"मुशाफिरी!":
# "यक्ष, की दक्ष प्रश्नोत्तरे"!:
जंग जंग पछाडूनही जी मिळत नाही, ती काय?:
"शांती"!
सोडू म्हणता सुटत नाही, भोगू म्हणता संपत नाही, ती काय?
" आसक्ती"!
मनं जुळून, अंतरंग उमजून, ओढ लावत उमलतं, ते काय?:
"प्रेम"!
जे पहाता फुलवतं, जे फुलता खुळवतं, ते काय?
"बाल्य"!
जे नको नकोसं असूनही मिळतंच मिळतं, अन् मिळालं तर संपवतं, ते काय?
"वार्धक्य"!
--------------------------
# "छोटा पडदा":
# चला, आता विश्रांती घेऊ या!:
'चला हवा येऊ दया' हया कार्यक्रमाचे शेकडो भाग यशस्वीपणे पूर्ण झाले, अभिनंदन.
आता ह्या कार्यक्रमाने थोडी विश्रांती घेणे जरूरीचे आहे. ठुकरटवाडीच्या ह्या तमायछशांत तोच तोपणा तर येतो आहेच, पण थिल्लरपणा व पांचटपणाचाही अतिरेक होत आहें. शिवाय तेच ते चेहरे पहाणे कठीण होते आहे.
एखाद्या नाटक वा चित्रपटाची जाहिरात वा इतरही काही ही, नको ते पहायला लागत आहे. हया संकल्पनेचा नव्याने विचार करावा, थोड़े गांभीर्य आणावे.
किंवा काही काळ विश्रांती घ्यावी!
# खास एक तास.......
"पोरखेळां"च्या सरींनी......
"मन हे बावरे".........
देवा, आता धांव रे........
मालिका कर, पुरे रे!.......
----------------------------
# "विचारमंथन":
# "द्रुष्टी व फलनिष्पत्ती":
तालीम अथवा जिम मध्ये माणूस जसा कसरत, व्यायाम यांचे विविध प्रकार करत, शिकत आपले आरोग्य व शरीरसौष्ठव घडवत जातो, तसंच फेसबुक आणि व्हाट्सअपचं आहे.
ह्या ठिकाणी, आपण आपल्या कल्पनाशक्तीला घडवत, फुलवत नवसाहित्य, नवविचार आकाराला आणत असतो, आणू शकतो. माझा तरी असाच अनुभव आहे.
अखेर, तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघता, यावर सारे अवलंबून असते आणि त्यातूनच विविक्षित फलनिष्पत्ती निर्माण होत असते!
# "जो तो म्हणतो, माझंच खरं,
हा हट्टीपणा, ना करे कुणाचंच भलं, बरं!"
# "वास्तव":
"पोट संभाळता आलं, तर अर्धी लढाई जिंकली अन् मनं संभाळता आली, तर जीवनात सार्थकता आलीच, आली!"
---------------------------
# "एक रसास्वाद":
उज्वला केळकर,
सादर वंदन.
"मेनका" ऑगस्ट'१९ मधील, तुम्ही अनुवादित केलेली "सहप्रवासी" ही कथा माझ्या डोळ्यासमोर तो अंक उघडल्यावर आपोआप आली आणि पाहता-पाहता वाचायलाही मी सुरुवात केली.
कारण मला सांगता येणार नाही, पण सहसा मला अनुवादीत कथा तेवढ्या आवडत नाहीत. परंतु येथे एकमेकांना पूर्ण अनभिज्ञ असा एक तरुण व एक तरुणी, एकांतात मनमोकळे बोलत असलेले संवाद जस जसे मी वाचत गेलो, तस तसे माझे मन त्यात गुंतत गेले.
तो आणि ती एकमेकांसमोर आरसा धरत एकमेकांना कसे जाणवून देत गेले, ते फार बहारीचे वाटले. असे घडणे खरे म्हणजे प्रत्यक्षात कठीण असते, पण प्रतिभावंत कल्पनाशक्ती काहीही करू शकते हेच खरे. तो जितका प्रगल्भ आणि जमिनीवर पाय ठेवून असलेला समंजस आणि मॅच्यूअर वाटला, त्या तुलनेत ती अजूनही खूप समजून घ्यायला हवं अशा व्यक्तिमत्त्वाची असावी अशा प्रतिमा आपोआप निर्माण कधी होत गेल्या ते कळलंच नाही.
मला, आता या दोघांचे पुढे काय होणार जुळणार ते वेगळे होणार अशी उत्सुकता वाटत असतानाच ते खूप जवळ आले असे अखेरी अखेरीला जाणवले. पहाता, पहाता तशी दीर्घच अशी ही सहप्रवासी होऊ पहाणार्यांची कथा कधी संपली ते कळलच नाही.
मूळ लेखिकेचं कौतुक करायलाच हवं. त्याचप्रमाणे योग्य त्या संवादांद्वारे जीवन तत्त्वज्ञान सहजतेनं उभे करणारा तुमचा हा कथा प्रवास खरोखर कौतुकास्पद आहे. म्हणून शुभेच्छा व अभिनंदन.
अशा तऱ्हेने जोडीदारांनी, एकमेकांना प्रामाणिक प्रयत्नांनी जाणून घेण्याची जर पद्धत आपल्या इथे विवाहापूर्वी यशस्वी झाली, तर अनेक घटस्पोट टाळले जातील, अन् मनं संभाळता आली, तर सहजीवनात सार्थकता येईलच, येईल!"
एवढा या कथेचा मतितार्थ होय.
धन्यवाद
सुधाकर नातू
----------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा