकीय पर्वाचा जन्म झाला !":😄
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-246 !":👌
🤣 "हायकू !":🤣
🤣"केला असंगाशी संग,
रहाती आपल्यातच दंग,
होणार त्यांचा अपेक्षाभंग !":🤣
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-247 !":👌
😇 "जनमानसाला हवीहवीशी प्रतिमा निर्माण करणे, खूप खूप कठीण असतं. चांगुलपणाच्या हितकारक कृत्यामुळे ती अथक प्रयत्नांनी निर्माण होते. पण अशा प्रतिमेचा चुराडा करायला, एखादेच दुष्कृत्य पुरेसे असते. त्यानंतर ती पुनश्च उभी करणे, केवळ अशक्यप्राय असते !":😇
🤣 "
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-248 !":👌
😀 "कोणत्याही कार्याला आरंभ करताना, अथवा शुभकार्याला सुरुवात करताना मुहूर्त पाहिला जातो. मुहूर्त म्हणजे इच्छित कार्य यशस्वी व्हावे याकरता निश्चित केलेली ध्येयवेळ होय.
निसर्ग अविरत गतिमान आहे आणि विश्वाच्या विशालते पुढे काळ ही एक केवळ संकल्पना जरी असली, तरी प्रत्येक क्षणाच्या परिणामांची परिणीती वेगवेगळी होत असते. याचे कारण त्या त्या वेळची आगळीवेगळी निसर्ग-परिस्थिती. साहजिकच ध्येयवेळ अर्थात मुहूर्त हा त्यासंबंधी सखोल विश्लेषण करून निवडला जातो. पूर्वापार मुहूर्त परंपरा चालू आहे ती याचमुळे ! साडेतीन मुहूर्त असलेले दिवस अर्थातच महत्त्वाचे. त्यामधील विजयादशमी अर्थात दसरा लवकरच आपण साजरा करणारा आहोत !":😀
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-249 !":👌
😀 "जीवन एक अतर्क्य, न सुटलेले कोडे
आहे, प्रत्येकाची आयुर्मर्यादा वेगवेगळी असते. विज्ञानाद्वारे कितीही प्रगती झाली तरी अमरत्वाचा वर कोणालाही मिळालेला नाही. निसर्ग अखेरीस शरीरावर मात करतोच करतो.
प्रत्येक जण आपले जीवन कशा पद्धतीने व्यतीत करतो, सवयी कोणत्या आणि नियमितता की अनियमितता यावर त्याची पुढची वाटचाल अवलंबून असते. शिवाय संपर्कात येणाऱ्या व्यक्तींबरोबरच्या बऱ्या वाईट संबंधांचेही मानसिक परिणाम त्याच्यावर होत असतात. साहजिकच त्याची किंमत त्याला स्वतःला द्यावी लागते.
आणि... म्हणूनच कदाचित प्रत्येकाचे आयुष्य ठराविक मर्यादेतच राहते.
'करावे तसे भरावे' हा शाश्वत नियम आहे,
हे ध्यानात ठेवा !":😁
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-250 !":👌
😇 "दर्जेदार साहित्य लिहिणारे लेखक आणि वाचणारे वाचक दुर्मिळ होत चालल्यामुळे 'अंतर्नाद' सारखे अभिजात जातकुळी जपणारे मासिक बंद पडले. असेच एकेकाळी 'सत्यकथा' मासिक बंद पडले होते....
आणि......
आजची बातमी तर अधिकच व्यथित करणारी आहे. 'शारदोत्सवा'ची ही वैभवशाली गाथा अधिक समृद्ध करणारे 'शब्द'रुची हे 'ग्रंथाली'तर्फे प्रसिद्ध होणारे मासिकही आगामी वर्षापासून बंद होणार ही !
एकीकडे अभिजात भाषा म्हणून मराठीचा सन्मान होत असताना, हे काय घडते आहे? 'कुठेतरी काहीतरी चुकते आहे' !!":😇
👍"बोल, अमोल-251 !":👌
😊 " कोणत्याही भाषेचं व्याकरण हा तिचा मूलभूत गाभा आणि पाया असतो. तेच संगीतातही, शास्त्रीय संगीत हे संगीताचे व्याकरण होय ! व्याकरण हे समान असते, शब्द बदलू शकतात, स्वरांच्या मात्रा बदलू शकतात.
तसंच माणसातील शरीररचना आणि त्या रचनांबरंहुकूम कार्य करण्याची पद्धत अथवा सिस्टीम ही सर्वत्र समान असते. पण माणसाच्या बाबतीत मन आणि त्यातून
निर्माण होणाऱ्या भावना हा सातत्याने बदल घडविणारा, नवनवी दिशा देणारा अथांग,अगम्य प्रवास असतो तोच जीवनाचा ड्रायव्हिंग फोर्स असतो. विवेकाने भावनांवर नियंत्रण ठेवता येते हे ध्यानात ठेवा !":😊
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-252 !":👌
😄 "इतरांच्या वागण्याचा आपल्याला जेव्हा त्रास होतो, तेव्हा हे ध्यानात घ्यावे की, त्यांनी कसे वागावे हे आपल्या हातात नसते. त्या उलट त्यांच्या वागण्याचा आपल्यावर कुठलाही विपरीत परिणाम होऊ नये, याची खबरदारी घेणे गरजेचे असते कारण आपणच आपल्या वागण्याची दिशा ठरवू शकत असतो.
महत्त्वाचे हे की,
भावनांवर नियंत्रण ठेवता येते, हे ध्यानात ठेवा !":😄
[10/10, 8:25 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल
👍"बोल, अमोल-253!":👌
💐"प्रत्येकाच्या काही ना काही सवयी असतात आणि त्या काटेकोरपणे पाळल्या जातात. आर्थिक जमाखर्च, वेळेचे नियोजन आदि सवयींमुळे जशी आर्थिक शिस्त पाळली जाते, तसंच वेळेच्या हिशोबामुळे वैयक्तिक आत्मविकास साधता येतो !":💐
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)