रविवार, २९ सप्टेंबर, २०२४

""बोल, अमोल-234 to 242 !":

[15/9, 7:43 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-234 !":👌 😁 "माणसाच्या शरीराची अंतर्गत रचना हाताच्या बोटांचे ठसे आणि बुब्बुळाची प्रतिमा हे दोन अपवाद वगळता सर्वत्र समान असते, तरीही नवल म्हणजे प्रत्येकाची आयुर्मर्यादा संपूर्णतया वेगवेगळी असते ! हे असे कां, हे कधीही न सुटलेले कोडे होय" !! :😁 [17/9, 8:42 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-235 !":👌 [21/9, 7:27 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-237 !":👌 II न अती ती 'नाती', अती परिचयात अवज्ञा ! संयम आणि सबुरीमुळे, जुळवा नाती, फुलवा नाती II [23/9, 10:53 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-238 !":👌 😄 "जगाला फसवले तरी, कुणी, कधीही आपल्या मनाला फसवू शकत नाही. देहबोली मनातल्या भावभावना प्रकट करतच असते !":😄 [26/9, 8:10 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-239 !":👌 😁 "संसारांचे सारीपाट !:😁 😇 "थोडं तुझं, थोडं माझं-TT TM ! अशा संसारात जोडीची गोडी वाढतच जाणार !! तर "तुझं ते तुझं, माझं ते माझं-TT MM ! अशा संसारात जोडीची वादावादी वाढतच जाणार ! अन् तुझं ते माझं माझंही माझंच-TM MM ? अशा संसारात एका जोडीदाराची कुचंबणा आणि संसाराचा बट्ट्या बोळ होणारच होणार !!:😒🤣 [27/9, 10:33 AM] Sudhakar Natu: 💐II (अ)मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-301 !":👌 🤣 "कुठेतरी काहीतरी चुकते आहे !":🤣 😇 "कालचे लोकल प्रवास आणि अंतर्गत प्रवासाचे जे सर्वांचे हाल झाले त्यावरून 26 जुलै 2005 ची आठवण झाली. नको इतकी शहरे तुडुंब लोकसंख्येने भरली आहेत आणि अक्षरश: सर्वसामान्य जनता किड्या मुंगीचे जीवन जगत आहे. कुठेतरी काहीतरी चुकते आहे. स्वातंत्र्यानंतर 75 वर्षानंतर जर ही परिस्थिती असेल तर आपले नियोजन पुनश्च सर्वांगीण हितकारक असे जेव्हा होईल तेव्हाच तो सुदिन!":😇 [28/9, 7:56 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-241 !":👌 😙 "कोणी विचारल्याशिवाय आपले काय काय भले होते आहे, हे स्वतःहून कधीही सांगू नये. कारण हल्ली माणसांच्या प्रवृत्ती असुयेने बऱ्याच वेळेला भरलेल्या असतात. त्यामुळे तुमचे चांगले होते याचे जसे त्यांना काहीच महत्त्व नसते, तसेच ते तसे होते आहे याचे त्यांना मनातून वाईटच वाटते, हे ध्यानात घ्यावे !"😙 [29/9, 8:15 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-242 !":👌 💐"माणसाच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस असतो तो त्याचा वाढदिवस. कारण त्याच दिवशी त्याला जीवन प्राप्त झाले असते. साहजिकच प्रत्येक जण आपापल्या परीने आपला वाढदिवस आपल्या कुटुंबीयांसमवे मित्रमंडळीसह यथाशक्ती आनंदाने साजरा करतो. अशावेळी प्रत्येकाने मागे वळून, मागच्या वर्षी काय केले, काय गमावले, काय मिळवले याचा जसा विचार करायला हवा, त्याचप्रमाणे पुढील वर्षी आपण कोणत्या क्षेत्रात काय केले पाहिजे आणि आपली प्रगतीची वाटचाल अधिक गतीने कशी पुढे न्यायची, त्याचा त्यादिवशी आढावा घेतला पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाचे जीवन अधिक सुखकर आणि यशस्वी होऊ शकेल !":💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा