मंगळवार, ३१ जुलै, २०१८

"आ(ता)रक्षण हवे"!:

"आ(ता)रक्षण



"अबीर गुलाल"

कुठल्याशा एका दिवाळी अंकात श्री. मधु मंगेश कर्णिक यांच्यावरील विविध लेख माझ्या वाचनात आले. आता त्या दिवाळी अंकाचं नाव आठवत नाही, पण मधु मंगेश कर्णिक यांनी जे साहित्य निर्माण केले त्याची नोंद मात्र मी तेव्हां घेतली होती.



मला व्यक्तिचित्रात्मक पुस्तक वाचायला खूप

आवडतात आणि त्यामुळे मधु मंगेश कर्णिक यांच्या कादंबऱ्यांपेक्षा त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रात्मक पुस्तकांबद्दल मला कुतूहल आणि आकर्षण निर्माण होते. त्यातील "लागेबांधे" आणि "अबीर गुलाल" गुलाल ह्या दोन पुस्तकांची नांवे मी लक्षात ठेवली होती. योगायोगाने लायब्ररीत गेलो असताना, तिथे "अबीर गुलाल" हे पुस्तक मिळाले. ताबडतोब घरी येऊन ते वाचायला सुरुवात केली आणि अक्षरशः दोन दिवसात ते वाचून संपवले पण!



हे पुस्तक म्हणजे विविध प्रकारच्या आणि प्रवृत्तीच्या माणसांचा एक शोभादर्शक आहे. येथे, त्यांच्या सान्निध्यात आलेल्या निवडक व्यक्तींची श्री. मधु मंगेश कर्णिक ह्यांनी त्यांच्या मनावर उमटलेली भावचित्रे रेखाटली आहेत. त्यात त्यांचे शाळेतील साळवी मास्तर, मॅजेस्टिक प्रकाशन आपल्या कर्त्रुत्वाने नावारूपाला आणणारे केशवराव कोठावळे, आपल्या रंगतदार गोष्टींनी त्या काळात सर्व समाजाला मोहवून टाकणारे कशेळीसारख्या आडगांवात चार दशके रहाणारे एकमार्गी वि. सी. गुर्जर, तसेच स्वातंत्र्यसैनिक आणि कर्णिकांचे जवळचे आप्त क्रांतिकारक भास्कर कर्णिक ह्यांची ह्या पुस्तकात मर्मस्पर्शी ओळख होते.



त्याचबरोबर एकला चालो रे असे जीवन जगणारे गांधीवादी अप्पा पटवर्धन, मराठी कवितेला, साहित्याला नक्षत्रांचे देणे अर्पिणारा, चिं. त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभु ह्यांचेही नाट्यमय जीवनविशेष आपल्याला ह्या पुस्तकात अनुभवता येतात. गोव्याच्या भूमीत लहानाचे मोठे झालेले व गोव्यावर मन:पूत प्रेम करणारे दोन सुपुत्र, कवीराज बा. भ. बोरकर आणि व्यक्तीत्वाला चपखल असे नांव असलेले दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोडकर ह्यांची अगदी जवळून पुस्तकात ओळख होते. एक वेगळी अशी बाब म्हणून, माझ्या आठवणींप्रमाणे, कोणे एके काळी सायनच्या शाळेमध्ये शिक्षिका असलेल्या सुमतीबाई देवस्थळे ह्यांचे अत्यंत हृदयस्पर्शी असे दर्शन एका छोटेखानी लेखात होते. ही व इतर व्यक्तीचित्रे म्हणजे स्वतंत्र कादंबर्या शोभतील अशी हवे"!:

एक मुक्त चिंतन:

मुक्त अथॅकारणामुळे ऐहिक भरभराट होत राहिली हे ज़री खरे असले, तरी नैतिक अधःपतन वेगाने घडत आहे, हे चांगले नाही. आत्मकेंद्रीपणा भयावहपणे वाढत आहे, भ्रष्टाचार वरपासून ख़ाली खोलवर पसरला आहे, माणसातली माणूसकी संपत चालली आहे असे एकंदर चित्र भासत आहे.

आहेरे आणि नाहिरे हयांंमधली दरी चिंता वाटावी एवढी वाढली आहे. शांतता आणि संमंजसपणा भंगत चाललेला दिसतो आहे. मागे वळून पहाताना, हे काय कसे आणि कोणत्या कारणांमुळे घडले, हा प्रश्न पडतो आहे. पूर्वी, पैशापेक्षा भावना, परस्पर सौहार्दाला आणि नैतिक मूल्यांना महनीय मानणारा, मध्यम वर्ग समाजाला नवी दिशा देत राहिलेला असे, पण आज हा वर्ग हरवला तर नाही ना? अशी शंका वाटते आणि हे अधिकच विचार करायला लावणारे आहे.


गुणवत्ता व कार्यसंस्क्रुती:
कोणतंही काम करण्यासाठी करण्यासाठी गुणवत्ता अतिशय महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे कार्यसंस्कृती आवश्यक आहे. तर उत्तम असे फळ निर्माण होऊ शकते. ह्या पार्श्वभूमीवर जर विकास साधायचा असेल, तर आपल्याला गुणवत्ता आणि कार्य संस्कृतीलाच प्राधान्य दिले पाहिजे हे उघड आहे. गेल्या सत्तर वर्षात आपल्या देशाची ज्या कूर्मगतीने प्रगती झाली आणि एकंदर व्यवस्था आणि प्रशासन ह्यांच्यातील अनेक त्रुटी आपल्याला आता सहन करायला लागत आहेत, त्याच्यामागे कदाचित आपण आपल्या धोरणांमध्ये गुणवत्ता आणि प्रगतीशील कार्यसंस्कृती ह्यांना महत्त्व दिले नाही, हे असू शकते.

आरक्षणाचा हेतु व वास्तवता:
ह्या पार्श्वभूमीवर आरक्षण या मुद्द्यावर सखोल विचारविमर्ष झाला पाहिजे. जेव्हा गुणवत्ता आणि कार्यसंस्कृती बाजूला जाऊन, जाती सारख्या गोष्टीवर आरक्षण निर्माण करून कामकाज पाहिले जाते, वा कोणतेही ईप्सित गोष्ट शैक्षणिक असो व्यावहारिक असो व आणखी कोणत्याही प्रकारची असो, त्याची जी काही फलश्रुती असेल ती तेवढी समाधानकारक असणार नाही, हे उघड आहे. त्यातून आपण समजू शकतो की, जो वर्ग हजारो वर्ष वंचित म्हणून दुर्लक्षिला गेला होता आणि अनेक संधी त्याला दिल्या जात नव्हत्या, त्या वर्गाला काही ठराविक मुदतीपर्यंत आरक्षण देणे शहाणपणाचे होते. आज सत्तर वर्ष होऊनही त्या वर्गाला तर आरक्षण दिले जातेच, पण त्याशिवाय आता पन्नास टक्‍क्‍यांपर्यंत ह्या आरक्षणाची मर्यादा पोहोचली आहे. तिथेच घोडे थांबले नाही, तर आता वेगवेगळ्या जाती जमाती देखील आरक्षणाची मागणी करत आहेत. काही समूह तर हा जणू आपला हक्कच आहे, अशा आविर्भावात हिंसक आंदोलने करत आहेत. अराजकासारखी परिस्थिती त्यामुळे निर्माण होण्याचा मोठा धोका  आहे.

आरक्षणामुळे खरोखरच देशाचे किती भले झाले, ही तपासणी करणे गरजेचे आहे. ह्या दुधारी साधनाचा राजकारण्यांनी सत्तेच्या ईर्षेपोटी केला हे उघड आहे. पन्नास टक्‍क्‍यांच्या वर आरक्षण देणे कठीण आहे, हे आपआपल्या समाजाला नीट समजावून देणे, हे त्या-त्या समूहातील नेत्यांचे, एवढेच काय पण शासनाने आश्वासन देताना या महत्त्वाच्या गोष्टीचा विचारच केला नाही, म्हणून ही वेळ आली आहे. आता तर ह्या दुर्लक्षामुळे, समाजासमाजामध्ये दुही कटूता निर्माण होऊ शकण्याचा धोका निर्माण होउन, चांगल्या शांततापूर्ण सामंजस्याचा, मागमूसही उरणार नाही. हिंसा अत्याचार, चक्काजाममुळे अंतर्गत वाहतुकीवर मर्यादा आणि एकंदरच जनजीवन नकोसे, असे होण्याचा धोका, आरक्षणाच्या सर्वच थरांतील अट्टाहासामुळे निर्माण झाला आहे. पुरेसा व समतोल आर्थिक विकास न झाल्यामुळे नोकऱ्या नाहीत आणि त्यामुळे तरूणांच्या जीवनाला दिशा नाही, अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. आपली धोरणे त्यांची अंमलबजावणी ह्यांचे हे दारुण अपयश आहे.

पुढे जाऊन आरक्षणाचा मुद्दा, काळाची मर्यादा न घालता तसाच कसा सोडून दिला गेला? इतर समाजांच्या मूलभूत हक्कांवर त्यामुळे गदा येईल, त्यांच्या संधी डावलल्या जातील, ह्याचा विचारही कसा केला गेला नाही? हे व असेच प्रश्न निर्माण होतात.आता शहाणपण हेच आहे की, सर्वांनी आत्मपरीक्षण करून आरक्षणाचा मुद्दा कायमचा तडीला लावला पाहिजे, निदान त्यासाठी योग्य त्या कालमर्यादेचा अंकुश निर्माण केला गेला पाहिजे. डार्विनच्या सिध्दांताप्रमाणे "सर्व्हायवल आँफ द फिटेस्ट" ह्या उक्तीची जाण ठेवली पाहिजे.

ह्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी, आता मूक ऐवजी सुरू झालेल्या ठोक आंदोलनाने अत्यंत घातक असे हिंसक व अनियंत्रित वळण घेतलेले आहे.

एखाद्या समुहावर पुन:पुन्हा याचना करण्याची परिस्थिती येणं, हे त्यांचे, त्यांच्यातील नेत्रुत्वाचे आणि पर्यायाने शासनाचे दारुण अपयश असते. राजकीय अगतिकतेमुळे, अपरिपक्वतेपायी, निष्क्रियतेचे तो परिणाम असतो.

आपल्या मांगण्यांसाठी, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणे हा, अत्यंत खेदजनक गुन्हाच नव्हे कां? कधी कसे कोण समजविणार?

शासनकर्त्यांनी विशेषतः मुख्यमंत्र्यांनी, जनतेच्या पालकाचे कर्तव्य न बजावता, वेळोवेळी केवळ बघ्याची भूमिका घेऊन दारूण निष्क्रियतेचे दर्शन घडविल्यामुळे ही भयावह स्थिती निर्माण करून, आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. इतके महाभारत होऊनही केंद्र व बोलबच्चन प्रसे गप्पच आहेत, हा दैवदुर्विलास होय.

कधी नव्हे इतकी आंदोलने, संप व बंद गेल्या चार वर्षात देशात, विशेषतः महाराष्ट्रात झाली. हे सरकारचे अक्षम्य अपयशच नव्हे कां? नुसती आश्वासने देत राहून, त्याप्रमाणे क्रुती न करण्यामुळे ही वेळ आली आहे, हे सत्य नाकारून, काही झाले की मागच्या शासकांवर आपले अपयश ढकलून देणे, ह्याला काय म्हणायचे? ह्या सार्यांनाच "अच्छे दिन" म्हणायचे?


नुसती अशक्य भाराभर आश्वासने, क्लीन चिटस् आणि शून्य क्रुती ह्राचे परिणाम आता दिसत आहेत. इतका गलथान कारभार महाराष्ट्राने पाहिला नव्हता. धाकटा भागीदार इतका  छळत असताना, सत्तेला चिकटून रहाण्यापेक्षा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूकाना सामोरे जाणे अत्यंत आवश्यक होते. एका दगडात अनेक पक्षी मारले गेले असते.

मुख्यमंत्री निवडीची तशी घाईच झाली, त्यामागे शिर्षस्थ नेत्यांचे राजकारण होते. गडकरीच परिस्थिती चांगली हाताळू शकले असते. नव्याने निवडणूका अगोदरच व्हायला हव्या होत्या. भांडत बसत कालापव्यय झाला. भागीदाराला धडा मिळणे आवश्यक होते. मोठ्या भावाचा मान राखला गेला असता. हा तमाशा संपला असता.

" याचना करणारा जेव्हां,
परिस्थितीचा सारासार विचार न करता हक्काची भाषा करतो, तेव्हा
अराजक फार दूर नसते."

ह्यावर सोमिवरील एक प्रतिक्रिया:
" *यात शंकाच नसावी*. हक्काची भाषा त्यांना कोण शिकवितो ? ज्यांनी वर्षानुवर्षे अमर्याद सत्ता ऊपभोगली , ज्यांच्या कारकिर्दीत ह्या सर्व समस्यांची पायाभरणी झाली, ज्याला खतपाणी घालून, गरीबांना भुलथापांनी फसवुन , मताचे राजकारण सोयीनुसार अव्याहत करून, सरकारी अनुदानांतुन गरीबांना मिळणारे पैसे लुटुन ज्यांनी आपली कोठारे भरली, तेच , तेच नेते, तेच पक्ष आज साळसूदपणे वेगवेगळ्या समाजातील गटांचा कैवार घेऊन हिंसक दंगलीवजा आंदोलने घडवून आणत आहेत. ऊद्देश साफ आहे. येनकेन प्रकारेण देशात अराजकता माजविणे. परत ऊद्देश ? काही करून मोदी सरकार २०१९ नंतर सत्तेत येता कामा नये. कारण ? नाहीतर ही सर्व भ्रष्ट मंडळी एका मागुन एक गजाआड जातील. त्यांना ही भिती सतावते आहे. या मंडळींना देशाचा विकास, शेतकऱ्यांचे हित, दलित गरीब मागासलेल्याच्या समस्या , देशाचे संरक्षण, परराष्ट्र नीती , आपला धर्म याच्याशी काही काहीही देणेघेणे नाही. यात अनेक परदेशी शक्ती देखिल सामील आहेत. हे वरवर जीतके साधेसोपे दिसते व वाटते तसे ते नक्कीच नाही. दुसऱ्या देशात अशी आंदोलने कठोरपणे मोडून काढली गेली असती. पण आपण लोकशाहीच्या नावाखाली देशाची प्रतारणा करतो आहोत. सरकारला याची चांगली कल्पना आहे. वर्तमान पत्रात येणाऱ्या लेखांवरून व पत्र व्यवहारांवरून जनतेला देखिल ते हळूहळू समजायला लागले आहे हे लक्षात येईल. रात्र वैऱ्यांची , हितशत्रूंची आहे. सावध राहाणे अत्यावश्यक आहे."

ह्यावर आमचे विचार:
नाण्याची ही बाजू मांडून, सध्याच्या शासनकर्त्यांच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष करत आपण आपलेच समाधान करूही शकतो.  परंतु, ह्या नाण्याची दुसरी अधिक वास्तववादी बाजूही नजरे आड करून चालणार नाही. ती अशी आहे:

"कायद्याच्या चौकटीत, ही समस्या आणि तिचे निराकरण सद्दस्थितीत केवळ अशक्य आहे, ही बाजू ना विरोधकांच्या नेत्यांनी वा राज्यकर्त्यांनी इतकी शांततापूर्ण मार्गाने आंदोलनांचे वेळी, मराठा बांधवांना समजावली. तसेच चार वर्षांच्या शासनकर्त्यांच्या निष्क्रीयतेमुळे त्यांनी ह्या समाजाचा विश्वास गमावल्याने संयम सुटून ही अशी अराजकसद्रुष्य वेळ आली आहे. शासक हे जनतेचे पालक असतात, काय योग्य व काय अयोग्य ह्याची जाण अशा समस्यांचे
समयी जनतेला पूर्ण विश्वासात घेऊन सांगणे हे प्रामुख्याने राज्यकर्त्यांचे प्रधान कर्तव्य असते, हे विसरता कामा नये."
थोडक्यात सर्वांनीच प्रामाणिकपणे आत्मपरिक्षण करणे नितांत गरजेचे आहे.

Finally,

 १८/९

Relook at Reservation:
While the policy of Reservation, based just on the basis of the casts, attempts to do justice to all those, who suffered injustice in the Past, it totally ignores the much needed two human resources-namely the ‘Quality and Competence’ for true progress and development of the System and Governance.

Thus,  at the cost of certain short term gains for a few, we end up with inviting heavy long term losses for One & All, thrusting injustice to those who possess desired ‘Quality and Competence’. Sooner or later such unending thirst for Reservation would definitely bring in mediocrity and mismanagement, ruining the future of Gen Next. Needless to add, that, this Concept of Reservation instead of achieving the desired goals, has become a tool for Vote Bank for some how gaining Power.

With such experience of the last 7 decades, Prudence demands that this burning issue must be thoroughly re-examined and debated in entirety to come to a viable, fruitful solution. Instead of casts, it is high time that if at all we wish to continue with Reservation, it MUST be based on economic status, without forgoing ‘Quality and Competence’. Finally, difficult though, earlier we all realize and stick to the universal principle of ‘The Survival of The Fittest’, better for One and All, not just for Today but for Tomorrow and Day After.

Problems, obstacles do occur, when you do, what you haven't done before.

It doesn't matter, from where you are coming, all that matters is,
Where you are going-- it is determined by you and your thoughts. Do remember, clear goals increase confidence, develop your competence and boost your levels of motivation.

With that let us hope for a National Debate for Re look at the Policy of Reservation.


सुधाकर नातू                                                                                                            30/7/'18


बुधवार, २५ जुलै, २०१८

"ह्याला जीवन ऐसे नांव":

"ह्याला जीवन ऐसे नांव!:

जीवन हे खरोखर चमत्कारीक आणि कल्पिताहूनही अद्भूत असते. आपण जन्माला कां येतो आणि आपल्या जीवनाचे प्रयोजन काय असते ह्याचा आपण गांभीर्याने विचार करतच नाही. काही काही माणसांची तर आयुष्ये फारच विचित्र आणि वादळांत भरकटलेल्या होडीसारखी असतात. त्यांच्याच वाट्याला तसे भोग कां येतात, हे कधीच कळत नाही. काही उदाहरणं सांगतो:

"हा मुलगा एका सरळमार्गी कुण्या खेड्यातल्या प्राथमिक शिक्षकाचा एकुलता एक. दहावी बारावीपर्यंत चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा, बहुधा हुशार म्हणूनच गणला जायचा. पण हाय पुढे काय झाले, कां होत गेले, कुणास ठाऊक! तो अचानक पूर्ण वाया गेला. कुठली तरी वाईट संगत लागली  आणि त्याला सिगरेट दारू जुगार अशी सगळ्या प्रकारची व्यसने लागली. दुर्दैवाने त्याच वेळेला त्याचे वडीलही अचानक मरण पावले. साधे प्राथमिक शिक्षक त्यामुळे आई आणि हा मुलाला त्यांच्या तुटपुंज्या पेन्शनवर जगायची वेळ आली. तो पुढे                   इतका फुकट गेला चक्क चोर्‍या मारामार्या करायला लागला. तो कोणत्याही नातेवाईकांच्या घरी जर तो आला, तर सारे जण त्याला टाळत असत व बाहेरच्या बाहेर त्याला हाकलून देत असत. आई बिचारी विधवा, एका खेड्यात राहणारी, हा मुलगा काय म्हणून महिने महिनेन् गायब व्हायचा. घरी आला की आईला छळायचा, पैसै मागत भांडत रहायचा. अशा दिशाहीन तऱ्हेने, पन्नाशी आली तरी त्याच्या जीवनाला कुठलाच मार्ग सापडलाच नव्हता. काय खायचा काय करायचा त्याचे त्यालाच ठाऊक हे असं उदाहरण बघितलं की वाटतं काय आणि कशा करता हा माणूस जन्माला आला, मागच्या जन्मीचा आई-वडिलांचा शत्रू तर नव्हता, असं वाटण्याजोगं आयुष्य ह्याच्या व असा नालायक मुलगा त्या अभागी आईच्याच पोटी कां जन्माला यावा, ह्या प्रश्नाला उत्तर आहे कां?

"हा मुलगा पाच सहा बहिणी मधला एक भाऊ आणि बहुदा अभ्यासात त्याचे लक्ष नव्हते व बुद्धीही बेताचीच असावी. कोकणातल्या खेड्यात कसाबसा चौथी पर्यंत शिकला आणि पुढे काय करायचं त्याचं त्यालाच कळेना. वीस-बावीस वर्षांचा होईतो त्याला कुठलीच दिशा मिळाली नव्हती. अखेरीस मुंबईत राहणाऱ्या त्याच्या एका नातेवाईकाने त्याला कुठेतरी शिपायाची नोकरी मिळवून दिली. तिथे त्याला खूप काम करायला लागेल चौथ्या मजल्यावर त्याचे ऑफिस आणि संपूर्ण पाच-सहा तास त्याला या मजल्यावरून त्या मजल्यावर अशी चढ-उतार करायला लागत असे.

पगारही तुटपुंजा, राहायला कुठेतरी झोपडीत कशीबशी सोय झालेली. हा तिशीला येईपर्यंत त्याचे आयुष्य असेच कसेतरी चालले होते. आणि अचानक काय झालं तो आजारी पडला. त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यावर लक्षात आलं की त्याच्या हृदयाची एक झडप नीट काम करत नाही. आणि दुर्दैवाने अखेरीस त्या अल्पवयातच तो मरणही पावला! म्हणून वाटते की त्या बिचार्याच्या आयुष्याचा अर्थ काय? तो जन्माला आला तेव्हा कुटुंबात आनंद झाला खरा, पण पुढे काय!  सारा निराशेचाच परवड होण्याचाच कारभार! सहाजिकच, लग्न होता, जीवनातल्या कुठल्याच आनंद क्षणांचा अनुभव न घेता, हा माणूस जगाचा निरोप घेतो, त्याचा अर्थ काय? आहे उत्तर?"

 "ही कथा आहे एका अशा मुलाची,की ज्याचं लाडाकोडात पालनपोषण झालं. इथेही परत दहावी-बारावी होईपर्यंत हा मुलगा ठीक होता.  पण नंतर सिगरेटचे व्यसन दारूचे व्यसन लागले. लहानपणापासून आईकडून खूप लाड व्हायचे, त्यामुळे तो खूप हठवादी आळशी होता. तिच्याकडून तो नेहमी पैसे घेऊन, ते छानछौकीत मौजमजेत उडवायचा. पुढचं शिक्षण सोडून दिलेलं आणि नंतर बारमध्ये जाऊन बारबालांच्या सान्निध्यात रहायला सुरवात त्याने केली. स्वत:हून एक दमडी त्याने कधीच मिळवली नाही. वडलांच्या जीवावर ऐतखाऊ आयुष्य काढता काढता, पुढे तो एका बारबालेला घेऊन एक दिवस घरी आला आणि वडिलांचा आई वडिलांचा विरोध असताना तिच्याशी लग्नही केलं. वडील बिचारे कामगार आणि vrs घेऊन घरी बसलेले. जे काही त्याचे पैसे आले त्या पैशाच्या जोरावर या मुलाचा संसार सुरू झाला. पुढे एक मुलगी पण झाली, पण काम धंदा काही नाही. इकडे वडलांची पुंजी संपली अन् घरी सगळ्यांचेच वांधे झाले खायचे-प्यायचे. अशा वेळेला त्याला अजून एक दुसरा मुलगाही त्याला झाला. कामधंदा परत काहीच नाही असे असताना दारू पिणे जुगारात पैसे घालवणे असले धंदे त्याचे चालूच होते. घरात रोज भांडणे बायकोला आई वडिलांना मारहाण करायला लागला. अखेर कंटाळून, पूर्वी बारबाला असलेली, त्याची बायको एक दिवस त्याला सोडूनही गेली. तिच्या वियोगामुळे तो बेभान होऊन, अधिकच दारू पीत राहिला आणि त्यातच शेवटी तो मरण पावला! बिचार्या आई-वडिलांवर हया लहान दोन मुलांना सांभाळायची वेळ आली."

आता येथे प्रश्न पडतो, ह्या मुलाच्या आयुष्याचा अर्थ काय? केवळ सगळ्यांना त्रास देण्यासाठीच तो जन्माला आला होता कां? कधीच त्याला असे जाणवले नाही की, आपण काय करतो ते सारे चूक आहे. आपली जबाबदारी पार पाडण्याची देखील त्याला कधीही सुचू नये. आपल्याबरोबर आपली बायको आई वडील आणि दोन निष्पाप मुले ह्यांच्या आयुष्याचे असे खेळखंडोबा करायची त्याला काय गरज होती? खरोखर त्याचे आयुष्य ही एक कादंबरीत शोभावी अशी कथा होती!

 अशी अनेक उदाहरणे सापडतील. माणूस जन्माला कां येतो आणि ठराविक काळानंतर जगाचा निरोप घेतो, मधल्या वेळात आयुष्याचं काहीतरी सोने करावे, असं अशा माणसांना का वाटत नाही? म्हणूनच म्हंटलं आहे "ह्याला जीवन ऐसे नांव"! जन्मपूर्वी माणूस कुठे असतो, मरणानंतर कुठे जातो? हा कायमच अनुत्तरीत प्रश्न जगाच्या अंतापर्यंत रहाणार आहे. आयुष्याला शेवटी काही अर्थ असतो कां? कां, हे सारे मृगजळच आहे?
खरं म्हणजे मानव जन्म दैवदुर्लभ होय. सर्व सजीवांमध्ये मानवाची सर्वोच्च प्रगती झालेली दिसते. आपली ज्ञानेंद्रिये आपल्याला विविध प्रकारच्या जाणिवांची ओळख करून देतात आणी त्यायोगे विविध प्रकारची सुखे, अनुभव आनंद आपल्याला उपभोगता येतो. परंतु कुणी ह्याची जाणीव ठेवतच नाही. जे आपल्याकडे असते ते नसले,तरच त्याचे महत्त्व कळते. म्हणून आपला जन्म कशासाठी झाला आहे याची जाणीव आपण विचारपूर्वक करून घेतली पाहिजे. आपल्या जीवनाचे ध्येय काय, याचा शोध घेतला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपली मार्गक्रमणा केली पाहिजे. आपण जसा स्वतः आनंद घेऊ शकतो, तसाच तो इतरांनाही द्यावा ही इच्छा कायम ठेवली पाहिजे आणि त्याप्रमाणे क्रुती करत राहिले पाहिजे. घेणं सोप असत देणं कठीण असतं. आपण देत राहिले पाहिजे. निसर्ग, आपण जे त्याला देतो,  त्याच्याहून कितीतरी पट भरभरून तो आपल्याला परत देतो. हे एखादे बी पेरलं की त्याच्यापासून झाड,  अनेक फळे, पुन्हा त्यापासून अनेक झाडे, एवढेच काय अखेरीस जंगल निर्माण होऊ शकतो, ही जाणीव ठेवली पाहिजे.

आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही, असे जरी आपण कायम वागलो, तरी ते पुरेसं होऊ शकते. पण आपल्याला लक्षात येतं की स्वतःपलीकडे कोणीच काही बघत नाही आणि म्हणूनच जीवनातले विविध कठीण अशा समस्या निर्माण होत असतात. वरील तीन उदाहरणे दिली आहेत, ज्यांनी आपली आयुष्य वाया घालवली. त्यावरून निदानहे धडे घेतले तरी पुरेसं आहे.
 अखेरीस "ह्याला जीवन ऐसे नांव" हेच खरे!
सुधाकर नातू
२४/७/'१८

रविवार, ८ जुलै, २०१८

"नकोरे मनोरे, मनोरे नकोरे":

"नकोरे मनोरे, मनोरे नकोरे":

सध्या टोलेजंग इमारती बांधण्याच्या हव्यासामुळे जमीन खचून शेजारच्या कुटुंबांवर कष्टाने घेतलेली घरे सोडण्याची वेळ येत आहे. तसेच अचानक लागणार्या आगींमुळे वित्तहानी व जीवितहानी असे धोके निर्माण होत आहेत. नागरी सेवा सुविधा व वहातूकव्यवस्थेचे बोजवारे उडत आहेत. मुंबई सारख्या बेटावर अशा संभाव्य धोक्याचा विचार न करता, नियोजनशून्य धोरणांपायी ह्या चांगल्या शहराची दुरावस्था होताना आपण उघड्या डोळ्यांनी पहात आहोत. म्हणूनच......
"नकोरे मनोरे, मनोरे नकोरे", हे आग्रहाने मांडणारा माझ्या ब्लॉगवरील हा लेख आहेे.

मुंबई शहरातील नागरी सेवा सुविधांचा किती बट्टयाबोळ झाला आहे त्याचे दर्शन वर्तमानपत्रातील तक्रारींच्या पाढ्यांवरून ध्यानांत येईल. काही उदाहरणे:

➡पाण्याची पाईपलाईन फुटलेली व अतोनात पाणी वाया चाललेले
➡रस्तोरस्तीचे खड्डे,
➡रस्तेदुरूस्थीचा ठेकेदार गायब आणि खडी, रेतीचा ढीग रस्त्यावर पडलेला
➡रेल्वेस्टेशनखाली अंधार
➡टोल फ्री क्रमांक बिनकामाचा
➡रस्त्याचा दुभाजक वाईट अवस्थेत, अपघाताचा धोका
➡कचरापेटी नादुरुस्त, कचर्याचे ढीग तसेच पडलेले
➡केबलवायरचे मोठे जाळे रस्त्यावर पडलेले, अपघाताचा धोका
➡गटार तुंबलेले किंवा गटाराचे झाकण गायब ➡स्टेशनात छप्पर नाही, किंवा स्टेशनांत अस्वच्छता, शौचालये वाईट स्थितीत ➡बसस्टापवर छप्पर नाही किंवा गर्दुचल्यांचा मुक्काम
➡मुलांना खेळायला मोकळ्या जागा नाहीत
➡बागांमध्ये स्वच्छता नाही, झोपाळे आदि मोडकळीस आलेले
➡लोकलगाड्या म्हणजे दररोजचे यमदूत ➡रस्तोरस्ती गल्लीबोळांमध्ये दोनही बाजूंना वहानांचे पार्कींग आणि त्यामुळे ट्रँफिक जँम, वेळेचा इंधनाचा अपव्यय
➡शहरामध्ये स्वच्छताग्रुहांची कमतरता, आहेत ती नीट देखभाली अभावी गलीच्छ. इ.इ. इ.इ. ………

हया तर्हेच्या तक्रारी मारूतीच्या शेपटाएवढ्या लांबच लांब असूनही कोणतीही लक्षणीय सुधारणा नाही आणि एके काळी शांत सुंदर असलेली ही मुंबापुरी आज झोपडपट्यांनी वेढलेली, अजस्त्र लोकसंख्येच्या आणि जीवघेण्या प्रदुषणापायी गुदमरत चाललेली एक बकाल नगरी झालेली सगळे उघड्या डोळ्यांनी पहात आहेत. अशी दारुण अवस्था शहराची असताना गगनचुंबी उंचच उंच मनोरे झोपडपट्टी निर्मुलन अथवा जुन्या इमारतींचा पुनर्विकास अशा गोंडस नावाखाली, तिचे लौकरांत लौकर, नरकपुरींत रूपांतर केले जात आहे. म्हणूनच आज सुंदर मुंबई, हरित मुंबई ही घोषणा इतिहासजमा जमा झालेली आहे. म्हणूनच आता घोषणा हवी:

नकोरे मनोरे, मनोरे नकोरे!

मुंबईत उंच मनोर्यांच्या इमारती बांधत रहाण्याच्या हव्यासामुळे, आधीच नागरी सुविधांचा बट्टयाबोळ आणि बजबजपुरी झालेल्या शहराची काय भयानक अवस्था होईल ह्याचा कोणी विचारच करत नाहीये. ह्या गदारोळांत मूळचे भूमीपुत्र विस्थापीत होऊन पहाता पहाता त्यांचा मागमूस रहाणार नाही, ह्या वास्तवाकडे दुर्लक्ष केले जात आहे. पुनर्विकासाचे गाजर दाखवून अर्धवट अवस्थेतील इमारतींमधील मूळचे कितीतरी नागरिक ना घर, ना घरभाडे अशा दारुण स्थितीत जवळ जवळ देशोधडीला लागून पस्तावत आहेत. त्यांच्या दु:खाला, वेदनांना तुलना नाही. 70 ते 100 वर्षांहून जुन्या चाळी, इमारतींबद्दल पुनर्विकासाची आवश्यकता समजता येऊ शकतो. परंतु सार्याच नागरी सेवा सुविधांची दारुण विदारक अवस्था, आताच कडेलोट झालेली मुंबईची लोकसंख्या आणि प्रदुषणाचा पडलेला विळखा ह्यांचा विचार करता कोणत्याही पुनर्विकास प्रकल्पांमध्ये जास्तीत जास्त सात मजल्यापर्यंतच नव्या इमारती बांधल्या जाणे योग्य ठरेल.

70/80 वर्षे जुन्या, जीर्ण झालेल्या चाळींच्या पुनर्विकासाचे एक वेळ समजू शकतो. परंतु आता ही लाट केवळ ३०/४० वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतींचेही पुनर्विकासाचे लोण आले आहे. ह्याचा अर्थ ह्या इमारती योग्य ती काळजी व सामूग्री वापरुन बनविल्या गेल्या नव्हत्या. अशा कमकुवत कामाकडे संबधीतांनी, यंत्रणांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले.  आता उत्तुंग मनोरे न बांधता अशा इमारतींचे मजबूतीकरणच करणे हाच उपाय शहाणपणाचा आहे. पण त्याकडे दुर्लक्ष केले जावून मुंबईची धुळधाण लावण्याचा उद्योग चालूच राहील, हे भावी पिढ्ढ्यांचे दुर्दैवच ठरणार आहे. 30 ते 40 टक्के झोपडपट्टयांनी वेढलेल्या मुंबई शहराची अशी लाज वाटावी अशी भयानक अवस्था कोणी केली? कां, कशी झाली आणि त्या करता जे जबाबदार असतील त्यांच्या अशा अक्षम्य अपराधांबद्दल काहीही न करता, झोपडपट्टी निर्मुलन योजना असे गोंडस नांव देऊन आंधळेपणाने उंच मनोर्यांमागून मनोरे बांधणे हे जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकणेच नव्हे, तर शहराला खड्यांत गाडणे नव्हे कां? झोपडपट्ट्यांना वर्षांमागुन वर्षे अधिक्रुत करत रहाणे हा सत्तेचा दुरुपयोगच नव्हे कां?

 एक विनवणी निश्चित, जरा फक्त स्वत:कडेच न पहाता, भावी पिढ्यांसाठी आपण खेळण्यातल्या सारखी कुरकुर करणार्या खुळखुळ्यासारख्या शहराचा वारसा क्रुपया सोडून जावू नका.
बाबांनो,          

‘नकोरे मनोरे, मनोरे नकोरे!!

सुधाकर नातू