सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४
"स्वरानंद-67 to
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-67 !":👌
3 सुमधुर गीते ऐकण्यासाठी त्यांच्या ह्या लिंकस् उघडा...
1 जाने कैसे सपनो मे खो गई अखिया...
https://youtu.be/b55RygjuITY?si=NXxVK_O0h72UgOGs
2 तुम मुझे भूल भी जाओ....
https://youtu.be/ljV9eYKqpmE?si=iStWfpbBGXFLKRoM
3 हो गये तेरे हम हो गये...
https://www.facebook.com/share/v/Tfq4vacuD18oPPBb/?mibextid=jmPrMh
धन्यवाद
सुधाकर नातू
"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-68 !":👌
3 सुमधुर गीते ऐकण्यासाठी त्यांच्या ह्या लिंकस् उघडा...
1 याहू चाहे कोई मुझे जंगली कहे.....
https://www.facebook.com/share/v/YJ1f54cEZf1yf1TB/?mibextid=jmPrMh
2 कौन जो सपने मे आया.....
https://www.facebook.com/share/v/5ZKxUdCUAnSUfmPp/?mibextid=jmPrMh
3 वो भोली दास्तां, लो फिर याद आ गई...
https://www.facebook.com/share/v/K5iytShyYLahUurj/?mibextid=xfxF2i
धन्यवाद
सुधाकर नातू
‐------
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-69 !":👌
3 सुमधुर गीते ऐकण्यासाठी त्यांच्या ह्या लिंकस् उघडा...
1 अजि मी ब्रह्म पाहिले ...
https://youtu.be/sFfvQd3y_B8?si=Da0EBQi5jI0W1hl3
2 माझिया मना जरा थांब ना....
https://youtu.be/_1yJaq__So0?si=1g8_0mecdAavTvbQ
3 अजूनी रुसूनी रुसून आहे ....
https://youtu.be/t830PeDhbyA?si=6PCNcyys0xoBPYCf
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-70 !":👌
3 सुमधुर गीते ऐकण्यासाठी त्यांच्या ह्या लिंकस् उघडा...
1 एहसान होगा मुझपर...
https://youtu.be/DnIUta3hyLE?si=3FNaVibiMVCqhuYK
2 जाऊ कहा तुम बिन ....
https://www.facebook.com/share/v/CkNLNrtgQh5uH6ZE/
3 सपने सुहाने लडकपनके....
https://www.facebook.com/share/v/pA4puPcTq1w41HeU/
धन्यवाद
सुधाकर नातू
धन्यवाद
सुधाकर नातू
‐------
रविवार, २९ सप्टेंबर, २०२४
""बोल, अमोल-234 to 242 !":
[15/9, 7:43 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-234 !":👌
😁 "माणसाच्या शरीराची अंतर्गत रचना हाताच्या बोटांचे ठसे आणि बुब्बुळाची प्रतिमा हे दोन अपवाद वगळता सर्वत्र समान असते, तरीही नवल म्हणजे प्रत्येकाची आयुर्मर्यादा संपूर्णतया वेगवेगळी असते ! हे असे कां, हे कधीही न सुटलेले कोडे होय" !! :😁
[17/9, 8:42 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-235 !":👌
[21/9, 7:27 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-237 !":👌
II न अती ती 'नाती',
अती परिचयात अवज्ञा !
संयम आणि सबुरीमुळे,
जुळवा नाती, फुलवा नाती II
[23/9, 10:53 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-238 !":👌
😄 "जगाला फसवले तरी,
कुणी, कधीही
आपल्या मनाला फसवू शकत नाही. देहबोली मनातल्या भावभावना प्रकट करतच असते !":😄
[26/9, 8:10 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-239 !":👌
😁 "संसारांचे सारीपाट !:😁
😇 "थोडं तुझं, थोडं माझं-TT TM !
अशा संसारात जोडीची गोडी
वाढतच जाणार !!
तर
"तुझं ते तुझं, माझं ते माझं-TT MM !
अशा संसारात
जोडीची वादावादी वाढतच जाणार !
अन्
तुझं ते माझं माझंही माझंच-TM MM ?
अशा संसारात एका जोडीदाराची कुचंबणा आणि संसाराचा बट्ट्या बोळ
होणारच होणार !!:😒🤣
[27/9, 10:33 AM] Sudhakar Natu: 💐II (अ)मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-301 !":👌
🤣 "कुठेतरी काहीतरी चुकते आहे !":🤣
😇 "कालचे लोकल प्रवास आणि अंतर्गत प्रवासाचे जे सर्वांचे हाल झाले त्यावरून 26 जुलै 2005 ची आठवण झाली. नको इतकी शहरे तुडुंब लोकसंख्येने भरली आहेत आणि अक्षरश: सर्वसामान्य जनता किड्या मुंगीचे जीवन जगत आहे. कुठेतरी काहीतरी चुकते आहे. स्वातंत्र्यानंतर 75 वर्षानंतर जर ही परिस्थिती असेल तर आपले नियोजन पुनश्च सर्वांगीण हितकारक असे जेव्हा होईल तेव्हाच तो सुदिन!":😇
[28/9, 7:56 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-241 !":👌
😙 "कोणी विचारल्याशिवाय आपले काय काय भले होते आहे, हे स्वतःहून कधीही सांगू नये. कारण हल्ली माणसांच्या प्रवृत्ती असुयेने बऱ्याच वेळेला भरलेल्या असतात. त्यामुळे तुमचे चांगले होते याचे जसे त्यांना काहीच महत्त्व नसते, तसेच ते तसे होते आहे याचे त्यांना मनातून वाईटच वाटते, हे ध्यानात घ्यावे !"😙
[29/9, 8:15 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-242 !":👌
💐"माणसाच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस असतो तो त्याचा वाढदिवस. कारण त्याच दिवशी त्याला जीवन प्राप्त झाले असते. साहजिकच प्रत्येक जण आपापल्या परीने आपला वाढदिवस आपल्या कुटुंबीयांसमवे मित्रमंडळीसह यथाशक्ती आनंदाने साजरा करतो.
अशावेळी प्रत्येकाने मागे वळून, मागच्या वर्षी काय केले, काय गमावले, काय मिळवले याचा जसा विचार करायला हवा, त्याचप्रमाणे पुढील वर्षी आपण कोणत्या क्षेत्रात काय केले पाहिजे आणि आपली प्रगतीची वाटचाल अधिक गतीने कशी पुढे न्यायची, त्याचा त्यादिवशी आढावा घेतला पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाचे जीवन अधिक सुखकर आणि यशस्वी होऊ शकेल !":💐
शनिवार, ७ सप्टेंबर, २०२४
"बोल अमोल-221 to 233 !":
[30/8, 7:43 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-221 !":👌
🤣 "प्रशासनाच्या त्रुटीमुळे अथवा चुकांमुळे जेव्हां अचानक एखादे महासंकट उभे राहते, तेव्हा सत्ताधारी नेहमी 'विरोधकांनी याचे राजकारण करू नये' असे तुणतुणे वाजवत राहतात, हे सर्वथैव चुकीचे ! ते म्हणजे आपली जबाबदारी झटकणेही होय, कारण त्यांच्या ऐवजी अशा वेळी जर विरोधक सत्तेत असते, तर ह्यांनीही तेच उलट अधिक ताकदीने केले असते,
नाही कां ?":🤣
[31/8, 7:31 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-222 !":👌
💐"आपण पुढे काय काय करणार याची वाच्यता करण्याची संवय तशी अयोग्यच, कारण बहुतेकदा इतरांना त्याचे काही देणे घेणे नसते. पट्टीचे पत्ते खेळणारा खेळाडू जसा आपली पत्ते काय आहेत याचा इतरांना थांंगपत्ता लागू न देता, डाव जिंकत जातो, त्याप्रमाणे आपणही आपले मनसुबे गुलदस्त्यातच ठेवणेच अखेर हितकारक होय !":💐
[1/9, 7:53 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-223 !":👌
😀 "लेखक कां लिहितो ? तर त्याला काही ना काही तरी दुसऱ्याला सांगायचं असतं म्हणून. चांगलं लेखन कशाला म्हणायला हवं ? तर ते जणू लेखक समोर बसून वाचकाला मनमोकळेपणाने सांगतोय
असं !":😃
[2/9, 8:55 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-224 !":👌
🤣 "एकच एक लकेर !":🤣
😇 "पर्यावरण समतोलाला डावलून कराल जर विकास, तर होईल तो भकास !":😇
[3/9, 9:48 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-225 !":👌
💐"कोणतेही कायदे हे आपल्या हितासाठी बनवलेले असतात. ते पाळणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं. सर्व व्यवहार सुलभतेने चालण्यासाठी कायदे पाळणे आणि कायद्यानुसार चालणं, हे अत्यावश्यक असतं. परंतु सध्या कायदे न पाळणं यातच फुशारकी मारली जाते ते
संपूर्णतया अयोग्य आहे !":💐
[4/9, 8:37 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-225 !":👌
😄"बोलायचं अन् सोईस्कर विसरायचं."
अशांना,
सांगा, काय बरं, म्हणायचं?
"विसरभोळे की, साळसूद??!":😄
☺️"व्यक्त होताना मांडण्यासारखे आणि इतरांना रुचेल, पटेल,
आवडेल असे जोपर्यंत सुचत नाही,
तोपर्यंत संयम बाळगणे
हा शहाणपणा होय !:😊
[5/9, 8:56 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-226 !":👌
💐"एखादे महत्त्वाचे काम अखेेर पूर्ण झाल्यानंतर आनंद होतो हे जरी खरे असले, तरी त्यानंतर एक प्रकारची पोकळी निर्माण होते. त्या उलट ते काम पूर्ण होण्यापूर्वी, जी प्रयत्नांची पराकाष्टा, काम पूर्ण कधी होणार याची हुरहुर, अनेक उद्भवणाऱ्या अडचणींचा सामना, कसोटी पाहणारी प्रतीक्षा असे बहुरंगी बहुरंगी अनुभव मिळणं हा देखील एक साठवणीत ठेवण्याजोगा मनभावन अनुभव असतो !":💐
[6/9, 9:44 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-228 !":👌
😇 "पुष्कळदा ज्यांचे कर्तृत्व कधीही सिद्ध झालेले नाही आणि जे आपलेच घोडे पुन्हा पुन्हा दामटत असतात, अशांना माध्यमांंमध्ये उगाचच महत्व देणे, न पटण्याजोगे. पण असेे सातत्याने कां होताना दिसते, हेही एक कोडेच !":😇
[7/9, 7:45 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-229 !":👌
😄"माझे अध्यात्म!"😄
वाचन हा श्वास,
लेखन हा निश्वास
मालिका पहाणे हा ध्यास
घडामोडींचा विचार हा अभ्यास
सोशल मिडिया वापरणे हा विकास
प्रवास करणे हा त्रास
आरोग्य राखणे हा प्रयास !":😄
[11/9, 7:37 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-230 !":👌
🤣 "अगदी नजीकच्या काळात कळीदार उकडीचे मोदक 25 रुपयाला एक असे मिळायचे, तर आजची बातमी 80 रुपयाला एक मोदक ! गाईचं दूध आणि म्हशीचं दूध देखील असंच पाहता पाहता वेगाने महागलं.
ही प्रगती म्हणायची की, अधोगती ?":🤣
[12/9, 9:23 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-231 !":👌
💐"विश्वास ठेवावा:
प्रकाश देणाऱ्या सूर्यावर, फुले देणार्या वेलींवर, जन्मभर खस्ता खाणाऱ्या
आईवर.......
विश्वास ठेवावा:
ऋतुचक्र आणणाऱ्या निसर्गावर,
कडक शिस्तीने कार्य करणाऱ्या मुंग्यांवर, अनिवार्य असणार्या मृत्यूवर!":💐
[13/9, 8:45 AM] Sudhakar Natu: 💐II(अ?)मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-232 !":👌
🤣 "आकाशात अधांतरी असलेल्या
विमानातील प्रवासापेक्षा, दुर्दैवाने रस्त्यावरील प्रवास आता अधिक जीव घेणा आणि धोकादायक ठरत आहे, घरातून बाहेर पडलेला माणूस, सुखरूप घरी येईल की नाही अशी चिंता घरोघरी वाटण्याची वेळ येणे, ही किती अधोगती !":🤣
[14/9, 10:36 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-233 !":👌
😇 "साध्या साध्या गोष्टींमुळे, आपल्या हातून अनुदानाने चुका होतात. विशेषत: तंत्रज्ञानाच्या योग्य उपयोग न केल्याने त्या चुका नंतर लक्षात येतात. बोलणे आणि लिहिणे यातील फरकामुळे होणार्या चुका तर खूप नुकसान करतात !":😇
"सुधा" डिजिटल श्री गणेश पुजन विशेषांक24:
गणेश चतुर्थी च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏
II श्री गणेशाय नमः II
"सुधा" डिजिटल श्री गणेश पुजन विशेषांक24:
आज श्री गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी मला हा डिजिटल विशेषांक तुमच्यासमोर सादर करायला विलक्षण आनंद होत आहे.
1 विशेषांकाची पीडीएफ पुरवणी
ही लिंक उघडून वाचा.....
https://drive.google.com/file/d/1Kef7sR9CHJ-K0ckA3l0teXEqcLPoyPNL/view?usp=drivesdk
2 माहवार राशीवार अनुकूल गुण कोष्टक-'24/25
ही लिंक उघडून पहा..
https://drive.google.com/file/d/1S7gxOg5lCtRlXdnCFDTEIdoA98MfTf-T/view?usp=drivesdk
3 अभिनव डिजिटल पुरवणी :
ही लिंक उघडून मुद्रण मांडणीत वाचा...
https://docs.google.com/document/d/1S2EtEJAmQiljpCzOiahh1WZZ52aqnlC9/edit?usp=drivesdk&ouid=113548774724041921723&rtpof=true&sd=true
4 ऐच्छिक मानधन पाठवण्यासाठी बँक अकाउंटची माहिती...
ही लिंक उघडून पहा....
https://drive.google.com/file/d/1QbavukqJFeAT29-470oekrvm6zZ2JTvp/view?usp=drivesdk
आपणास या मंगल प्रसंगी ही भेट आवडेल अशी आशा आहे.
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
Mb 9820632655
गुरुवार, ५ सप्टेंबर, २०२४
"छाप (पड)लेले शब्द-1 to 5F !"
👍"छाप (पड)लेले शब्द-1 F !":👌
🤣 "बाजारू बेजबाबदार उत्सव ! :🤣
😊"कथा' कुणाची व्यथा कुणा !":😇
🤢 "कोणतेही कायदे हे आपल्या हितासाठी बनवलेले असतात. ते पाळणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं. सर्व व्यवहार सुलभतेने चालण्यासाठी कायदे पाळणे आणि कायद्यानुसार चालणं, हे अत्यावश्यक असतं. परंतु सध्या कायदे न पाळणं यातच फुशारकी मारली जाते ते
संपूर्णतया अयोग्य आहे !
हा विचार मनात यायला, सोबतचा सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणारा, ध्वनी व इतर प्रदूषणासंबंधीचा लेख आहे. बाजारू बेजबाबदार उत्सवांंच्या गगनभेदी माहोलांत ध्वनि, वायू व प्रकाश प्रदूषण अशी सर्व प्रकारची त्रासदायक आयुधे परजली जातात आणि सामान्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो, नक्की कुणालाच परवा नाही, हे येथे अधोरेखित केले आहे.
जेव्हा हे सार्वजनिक उत्सव पूर्वी सुरू झाले, तेव्हाचे स्वरूप आणि आत्ताचे, यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. तेव्हाचा उद्देश समाज प्रबोधन त्याचप्रमाणे समाजाचे संघटन आणि परस्पर बंधुभाव वाढावा आणि एकीकडे देशाभिमान व जनजागृती व्हावी हा होता. परंतु सध्या जवळजवळ सगळीकडेच त्याचे विदारक स्वरूप दिसत आहे. प्रायोजक म्हणून पैसा ओतायला विविध ठिकाणचे नेते पुढे येतात आणि आपला, तसेेच आपल्या पक्षाचा प्रचार हाच प्रामुख्याने त्यामागचा गर्भित हेतू असतो हे वेगळे सांगायला नको.
प्रदूषण नियंत्रणासाठी अनेक कायदे आहेत. पण ते अशा उत्सवांच्या प्रसंगी पाळले जातात का? हे पाहणे गरजेचे आहे. एवढेच काय साध्या गल्लीबोळातल्या कुणाचा वाढदिवस असो वा लग्न समारंभ अथवा एखादे धार्मिक कार्य असो-
श्री सत्यनारायणासारखे त्या वेळेला देखील होणारा धांगडधिंगा आणि गोंधळ निमूूटपणे सारेजण सहन करत आले आहेत. हे काही प्रगत, प्रकल्भ समाजाचे लक्षण नव्हे. जर आपण कुणाचे भले करत नसलो तरी निदान आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही एवढी किमान दक्षता कुणीच घेत नाही हा दैव दुर्विलासच होय.
साहजिकच म्हणूनच या साऱ्यांचा गांभीर्याने विचार करायची वेळ आली आहे: असे उत्सवी बाजारू बेजबाबदार सार्वजनिक प्रदर्शन नकोच. ज्या काही गोष्टी वैयक्तिक आहेत, त्या वैयक्तिकच रहाव्यात आणि जर खरोखरच कुणाला गाजावाजा करायचाच असेल तर बंदिस्त हॉलमध्ये ते कार्यक्रम करावेत. पण ऐकतो कोण? लक्षात कोण घेतो? जो तो आपलेच घोडे पुढे दामटायला सज्ज आहे आणि कदाचित कुणालाच कशाचे काही वाटत नाही. कितीतरी सामूहिक क्रयशक्ती अशा वेळेला वाया जाते, हे कोण बघणार? शिवाय आरोग्याचे दुष्परिणामांकडेही कोण बघणार ?असे अनेक प्रश्न मनात निर्माण झाले आहेत !
शेवटी हे खेळ थांबणे केवळ अशक्यच ! सर्वसामान्यांनी मुग गिळून गप्प राहायचे, दुसरे काय ?:🤢
II कालाय तस्मै म: II
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)