रविवार, २५ जून, २०२३

"भक्ती पंथेची जावे'' पुस्तकाची किमया !":

 "भक्ती पंथेची जावे'' पुस्तकाची किमया !":

अचानक कुठून तो कोरोना आला आणि त्याने सगळाच घोटाळा केला. साहजिकच बाहेर जाणं अशक्य असल्यामुळे
दा.सा. वा. वाचनालयाच्या सदस्यत्वाचा काय होतंय याचा विचार न करता बरेेच महिने घरीच बसून राहिलो. शेवटी कळून चुकलं की, आता आपल्याला लायब्ररी बंद करायला हवी. म्हणून एके दिवशी तिथे गेलो आणि तसे सांगितले, तर मधल्या अनेक महिन्यांची वर्गणी माझ्या डिपॉझीट मधून वजा केली गेली ! कारण मी आता वाचनालयाचा सदस्यत्व बंद करत आहे हे कळवायलाच विसरलो होतो.

सार्या कोरोनाकाळात मी घराखाली कधी गेलो नाही आणि आपला जीव त्यामुळे सावरला जातोय या अनुभवात सुखाने मार्गक्रमण करत राहिलो. परंतु जसजशी ती भयाण दोन वर्षे गेली  आणि कोरोना गेला व् जवळजवळ कमी झाला, त्यानंतर मला आढळलं की माझा कॉन्फिडन्स कम्प्लीटली नष्ट झाला आहे. घरातल्या घरात 24 तास एकटा मी व पत्नी आणि एक दोन कोणी हाऊसहेल्प किंवा इतर कोणी आलं गेलं तर त्यांचं होणारे दर्शन एवढेच आणि त्या पायी माझं मोठं नुकसान झालं हे कळून चुकलं. साधी सभोवताली फेरी मारणेही मी टाळत होतो. मला माझ्या मुलानृ सांगितलं की, तुम्ही तुमच्या मेंदूतील न्यूराॅनना, अशी व्यवस्था करायला लावली की आपण बाहेर नाही जायचं हा नियम आहे. त्यामुळे आता याच्यातून बाहेर यायला तुम्हाला खूप त्रास होणार.

मी सोडून, माझ्या घरातील सगळेजणांचे नेहमीचे आयुष्य चालू झाले होते, पण माझे तसे नव्हते. मी एकटाच घरात रात्रंदिवस असायचो आणि त्यामुळे खूप त्रास व्हायला लागला. मला कळून चुकलं की आता आपण याच्यातून बाहेर आलंच पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. रोज नाही तरी निदान आठवड्यातून दोन-तीन वेळा तरी दादरला गेलो पाहिजे.  तसे वाटायला 'रुची' अंकामधला, जो अंक मी नेहमी वाचतो, एक जाहिरात कारणीभूत ठरली. जाहिरात होती के.ज. जो पुरोहितांच्या 'मित्रास्त' या पुस्तकाची जाहिरात आणि त्याच अंकातील "भक्ती पंथीची जावे' असे आकर्षक नांव असलेल्या पुस्तकाचा परिचय ! तो परिचय मला इतका भावला, मला वाटलं की आपण आता परत लायब्ररी चालू करायला हवी. 'दासावा' ही लायब्ररी दादरला
टिळक ब्रिजच्या खाली जायला लागायचं, त्यामानाने 'वसंत वाचनालय, शिवसेना भवनाच्या जवळच आहे. त्यामुळे आपण पुन्हा ती लायब्ररी चालू करावी असं मनानं घेतलं. अर्थात त्याला कारण ठरलं हे 'भक्ती पंथृची जावे' या पुस्तकाच्याबद्दलचा परिचय. मी व्हाट्सअप वर तसा संदेशही वसंत वाचनालयात पाठवला होता की ही दोन पुस्तकं तुमच्याकडे आहेत कां? पण त्यांचं काय उत्तर आलं नाही. 

मग मी ठरवलं की काही झालं तरी, आता आपल्याला हा जो कोरोना काळामुळे आपल्यावर कुठेच बाहेर न जायचा जो रोग एक प्रकारे आलाय, त्याने आपण ग्रासून गेलो आहोत. त्पातून बाहेर येण्यासाठी काही करून आपण वसंत वाचनालयाचं मेंबर व्हावं. चार हजार रुपये वर्षाची फी आणि काय डिपॉझिट असेल ते, एवढी माहिती मला कळली होती. माझ्या मुलीने ती लायब्ररी सोडली, हे मला नंतर कळलं. जेव्हा मी तिला विचारलं की अगं तू मलाही दोन पुस्तक आणून देशील कां, तेव्हा. त्यामुळे मी ठरवलं आपणच आता या लायब्ररीचा मेंबर व्हायचं आणि हे पुस्तक 'भक्ती पंथेची जावे' त्याची माहिती त्यामुळे गाडी कशी उलटी फिरली, घड्याळाची चक्र कशी उलटी फिरली, तो अनुभव आला. तोच मी इथे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय.

कारण 'दासावा' सोडल्यानंतर,मला माझ्या मुलीने सुचवलं होतं की, वसंत वाचनालयाचे तुम्ही मेंबर व्हा आणि त्याप्रमाणे त्यांच्याशी माझं बोलणंही झालं होतं. ते मला सांगत होते व्हा तुम्ही मेंबर. पण तेव्हा मला 'शहाणपणा' सुचला. मनाशी म्हटलं- आपण आधी कधी कुठे जातो एवढे बाहेर दादरला ? त्यामुळे महिन्यातन किती वेळा जाणार आणि कितीशी पुस्तके वाचणार , त्यासाठी फी काय, असा सगळा आकडेमोडीचा हिशोब केला आणि मी म्हटलं हे खूप महागातलं काम आहे आणि म्हणून मी तेव्हा चक्क नकार दिला काही केलं तरी मी नाही मेंबर होणार. चारशे रुपये किती वेळा जाणार मी महिन्यातून किती वाचणार म्हणजे एक पुस्तक वाचायला किती रुपये पडले असे सगळे उद्योग, मी का करत होतो कारण माझ्यावर असलेला कुठेही बाहेर न जाण्याचा पगडा.

परंतु आज आता उलटच घडलं होतं की, आता मला त्या बाहेर न जाण्याच्या विचित्र पगड्यामधून बाहेर काढण्यासाठी, तीच लायब्ररी कारणीभूत होणार होती !  म्हणूनच मी आज दादरला गेलो. फक्त तेव्हा एक शहाणपण केलेला आहे, असं आत्ता वाटतंय की, एक महिनाभर प्रयत्न करूया ! असं करून डिपॉझीट प्रवेश फीसह 1100 रुपये त्यांना पाठवून दिले आणि हे 'भक्ती पंथेची जावे' पुस्तक आहे का ते विचारलं आणि तिथल्या सेविकेने ताबडतोब ते शोधून मला काढून दिलं. ते पुस्तक माझ्या हातात आल्यावर मला खूूपआनंद झाला, घरी आलो आणि ते वाचायला सुरुवात केली आहे. पहिलाच धडा म्हटलं तर वाचून झालेला आहे आणि आपण जो निर्णय घेतला तो योग्य होता असं आता वाटत आहे. कारण त्यामधील पहिला जो अरुण घाडीगावकरांचा लेख आहे तोच मुळीक अविस्मरणीय असा आहे. सहाजिकच आपण घेतलेला हा निर्णय खरंच पुढे आपल्याला उपयोगी पडणार असं वाटून मी हे सारे आत्मनिवेदन करत आहे. थोडक्यात या 'भक्ती पंथेची जावे' या पुस्तकांने
माझ्या अनारोग्याच्या समस्येमधून मला एका वेगळ्या अशा वळणावर आणूून नवी दिशा दाखवली आहे !

धन्यवाद 
सुधाकर नातू

शनिवार, २४ जून, २०२३

👍"छाप (पड)लेले शब्द !":👌

 👍"छाप (पड)लेले शब्द !":👌

💐"समर्पित जीवनाचा आल्हाददायक पट !":💐

"छाप (पड)लेले शब्द  !": 'वर्तमानपत्रातील नेहमीच्या घोटाळे, भीषण अपघात, राजकीय उखाळ्या पाखळ्या, आदी नको असलेल्या बातम्यांच्या रखरखीत वाळवंटात, अचानक हा असा  कर्तृत्ववान व्यक्तीच्या समर्पित जीवनाचा आल्हाददायक पट नजरेत येतो, तेव्हा मन भरुन येते.

आज पासून जनता शताब्दी सुरू होणाऱ्या प्राध्यापक, प्राचार्य, कुलगुरू राम जोशींचा शिक्षण क्षेत्रातील अलौकिक योगदानाचा विस्त्रुत आलेख या लेखात आहे. त्यांना 'शिक्षणमंत्री व्हा' असा आग्रह असूनही आपल्याला कायम शिक्षक करायचे आहे, असा निर्णय घेणारा माणूस विरळाच. मुंबई विद्यापीठाची सध्या जी घसरगुंंडी चालू आहे, त्या पार्श्वभूमीवर कुलगुरू म्हणून त्यांनी दिलेले योगदान निश्चितच उठून दिसते.

प्रखर बुद्धिमत्ता, ध्येयासक्ती अमोघ वक्तृत्व आणि देखणे व्यक्तिमत्व लाभलेल्या प्रा राम जोशींच्या स्मृतीला मनापासून वंदन. शतकातून, अधून मधून कां होईना, अशी आदर्श व्यक्तिमत्वे निर्माण होतात, आपल्या असीम कर्तृत्वाचा ठसा उमटवत समाजाला दिशा देतात, हे आपले भाग्य !":👌

--------------
👍"छाप (पड)लेले शब्द !":👌
💐"हरवले ते गवसले !":💐

👍" सोबतच्या वृत्तामधील आजोबांचा चष्मा समुद्रात पडून देखील पुन्हा सापडला हे वाचल्यावर, मला तशाच एका प्रसंगाची आठवण झाली. काही कामानिमित्त मी माहीमहून दादरला बसने चाललो होतो. सर्वसाधारणपणे मी बाहेर पडल्यावर टोपी घालतो.त्या बसमध्ये बसल्यावर ती टोपी बहुदा बाजूला मी सीटवर ठेवली होती, पण ते मी विसरून गेलो. बसमधून दादरला उतरून काम करून, पुन्हा काही वेळाने घरी जायच्या वेळेला आपल्या डोक्यावर टोपी नाही हे माझ्या लक्षात आले. खूप हळहळ वाटली आणि मी बससाठी स्टाॅपशी उभा राहिलो,  मेचकी मी दाारला जिने आलो तीही 52 नंबरची बस होती, बहुदा तीच उलटा प्रवास करून योगायोगाने मला मिळाली ! बघतो ते काय एका सीटवर कोपऱ्यात माझी टोपी तशीच पडलेला होती. कोणी ती उचलून नेली नव्हती, हे एक आश्चर्यच ! त्यावेळेला मला जो आनंद झाला, तसाच आनंद बहुदा ह्या चष्मा हरवलेल्या आजोबांना झाला असेल.

खरंच काय योगायोग असतात कळत नाही. 'हरवलेले अवचित गवसते आणि ते तसे कां होते, हे कुणाला कधीच कळत नाही !:"👌
---------------
👍"छाप (पड)लेले शब्द !":👌
💐"वाचावे, ते ते नवलच !":💐

👍"कधी कधी वर्तमान पत्रामधले, एखादे वृत्त आपले लक्ष त्याच्या शीर्षकामुळे वेधून घेते. 'सनातन' ध्यासाचा सन्मान" या शीर्षकानेही माझे लक्ष ते वृत्त वाचण्यासाठी उद्युक्त झाले आणि काय आश्चर्य ! एकाहून एक नवल वाटाव्यात, अशा कितीतरी गोष्टी त्यामधून गवसल्या. गोरखपूरची 'गीता प्रेस' या संस्थेला, 2021 चा "गांधी शांतता पुरस्कार" जाहीर झाला आहे.

आज पर्यंत ह्या प्रेसने 93 कोटी होऊन अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत ! पंधरा भाषांमधील 1800 प्रकारची पुस्तके हे वाचून मी थक्क झालो !!  त्या पुढचा या पुरस्काराचा आकडा वाचून मी तर हवेतच उडालो एक कोटी रुपये आणि इतर बऱ्याच काही गोष्टी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे !!!

खरंच एखादी संस्था  निरलसपणे, इतके
उपयोगी आणि अवर्णनीय कार्य करत असेल याची आपल्याला कल्पनाच नसते.":👍

रविवार, ४ जून, २०२३

:💐"सोशल मिडीयावरील मुशाफिरी !":💐

 👍"रंगांची दुनिया 👌

💐"रसिकमनांची रसिली यात्रा !💐

💐"सोशल मिडीयावरील मुशाफिरी !":💐

"मोबाईलवर सर्फिंंग करताना अवचित 'वटसावित्री' विषयावर हा लेख वाचायला मिळाला. तो कोणी लिहिला त्याचा उल्लेख नाही, परंतु आज 'पर्यावरण दिवशी' हा लेख वाचायला मिळणे हा योगायोगच ! तोच येथे तुमच्याबरोबर # सामायिक# केला आहे. 

ज्या कोणी हे सारे लिहिले आहे, त्या अनामिकाला मनापासून धन्यवाद आणि आभार. 

श्री सुधाकर नातू

# तो लेख:#

 *वटसावित्री*! 

*नवीनच लग्न झालेल्या* एका *मित्राकडे* बसलो होतो. सहज विषय निघाला. त्या दिवशी *वटसावित्रीची पौर्णिमा* होती. मी सहज *नवीन वहिनींना प्रश्‍न केला*, काय वहिनी! *झाले का बुकिंग*?तर *ती फणकार्‍यात म्हणाली मी विज्ञाननिष्ठआहे*.असल्या *अंधश्रद्धांवर माझा विश्‍वास नाही*.

 सगळेच हबकले. मित्राच्या चेहर्‍यावरचे भाव, *‘सांग बाबा काही समजावून*!’ असे होते. मग *म्हणालो ‘वहिनी’ बसा*! *विज्ञाननिष्ठा म्हणजे काय हो?*

 *कोणत्याही गोष्टीची कार्यकारणमीमांसा समजून घेतल्याशिवाय त्यावर विश्‍वास न ठेवणे हेच ना*? त्या म्हणाल्या *हो! बरोबर*.

 मी म्हणालो, *मग आता सांगा* *वडाचीच पूजा का करायची*? *आंबा, फणस, जांभूळ* वा *बाभळीची का नाही*? मी म्हणालो,

 *मला काय माहिती?* 

*म्हटले जाऊ द्या. ज्येष्ठ पौर्णिमेलाच का करायची?श्रावणी वा माघ पौर्णिमेला का नाही ?* 

*ती पुन्हा म्हणाली, मला काय माहिती*? 

मग मी म्हणालो, *हे काहीच माहिती नाही*? *कधी समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही?*! तर *मग ‘अंधश्रद्धा’ कशाच्या आधारावर घोषित करता*? *बिचारीजवळ उत्तर नव्हते, अनेकांजवळ नसते.*

*शेवटी म्हणाली तुम्हीच सांगा. म्हटलं ऐका*.

 *जगात सर्वात दाट सावली असते वडाची*. *वडाच्या पारंब्यांमधून अखंड पाणी टपकत असते*. त्यामुळे *वडाखालील जमीन सदैव ओलसर असते*. *याचसाठी वडाची सावली अद्भुत गुणकारी असते*, 

*हे सांगताना सुभाषितकार म्हणतात-*

 *कूपादेकं वटच्छाया तथा मृद्निर्मितंगृहम्‌ ।*

*शीतकाले भवदुष्णं उष्णकाले तु शीतलम्‌।*

*अर्थात विहिरीचे पाणी, वडाची सावली आणि मातीचे घर , उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात गरम असते*. या *तिननी युक्त असे घर होते तोवर कूलर, एसी लागत नव्हता*.

 *वडाचे वैज्ञानिक वैशिष्ट्य जगात सर्वाधिक ऑक्सिजनचे उत्सर्जन करणारा वृक्ष आहे वड*.

 *ज्येष्ठाच्या जीवघेण्या घुसमटी उन्हात लाकडे तोडण्यास गेलेला सत्यवान ऊन लागून पडला*. *गरमीने त्रासला*. *प्राणवायूच्या अभावाने कासावीस झाला. त्याला सत्यवतीने वडाच्या झाडाखाली आणले*. 

*त्या सावलीत, त्या पारंब्यांच्या तुषारात, त्या थंडाव्यात* आणि *उपलब्ध सर्वाधिक ‘ऑक्सिजन’ युक्त स्थानी आल्यावर त्याचे प्राण वाचले*. *हे आहे पतीचे प्राण वाचविणे*. *बाकी पुराण कथा ‘रोचनार्था फलश्रुति:। ’ प्रकारातील समजायची असते*. *ज्या वडाच्या या गुणधर्मामुळे पती वाचला त्या वडाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे. निसर्गाला धन्यवाद देणे म्हणजे आहे वटपौर्णिमा*!

ती म्हणाली *याचा सात जन्मांशी संबंध काय? म्हटले ही देखील अशीच न समजता पसरलेली गोष्ट आहे.* 

*सात जन्माचा पुढच्या जन्माशी काहीही संबंध नाही*. *हा जीवशास्त्रीय विश्‍लेषणाचा भाग आहे*.

 *जीवशास्त्र सांगते आपल्या शरीरात पेशी सतत परिवर्तित होत राहतात. जुन्या मरतात नव्या जन्मतात. सतत बदल घडत राहतो.*

 *संपूर्ण शरीरातील सगळ्या पेशींचे परिवर्तन व्हायला काळ लागतो १२ वर्षे.* म्हणून *तर ‘तप’ १२ वर्षे*. *नवीन तयार होणारी प्रत्येक पेशी तप:पूत असावी म्हणून १२ वर्षे तपश्‍चर्या*.

 *१२ वर्षांत सगळ्या पेशी बदलतात*. *जणू पुनर्जन्म. सगळ्या नव्या पेशी.* *नवा देह*.

 *असा ७ वेळी जन्म अर्थात १२x ७=८४ वर्षे*. *पूर्वी विवाह व्हायचे १६ व्या वर्षी. त्यावेळी नववधू प्रार्थना करायची ‘साताजन्माची सोबत असू दे*!’ *अर्थात पती १६+८४=१०० वर्षे जगू देत*.

 *हा शतायुष्याच्या प्रार्थनेसह निसर्गाच्या कृतज्ञतेचा सोहळा आहे*. *वटपौर्णिमेला सावित्रीला हे वटमाहात्म्य माहिती होते म्हणून तिचा सत्यवान वाचला*. 

*आपण ‘वट’ तोडले तर आपल्या सत्यवानांचे काय*? *याचा विचार करण्याचा दिवस आहे ‘वटपौर्णिमा*!’

*खूपच छान माहिती* 👌🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🚩🚩🚩

गुरुवार, १ जून, २०२३

👍"संक्षिप्त वार्षिक राशीभविष्य"'२२/२३":👌

 👍"संक्षिप्त वार्षिक राशीभविष्य"'२२/२३":👌


१ नोव्हेंबर'२२ ते ३१ डिसेंबर'२३ ह्या कालखंडातील ग्रहबदलानुसार, राशीनिहाय अनुकूल गुण कोष्टक वर
दिलेले आहे. तशीच एकूण संपूर्ण कालखंडातील 
गुणांच्या बेरजेवरून पुढील पाच सुलभ गटात त्यांची विभागणी केली आहे:
१.उत्तम पहिला गट: धनु, कन्या व मीन राशी
२.उजवा दुसरा गट: कर्क, सिंह व मेष राशी
३.मध्यम तिसरा गट: व्रुश्चिक व मिथुन राशी.
४.डावा चौथा गट: व्रुषभ व तुळ रास
५.त्रासदायक पाचवा गट: कुंभ आणि मकर रास.

दरमहा आपल्या राशीला किती अनुकूल गुण आहेत ते पहा आणि त्याप्रमाणे जर अनुकूल गुण समाधानकारक असतील तर प्रयत्न व अपेक्षा जरूर वाढवा. या उलट जर अनुकूल गुण कमी असतील, तर प्रयत्न वाढवा आणि अपेक्षा कमी करा. त्यामुळे तुम्हीच तुमच्या समाधानाचा मार्ग निवडू शकाल आणि त्याप्रमाणे पुढे जाऊ शकाल आपल्या सर्वांना शुभेच्छा.

💐💐"शुभ दिपावली"🪔🏮🕯
👍"२१ ऑक्टोबर पासून दीपावलीचा प्रारंभ होत आहे.
💐सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छ💐... !!!!!
त्यानिमित्ताने आगामी काळाची चाहूल घेणारा,
गृहबदलानुसार चंद्रराशीनिहाय अनुकूल गुणांच्या आधारे प्रयत्न आणि अपेक्षा यांची योग्य ती सांगड
घालून समाधान कसे मिळवायचे त्याचे मार्गदर्शन
देणारा हा खास लेख आपण जरूर वाचा.
             👍👍💐💐👍👍💐💐
👍प्रास्ताविक:
भारतीय ज्योतिष चंद्राला महत्व देते तर पाश्च्यात्य
 ज्योतिष रविला.  त्यामुळे, आपल्या जन्मवेळी चंद्र 
ज्या राशीत असतो, ती आपली जन्मरास मानली 
जाते. चंद्र सर्वसाधारणपणे एका महिन्यात बाराही 
राशींचा प्रवास पूर्ण करतो, त्यामुळे आपली जन्मरास ठरविताना जन्मतारिख महिना वर्ष व जन्मवेळ माहीत असावी लागते. चंद्रावर आधारित भारतीय ज्योतिष अधिक सूक्ष्मपणे वस्तुनिष्ठ, तसेच व्यक्तिनिष्ठ विचार करते. 

आपले आयुष्य ही विशिष्ठ परिस्थितींत घेतलेले वा न घेतलेले निर्णय आणि त्यानुसार केलेली
क्रुती वा न केलेली क्रुती ह्यांच्या परिणामांची अखंडीत श्रुंखला असते. परिस्थितीदेखिल नित्य नव्याने बदलत रहात असते. ह्या सर्व घडामोडींमागे आपले मन एखाद्या सारथ्याची भूमिका बजावत असते. मानवी 
मनावर चंद्रभ्रमणाचा यथोचित परिणाम होत असतो. 

प्रुथ्वीवरील समुद्राच्या भरती ओहोटीचा संबंध 
चंद्राच्या दररोजच्या भ्रमणावर अवलंबून असतो हे 
सर्वश्रुत आहे. आपल्या शरिरात सुमारे सत्तर टक्के 
पाणी असते. सहाजिकच चंद्रभ्रमण आपले विचार 
निर्णय व क्रुतीवर प्रभाव पाडत असते, हे ओघाने 
आले. ह्या विचारमंथनामुळे चंद्रभ्रमणाला केंद्रीभूत 
मानणारे भारतीय ज्योतिष तर्कशास्त्राला पटू शकेल असे तथ्य आहे.

👍अनुकूल गुण पद्धती:

कालचक्र अव्याहत फिरत असते, माणसाच्या आयुष्यात काही दिवस सुखाचे तर काही दु:खाचे असतात. हा क्रम प्रत्येकाला अनुभवाला येतो. उद्याचा दिवस, आजच्यापेक्षा अधिक चांगला जावा ह्या आशेवर माणूस जगत असतो. उद्याचे पुढचे पाऊल कसे असेल, येणारा काळ कसा असेल, अनुकूल वा प्रतिकूल आणि तोही किती प्रमाणात हे कळण्याच्या इच्छेने तो दर वर्षी उत्सुकतेने राशीभविष्य पहात असतो.

माणूस उंच वा बुटका आहे, जाडा किंवा बारिक आहे, तो गरिब वा श्रीमंत आहे अशा विधानांवरुन आपल्याला निश्चित अशी काही कल्पना येत नाही. ती येण्यासाठी कोणते तरी त्या विषयाशी संबंधित असे अनुरूप संख्यात्मक परिमाण आवश्यक असते. जसे उंची 
सेंटी मीटर, वजनासाठी किलोग्राम, आर्थिक 
स्थितीसाठी रुपये असे परिणाम संख्यात्मक द्रुष्टिने 
दाखवता येते. ह्याच पद्धतीने आपले आगामी दिवस कोणाला कसे जातील, हे भविष्याच्या ज्ञानाच्या 
आधारे सांगण्याची पद्धत म्हणजे राशीभविष्य होय. 

👍नशिबाच्या परिक्षा: 

पहिल्या स्तंभात प्रत्येक राशीच्या खाली डाव्या बाजूला त्या राशीचा नशिबाचा ह्या वर्षीचा तर उजव्या बाजूस मागील वर्षीचा अनुक्रम दाखवला आहे.  

३१ दिवसांचा महिन्यांचे प्रत्येक महिन्याचे जास्तीत जास्त गुण १८६, तर ३० दिवसांच्या महिन्यांचे जास्तीत जास्त गुण १८० आणि फेब्रुवारी २०२३चे जास्तीत जास्त अनुकूल गुण १६८. याप्रमाणे प्रत्येक महिन्याला ग्रह किती शुभ दिवस आहेत ते अनुकूल गुण 
दाखवले आहेत. त्या आधारे प्रयत्न आणि अपेक्षा यांचा समतोल राखत समाधान मिळवण्याची युक्ती 
तुम्हाला मिळू शकेल अशी अनुकूल गुणांची कल्पना आहे. 

👍अनुकूल गुणांच्या पद्धती: नियम
आम्ही गेले तीन दशके त्याकरता अभिनव अशा अनुकूल गुणांच्या पद्धतीचा उपयोग करत आहोत. प्रत्येक राशीला सहा प्रमुख ग्रहांच्या बदलत जाणार्या स्थितीचा अभ्यास करून ज्योतिषांतील पुढील नियमांचा आधार घेऊन वर्षभरात प्रत्येक माहवार किती दिवस अनुकूल आहेत त्याचे गणित मांडून अनुकूल गुण 
देतो. ते नियम असे आहेत:

रवि: ३,६, १० व ११ वा शुभ
मंगळ: ३,६, व ११ वा शुभ
बुध: २,४,६,८,१० व ११ वा शुभ
गुरू: २,५,७,९, व ११ वा शुभ
शुक्र: १,२,३,४,५,८,९,११ व१२ वा शुभ
शनी: ३,६, व ११ वा शुभ

👍"नशिबाची गटवारी":👌

आगामी १४ महिन्यांच्या कालखंडात वरील महत्वाच्या ग्रहांच्या विविध राशीप्रवेशानुसार ह्या नियमांचे आधारे ते किती दिवस शुभ आहेत, ते आजमावून माहवार शुभदिवस अर्थात अनुकूल गुण देऊन, त्याप्रमाणे राशीनिहाय अनुकूल गुण कोष्टक पुढे दिलेले आहे. तशीच एकूण संपूर्ण कालखंडातील गुणांच्या बेरजेवरून पुढील पाच सुलभ गटात त्यांची विभागणी केली आहे
१.उत्तम पहिला गट: धनु, कन्या व मीन राशी
२.उजवा दुसरा गट: कर्क, सिंह व मेष राशी
३.मध्यम तिसरा गट: व्रुश्चिक व मिथुन राशी.
४.डावा चौथा गट: व्रुषभ व तुळ रास
५.त्रासदायक पाचवा गट: कुंभ आणि मकर रास.

👍"राशीनिहाय संक्षिप्त राशीभविष्य":👌
सोबत राशीने हाय या संपूर्ण कालखंडातील माहवार अनुकूल गुणांचे कोष्टक दिले आहे प्रत्येक महिन्यामध्ये राशीचा नशीबाचा क्रमांक ही खाली दिलेला आहे वर्ष कालखंडाच्या अखेरीस मागच्या वर्षीच्या तुलनेत अनुकूल गुण तसेच क्रमांक नशिबाच्या बाबतीत कुठला ते देखील दिले आहे त्यावरून तुमचे तुम्हालाच समजू शकेल की आपले नशीब इतरांच्या तुलनेत कसे आहे. या पद्धतीमुळे आपण आपल्या अपेक्षा आणि प्रयत्न यांची सांगड घालून योग्य ते कृती करून आपल्या समाधानाचा मार्ग शोधू शकता तुमचे नशीब तुमच्या हातात असाच जणू काही हा एकंदर मार्ग.
मागील व यंदाच्या एकूण अनुकूल गुणांचा विचार करता, राशीनिहाय नशिबाचा चढ उतार हा असा असेल:

मेष: मागच्या वर्षी सातवा नंबर होता आता सहावा आहे म्हणजे प्रगती आहे.
वृषभ: बरोबर उलटं झालंय मागच्या वर्षी आठवा क्रमांक होता बारा राशींमध्ये तो आता नववा झालाय.
मिथुन: राशीची प्रगती आहे कारण गेल्यावर्षी बारा राशींमध्ये त्याचा तळाला 11 वा क्रमांक होता तो आता उडी मारून आठ झाला आहे.
तर कर्क रास नवव्या क्रमांकावरून प्रगती करत चौथ्या क्रमांकावर पोचली आहे.
सिंह: रास दिमाखाने दुसऱ्या क्रमांकावर होती तिची घसरगुंडी होऊन ती पाचव्या नंबरवर स्थिरावणार आहे, म्हणजे दिवस मागच्यापेक्षा आता जरा तेवढे चांगले नाहीत.
कन्या: राशीचे बरोबर उलट झालं आहे कारण तिने मागच्या वर्षी पाच क्रमांक वरून दुसऱ्या क्रमांकावर ह्या वेळेला उडी मारणार आहे म्हणजे त्यांची चांगली प्रगती आहे.
तुळ: जैसे थे तळाला दहाव्या क्रमांकावर कठीण दिवस तसेच पहात राहणार आहे.
वृश्चिक रास मागच्या वर्षी दिमाखात पहिल्या क्रमांकावर होती ती आता घसरून सातव्या क्रमांकावर कटकटी पाहणार आहे.
धनु: त्याउलट अगदी बरोबर मागच्या वर्षी मध्यममार्गी ६ व्या क्रमांकावरून चक्क पहिला क्रमांक मिळवणार आहे.
मकर : रास बिचारी बाराव्या तळाच्या क्रमांकावर यावर्षीही किया मारुन कठीण दिवसांना तोंड देणार आहे.
कुंभ: राशीची जबरदस्त घसरगुंडी होऊन ती तिसर्या नंबरवरून चक्क अकराव्या क्रमांकावर तळाला जाणार आहे.
मीन: रास आहे त्या परिस्थितीत किंचित सुधारणा करत चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर उडी मारणार आहे.
अशा तऱ्हेने राशींचे नशिबाचे आगामी वर्षांतील चढउतार तुम्हाला मार्गदर्शक ठरतील.

👍"शनीची साडेसाती":

साडेसाती म्हणजे काय? गोचरीचा शनि जेव्हां 
तुमच्या चंद्रराशीच्या मागील राशीत येतो, तेव्हा  
साडेसाती सुरू होते व  तुमच्या राशीच्या पुढील 
राशीनंतर येणार्या राशींत जातो, तोपर्यंत साडेसाती 
असते.
उदा: 
सध्या मकर राशींत शनी वक्रीआहे, म्हणून आता 
धनु, मकर  कुंभ राशींना साडेसाती आहे. शनी कुंभेत 
१७ जानेवाली'२३ रोजी जेव्हा करेल, तेव्हा धनु राशीची साडेसाती 
संपेल, मात्र तेव्हा पुन्हा मीन राशीला साडेसाती सुरु होईल.
✴९. धनु▪ २ नोव्हेंबर २०१४ रोजी सुरु झालेली असुन दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी संपेल.​
✴१०. मकर▪२६ जानेवारी २०१७ रोजी  सुरु 
झालेली असुन दिनांक २९ मार्च २०२५ रोजी संपेल.​
११. कुंभ:
शनीची साडेसाती २४ जानेवारी'२०२० पासून सुरु झाली, ती २३ फेब्रुवारी'२०२८ पर्यंत असेल.
१२ मीन: शनीची साडेसाती २९ एप्रिल'२२ ते १२ जुलै'२२ व नंतर पुन्हा १७ जाने'२३ ते 7 aug'29  पर्यंत ती राहील.

👍वयोमानानुसार आता मी वैयक्तिक ज्योतिष सल्ला देणे बंद केले आहे, ह्याची क्रुपया नोंद घ्यावी.

👍सर्व वाचकांना आगामी कालखंड सुख शांती व समाधानाचा जावो ही मनःपूर्वक शुभेच्छा.

धन्यवाद
सुधाकर नातू

।। शुभम् भवतु ।।

ता.क.
अनुकुलगुण कोष्टक:'२२/२३
ज्यांना हवे असेल त्यांनी आपल्या नांव, गांवात whatsapp mb number प्रतिसादाा द्यावा अथवा 9820632655
ह्या नंबरवर whatsapp msg ने पाठवावा.




👍"सोशल मिडीयावरील नीरक्षीर विवेक !":👌

 👍"सोशल मिडीयावरील नीरक्षीर विवेक !":👌

# स्मार्ट फोन व सोशल मीडिया जगात अवतरण्यापूर्वी, आपले ज्ञान आणि जाणीवा या खूप संकुचित व मर्यादित होत्या. कारण आपले परिचय वर्तुळ, वाचन आणि आपले एकंदर समाजातील परस्पर संपर्क यापुरते आपले ज्ञान व जाणिवा यांचा विस्तार होता. परंतु सोशल मीडिया आणि स्मार्टफोन हातात आल्यापासून, जगामध्ये काय काय चांगले घडत आहे, काय काय उपयुक्त आहे यांची देवाण-घेवाण सहजतेने बसल्या बसल्या होत गेली. 

अर्थात् त्यासाठी आपली नजर घारीसारखी हवी आणि सोशल मीडियाकडे केवळ टाइमपास एवढेच न बघता, आपण अधिक समंजसपणे, चौकसपणे जर मोबाईलवर सर्फिंग करत राहिलो आणि आपला एकंदर या माहितीच्या महासागरात वावर वाढवला, तर आपल्याला त्यातून खूप खूप काही नवे नवेउदबोधक विचार, खुप वेगवेगळी नवी माहिती आणि संग्रही ठेवावे, अनुकरण करावे असे मार्गदर्शन मिळू शकते. तसा निदान माझा अनुभव आहे आणि म्हणूनच मी सोशल मीडियाकडे वेगळ्या दृष्टीने पाहतोः सोशल मीडीया म्हणजे जणू काही क्रिएटिव्ह मोटिवेशन देणारी एक आधुनिक जिम्नॅशियम आहे असेच मला कायम वाटत आले आहे.

या माझ्या धडपडीत काही गोळा केलेले असेच उपयुक्त नीरक्षीरविवेकाने वेचलेले तीन संदेश मी येथे शेअर करत आहे:
1
#👍"Forwarded message !:👌
(फक्त शीर्षक माझे !):
☺️"खाणे किती किती बहाणे !:😊
एखादा पदार्थ किंवा धान्य /भाजी खाण्याजोगे करण्यासाठी आपण किती प्रकारच्या प्रक्रिया त्यावर करतो ? बघू या किती आठवतात ते .....
१) खुडून २) निवडून ३) पाखडून ४) चाळून ५) वेचून ६) दळून ७) कांडून ८) मळून ९) भिजवून १०) शिजवून ११) भाजून १२) परतून १३) गाळून १४) धुवून १५) वाळवून १६) आटवून १७) मुरवून १८) तळून १९) लाटून २०) पसरुन २१) वाफवून २२) कुटून २३) वाटून २४) कालवून २५) साठवून २६) खारवून २७) पाकवुन २८) ठेचून २९) सोलून ३०) चिरुन ३१) कापून ३२) नासवून ३३) फेटून ३४) ढवळून ३५) उकळवून ३६) वळुन ३७) थापून ३८) उकडून ३९) उलथवून ४०) तिंबून ४१) मिसळून ४२) घुसळून ४३) चोचवून ४४) कातरून ४५) फोडून ४६) पाडून ४७) ओतून ४८) काढून ४९) झाकून ५०) खरवडून ५१) विरजून ५२) गुंडाळून ५३) बांधून ५४) टांगून ५५) रांधून ५६) कुस्करुन ५७) चापून /चोपून ५८ ) पेरून ५९) कोचून ६०) उगाळून ६१) आंबवून
आपल्याला यात आणखी भर घालायची असल्यास भर प्रतिसादात जरूर कळवा.
---------------------------
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

2
# 😊 "अयोग्य खाण्यामुळे दुष्परिणाम !":😢
आता अयोग्य खाण्यामुळे काय काय दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर विशेषतः प्रत्येक अवयवावर कोणता होऊ शकतो, ते हिंदी भाषेत उलगडणारा हा अंतर्मुख करणारा सोशल मिडीयावरील.... Forwarded msg;
👍वेद केरला नेचुरल हेल्थ केयर एक ऐसी संस्थेतर्फे:

😊 "*नाज़ुक अंगो को घायल कर रहा आपका कठोर व्यवहार ।‌।*
1- *आमाशय* घायल होता है जब आप प्रातः काल अल्पाहार नही करते हैं।
2- *किडनी* घायल होती है जब आप 24 घण्टे में 10 -12 गिलास पानी नही पीते
3- *पित्ताशय* घायल होता है जब आप रात्रि 11 बजे तक सोते नही है और सूर्योदय से पूर्व जागते नही हैं।
4- *छोटी आंत* घायल होती है जब आप ठंडा और बासी भोजन करते हैं।
5- *बड़ी आंत* घायल होती है जब आप बहुत तला भुना और मसालेदार भोजन करते हैं।
6- *फेफड़े* घायल होते हैं जब आप सिगरेट,और धुयें आदि से प्रदूषित वातावरण में सांस लेते हैं।
7- *लिवर* घायल होता है जब आप बहुत भारी जंक, फ़ास्ट फ़ूड खाते हैं।
8- *हृदय* घायल होता है जब आप अपने भोजन में अधिक नमक और केमिकल रिफाइंड तेल खाते हैं।
9- *अग्न्याशय* घायल होता है जब आप मीठी चीजे ज्यादा मात्रा में खाते हैं क्योंकि वो स्वादिष्ट और सहज उपलब्ध हैं।
10- *आँखें* घायल होती हैं जब आप कम प्रकाश में मोबाईल और कम्प्यूटर स्क्रीन पर काम करते हैं।
11- *मस्तिष्क* घायल होता है जब आप नकारात्मक सोचने लगते हैं।
12- *आत्मा* घायल होती है जब आप नैतिकता के विरुद्ध कार्य करते हैं।
*👉आप सभी अंगो को अच्छी तरह से देखभाल कर अपने को स्वस्थ रखिये।*
👍
*वेद केरला नेचुरल हेल्थ केयर एक ऐसी संस्था है जो प्राकृतिक उपचारओं के माध्यम से शरीर को निरोगी बना सकते हैं*
*अपनी दुआओं में हमें याद रखें।*
(Contact no:- +919643048904)*
-----------------------
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

3
# शेवटी ज्येष्ठांना भेडसावणाऱ्या दररोजच्या एका त्रासदायक समस्येविषयी अत्यंत उपयुक्त माहिती ह्या Forworded msg मध्ये आवर्जून वाचा:

😢 "*नोक्टुरिया* !😢:
👇
नॉक्टुरिया म्हणजे रात्री लघवी होणे हे हृदयाच्या विफलतेचे लक्षण आहे, मूत्राशयाचे नाही.

शिवपुरीचे प्रसिद्ध डॉक्टर डॉ. बन्सल स्पष्ट करतात की, नॉक्टुरिया हे खरेतर हृदय आणि मेंदूच्या रक्तप्रवाहात अडथळा येण्याचे लक्षण आहे. प्रौढ आणि वृद्ध लोकांना सर्वात जास्त त्रास होतो कारण त्यांना लघवी करण्यासाठी रात्री वारंवार उठावे लागते. झोपेचा त्रास होईल या भीतीने वडील रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिण्यास टाळाटाळ करतात. पाणी प्यायलं तर लघवी करण्यासाठी पुन्हा पुन्हा उठावं लागेल, असं त्यांना वाटतं. त्यांना काय माहित नाही की झोपण्यापूर्वी किंवा रात्री लघवी केल्यानंतर पाणी न पिणे हे प्रौढ आणि वृद्ध लोकांमध्ये वारंवार पहाटे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचे एक महत्त्वाचे कारण आहे. खरं तर, नॉक्टुरिया म्हणजे वारंवार लघवी होणे ही मूत्राशयाच्या बिघडलेली समस्या नाही. हे वयोमानानुसार वृद्धांमध्ये हृदयाचे कार्य कमी झाल्यामुळे होते, कारण हृदय शरीराच्या खालच्या भागातून रक्त शोषण्यास सक्षम नाही.

अशा स्थितीत दिवसा जेव्हा आपण उभे असतो तेव्हा रक्ताचा प्रवाह अधिक खालच्या दिशेने होतो. हृदय कमकुवत असल्यास हृदयातील रक्ताचे प्रमाण अपुरे पडते आणि शरीराच्या खालच्या भागावर दाब वाढतो. म्हणूनच प्रौढ आणि वृद्ध व्यक्तींना दिवसा शरीराच्या खालच्या भागात सूज येते. जेव्हा ते रात्री झोपतात तेव्हा शरीराच्या खालच्या भागाला दाबातून आराम मिळतो आणि त्यामुळे ऊतींमध्ये भरपूर पाणी साठते. हे पाणी पुन्हा रक्तात येते. जास्त पाणी असल्यास, पाणी वेगळे करण्यासाठी आणि मूत्राशयातून बाहेर ढकलण्यासाठी मूत्रपिंडांना अधिक मेहनत करावी लागते. हे नॉक्टुरियाच्या मुख्य कारणांपैकी एक आहे.

त्यामुळे तुम्ही झोपायला आडवे झाल्यावर आणि पहिल्यांदा टॉयलेटला जाता तेव्हा साधारणतः तीन ते चार तास लागतात. त्यानंतर, जेव्हा रक्तातील पाण्याचे प्रमाण पुन्हा वाढू लागते, तेव्हा तीन तासांनंतर पुन्हा शौचास जावे लागते.

आता प्रश्न असा पडतो की ब्रेन स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका हे महत्त्वाचे कारण का आहे?

दोन-तीन वेळा लघवी केल्यावर रक्तात फारच कमी पाणी असते, असे उत्तर मिळते. श्वासोच्छवासानेही शरीरातील पाणी कमी होते. यामुळे रक्त घट्ट आणि चिकट होते आणि झोपेच्या वेळी हृदयाची गती मंदावते. जाड रक्त आणि संथ रक्तप्रवाहामुळे, अरुंद रक्तवाहिनी सहज अवरोधित होते...

यामुळेच प्रौढ आणि वृद्ध लोकांना नेहमी पहाटे ५-६ च्या सुमारास हृदयविकाराचा झटका किंवा अर्धांगवायू झाल्याचे आढळून येते. या अवस्थेत ते झोपेतच मरतात.

सगळ्यांना सांगायची पहिली गोष्ट म्हणजे नॉक्टुरिया ही मूत्राशयाची खराबी नाही, ती वृद्धत्वाची समस्या आहे.

आणखी एक गोष्ट सर्वांना सांगावीशी वाटते ती म्हणजे झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यावे आणि रात्री उठल्यावर पुन्हा लघवी करावी.

नॉक्टुरियाला घाबरू नका. भरपूर पाणी प्या, कारण पाणी न पिल्याने तुमचा जीव जाऊ शकतो.

तिसरी गोष्ट म्हणजे हृदयाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तुम्ही सामान्य वेळेत जास्त व्यायाम केला पाहिजे. मानवी शरीर हे यंत्र नाही की त्याचा अतिवापर केला तर बिघडेल, उलट त्याचा जितका जास्त वापर केला जाईल तितका तो मजबूत होईल. अस्वास्थ्यकर अन्न खाऊ नका, विशेषतः जास्त स्टार्च आणि तळलेले पदार्थ.

मी तुम्हाला विनंती करतो की हा लेख तुमच्या प्रौढ आणि वृद्ध मित्रांसोबत शेअर करा.

ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा. कृपया साध्या सूचना वाचा आणि अनुसरण करा."
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

हा लेख तुम्हाला कसा वाटला त्याचा जरूर प्रतिसादात उल्लेख करा.....

धन्यवाद
सुधाकर नातू