गुरुवार, ५ सप्टेंबर, २०२४
"छाप (पड)लेले शब्द-1 to 5F !"
👍"छाप (पड)लेले शब्द-1 F !":👌
🤣 "बाजारू बेजबाबदार उत्सव ! :🤣
😊"कथा' कुणाची व्यथा कुणा !":😇
🤢 "कोणतेही कायदे हे आपल्या हितासाठी बनवलेले असतात. ते पाळणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं. सर्व व्यवहार सुलभतेने चालण्यासाठी कायदे पाळणे आणि कायद्यानुसार चालणं, हे अत्यावश्यक असतं. परंतु सध्या कायदे न पाळणं यातच फुशारकी मारली जाते ते
संपूर्णतया अयोग्य आहे !
हा विचार मनात यायला, सोबतचा सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणारा, ध्वनी व इतर प्रदूषणासंबंधीचा लेख आहे. बाजारू बेजबाबदार उत्सवांंच्या गगनभेदी माहोलांत ध्वनि, वायू व प्रकाश प्रदूषण अशी सर्व प्रकारची त्रासदायक आयुधे परजली जातात आणि सामान्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो, नक्की कुणालाच परवा नाही, हे येथे अधोरेखित केले आहे.
जेव्हा हे सार्वजनिक उत्सव पूर्वी सुरू झाले, तेव्हाचे स्वरूप आणि आत्ताचे, यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. तेव्हाचा उद्देश समाज प्रबोधन त्याचप्रमाणे समाजाचे संघटन आणि परस्पर बंधुभाव वाढावा आणि एकीकडे देशाभिमान व जनजागृती व्हावी हा होता. परंतु सध्या जवळजवळ सगळीकडेच त्याचे विदारक स्वरूप दिसत आहे. प्रायोजक म्हणून पैसा ओतायला विविध ठिकाणचे नेते पुढे येतात आणि आपला, तसेेच आपल्या पक्षाचा प्रचार हाच प्रामुख्याने त्यामागचा गर्भित हेतू असतो हे वेगळे सांगायला नको.
प्रदूषण नियंत्रणासाठी अनेक कायदे आहेत. पण ते अशा उत्सवांच्या प्रसंगी पाळले जातात का? हे पाहणे गरजेचे आहे. एवढेच काय साध्या गल्लीबोळातल्या कुणाचा वाढदिवस असो वा लग्न समारंभ अथवा एखादे धार्मिक कार्य असो-
श्री सत्यनारायणासारखे त्या वेळेला देखील होणारा धांगडधिंगा आणि गोंधळ निमूूटपणे सारेजण सहन करत आले आहेत. हे काही प्रगत, प्रकल्भ समाजाचे लक्षण नव्हे. जर आपण कुणाचे भले करत नसलो तरी निदान आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही एवढी किमान दक्षता कुणीच घेत नाही हा दैव दुर्विलासच होय.
साहजिकच म्हणूनच या साऱ्यांचा गांभीर्याने विचार करायची वेळ आली आहे: असे उत्सवी बाजारू बेजबाबदार सार्वजनिक प्रदर्शन नकोच. ज्या काही गोष्टी वैयक्तिक आहेत, त्या वैयक्तिकच रहाव्यात आणि जर खरोखरच कुणाला गाजावाजा करायचाच असेल तर बंदिस्त हॉलमध्ये ते कार्यक्रम करावेत. पण ऐकतो कोण? लक्षात कोण घेतो? जो तो आपलेच घोडे पुढे दामटायला सज्ज आहे आणि कदाचित कुणालाच कशाचे काही वाटत नाही. कितीतरी सामूहिक क्रयशक्ती अशा वेळेला वाया जाते, हे कोण बघणार? शिवाय आरोग्याचे दुष्परिणामांकडेही कोण बघणार ?असे अनेक प्रश्न मनात निर्माण झाले आहेत !
शेवटी हे खेळ थांबणे केवळ अशक्यच ! सर्वसामान्यांनी मुग गिळून गप्प राहायचे, दुसरे काय ?:🤢
II कालाय तस्मै म: II
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा