👍"छाप(पड)लेले शब्द-9 !":👌
👍"वाचा ही, वाढदिवसाची कहाणी !":👌☺️"वाढदिवस साग्र संगीत, सार्वजनिक रित्या, साजरा करण्याची पद्धत कधी सुरू झाली कोण जाणे ! खास वाढदिवसानिमित्त बनवलेला केक सजवून, त्यावर पेटलेली मेणबत्ती उत्सवमूर्तीने, ती मेणबत्ती विझवायची आणि बाकीच्या कोंडाळे करून उभे असलेल्या मंडळींनी, टाळ्या वाजवत इंग्रजी मधले "हॅपी बर्थडे हे टू यु" गाणे म्हणायचे हा प्रकार हल्ली सर्रास सगळीकडे आपल्याला दिसतो.
पण माझ्या आठवणीत, अशा प्रकारचे वाढदिवस आमचे कुणाचेच कधी साजरे केले गेले नव्हते. मला आठवते त्या दिवशी, बालपणी आजी ताकमेढी जवळच्या खांबाशी मला नेऊन, काही तरी 'कापसासारखा म्हातारा हो... 'वगैरे वगैरे अशी प्रार्थना करायची आणि माझे औक्षण करायची.
वाढदिवसाची दुसरी आठवण, पुढे प्राथमिक शाळेमध्ये एखाद्या सुस्थितीतील कुटुंबातील विद्यार्थी वा विद्यार्थिनी, वाढदिवसाला सर्व वर्गाला अथवा जमल्यास सर्व शाळेला चॉकलेटस् वाटायची. हा अजून एक वाढदिवस लक्षात राहण्याचा प्रकार.
आपले मूल एक वर्षाचे झाले की सार्वजनिकरित्या हॉल वगैरे घेऊन शिवाय सजााच भोजन आदी व्यवस्था करून मोठ्या दिमाखाने त्याचा वाढदिवस साजरा करणारी दांपत्ये देखील आपल्याला आढळतात. आपणही अशा कुठल्या ना कुठल्यातरी वाढदिवसाला हजेरी लावलेले असते. अगदी छोट्यात-छोटे म्हटलं तरी कुटुंबातील कोणाचाही वाढदिवस असला तर वरील केक मेणबत्ती इ.इ. प्रकार एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन नंतर, सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेणे ही देखील प्रथा रूढ झालेली आपण बघतो.
खरं म्हणजे वाढदिवस, ही वैयक्तिक गोष्ट व कुटुंबापूर्ती मर्यादित असते. परंतु तिथे असे सार्वजनिक प्रदर्शन कदाचित माणसांतील उत्सवप्रियतेमुळे झाले असावे. फक्त माझ्यापुरते बोलायचे झाले, तर मला चॉकलेटस् किंवा केक कधीच आवडलेला नाही. त्यामुळे केकचे घास भरवणे वगैरे हे प्रकार माझ्यापासून तरी दूर असतात हे माझे भाग्यच !
या पार्श्वभूमीवर 'इंग्रजी गीता ऐवजी, एखादे मराठी गीत वाढदिवशी कां म्हटले जावू नये ?' ही अभिनेता श्री सुबोध भावेंची शंका असलेले वृत्त माझ्या नजरेत आले. ते इथे पुुढे देत आहे.
सरते शेवटी, हे जे काही वाढदिवस पुराण चालू आहे, त्याची सांगता एका वेगळ्याच विचाराने मी करतो:
'वाढदिवस म्हणजे खरं म्हणजे आपल्या जीवनातला एक एक दिवस किंवा एक एक वर्ष कमी होणं होय. त्यामुळे सर्वसाधारण अर्ध्या आयुष्यापर्यंत, म्हणजे आताच्या सरासरी आयुर्मेनाचा विचार करता, वय वर्ष 35 ते 40 पर्यंत वाढदिवसाला वाढदिवस म्हणणे आणि तो साजरा करणे निश्चितच योग्य. परंतु त्यानंतरच्या वाढदिवसाला मात्र
'काढदिवस' असं म्हणावं, असं मला वाटतं ! आता
'काढदिवस' कां?, हे उघड करायची जरूर नाही, सुज्ञास अधिक सांगणे न लगे !!":☺️
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
☺️ 'हे सारे ( सु )विचार (?) आजच सुचायला, तारीख 25 असावी, जी आमच्या विवाहाची तारीख आहे; एवढेच नाही, तर माझ्या ती. कै. आईचाही जन्मदिवस 25 तारखेचाच, हा विलक्षण योगायोग दुसरे काय?
👍"छाप(पड)लेले शब्द-15 !":👌
💐"सावध व्हा ऐका पुढल्या हाका !":💐
☺️ "कालचक्र अव्याहत पुढे चालू आहे, चालूच राहणार आहे. त्याचप्रमाणे माणसाचे जीवनचक्र असेच अव्याहत पिढ्यानपिढ्या चालत राहणार आहे. मात्र गेल्या शतकात विज्ञानाच्या प्रगतीमुळे, तसेच आरोग्य विषयीच्या माणसांच्या अधिकाधिक सजगतेमुळे, माणसांचे आयुर्मान वेगाने वाढत आहे.. वाढतच राहणार आहे. त्याचे दुष्परिणाम आता प्रगत देशांमध्ये दिसायला लागले आहेत. विशेषतः जपानमध्ये तर चिंताजनक इतक्या संख्येमध्ये जेष्ठ नागरिक आढळतात. तीच कथा अनेक पाश्चात्य प्रगत देशांचीही.
वैयक्तिक स्वार्थ, अधिकाधिक व आत्मकेंद्री प्रव्रुत्ती वाढत चालल्यामुळे माणसांचे फक्त स्वतःच्या प्रगतीसाठी लक्ष केंद्रित होत आहे. साहजिकच करिअर, आर्थिक संपत्ती आदि गोष्टींना प्रचंड महत्व आले आहे. त्याचा परिणाम जन्मदर घटत आहे, तर दुसरीकडे आयुर्मान वाढत आहे, अशी ही विचित्र परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.
स्वतःच्या हाताने आपापले उद्योग करता येणं, हे सर्वांना शक्य होत नाही. विशेषता जेष्ठांना वेगवेगळ्या गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते. आर्थिक भार देखील अनेकांना इतरांवर टाकावा लागतो.
बहुसंख्य पुुढारलेेल्या देशांमध्ये काम करणारे हात आणि जेष्ठ नागरिक घरामध्येच हात चोळत बसलेले, यांचा विषम अशा संख्येतील परिणाम हळूहळू सर्वांच्याच लक्षात यायला लागला आहे. त्यासंबंधी विशेष प्रकाश टाकणारे हे वृत्त आपल्या सगळ्यांना हेच सांगत आहे की, 'प्रत्येकाने आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करावा नव्हे, ज्येष्ठांसाठी तर हे अत्यंत अत्यावश्यक झाले आहे'.
म्हणूनच....
"सावध व्हा, ऐका पुढल्या हाका !":