"काहीही विपुल नसणारा,विपुलश्री दिवाळी अंक'१८":
"विपुलश्री" हे मासिक खूप चांगले असते असा अनुभव होता. म्हणून वाचनालयातून मुद्दाम होऊन विपुलश्रीचा दिवाळी अंक आणला. दहा दिवसांनी तो परत करायचा होता. पण त्या दहा दिवसात केवळ दोनदा तीनदा तो हातात घेतला, चाळला. परंतु तेव्हा प्रथम शशि कपूर यांचे जीवनचरित्र- श्री. सदानंद गोखले यांनी लिहिलेले वाचावेसे वाटले. त्यामधून शशी एक व्यक्ती म्हणून निर्माता म्हणून आणि कुटुंबवत्सल गृहस्थ म्हणून अभिनेता म्हणून कसा चांगला होता ही सर्वस्पर्शी ओळख झाली. देखणा आपली शिडशिडीत शरीरयष्टी कायम ठेवणार्या ह्या गुणवंताबद्दल, कधीही ज्याच्याबद्दल कुठलही गॉसिप आलं नाही, असा निर्मळ मनाचा हा अभिनेता खरोखर कौतुकास्पद होता हे जाणवले. एकाच कुटुंबात वडील आणि दोन भावांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळतो, ही देखील एक खरोखर अद्वितीय गोष्ट, त्यातून माहीत झाली. लेखातले फोटो चांगले होते. पण जास्त लक्षात राहिले ते म्हणजे विसाव्या वर्षी जेनिफरशी विवाह करून केवळ सेहेचाळीसाव्या वर्षी शशीने दुर्दैवाने तिला गमावले खरे, पण तिच्यावरचे त्याचे प्रेम खरोखर अद्वितीय असेच होते. एक प्रकारे जास्त वय झालेले नसताना, विधुर होऊनही ह्या माणसाने दुसरा विवाह केला नाही किंवा कोणत्याही दुसर्या स्त्रीच्या प्रेमात तो पडला आहे असेही कधी कानावरही आले नाही. हे खरोखर न विसरण्याजोगे. सहाजिकच, हा लेख हे एक या दिवाळी अंकाचे खास वैशिष्ट्य मानायला लागेल.
दुसरा जो लेख त्या दहा दिवसात वाचला तोही असाच लक्षात ठेवण्याजोगा. श्रीमती कल्याणी गाडगीळ यांनी देशाटन माणसं कां करतात, त्याचा अत्यंत अभ्यासपूर्ण असा लेखाजोखा आपल्या लेखात घेतला आहे. भारतामधील त्यामानाने निरुत्साही करणारी अशी परिस्थिती: म्हणजे शिस्त नाही भ्रष्टाचार पर्यावरणाची समस्या आणि एकंदरच सर्वसाधारण दररोजच्या जीवनात येणाऱ्या अडचणी अडथळे घाईगर्दी आणि त्यामुळे येणारे ताण-तणाव त्या जोडीला गुणवंतांना, आरक्षण आदी गोष्टींमुळे कमी किंवा जवळजवळ नसणाऱ्या संधी, यामुळे माणसं परदेशी जातात, हे त्यांनी सोदाहरण मांडले आहे. केवळ पैसा मिळवण्यासाठी माणसं देशाटनाला जातात असं पूर्णतया नव्हे हे देखील या लेखावरून समजते.पण तेवढेच एक कारण असते असे नाही. त्याशिवाय आपल्या पुढच्या पिढ्यानी चांगल्या तऱ्हेने जीवन जगावे, म्हणूनही माणसं परदेशी जातात. कुणालाही पटेल अशी कारणे देत देशाटन माणसं कां करतात ते लेखिकेने एखाद्या वकिलाच्या ताकदीने मांडले आहे. पण तिथेच त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी दुसरीही बाजू इथे मांडली आहे. पुन्हा परत भारतात येणार्या, डॉक्टर बंग, डॉ. अच्युत गोडबोले आदी अनेक उदाहरणं देऊन परदेशात राहिल्यानंतरही, आपले काही विशिष्ट ध्येय मनात ठेवून भारतात परत आलेल्या ह्या माणसांमुळे हा लेख परिपूर्ण झाला आहे.
एक वैयक्तिक बाब. पंधरा सोळा वर्षापूर्वी, माझाही मुलगा नोकरीनिमित्त परदेशात गेला. तेव्हा माझ्या पत्नीला खूप दुःख झाले होते आणि तिचे काही वर्षे, कायम त्याच्या मागे लागणे असे: की बाबा रे तू परत ये. परंतु त्यावेळेला मला मात्र तसे काही वाटले नव्हते. ज्याची त्याची आवड व इच्छा ह्या नात्याने, मी त्याच्या परदेशात जाण्याचा स्वीकार केला होता. आज पंधरा वर्षांहून अधिक काळ त्याला परदेशात जाऊन झाल्यावर, माझ्या पत्नीलाही, आता हे पटले आहे की, तो तिथे सुखी आहे आणि तो आता कधीही कायम वास्तव्यासाठी, भारतात परत येणार नाही, कारण त्यातच त्याचे व त्याच्या कुटुंबाचे कल्याण आहे. ह्या उत्तम लेखामुळे आमच्या त्या दृष्टिकोनाला पुष्टीच मिळाली.
अजून एक गोष्ट मात्र या अंकाची खरोखर वैशिष्ट्यपूर्ण आणि कौतुकास्पद आहे ती म्हणजे जागोजागी असणारी उत्तम व्यंगचित्रे. सध्याच्या सामाजिक राजकीय आणि सांसारिक जीवनातील मुद्दे, कोपरखळी देत हुशारीने तेथे मांडले आहेत आणि म्हणून तेही एक ह्या अंकाचे वैशिष्ट्य ठरते.
दुर्दैवाने दिवाळी अंक बदलायच्या दिवसापर्यंत मला याहून अधिक काही त्यातून, सापडले नव्हते. म्हणून शेवटच्या दिवशी जेव्हा मी पुन्हा एकदा अंक हाती घेतला आणि वाचायचा प्रयत्न केला, तेव्हा मला जाणवले की चीन वरचा पर्यटन विषयक लेख सोडला तर बाकी लांबण लावणार्या कथा व इतर वैचारिक लेख ह्या कशातही काही दम नव्हता. त्यामुळे तासाभरातच मी त्या अंकाच्या वाचनाचा फडशा पाडला. जर खरोखरच हे साहित्य मन खिळवून ठेवणारे असते, तर मी लेट फी भरून अंक वाचनालयात उशीराने परत केला असता.
थोडक्यात वरील तीन/चार गोष्टी सोडल्या, तर बाकी अंकामध्ये पाने पुढे ढकलत जावं असाच मजकूर आहे. जर गुण द्यायचेच झाले तर दहा पैकी केवळ चार इतकेच गुण, मी अंकाला देईन. विशेषत: विपुलश्रीचा मासिक अंक,
ज्या दर्जाचा असतो, त्या पातळीचा हा दिवाळी अंक काही वाटला नाही, हे खेदाने नमूद करणे भाग आहे.
°पसंद अपनी अपनी, खयाल अपने अपने° ह्या नजरेने ह्या विवेचनाकडे पहावे, ही विनंती.
सुधाकर नातू
सोमवार, १९ नोव्हेंबर, २०१८
सोमवार, १२ नोव्हेंबर, २०१८
"एका गुणवंताची दुर्दैवी जीवनगाथा":
"एका गुणवंताची दुर्दैवी जीवनगाथा":
"आणि सुबोध भावे!":
"आणि डॉ. काशीनाथ घाणेकर" हा चित्रपट पाहिला. विलक्षण मनस्वी माणसाचे नाट्यमय
चढउतार असणारे जीवनचरित्र, अडीच तासांच्या एका खेळात बसविण्याचा हा प्रयत्न, जितकी त्याबद्दल हवा निर्माण करण्यात आली, तितकासा परिणामकारक नाही, हे प्रारंभीच धाडस करून मांडतो. ह्याला प्रमुख कारण म्हणजे येथे चरित्रनायक त्याचे निळे डोळे वगळता, कायम तो सुबोध भावेच वाटतो आणि ज्या ताकदीने व जिद्दीने डॉक्टरसाहेब आपल्या भूमिका रंगवत त्याच्या जवळपासही सुबोधचा हा काशीनाथ पोहोचत नाही. डॉक्टरांचा लाल्या, संभाजी म्हणजे सळसळती वीज होती, तर गारंबीचा बापू अवखळ मनस्विता होती.
प्रसाद ओक, प्रदिप वेलणकर, सोनाली कुलकर्णी व मोहन जोशी ही मंडळी त्या त्या भूमिकेत चपखल बसलेले जितके भासतात, तितकी इतर प्रमुख पात्रांची-वसंत कानेटकर, ईरावती व कांचन ह्यांची निवड त्या त्या व्यक्तींरेखांसाठी अयोग्यच दिसते. आपल्या वाट्याला आलेली पाटी, ते टाकतात इतकेच!
चित्रपटातील अनेक नाट्यमय घडामोडींची, घटनांची, विश्वसनीयता वा सत्यतेची शहानिशा जाणकार करतीलच- विशेषतः, दोन डॉक्टर अभिनेत्यांंमधील एखाद्या हिंदी चित्रपटात शोभेल असे भावनिक युद्ध! तसेच कानेटकर घाणेकरांमधील दुष्मनी. ह्या सार्यात, मात्र खटकारी एक बाब ही:
"काशीनाथ आपल्या पत्नीला ईरावतीला, तो कांचनशी लग्न करणार आहे हे बिनदिक्कत चक्क रस्त्यात कांचन भेटल्यावर सांगतो ही घटना, त्यानंतर ईरावती जणू काही विचित्र, अपमानास्पद, चिड आणणारे घडलेच नाही, ह्या आविर्भावात ते स्विकारून, पुन्हा वर त्याला सांगते की, आता त्या प्रेमी जीवांनी कुठेही बाहेर न भेटता, त्यांच्या घरीच न भेटावे, कारण ती नेहमीच दिवसभर क्लिनिकमध्ये असते!" हे असे कितपत् खरे घडले होते?
चित्रपटामध्ये काशिनाथ आणि त्यावेळच्या एकंदर माहोलाचा लेखाजोखा मांडण्यासाठी नाटकातले तसेच चित्रपटातले काही भाग दाखवले आहेत. मात्र ते त्रोटक आहेत. विशेषतः एक आनंदी गोपाळ सोडलं तर इतर नाटकांचे भाग ह्यांची तुलना, जर प्रत्यक्ष डॉक्टरांनी रंगभूमीवर केलेल्या कलाकृतींची केली तर ती पुष्कळच उणी वाटते. फक्त गोमूचे नृत्य आणि गीतांत सुबोध छान दिसला व त्याने चांगला प्रभाव दाखवला आहे. पिंजरा चित्रपटामधलं 'तुम्हावर.....हे गीत अजून विस्ताराने दाखवले गेले असते तर ते योग्य ठरले असते. प्रत्यक्ष चित्रपटातील स्वतंत्र, गीत वा गीते तेवढीशी काही लक्षात राहत नाहीत आणि म्हणूनच प्रभाव पाडू शकत नाहीत. जुन्या नाटक चित्रपटातली काही दृश्य बघायला मिळणे, हे मात्र ह्या चित्रपटातील, एक आकर्षण ठरू शकते.
एका गोष्टीचा मात्र कौतुक केलं पाहिजे की ह्या चित्रपटात, डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांच्या बद्दल काही गोष्टी अगदी प्रांजळपणे आणि पारदर्शक पद्धतीने मांडल्या आहेत. त्यातील पहिली म्हणजे, कारण कोणतेही असू दे. काशिनाथ त्यांच्या वडिलांच्या दृष्टीने कुठल्याही किमतीचे नव्हते ही. तिचा सल या माणसाला कायम लागला. दुसरी गोष्ट, रंगभूमीवर ज्या माणसाने आपल्या जबरदस्त अभिनय आणि तन्मयतेने सुपरस्टारगिरी प्रस्थापित केली, त्या गुणवंताला त्यामानाने चित्रपटांमध्ये, विशेष वाव मिळाला नाही आणि जो काही मिळाला त्यामुळे ठसा उमटवा अशी कामगिरी काही त्यांना करता आले नाही हे आणि ते सुद्धा काशिनाथ ह्यांना चित्रपटसृष्टीला आवश्यक चॉकलेट गुलछबू व्यक्तिमत्व लाभले होते तरी! शेवटी एकेकाचे कर्तृत्व त्या त्या माध्यमात सारखेच नसते हेच खरे!
चित्रपटात नायकापेक्षा प्रभाकर पणशीकर झालेल्या प्रसाद ओकनेच आपल्या भूमिकेला व त्यांच्या काशीनाथ बरोबरच्या निखळ मैत्रीला बावन्नकशी न्याय दिला आहे. त्याच बरोबर मोहन जोशी, मूर्तीमंत भालजी उभे करण्यात यशस्वी झाले आहेत. उंची, शारीरिक ठेवण व रंग ह्या बाजू लक्षात घेतल्या तर तस्सेच निळे घारे डोळे असलेला अभिजीत केळकर हा अभिनेता, काशीनाथ म्हणून अधिक शोभला असता किंवा सुबोधप्रमाणे निळ्या डोळ्यांसाठी योग्य त्या तंत्राचा उपयोग करून उमेश कामतही काशीनाथ वाटला असता.
सारांश असा की, बालगंधर्व, लोकमान्य ह्या अजरामर भूमिकांत हुबेहुब शोभलेला व त्या भूमिकांना पूर्ण न्याय देणारा अत्यंत गुणवंत सुबोध भावे डॉ. काशीनाथ घाणेकर ह्या नात्याने इथे पुष्कळच उणा पडला. कादंबरीत शोभेल असे यशापयशाचे विस्मयकारक आयुष्य लाभलेलां रंगभूमीवरील एकमेव सुपरस्टार डॉ. काशीनाथ घाणेकरांच्या जीवनाची ही शोकांतिका, ह्या उण्या बाजूचा विचार करूनच पहावी असे अखेरीस सगळ्यांना सांगणे भाग आहे.
"म.टा. संवाद पुरवणी"
"एक सांस्कृतिक मेजवानी":
महाराष्ट्र टाइम्स रविवार दि. ११नोव्हेंबर'१८ ची संवाद पुरवणी, ही विविध क्षेत्रातील अंतर्गत पद्धतींचा, घडामोडींचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या निष्पन्नाचा सहजपणे परामर्ष घेणारी होती. राजकारण, मालिका निर्मिती आणि पुस्तक निर्मिती-प्रकाशन, मुले व स्मार्ट फोन अशा विविध आणि वेगळ्या बाबींवर येथे वाचनीय लेख होते.
" रामाविण.........
मोठी स्वप्ने दाखवून सत्ता मिळवल्यानंतर, दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करण्याऐवजी केवळ अधिकाधिक सत्ता कशी मिळेल याकडे लक्ष देत आपल्या धोरणांचे आणि कृतींचे लक्ष भलतीकडे नेत शेवटी विकासाचे वारू वादळात भरकटल्यानंतर शेवटी काय केले आणि त्याचा काय फायदा झाला हे दाखवणे कठीण झाल्यामुळे, अखेर रामाची आठवण झाली. ह्या वास्तवतेचा परखड पण सहज शैलीत घेतलेला आढावा "रामाविण...." श्री. सुनील चावके यांच्या लेखात होता.
"अवंतिकेमागची कहाणी":
टीवीवरील मालिका या सर्वांनाच ह्या सर्वांनाच बघायच्या असतात. परंतु सर्वच मालिका काही लोकप्रिय व चर्चेचे कारण ठरत नाहीत. हल्लीच्या भरकटत चाललेल्या मालिकांबद्दल तर बोलायलाच नको! या पार्श्वभूमीवर रोहिणी निनावे यांनी "अवंतिका" ह्या अतिशय लोकप्रिय मालिकेच्या बीजनिर्मिती पासून ते संपूर्ण प्रवासाचे चित्र आपल्या लेखात उत्तमपणे उभे केले आहे. त्यामुळे आपण जे छोट्या पडद्यावर बघतो, त्याच्या मागे किती जणांचे किती आणि कस कसे कष्ट प्रयत्न आणि प्रतिभा असते, ह्याचे दर्शन घडून गेले.
पुस्तक प्रकाशन विश्व:
पुस्तक हा एक वेगळाच विषय. परंतु अखेरीस तेही एक विक्री योग्य अशी वस्तू आहे, ह्याचे भान ज्या प्रकाशकाला असते, तोच या उद्योगात पाय रोवून बसू शकतो, हा मुद्दा श्री.दिलीप माजगावकर यांचा आणि त्यांच्या राजहंस प्रकाशनाचा अगदी जवळून परिचय करून देताना, लेखिकेने त्यांच्याबरोबरचे आपले अनुभव मांडले आहेत. ह्या साऱ्या निवेदनात पुस्तक कसे तयार होते, आणि त्यामागे लेखक मुद्रक प्रकाशक आणि वितरक आणि शेवटी वाचक ही साखळी कशी बांधली जाते, ते पुस्तक विश्वाचे दर्शन या लेखात हुबेहूब घडवले आहे. ते पुरे नाही म्हणून की काय पण यशस्वी प्रकाशक कसा असतो, कसा वागतो त्याची दूरदृष्टी योजकता कशी असते, त्याचे उत्तम उदाहरण, दिलीप माजगावकरांच्या व्यावसायिक प्रतिमा उभी करताना, ह्या लेखात झाले आहे.
स्मार्ट फोनचा अतिरेक:
त्याचमुळे आजची महाराष्ट्र टाइम्स संवाद पुरवणी ही, जाणिवेचे विश्व अधिक विस्तारित करणारी झाली आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. "आइसिंग आँन द केक" म्हणून आधुनिक जगातला सर्वात आवश्यक असा स्मार्टफोन हे साधन आणि बाळ-बुद्धी ह्यांचं नातं कसं आहे, कसं असावं, हे सोदाहरण एका लेखात मांडले आहे. हल्ली पालकांना मुले आपले काही ऐकत नाहीत, कायम मोबाईल धरून असतात ही व्यथा असते. अशा अतिरेकापायी मुले, हट्टी मतलबी होऊ शकतात आणि त्यांच्यावर अनिष्ट संस्कार होऊन, समंजस सुसंस्कृत नागरिक बनण्याची प्रक्रिया कोळम खोळंबू शकते हे सध्या काय चुकते आहे त्यावरून एकीकडे दाखवले तर आहेच, परंतु त्याचबरोबर ह्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी कोणते कोणते वेगवेगळे मार्ग आणि संधी आहेत, त्याचीही उदाहरणे दिल्यामुळे आणि ती खरोखरच सगळ्यांसाठीच अनुकरणीय असल्यामुळे खरोखरच हा लेख दर्जेदार झाला आहे.
थोडक्यात आजची मटा संवाद पुरवणी ही वाचकांसाठी एक वैचारिक मेजवानीच होती. आणि म्हणून अभिनंदन.
छोटा पडदा-मल्लीनाथी:
"ललित २०५": आजींचा एक मुलगा व सून, कुरळ्या केसांची नात
"राधा प्रेम रंगी रंगली": प्रेमची आत्या व तिचा ड्रग अँडिक्ट मुलगा, प्रिया, तिचे वडील आणि परांजपे, लल्लनची बहिण
"घाटगे अँड सून": अम्रुताचे आई बाबा व काका
"राधा प्रेम रंगी रंगली" मधील नायिकेच्या वडीलांना खोट्या केस मध्ये अडकवायच्या आयडीयाची काँपी, "तुला पाहते रे" मधील ईशाच्या वडीलांसाठीही? अरेरे!
आतापर्यंतचे पोरखेळ पुरे नाही झाले, म्हणून ईशा & कंपनीची एका रात्रीत ढीगभर चकल्या बनवायची किमया! "तुला पाहते रे" चेही नामकरण "ईशाचा जादुचा दिवा" असे करावे!
प्रेक्षकांना बालबुद्धिचे समजणे पुरे करा!!
नव्या आयडिया घेऊन येणारा, कल्पक लेखक तातडीने हवा आहे:
१. "नकळत सारे घडले": आतापर्यंत शक्य तेवढ्या अनेक युक्त्या वापरून मालिका पुढे खेचत नेल्या खर्या, पण आता काय करायचे ते मुळीच कळत नाही. प्रताप व नेहा एकमेकांवर प्रेम करतात, नाही करतात असा खेळ वापरून चोथा झाला. म्हणून आयडीयाबाज कुणी नवा लेखक आहे कां?
२. "राधा प्रेम रंगी रंगली": लल्लनला मारून टाकलं, त्याच्या बहिणीला बदलापूरला हाकललं! परांजपे व विक्रम गायब तर प्रेम व आई अमेरिकेत देवयानी बेड रिडन त्यामुळे आता कोणतीच कल्पना उरली नाही. दीपिकाच्या डोक्याचा आटा ढिला झालाय, हेच पुन्हापुन्हा दाखवून प्रेक्षकांबरोबरच, निर्माताही कंटाळला. म्हणून कल्पक लेखक तातडीने हवा आहे!
सुधाकर नातू, माहीम मुंबई१६
गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१८
"सुधा" दिवाळी अंक-२०१८:-"टेलिरंजन"III
"सुधा" दिवाळी अंक-२०१८:
"टेलिरंजन"III
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
अनुक्रमणिका:
६. भरकटत जाणार्या मालिका.
७. अंकूश हवा.८. मराठी मालिका: एका शब्दात.९. अब जमाना बदल.रहा है!१०. मालिकांचे महाभारत.
६. भरकटत जाणार्या मालिका.
७. अंकूश हवा.८. मराठी मालिका: एका शब्दात.९. अब जमाना बदल.रहा है!१०. मालिकांचे महाभारत.
सुधाकर नातू
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
श्रीगणेशाय नम:
मनोगत:
सादर वंदन.
प्रथम, आपण वेळात वेळ काढून, माझ्या ब्लॉगची ही लिंक उघडून, हा खास दिवाळीचा वैचारिक व सांस्कृतिक "फराळ" आस्वादायला सुरवात केलीत, त्याबद्दल तुमचा मी शतश: आभारी आहे. हाच वसा तुम्ही तुमच्या परिचय वर्तुळालाही घ्यायला लावाल, अशी मी आशा करतो.
दिवाळी म्हणजे उत्साह आनंदाचा उत्सव! नूतन दिवाळी आणि आगामी वर्ष, तुम्हा सर्वांना सुखासमाधानाचे, आनंदाचे शांतीचे जावो ही मनोमनी इच्छा.
आज मला माझ्याच ह्या संदेशाची आठवण होत आहे: "One should always consistantly do that, which one is best at. Respected great Achievers do it, why not You?"
खूप खूप उशीरा कां होईना, मला विचार कल्पना करायला आणि त्या समर्पक शब्दात मांडता येतात आणि तेच मला मनापासून आवडते, समाधान देते ह्याची जाण झाली. सातत्याने दोन वर्षांपासून सुरू असलेल्या माझ्या ब्लॉगमुळे हा आत्मसुखसमाधानाचा शोध असाच चालत रहाणार आहे. त्याचीच परिणती हा एक हाती विविध विषयांवरील, घसघशीत पाच अंकांचा "सुधा" दिवाळी अंक, ही आहे.
आपण पुढील काही दिवस सवड काढून हा
"ह्या ह्रदयीचे त्या ह्रदयी सोपवण्याचा प्रयत्न" जरूर अनुभवावा. त्यामुळे, आपल्या जाणीवांच्या कक्षा निश्चितच विस्तारतील, अशी मला आशा आहे.
"ह्या ह्रदयीचे त्या ह्रदयी सोपवण्याचा प्रयत्न" जरूर अनुभवावा. त्यामुळे, आपल्या जाणीवांच्या कक्षा निश्चितच विस्तारतील, अशी मला आशा आहे.
धन्यवाद.सुधाकर नातू, माहीम मुंबई१६
१/११/२०१८
9. अब जमाना बदल रहा है!
मराठी मालिकांमधील एक से बढकर एक खडूस खलनायिका: :
आतापर्यंत मुळूमुळू रडणार्या, आंतल्या आंत कुढणार्या आणि निमूटपणे, त्यांच्यावर होणार्या अन्यायाचे घांव सहन करत जगणार्या, सती सावित्री रूपातल्या नायिकाच मराठी मालिकांमध्ये पहायला मिळत असत. त्यांच्या पीडा जितक्या जास्त, जेवढे त्यांचे अश्रु अधिक तेवढा टीआरपी वाढणारच असे सारे गणित होते.
बिनधास्त मोनिका:
पण आता जमाना बदलला आहे नायकाशी विवाह होऊनही मालिकेतली बायको नायिका नसून एक पोहोचलेली खलनायिकाच आहे, हे 'खुकखु' मालिकेतील मोनिकाने आपल्या बेछूट बिनधास्त वागण्याने दाखवून देत आहे. ती विवाहापूर्वीच गर्भवती असूनही बावळट, नेभळट नायकाच्याच नव्हे, तर सर्वच कुटूंबियांपासून हे पाप लपविण्यात ती यशस्वी झाली आहे. इतकेच पुरे नाही म्हणून ती मुलीला जन्म दिल्यानंतरही आपल्या खलनायिकी व्रुत्तीचा कडेलोट बिनदिक्कतपणे करते आहे, तेही नायकाने घटस्फोटाचा बागुलबुवा उभा केला असताना! माहेरची तर राहोतच पण सासरच्याही सर्व 'शहाण्या' (?) मंडळींनी जणु बुद्धि सारासार विचार गहाण टाकला आहे! डाँक्टर असलेल्या ह्या नायकाला साधी DNA टेस्टही, मामला रफादफा करण्यासाठी आठवत नाहीये, म्हणजे दर्शकांना ग्रुहित धरण्याची शर्थ झाली.
करणार काय, अब जमाना बदल रहा है, सोशिक पापभिरू नायिकांची जागा त्याहूनही अधिक 'ताकदी' (?)ने मालिकांमध्ये नायकांनी घेतली आहे. इथला विक्रांत त्याबाबतीतले किती विक्रम प्रस्थापित करतो CT, तेवढेच पहाणे आपल्या हाती आहे!!
'विभा': हेरा फेरी करून वडिलांना रस्त्यावर आणते!
'अस्सं सासर सुरेख बाई', मधली थोरली बहिण 'विभा' प्रथम आपल्या धाकट्या बहिणीच्या जुईलीच्या संसारांत जेव्हढी म्हणून विघ्ने आणता येतील, तेवढी पुरेशी नाहीत म्हणून चक्क सगळी मालकी, हेरा फेरी करून आपल्या वडिलांना व दुसर्या विवाहीत बहिणीला घराबाहेर काढून, जवळ जवळ रस्त्यावर आणते! 'टीआरपी'साठी खलनायिकेला हे असे दुष्ट उद्योग केवळ मालिकाच करू जाणे!

धाकटी वहिनीच खलनायिका!
'तुझ्यात जीव रंगला' मध्ये धाकटी वहिनीच आपल्या हाती घरातील सारा कारभार व सत्ता रहावी, म्हणून भोळ्या सरळमार्गी पेहलवान असलेल्या थोरल्या दीराचे राणाचा विवाहच होऊ नये म्हणून अंजली व राणाच्या मैत्रीत काय काय विघ्ने आणते, ते पाहून प्रेक्षकांच्या कपाळावर आठ्ठया आणत रहाते. त्यासाठी आपल्या सासर्यांच्या डोळ्यांत धूळ तर फेकतेच, पण आपल्या नवर्याला मुठींत ठेवत, त्याचा ही खलनायिका बिनदिक्कत खेळण्यासारखा उपयोग करताना दिसते.

तीन तीन खलनायिका!
काहे दिया परदेस मधील आपल्या मुलाचे-शिवचा विवाह मुंबईवाली गौरीशी होऊ नये म्हणून तिच्याच नणंदेला-निशाला हाताशी धरणार्या अम्मा-जौनपूरवाली कोणत्या कोणत्या युक्त्या करतात! निशा, त्याना साथ देता देता, आपल्याला व नवर्याला आँस्ट्रेलीयाला न जाऊ देणार्या सासर्याना-सावंतांना कशी छळत रहाते, तेही पुरे नाही म्हणून गौरीचा विवाह जुळविण्याच्या बहाण्याने ही सून आपल्या महा बिलंदर आईच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे रहाते घरच बेमालूमपणे ही खलनायकी निशा विकते! ह्या तीन तीन खलनायिका असल्यावर मालिकेची गाडी फाँर्मांत येणार नाही तर दुसरे काय होणार. आता सारेच डाव उलटल्यावर ही नाठाळ सून साळसूदपणाचा आव आणत सगळ्या कुटूंबियांची सहानुभूती मिळवत आहे खरी, पण जर गौरीच्या बनारस मधील सासरचे दिल अभी भरा नही स्टाईल बाबूजी व अम्मांचा उगाचच लांबत जाणारा दुरावा जर कंटाळवाणा होऊ लागला, तर ही भोळी भाबडी (?) निशा परत बदलेकी आग लावायला समर्थ आहेच!!
‘शयाना’: राधिकेच्या सुखी संसारावर निखारे:
'माझ्या नवर्याची बायको' मधील शयाना, नायक गुरूनाथला केवळ स्वार्थापोटी, मोहांत पाडून त्याच्या व राधिकेच्या सुखी संसारावर निखारे टाकते. एवढेच नव्हे, तर ती गुरूनाथला राधिकेला चक्क घराबाहेर काढायला लावते आणि बिनदिक्कत त्याच्याबरोबर त्याच्या घरांत राहू लागते. तारुण्य आणि सौंदर्य ह्या जोरावर ही खलनायिका आपला कार्यभाग साधत रहाते. तिला ह्या ना त्या प्रकारे मदत करणारी शेजारच्या नानाजींची सून व शयाना बरोबर मैत्री साधणारी तिची मैत्रिण ह्या दोघीही मिनी खलनायिकाच आहेत.
सावत्र आई; खलनायिकाच.
सरस्वती मालिकेतही मोठ्या मालकीणबाई देखिल आपले अधिराज्य सरस्वतीच्या आगमनामुळे जाणार म्हणून तिच्या संसारात बिब्बे घालण्याचे नाना प्रयत्न करतच असते. शिवाय ती, मोठ्या मालकांच्या पित्याशी मतलब ठेवून विवाह केल्यानंतर, आपल्या भावाच्या मदतीने स्वत:च्या पतीचा कपटीपणाने अंत घडवून आणते, हे रहस्यच लपवण्याचे डाव खेळते. अर्थांत अखेर तिचा हा खलनायिकी मुखवटा सरस्वती केव्हा ना केव्हां उघडकीस आणेलच! सावत्र आईच्या रूपांतील ही खलनायिकाच.

खलनायिकेच्या ट्रेंडचा पाया:
मराठी मालिकांमध्ये नायिका खलनायिकेच्या रूपात आपले दुष्ट कारनामे करण्याच्या अशा ट्रेंडचा पाया बहुदा विलक्षण गाजलेल्या व लांबलेल्या 'चार दिवस सासूचे...' मालिकेतील मोठी सूनबाई सुप्रियाने घातला. नवर्यालाच घरगडी बनविणार्या ह्या खलनायिकेने आपली एका मागोमाग एक क्रुष्णक्रुत्ये चालूच ठेवली होती. हाच अंधारमार्ग असावा अपुला स्वप्नांचा बंगला मधील नायिका कम खलनायिका अंकीताने लाज वाटतील असे अनेक उपद्व्याप करुन सजवला (?) होता!

मालिकेतील कारस्थानी पात्रे:
मालिकेतील पात्रे, सामान्य प्रेक्षकांच्या मनाला रूचेल असे रास्त न वागता, अगदी उरफाटे वागत त्यांच्या रागाची व संयमाची अक्षरश: परिक्षा पहातात असे दिसते. ह्यामध्ये पहिला क्रमांक अर्थातच जगावेगळे वागण्याचा विक्रम करणारा, चक्रम विक्रांतचा! प्रेक्षकांना राग येईल असे वागणारी पात्रे मुद्दामून प्रत्येक मालिकेत आपला धुडघूस घालतच रहातात. बहुदा टीआरपी वाढवण्याकरताच अशा भूमिका निर्माण करतात. विक्रांतला फसवून त्याचा अंत पहाणारी ‘खुकखु’ मधली मोनिका काय, ‘सख्या रे’ मधील निष्ठूरपणे आपल्याच सुनेला जीन्यावरून ढकलून देणारी पुन्हा तिने आपण आपल्याच चुकीमुळे पडलो अशी कबूली द्यायला लावणारी, मतलबी कजाग सासू-आकाशराजांच्या मातोश्रीची भूमिका, ह्याच तर्हेची. ‘अस्सं सासर सुरेख बाई’ मधली चक्क आपल्या वडिलांनाच फसवून घराबाहेर काढणारी विभा, ‘सरस्वती’ मालिकेतील भैरवकरांचे खुनशी जावईबापू, ‘लेक माझी लाडकी’ मधली मीराच्या जन्माचं रहस्य उघडकीस आणताना कावेबाजपणे आदित्य ईरावती आणि आजोबा ह्यांचा अक्षरश: कचरा होईल इतकी बदनामी होईल हे बेमालूमपणे साधणारी कारस्थानी सानिका,सूर्यवंशी खानदानाचा नायनाट व्हावा ह्या अघोरी ईर्षेने झपाटलेला एक मामा उर्फ दुष्ट बल्लाळ आणि त्याला साथ देणारा बहुरूपी बबन हे ‘दुहेरी’ मध्ये सगळ्यांना सळो की पळो करून सोडतात. मधुराला अडचणीत आणून तिचा छळ करणारी पार्थची आजी व ह्यांत त्यांना मदत करणारी पार्थची बाँस तनुश्री ‘आम्ही दोघं राजा, राणी’ मालिकेंत असाच प्रेक्षकांना संताप आणतात. ही सगळी पात्रे ह्याच रांगेतील! दूरदर्शन माध्यमाचा उपयोग समाजाला घडवण्याऐवजी बिघडवण्याचेच काम अशा पात्रांमुळे मालिका करतात. अगोदरच गुन्हेगारीच्या विविध प्रकारांनी उच्छाद मांडला असताना असे विघातक आविष्कार, ह्या माध्यमाला सेन्साँरची किती आवश्यकता आहे, तेच अधोरेखीत करतात.

दूरदर्शन सारख्या माध्यमातून खलप्रव्रुत्तीना हे असे महत्व व प्राधान्य मिळावे आणि नायक, नायिकांपेक्षा खलनायिकांच्या खांद्यांवर मालिकांचे यशापयश ठरावे, हीच दुर्दैवाने आजची वस्तुस्थिती आहे!
थोडक्यांत काय, अब जमाना बदल रहा है!
जादू?
नुकताच एक संदेश वाचायला मिलाला, हा माणूस लिहीतो:'मी कधीही छोटया पडदयावरचया मालिकाच बघत नाही,परवा,थोडया वेलासाठी केवल अर्धा एपिसोड कसाबसा पाहिला आणि टीवी बंद केला' हे वाचून मी मात्र, अक्षरश: आशचयॅचकीत झालो,कारण हया मालिकाच, माझयासारखया ज्येष्ठ नागरिकांचा दररोजचा अत्यावश्यक असा खुराक आहेत. सायंकाली ७ ते १० जणु रात्रपाली असलयासारखा मी टीवी समोर मालिकाच पहा़त असतो. मालिकांचा आणि माझा संबंध 'तुंझे माझे जमेना आंणि तुझयावाचून करमेना' असा आहे! व्यसनी माणसाला उमजत असते की आपण जे करतो,ते योग्य नाही, हानिकारक आहे,पण तो जसा तरीही व्यसन काही केलया सोडू शकत नाही, तसेच माझे मालिका पहाण़याच् हे वेड मला सोडता येत नाही!
' कॅथारसिस' मध्ये जसा वेदनेतून आनंद मिलतो, तसाच काही तरी अनुभव मला मालिका पहाताना होतो. मालिका उगाचच लांबलचक केलया जातात,तयांत 'पाणी' घातले जाते, तयांतील पुष्कल गोषटी निरर्थक असतात::::वगैरे वगैरे दुषणे लावत, लावत न चुकता परत मी मालिका पहातच रहातो. कुठे तो मालिकाच न बघणारा किंवा घरी बिलकुल टीवीच न घेणारा आमचा एक दोस्त आणि कुठे रोज़ रोज़ रतीब घातलयासारखा मालिका पहाणारा मी! असा वेल वाया घालवणयापेक्षा तोच वेल, दुसरया एखादया विधायक कामात घालवावा, हे पटूनही, काही केलया वलत नाही, ही माझी खंत आहे! कोणी सागेल कां हया ईडीयट बाॅक्समधे अशी कोणती जादू आहे

झी वाहिनीवरील बहुतेक प्रत्येक मालिका अशा असंभवनीय लपवा छपवीचाच, आधार कां घेताना दिसतात? दर्शक इतके मूर्ख नाहीत. मोनिकाचे रहस्यउघड़ झाल़यानंतर 'ख़ु क खु' ही मालिका दिशाहीन व निरर्थक होताना दिसते आहे. मोनिकाचे रहस्य
ती नायक विक्रांतच्या नांविवर
बिनदिक्कत
खपवते आणि सुजाण आजी
त्यावर विश्वास ठेवते, म्हणजे
कहरच झाला! एक गुणवंत दिग्गज दिग्दशॅक व अनेक नामवंत कलावंत इथे असूनही, ही गोषट तेसमजू शकत नाहीत हयाचेच आश्चर्य वाटते. ही मालिका लौकरच बंद करावी. तेच शहाणपणाचे ठरेल.
नाटक वा चित्रपट असो, हया दोनही माध्यमांचा आस्वाद घयायला दर्शक काही विचार करून जातो. तयामुले निवडक व्यक्तींसमोर तयांच्े प्रदर्शन होतअसते. तरीही ईथे censorship असते. संपूर्ण कलाकृतीचे यथोचित निरीक्षण व परिक्षण अगोदरच केले जाते. परंतु दूरदर्शन वरून दाखविले जाणारेकार्यक्रम मालिका इ.इ. सर्वांसमोर विशेषत; लहान मुलांसमोर प्रदर्शित होत असतात, तरीही त्याना censorship नसणे, हे चुकीचे नाही कां?
'चला हवा येऊ दया' हया
आता हया कार्यक्रमाने थोडी विश्रांती घेणे जरूरीचे आहे. ठुकरटवाडीचा हया तमाशांत तोच तोपणा तर येतो आहेच, पण थिल्लरपणा व पांचटपणाचाही अतिरेक होत आहें. शिवाय तेच ते चेहरे पहाणे कठीण होते आहे. एखादया नाटक वा चित्रपटाची जाहिरात होणयाऐवजी नको ते पहायला लागत आहे. हया संकलपनेचा नवयाने विचार करावा, थोड़े गांभीयॅ आणावे व नाटकाचा वा चित्रपटाचा आस्वाद, परामर्श घेतला जाईल हयाकडे पहावे असे वाटते.
जाहिरातींचा अतिरेक
महीनों महीने चालणार असलेलया मालिकांचे रोजचे दलण 'पाणी' घालणे व ते पहाणे, त्रासाचे
होतअसते. कोणत़या जाहिराती कोणत़या वेलीदाखवणयातरता ठेवायच़़या, त्याची शहानिशा करायची नाही. उदा: रात्री भोजनाचे वेळी, शौचालयात वापरल्या,जाणार्या गोष्टींची जाहिरात...कारणनसताना मालिका लांबवा़यच्या अणि ग़रीब बिचारया प्रेक्षंकंाचा अंत पहायचा. हे सारे खेल खंडोबे कधी कोण थांबवणार?जाहिरातदारांचा पैसा वाया,प्रेक्षंकंाचा वेल वाया घालावायचे हे तमाशे आता पुरे झाले. ठराविक कालांत संपणारया अर्थपुणॅ मालिका आता हवया आहेत. महणून TV वर दाखविलेजाणारे news व चर्चा सोडून सर्वच करमणूकीचया कार्यक्रमांवर censorship असावी. सर्वांचा बहुमूल्य वेल चांगलाच वापरला जावा हया करता, हे गरजेचेआहे. अत्यंत गरजेची अशी शिस्त तर अस्तित्वांत येईल आणि हे महत्वाचे माध्यम योग्य तो मार्ग अंगिकारेल.
Tail Piece:
जाता जाता टीव्हीवरील जाहिराती आणि मराठी बातम्यांसंबधीची एक नोंद. ताज्या बातम्यांचा दुष्काळ, पूर्वी ई टीव्हीवर दर तासानी प्रक्षेपित केल्या जाणार्या बातम्या बंद झाल्यावर सुरू झाला. हल्ली नीट पाहिले तर जवळ जवळ त्याच त्याच मराठी बातम्या सारख्या दाखवल्या जातात, फक्त त्या देणारे निवेदक बदलतात इतकेच! पुन्हा इथेही बातमीपत्राच्या अर्ध्या वेळात, जाहीरातींचा मारा चालू असतोच!
महाराष्ट्राच्या इतिहासांत जसे शत्रूपक्षाला संताजी आणि धनाजी, जिथे तिथे, जळी स्थळी पाषाणी दिसत, तसेच आपले सुपर डूपर स्टार अँग्री यंग मँन, डोक्याला लावावयाच्या तेला पासून वाँटरप्रूफींगच्या, शौचालयांपासून, बेबी शूज, स्वैपाकाच्या मसाल्याच्या, तसेच गुजरातचे ब्रँड अँबँसेडर पासून, महाराष्ट्रात वाघ वाढताहेत ते सांगणार्या अनेक जाहिरातीत आपल्या सर्वांना आवडणार्या दमदार आवाजांत आणि कदाचित न पहावणार्या म्हातार्या अवतारात पहावे लागतात! Too much familiarity breeds contempt वा अती परिचयांत अवद्न्या हे कोण कोणाला कधी सांगणार?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)