" वाचा आणि विचार करा!":
"परिक्षे'चा 'निकाल'!":
"Beginning of the End?."
कधी नव्हे ती एकदाची परीक्षा संपली. ह्या वेळेस एक बरे होते, परिक्षेसाठी सात पेपरांमध्ये तयारी करायला भरपूर दिवसांचा वेळ दिला होता. आता प्रतीक्षा निकालाची. जन्मानंतर म्रूत्यू जसा अटळ, तसंच परिक्षेनंतर निकालही अटळच!
आता हुरहुर, काळजी व धागधूग सुरू झाली. केव्हां एकदाचा तो निकालाचा दिवस येतो, अशी प्रत्येक विद्यार्थ्याच्या नव्हे, तर परीक्षकांच्या सुद्धा मनात खळबळ, रुखरुख सुरू आहे. ही परीक्षा खूपच आगळी वेगळी होती. विचारलेल्या प्रश्नांना सोडून, हुशार विद्यार्थ्यांनी काहीबाही उत्तरे देणेच पसंत केले, त्यात नको नको त्या शब्दात उखाळ्या पाखाळ्या अधिक होत्या. हुशार मुलांनी आणि त्यांच्या मॉनिटरनी वर्षभर अभ्यास सोडून अक्षरश: उनाडक्या केल्यामुळे त्यांच्यापाशी दुसरे काहीच उरले नव्हते. बिचारी मागच्या बाकावर बसणार्या तथाकथित ढ मुलांपैकी जे जे विषयाला धरून उत्तरे द्यायचे प्रयत्न करत होते, त्यांनाही आपल्या निकालाची खात्री नाही.
खरोखर अशी परीक्षा, पूर्वी कधीही झाली नाही आणि पुढेही कधी होऊ नये. विषयांना धरुनच परिक्षा रितसर होणेच, सगळ्यांच्या हिताचे आहे. शेवटी निकाल लागायचा तो लागेलच, परंतु तसा कोणताही 'निकाल' लागला, तरी शेवटी परीक्षकांचीच गोची होणार, हे उघड सत्य आहे!
(१९/५/'१९-सार्वत्रिक निवडणूक पूर्ण.)
--------------------------------------
"परीक्षे"चा खराखुरा निकाल वेगळा,
आणि अंदाज वेगळा!
"निकाल" अजून लागलेला नाही,
म्हणून कुणी अर्ध्या हळकुंडाने पिवळे
जसे होऊ नये,
तसेच निराश होऊन देखील कुणी
पाणी पाणी करू नये!
घोडामैदान जवळच आहे.
वाट बघा.
शेवटी,
कुणाची तरी वाट लागायची आहेच!
-----------------------------------------
## "गतम् न शोच्यम्"!
मागे वळून पहा आणि त्याच त्या चुका पुन्हा न करता, आपल्यात सुधारणा करत नेहमी पुढे पहा, पुढे जात रहा.
----------------------------------------------------------------------
"अति तेथे, दुर्गती!":
काही माणसांना काहीही करून चर्चेत राहण्याचं व्यसन असतं. स्वतःचं, स्वतःवरच अति प्रेमाचं जेव्हा दर्शन अशा मुळे घडत असतं, त्याचं त्यांना कधीही भान नसतं. परंतु अतिपरिचयात अवज्ञा, हे त्यांच्या लक्षातच येत नाही.
आपली प्रतिमा जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्व आसमंताला दिसत राहिली पाहिजे म्हणजे पाहिजे, ह्या ईर्ष्येमुळे ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. अशा माणसांचं काय करायचं, हा नेहमी प्रश्नच असतो.
परंतु काळ हाच शेवटी ह्यावर औषध असतो. जे आज चर्चेत असतात, ते उद्या विस्मृतीत कधी जातात, ते कुणाच्या नंतर कधीही लक्षात राहतच नाही.
"अति तेथे माती" आणि "अति तेथे दुर्गती" हे अशा माणसांनी लक्षात ठेवलं तर फारच चांगलं!
---------------------------
"भक्तीतून शक्ती?":
भक्ती ही संपूर्णपणे वैयक्तिक आणि खाजगी बाब आहे व असावी. परंतु तिचे जर प्रदर्शन मांडले गेले आणि त्यातून ते प्रदर्शन जर सार्वजनिक रित्या आधुनिक प्रसार माध्यमातून प्रसारित केले गेले तर, ते तितकेसे योग्य कां अयोग्य हे ज्याचे त्याने ठरवायचे.
मात्र अशा प्रकारची कृती केवळ वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी असू शकते हे मत, कदाचित खोडता येणार नाही. आपल्या जवळच्या सामर्थ्यामुळे अशा प्रकारचे कृत्य करता येऊ शकते आणि त्याचा मुद्दामून उपयोग करणे हेही खरेच. परंतु तितकेसे रास्त असते कां?
अर्थात् जेव्हा वैयक्तिक सामर्थ्य आणि स्वार्थ कसाही करुन साधण्याची प्रवृत्ती अंगात असेल, तेव्हा अशा प्रकारचे प्रदर्शन करणे भूषणावह आहे असेच समजून ते केले जाते. काळाचा महिमा दुसरं काय!
परंतु परिस्थिती बदलू शकते आणि तेव्हां मागे वळून पहाताना तर, हे खेळ अखेर हास्यास्पदही ठरू शकतात, ह्याचे भान ठेवणे अत्यावश्यक होय.
----------------------------
## "वाचाल, तर वाचाल":
माणसाचं सर्व सजीवांमध्ये एकमेवाद्वितीय असं वैशिष्ट्य कुठलं असेल, तर ते म्हणजे त्याला स्वयंभू विचार करू शकणारं अन् विचार मांडू शकणारं एक मन असतं, हे!
त्यांत, वाचन हे शोभादर्शकासारखे विविधरंगी व विविधढंगी विचार करायला लावू शकणारं, एक शक्तीशाली साधन असतं. ते ज्यांच्या हाती अन् ध्यानी मनी, ते महाभाग्यवान!
--------------------------
जे घडतं, ते घडणारच असतं. आपण फक्त त्याचे साक्षी असतो, वा नसतो. त्यातून आपल्याला काय काय शिकता येऊ शकतं, हे आजमावण्याची व्रुत्ती असली तर वाईटातूनही काही ना काही चांगलंच निघतं!
----------------------------
Catharsis, अर्थात वेदनेतून आनंदाचा अनुभव घेणे: उदाहरण: "अच्च्छे दिन" अंतर्धान पावलेले, उभी केलेली सारी स्वप्ने भुईसपाट असे असताना त्याच म्रुगजळामागे धावणे!
---------------------------
## "नाश":
# क्रोध, बुद्धीचा नाश करतो.
# गर्व, ज्ञानाचा नाश करतो.
# प्रायश्चित्त, पापाचा नाश करते.
# लालच, प्रामाणिकपणाचा नाश करते.
# लाच, ईमानाचा नाश करते.
# शिक्षण, अज्ञानाचा नाश करते.
तर,
# आळस, आयुष्याचा नाश करतो.
----------------------
## "नको असे आंधळेपण!":
"कोणी कोणत्याही कारणाने, कधीही इतके आंधळे होऊ नये की, जे समोर ढळढळीत घडतंय, भासतंय, ते तसे होतच नाही, ते तसे नाहीच नाही, असे अट्टाहासाने म्हणत राहावे."
------------------------
"हसे असे, अन् तसे!":
"आपणच आपल्या वागण्याने व बोलण्याने आपलेच हसे करून घेत असतो. ते आपल्या सहसा लक्षात येत नाही, हे दुर्दैव. त्यामुळे आपण त्याच त्याच चुका, पुन्हा पुन्हा करत राहतो.
पण जे व्हायचे ते होतेच होते आणि शेवटी आपल्यालाच आपले हसे येऊ शकते आणि आपणच आपले तोंड लपवावे, अशी वेळ केव्हाही येऊ शकते!"
---------------------
## "संधी गमावली की घालवली?":
काल रात्री, मुंबई इंडियन्सच्या बिनबाद ४५
धांवसंख्येवरून, जेव्हा त्यांचा डाव १५० धांवातच गडगडला, तेव्हाच निराशेची झुळूक मनात अवतरली होती.
नंतर चेन्नई, चक्क ७० धावा आणि एकच बाद, असा धावफलक पाहिल्यावर तर, आता मुंबईचा
पराभव निश्चितच, असे वाटून सरळ सामना बघणे बंद करून मी झोपी गेलो.
आज सकाळी उठल्यावर, वर्तमानपत्रात मुंबई इंडियन्सचा एका धावेने विजय, हे वाचून थक्क झालो, एक सुखद धक्काही बसला. परंतु त्याच बरोबर आपण एका रोमहर्षक, आशा निराशेचे हिंदोळे असणारे एक झंझावाती वादळ पाहण्यास मुकलो याची खंत वाटली, रुखरुख वाटली.
पण वेळ गेलेली होती. मी संधी गमावली नव्हती, तर घालवली होती.
त्यातून मिळालेला धडा असा की,
"धोका पत्करला तर व तरच, संधी मिळण्याची शक्यता निर्माण होते" हा!
---------------------
## "सारेच मुसळ केरात"!:
संधी, ही प्रगती भरभराट व कीर्ती व्रुद्धिंगत करू शकणारी, एक गुरू किल्ली असते. संधी मिळणं, हा जीवनाला चांगली कलाटणी देणारा सांधा असतो. अवगत झालेल्या संधीचं सोनं करणं सर्वांना जमतच असं नाही.
उलट संधीमुळे मिळणार्या संभाव्य फायद्यापायी नको इतके हुरळून जाऊन, प्रसंगी अहंकार व गर्वाने फुलून जाऊन, आवश्यक प्रयत्नांकडे संपूर्ण दुर्लक्ष करणं अखेर महागांत पडतं. संधी पूर्ण वाया जाऊन, सारंच मुसळ केरात जातं. नंतर, हळहळ अन् पश्चात्ताप निरर्थक ठरतो.
हे सुचले कसे, ते सांगतो:
आज मागे वळून पहाताना, माझ्या व्यवस्थापन शास्त्रातील पोस्ट ग्रँज्युएशननंतर, पी.एचडी. करण्याची संधी मी अशाच तर्हेने वाया घालवली, त्या आठवणीमुळे!
--------------------------
सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा