"भक्ती पंथेची जावे'' पुस्तकाची किमया !":
अचानक कुठून तो कोरोना आला आणि त्याने सगळाच घोटाळा केला. साहजिकच बाहेर जाणं अशक्य असल्यामुळेदा.सा. वा. वाचनालयाच्या सदस्यत्वाचा काय होतंय याचा विचार न करता बरेेच महिने घरीच बसून राहिलो. शेवटी कळून चुकलं की, आता आपल्याला लायब्ररी बंद करायला हवी. म्हणून एके दिवशी तिथे गेलो आणि तसे सांगितले, तर मधल्या अनेक महिन्यांची वर्गणी माझ्या डिपॉझीट मधून वजा केली गेली ! कारण मी आता वाचनालयाचा सदस्यत्व बंद करत आहे हे कळवायलाच विसरलो होतो.
सार्या कोरोनाकाळात मी घराखाली कधी गेलो नाही आणि आपला जीव त्यामुळे सावरला जातोय या अनुभवात सुखाने मार्गक्रमण करत राहिलो. परंतु जसजशी ती भयाण दोन वर्षे गेली आणि कोरोना गेला व् जवळजवळ कमी झाला, त्यानंतर मला आढळलं की माझा कॉन्फिडन्स कम्प्लीटली नष्ट झाला आहे. घरातल्या घरात 24 तास एकटा मी व पत्नी आणि एक दोन कोणी हाऊसहेल्प किंवा इतर कोणी आलं गेलं तर त्यांचं होणारे दर्शन एवढेच आणि त्या पायी माझं मोठं नुकसान झालं हे कळून चुकलं. साधी सभोवताली फेरी मारणेही मी टाळत होतो. मला माझ्या मुलानृ सांगितलं की, तुम्ही तुमच्या मेंदूतील न्यूराॅनना, अशी व्यवस्था करायला लावली की आपण बाहेर नाही जायचं हा नियम आहे. त्यामुळे आता याच्यातून बाहेर यायला तुम्हाला खूप त्रास होणार.
मी सोडून, माझ्या घरातील सगळेजणांचे नेहमीचे आयुष्य चालू झाले होते, पण माझे तसे नव्हते. मी एकटाच घरात रात्रंदिवस असायचो आणि त्यामुळे खूप त्रास व्हायला लागला. मला कळून चुकलं की आता आपण याच्यातून बाहेर आलंच पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. रोज नाही तरी निदान आठवड्यातून दोन-तीन वेळा तरी दादरला गेलो पाहिजे. तसे वाटायला 'रुची' अंकामधला, जो अंक मी नेहमी वाचतो, एक जाहिरात कारणीभूत ठरली. जाहिरात होती के.ज. जो पुरोहितांच्या 'मित्रास्त' या पुस्तकाची जाहिरात आणि त्याच अंकातील "भक्ती पंथीची जावे' असे आकर्षक नांव असलेल्या पुस्तकाचा परिचय ! तो परिचय मला इतका भावला, मला वाटलं की आपण आता परत लायब्ररी चालू करायला हवी. 'दासावा' ही लायब्ररी दादरला
टिळक ब्रिजच्या खाली जायला लागायचं, त्यामानाने 'वसंत वाचनालय, शिवसेना भवनाच्या जवळच आहे. त्यामुळे आपण पुन्हा ती लायब्ररी चालू करावी असं मनानं घेतलं. अर्थात त्याला कारण ठरलं हे 'भक्ती पंथृची जावे' या पुस्तकाच्याबद्दलचा परिचय. मी व्हाट्सअप वर तसा संदेशही वसंत वाचनालयात पाठवला होता की ही दोन पुस्तकं तुमच्याकडे आहेत कां? पण त्यांचं काय उत्तर आलं नाही.
मग मी ठरवलं की काही झालं तरी, आता आपल्याला हा जो कोरोना काळामुळे आपल्यावर कुठेच बाहेर न जायचा जो रोग एक प्रकारे आलाय, त्याने आपण ग्रासून गेलो आहोत. त्पातून बाहेर येण्यासाठी काही करून आपण वसंत वाचनालयाचं मेंबर व्हावं. चार हजार रुपये वर्षाची फी आणि काय डिपॉझिट असेल ते, एवढी माहिती मला कळली होती. माझ्या मुलीने ती लायब्ररी सोडली, हे मला नंतर कळलं. जेव्हा मी तिला विचारलं की अगं तू मलाही दोन पुस्तक आणून देशील कां, तेव्हा. त्यामुळे मी ठरवलं आपणच आता या लायब्ररीचा मेंबर व्हायचं आणि हे पुस्तक 'भक्ती पंथेची जावे' त्याची माहिती त्यामुळे गाडी कशी उलटी फिरली, घड्याळाची चक्र कशी उलटी फिरली, तो अनुभव आला. तोच मी इथे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय.
कारण 'दासावा' सोडल्यानंतर,मला माझ्या मुलीने सुचवलं होतं की, वसंत वाचनालयाचे तुम्ही मेंबर व्हा आणि त्याप्रमाणे त्यांच्याशी माझं बोलणंही झालं होतं. ते मला सांगत होते व्हा तुम्ही मेंबर. पण तेव्हा मला 'शहाणपणा' सुचला. मनाशी म्हटलं- आपण आधी कधी कुठे जातो एवढे बाहेर दादरला ? त्यामुळे महिन्यातन किती वेळा जाणार आणि कितीशी पुस्तके वाचणार , त्यासाठी फी काय, असा सगळा आकडेमोडीचा हिशोब केला आणि मी म्हटलं हे खूप महागातलं काम आहे आणि म्हणून मी तेव्हा चक्क नकार दिला काही केलं तरी मी नाही मेंबर होणार. चारशे रुपये किती वेळा जाणार मी महिन्यातून किती वाचणार म्हणजे एक पुस्तक वाचायला किती रुपये पडले असे सगळे उद्योग, मी का करत होतो कारण माझ्यावर असलेला कुठेही बाहेर न जाण्याचा पगडा.
परंतु आज आता उलटच घडलं होतं की, आता मला त्या बाहेर न जाण्याच्या विचित्र पगड्यामधून बाहेर काढण्यासाठी, तीच लायब्ररी कारणीभूत होणार होती ! म्हणूनच मी आज दादरला गेलो. फक्त तेव्हा एक शहाणपण केलेला आहे, असं आत्ता वाटतंय की, एक महिनाभर प्रयत्न करूया ! असं करून डिपॉझीट प्रवेश फीसह 1100 रुपये त्यांना पाठवून दिले आणि हे 'भक्ती पंथेची जावे' पुस्तक आहे का ते विचारलं आणि तिथल्या सेविकेने ताबडतोब ते शोधून मला काढून दिलं. ते पुस्तक माझ्या हातात आल्यावर मला खूूपआनंद झाला, घरी आलो आणि ते वाचायला सुरुवात केली आहे. पहिलाच धडा म्हटलं तर वाचून झालेला आहे आणि आपण जो निर्णय घेतला तो योग्य होता असं आता वाटत आहे. कारण त्यामधील पहिला जो अरुण घाडीगावकरांचा लेख आहे तोच मुळीक अविस्मरणीय असा आहे. सहाजिकच आपण घेतलेला हा निर्णय खरंच पुढे आपल्याला उपयोगी पडणार असं वाटून मी हे सारे आत्मनिवेदन करत आहे. थोडक्यात या 'भक्ती पंथेची जावे' या पुस्तकांने
माझ्या अनारोग्याच्या समस्येमधून मला एका वेगळ्या अशा वळणावर आणूून नवी दिशा दाखवली आहे !
धन्यवाद
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा