शनिवार, ७ सप्टेंबर, २०२४
"बोल अमोल-221 to 233 !":
[30/8, 7:43 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-221 !":👌
🤣 "प्रशासनाच्या त्रुटीमुळे अथवा चुकांमुळे जेव्हां अचानक एखादे महासंकट उभे राहते, तेव्हा सत्ताधारी नेहमी 'विरोधकांनी याचे राजकारण करू नये' असे तुणतुणे वाजवत राहतात, हे सर्वथैव चुकीचे ! ते म्हणजे आपली जबाबदारी झटकणेही होय, कारण त्यांच्या ऐवजी अशा वेळी जर विरोधक सत्तेत असते, तर ह्यांनीही तेच उलट अधिक ताकदीने केले असते,
नाही कां ?":🤣
[31/8, 7:31 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-222 !":👌
💐"आपण पुढे काय काय करणार याची वाच्यता करण्याची संवय तशी अयोग्यच, कारण बहुतेकदा इतरांना त्याचे काही देणे घेणे नसते. पट्टीचे पत्ते खेळणारा खेळाडू जसा आपली पत्ते काय आहेत याचा इतरांना थांंगपत्ता लागू न देता, डाव जिंकत जातो, त्याप्रमाणे आपणही आपले मनसुबे गुलदस्त्यातच ठेवणेच अखेर हितकारक होय !":💐
[1/9, 7:53 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-223 !":👌
😀 "लेखक कां लिहितो ? तर त्याला काही ना काही तरी दुसऱ्याला सांगायचं असतं म्हणून. चांगलं लेखन कशाला म्हणायला हवं ? तर ते जणू लेखक समोर बसून वाचकाला मनमोकळेपणाने सांगतोय
असं !":😃
[2/9, 8:55 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-224 !":👌
🤣 "एकच एक लकेर !":🤣
😇 "पर्यावरण समतोलाला डावलून कराल जर विकास, तर होईल तो भकास !":😇
[3/9, 9:48 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-225 !":👌
💐"कोणतेही कायदे हे आपल्या हितासाठी बनवलेले असतात. ते पाळणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं. सर्व व्यवहार सुलभतेने चालण्यासाठी कायदे पाळणे आणि कायद्यानुसार चालणं, हे अत्यावश्यक असतं. परंतु सध्या कायदे न पाळणं यातच फुशारकी मारली जाते ते
संपूर्णतया अयोग्य आहे !":💐
[4/9, 8:37 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-225 !":👌
😄"बोलायचं अन् सोईस्कर विसरायचं."
अशांना,
सांगा, काय बरं, म्हणायचं?
"विसरभोळे की, साळसूद??!":😄
☺️"व्यक्त होताना मांडण्यासारखे आणि इतरांना रुचेल, पटेल,
आवडेल असे जोपर्यंत सुचत नाही,
तोपर्यंत संयम बाळगणे
हा शहाणपणा होय !:😊
[5/9, 8:56 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-226 !":👌
💐"एखादे महत्त्वाचे काम अखेेर पूर्ण झाल्यानंतर आनंद होतो हे जरी खरे असले, तरी त्यानंतर एक प्रकारची पोकळी निर्माण होते. त्या उलट ते काम पूर्ण होण्यापूर्वी, जी प्रयत्नांची पराकाष्टा, काम पूर्ण कधी होणार याची हुरहुर, अनेक उद्भवणाऱ्या अडचणींचा सामना, कसोटी पाहणारी प्रतीक्षा असे बहुरंगी बहुरंगी अनुभव मिळणं हा देखील एक साठवणीत ठेवण्याजोगा मनभावन अनुभव असतो !":💐
[6/9, 9:44 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-228 !":👌
😇 "पुष्कळदा ज्यांचे कर्तृत्व कधीही सिद्ध झालेले नाही आणि जे आपलेच घोडे पुन्हा पुन्हा दामटत असतात, अशांना माध्यमांंमध्ये उगाचच महत्व देणे, न पटण्याजोगे. पण असेे सातत्याने कां होताना दिसते, हेही एक कोडेच !":😇
[7/9, 7:45 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-229 !":👌
😄"माझे अध्यात्म!"😄
वाचन हा श्वास,
लेखन हा निश्वास
मालिका पहाणे हा ध्यास
घडामोडींचा विचार हा अभ्यास
सोशल मिडिया वापरणे हा विकास
प्रवास करणे हा त्रास
आरोग्य राखणे हा प्रयास !":😄
[11/9, 7:37 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-230 !":👌
🤣 "अगदी नजीकच्या काळात कळीदार उकडीचे मोदक 25 रुपयाला एक असे मिळायचे, तर आजची बातमी 80 रुपयाला एक मोदक ! गाईचं दूध आणि म्हशीचं दूध देखील असंच पाहता पाहता वेगाने महागलं.
ही प्रगती म्हणायची की, अधोगती ?":🤣
[12/9, 9:23 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-231 !":👌
💐"विश्वास ठेवावा:
प्रकाश देणाऱ्या सूर्यावर, फुले देणार्या वेलींवर, जन्मभर खस्ता खाणाऱ्या
आईवर.......
विश्वास ठेवावा:
ऋतुचक्र आणणाऱ्या निसर्गावर,
कडक शिस्तीने कार्य करणाऱ्या मुंग्यांवर, अनिवार्य असणार्या मृत्यूवर!":💐
[13/9, 8:45 AM] Sudhakar Natu: 💐II(अ?)मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-232 !":👌
🤣 "आकाशात अधांतरी असलेल्या
विमानातील प्रवासापेक्षा, दुर्दैवाने रस्त्यावरील प्रवास आता अधिक जीव घेणा आणि धोकादायक ठरत आहे, घरातून बाहेर पडलेला माणूस, सुखरूप घरी येईल की नाही अशी चिंता घरोघरी वाटण्याची वेळ येणे, ही किती अधोगती !":🤣
[14/9, 10:36 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-233 !":👌
😇 "साध्या साध्या गोष्टींमुळे, आपल्या हातून अनुदानाने चुका होतात. विशेषत: तंत्रज्ञानाच्या योग्य उपयोग न केल्याने त्या चुका नंतर लक्षात येतात. बोलणे आणि लिहिणे यातील फरकामुळे होणार्या चुका तर खूप नुकसान करतात !":😇
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा