"टेलिरंजन": "हे असं वागणं बरं नव्हं !":
"वाहता वाहे, 'मालिका'माई"!:माणसाचं आयुष्य म्हणजे जणू आगगाडीचा प्रवास असतो, जणु मुंबई पासून दिल्ली पर्यंत. पण इथे जेव्हां तुम्ही गाडीत शिरता, तेव्हा तुम्हाला जिथे उतरायचं त्या स्टेशनचं तिकीट दिलं जातं ते तुमच्या जवळ असतं पण, त्याच नांव तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला काही करून आयुष्यात किती वर्षे असतील त्याच्याबद्दल काही सांगता येत नाही.
आज ती आठवण व्हायचं कारण म्हणजे, नुकतीच अत्यंत कंटाळवाणी अर्थहीन व बेलगाम अशी "माझ्या नवर्याची बायको ही मालिका एकदाची संपली, ही आनंदाची गोष्ट ! टेलिव्हिजनवरच्या मालिका त्या सुरू होतात, पण संपणार कधी हे खरं म्हणजे त्या वेळेला माहीत नसतं. पण फारच थोड्या वर्ष-दोन वर्ष काही पाच पाच वर्ष टिकून राहतात. काही अल्पजीवी देखील असतात. आता हे असं कां? उत्तर काय बघा काही मिळत नाहीच.
मालिकांचा आयुष्ये ही खरं म्हणजे प्रेक्षकांच्या मर्जीवर आणि जाहिरातदारांच्या निर्णयावर अवलंबून असतात. त्यामुळे काही मालिका टिकतात, तर काही मालिका लवकर संपतात. आता त्या जास्त टिकाव्यात म्हणून लेखक आणि इतर आटापिटा करत, काही ना काही त्याच्यामध्ये नवनवीन कल्पना घालतात. ज्या वेळेला एखादी मालिकेत आता पुढे काय करायचं काय करायचं हे समजत नाही-ती वेळ तशी लौकरच येते, तेव्हां कथानकाला वेडीवाकडी वळणे देत मालिका सुरू ठेवली जाऊन प्रेक्षकांचा अक्षरशः अंत पाहिला जातो. कारण उघड असते, बहुतेक मालिकांचा कथाजीव इवलासा असतो.
सहाजिकच कोणतीही नवनवी पात्रे आणून रबर जसा ताणावा, तशा त्या (प्रेक्षकांना उबग येईपर्यंत), तुटेपर्यंत लांबविल्या जातात. आरोग्य सुधारावे, जीव काही करून वाचावा म्हणून, डॉक्टर जसे त्याला निरनिराळे उपाय करून त्याचं आयुष्य वाढवण्याचा प्रयत्न करू शकतात तशी ही माणसांची आणि मालिकांची गंमत आहे.
"विसंगत वागणे":
मराठी मालिकांमध्ये बहुदा पात्रं कधीही तर्कसंगत वागत नाहीत. सर्वसाधारण प्रसंगांमध्ये माणूस जो विचार करेल आणि जी कृती करेल असे अपेक्षित असेल, त्याच्या बरोबर उलट बहुतेक वेळा, निदान एक तरी पात्र उरफाटे वागताना दिसते आणि दुर्दैवाने ते महत्त्वाचे पात्र असते, ज्यामुळे कथानक पुढे पुढे जाऊ शकते.
जेव्हा, एखादा माणूस आपल्याला अपेक्षित असलेले निर्णय घेत नाही व क्रुती करत नाही, तेव्हा मनस्ताप होऊन ताणतणाव वाढतो. त्यामुळे आपल्या विचारांचे केंद्र, ती व्यक्ती आणि तिचे आपल्या द्रुष्टीने विपरीत असलेले वागणे हेच होऊन, आपण त्याच त्या विचारांच्या भोवर्यांत सापडतो. आपले ताणतणाव सहाजिकच असह्य होतील इतके वाढत जातात. परस्पर संबंधांतही कटूता येते. भांडण तंटे, वितुष्ट शत्रुत्व ह्या त्या नंतरच्या अनिष्ट गोष्टी असतात. अपेक्षा भिन्नता, स्वभावां प्रव्रुत्तींमधले फरक ह्या सार्याच्या मुळाशी असतात. व्यक्तिगत, व्यावसायिक जीवनांत हे असेच घडत असते, घडत रहाते आणि राहील. सामंजस्य, परस्पर सहकार ह्यांची नितांत गरज आहे, हेच खरे. मालिकांमधील असे न पटणारे उरफाटे वागणार्या पात्रांबद्दल म्हणूनच अशीच तिडीक येते. प्रेक्षक, जाहिरातदार एवढेच काय कलाकारांनाही ग्रुहीत धरून मालिका कशाही भरकटत चालू ठेवल्या जातात. ही सर्वांचीच एक प्रकारे फसवणूक नव्हे कां?
एक ताजे उदाहरण आता पाहू:
"चंद्र आहे साक्षीला"
"मालिकेचा विचका की हो झाला !":
मालिका सुरू होण्यापूर्वी ज्या जाहिराती यायच्या त्या अतिशय आकर्षक आणि चित्तवेधक असल्यामुळे, शिवाय सुबोध भावे सारख्या खंद्या व्यक्तिमत्वाची, अभिनेत्याची प्रमुख भूमिका असलेली "चंद्र आहे साक्षीला" ही मालिका सर्वांनी मोठ्या उत्सुकतेने पाहणे सुरू केले आणि तिने देखील बरेच भाग होईपर्यंत प्रेक्षकांची निराशा केली नाही हे खरे. परंतु भोळी भाबडी तरूणी स्वाती गुळवणी, बनेल श्रीधरच्या कारस्थानांंना भुलली आणि तिची आईदेखील तशीच सरळमार्गी असल्यामुळे, ही तरुण मुलगी श्रीधर आणि सुमन ह्यांच्या कुटील कारस्थानाला फशी पडली. परंतु तोपर्यंत पुष्कळ उशीर झाला होता आणि अखेर स्वातीला आत्महत्या करण्यापर्यंत नैराश्य आले, या भागापर्यंत ही मालिका निश्चितच अतिशय उत्तम आणि नाट्यपूर्ण अशीच होती.
त्यामुळे प्रेक्षकांना देखील पुढे काय होणार, याची उत्सुकता असताना, काही विपरीत तेच घडले, स्वातीच्या सहाय्याला नेहमी उभा रहाणारा नन्ना मुंबईला गेला आणि संग्राम नावाचे एक नवेच मात्र अचानक मालिकेत उगवले. नुसता तो एकटाच नव्हे तर त्याचे सारे कुटुंबच, त्यानंतर मालिकेचा कब्जा घेऊन बसले. संग्राम जो केवळ केव्हा तरी स्वातीचा कॉलेजमधला एक सहाध्यायी होता, तो तिच्या प्रेमात काय पडतो आणि तिचा सारा विचित्र भूतकाळ माहित असून देखील तो तिच्याशी विवाह करण्यापर्यंत काय मजल घेतो, हे सारे खरोखर न पटण्याजोगे. ही लांबण व हे वळण मालिकेला भलतीकडेच नेणारे असे होते.
अक्षरशः प्रेक्षकांच्या सहनशक्तीचा अंत पाहीपर्यंतच्या भागांमध्ये श्रीधर आणि सुमन कुठे गायब झाले आणि अखेरीस स्वातीला दिवस गेल्याचे केल्यानंतरच, श्रीधर श्रीरंग बनून, संग्रामच्या कारखान्यात प्लांट मॅनेजर म्हणून नोकरीला येतो काय, हे सारे अकल्पित व अतर्क्य आणि विश्वास न ठेवण्यासारखे. श्रीधर हे नाव बदलून श्रीरंग हे नाव घेणारा हा बनेल माणूस संग्रामच्या लक्षात कसा आला नाही? त्याने त्याची निवड करण्यापूर्वी कुठलीच माहिती घेतली नव्हती कां, अशा शंका देखील साहजिकच मनात उभ्या राहिल्या.
थोडक्यात ही मालिका योग्य दिशेने चालली होती. तिला संग्रामच्या आगमनाने भलतेच वळण मिळाले. शिवाय सारे माहीत असूनही संग्राम स्वातीचे जे काही गर्भारपण आहे ती आपलीच चूक आहे असे बिनदिक्कत सगळ्यांना खोटे सांगतो, ते देखील खरोखर संतापजनक आणि नाव पटण्याजोगे. एक चांगली मालिका वाढवण्याच्या नादात, तिला कशीही भरकट न्यावी कशी, याचे "चंद्र आहे साक्षीला" हे मूर्तिमंत उदाहरण असू शकेल.
सुरूवातीला ही मालिका "कुसुम मनोहर लेले" ह्या गाजलेल्या नाटकावर आधारित असावी असा प्रेक्षकांचा समाज असल्यामुळे, सगळ्यांनीच ती त्या दृष्टिकोनातून पाहिली आणि तिला हे असे तिरपकडे रुप अखेरीस मिळाले. ह्यापुढे संग्राम आणि श्रीधर/श्रीरंग यांच्यातील द्वंद्व दाखवले जाईल खरे, परंतु ते सारे पटण्याजोगे असेच वाटत
राहील. नाट्यपूर्ण कथानकाचा विचका कसा करावयाचा, ह्याचे एक उदाहरण म्हणून या मालिकेचे आपण सारे पैलू पाहिले. बहुतेक इतरही मालिकांमध्ये अशाच तऱ्हेने पाणी घालून त्यांना वेडीवाकडे बनवली जाते, हेच खरे आणि म्हणूनच "हे वागणं बरं नव्हं !" म्हणायची वेळ येते.
दुसरं ताजं उदाहरण:
"सुंदरा मनामध्ये भरली":
'शर्यती'चा नाही पत्ता....
मालिकेची वाट लागली":..
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
माझा you tube channel
moonsun grandson
विचारमंथन, रंगभूमी, साहित्य, मालिका व चित्रपट ज्योतिष अशा विविधरंगी विषयांवरचे
एकसे बढकर एक.............
विडीओज् पहाण्यासाठी........
आजच ही लिंक उघडा...........
moonsun grandson Channel link:
https://www.youtube.com/user/SDNatu
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
माझा you tube channel
moonsun grandson
विचारमंथन, रंगभूमी, साहित्य, मालिका व चित्रपट ज्योतिष अशा विविधरंगी विषयांवरचे
एकसे बढकर एक.............
विडीओज् पहाण्यासाठी........
आजच ही लिंक उघडा...........
moonsun grandson Channel link:
https://www.youtube.com/user/SDNatu
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा