बुधवार, १४ मार्च, २०१८

गुढी उभारु या: नियतीचा संकेत५:शनिमहात्म्य:



नियतीचा संकेत-५: शनिमहात्म्य:

  *शनीची साडेसाती*:
साडेसाती म्हणजे काय? गोचरीचा शनि जेव्हा भ्रमण करताना तुमच्या कुंडलीतील  जन्मस्थ चंद्राच्या मागे  ४५ अंशावर येतो, म्हणजेच तुमच्या राशीच्या मागील राशीत येतो, तेव्हा  साडेसाती सुरू होते ४५ अंश जन्मस्थ चंद्रा पुढे शनि जाईपर्यंत, म्हणजेच तुमच्या राशीच्या पुढील राशीनंतर येणार्या राशींत जातो,तोपर्यंत साडेसाती असते.....
उदा: सध्या धनु राशींत शनी आहे, म्हणून आता व्रुश्चिक, धनु मकर राशींना साडेसाती आहे. शनी कुंभेत जेव्हा प्रवेश करेल, तेव्हा व्रुश्चिक राशीची साडेसाती संपेल.

मेषदिनांक २९ मार्च २०२५ रोजी सुरु होईल दिनांक ३१ मे २०३२ रोजी संपेल.
वृषभ▪ ३ जुन २०२७ रोजी सुरु होईल दिनांक १३ जुलै २०३४ रोजी संपेल.
मिथुन▪८ अॉगष्ट २०२९ रोजी सुरु होईल दिनांक २७ अॉगष्ट २०३६ पावेतो.
कर्क▪ ३१ मे २०३२ रोजी सुरु होईल दिनांक १३ जुलै २०३९ पावेतो.
सिंह▪ १३ जुलै २०३४ रोजी सुरु होईल दिनांक २६ सप्टेबर २०४१ पावेतो.
कन्या▪२७ अॉगष्ट २०३६ रोजी सुरु होईल दिनांक ३० अॉगष्ट २०४४ पावेतो.
तुला▪ १० सप्टेंबर २००९ रोजी सुरु झालेली असुन दिनांक २६ ऑक्टोबर २०१७ रोजी संपेल.
वृश्चीक▪५ नोव्हेंबर २०११ रोजी सुरु सुरु झालेली असुन दिनांक २४ जानेवारी २०२० रोजी संपेल.
धनु▪ २ नोव्हेंबर २०१४ रोजी सुरु सुरु झालेली असुन दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी संपेल.

मकर▪२६ जानेवारी २०१७ रोजी सुरु सुरु झालेली असुन दिनांक २९ मार्च २०२५ रोजी संपेल.
कुंभ▪२४ जानेवारी २०२० रोजी सुरु होईल दिनांक २३ फेब्रुवारी २०२८ पावेतो.
मिन▪२९ एप्रिल २०२२ रोजी सुरु होईल दिनांक १७ एप्रिल २०३० पावेतो.

माझा अनुभव असा आहे की, कोणाच्याही आयुष्यात तीनदाच साडेसाती येते माणूस  ८५ वर जगला तर  चौथी  साडेसाती येऊ शकते जर त्याला जन्मतःच साडेसाती असेल तर.

🛑
तुमची  तुमच्या साडेसातीच्या वेळी जी  महादशा चालू असते त्याला फार महत्व आहे दुसरे म्हणजे  तुमच्या कुंडलीत  जन्मस्थ चन्द्र  जर  बिघडलेला असेल चन्द्राचा जवळपास रवी असेल तर शनि त्या दोन्ही ग्रहाना त्रास देतो . चंद्र म्हणजे मन  आणि रवि म्हणजे आत्माहया दोन ग्रहाना छळणे म्हणजे साडेसाती.

शनीची छोटी साडेसाती:
ही झाली मुख्य शनीची साडेसाती. ह्या शिवाय शनी जेव्हा आपल्या चंद्रराशीपासून चौथ्या किंवा आठव्या स्थानी असतो, तेव्हा शनीची छोटी साडेसातीचा काळ असतो. चौथ्या स्थानी शनी असेल तर मानसिक सौख्य बिघडू शकते अथवा स्थावरविषयक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तर आठवा शनी नुकसान, अपयश, अपघात, आरोग्याचे गंभीर प्रसंग निर्माण होऊ शकतात.

शनीचा राजयोग:

जेव्हां, जन्मलग्नपत्रिकेमध्ये एक केंद्र व पाचवे अथवा नवव्या अशा एका त्रिकोणस्थानाचा मालक जर एकच ग्रह असेल तर त्या पत्रिकेला त्या ग्रहाचा राजयोग हा शुभफलदायी योग होतो. व्रुषभ व तुळ लग्न अर्थात् प्रथम स्थानाच्या पत्रिकेला, म्हणूनच, शनीचा राजयोग होतो. जीवनात भरभराट, प्रगती करणारा हा योग आहे. मात्र शनी हा मंदगतीने चालणारा ग्रह असल्याने काहीशी उशीरा ह्याची फळे मिळतात.


शनी आठवा: संबंधीची फळे:

आता जन्मपत्रिकेत ज्या स्थानी शनी असतो, त्याचे परिणाम पाहू. शनी पत्रिकेत ज्या स्थानापासून आठवा असतो, त्या स्थानासंबंधीची फळे, नुकसानकारक, त्रासदायक मिळण्याची शक्यता असते.

प्रथम स्थानी डोक्यावर शनी म्हणजे पत्रिकेतील रोगस्थान-सहाव्या स्थानाला तो आठवा असेल. म्हणून मानसिक चिंता, सातत्याने काही ना काही आजार अशी फळे.

दुसर्या स्थानचा शनी पत्रिकेतील विवाहस्थानाला आठवा, त्यामुळे विवाहजुळणीत अडचणी विलंबाने विवाह आणि वैवाहिक कौटूंबिक सुखात बाधा.

तिसर्या स्थानातील शनी, पत्रिकेतील आठव्या स्थानाला आठवा, म्हणून शारिरीक अपंगत्व परावलंबित्व देणारे रोग वा प्रसंग आणि हाल होऊन म्रुत्यू होण्याचा धोका.

चौथ्या स्थानांतील शनी पत्रिकेतील भाग्यस्थानाला आठवा होतो, त्यामुळे संधी डावलल्या जाणे, ईप्सित फळे अपेक्षा पुरी होणे वा त्यासाठी खूप कष्ट विलंब, ही फळे.

पाचव्या स्थानचा शनी पत्रिकेतील व्यवसायस्थानाला आठवा, म्हणून अशा माणसांनी धंद्यात पडू नये, नोकरीतही अपेक्षाभंग, मनस्ताप अडचणी, ही फळे.

सहाव्या स्थानचा शनी पत्रिकेतील लाभस्थानापासून आठवा, म्हणून संधी हुकणे, नुकसानीचे योग ही फळे मिळण्याची शक्यता.

सातव्या स्थानी-विवाहस्थानी शनी, पत्रिकेतील व्यय स्थानाला आठवा, म्हणून विवाहाला विलंब, आर्थिक नुकसान वा फसवणूक.

आठव्या स्थानी शनी हा पत्रिकेच्या प्रथमस्थानाला आठवा, त्यामुळे खडतर मंदगतीने प्रगती करणारं जीवन.

नवम-म्हणजे भाग्यस्थानचा शनी पत्रिकेच्या द्वितीय म्हणजे धन वा कौटुंबिक स्थानाला आठवा, त्यामुळे आर्थिक ओढाताण, कौटुंबिक कलह अशी फळे मिळू शकतात.

दशमस्थानचा शनी हा पत्रिकेतील त्रुतीय स्थानाला आठवा, त्यामुळे भावंडाशी मतभेद, प्रवासात कष्ट, अपघाताचा धोका.

लाभ अथवा अकराव्या स्थानचा शनी, पत्रिकेतील चतुर्थ अर्थात मात्रुस्थान सुखस्थानाला आठवा होतो, म्हणून मात्रुसुखात अडचणी, वियोग, मानसिक विवंचना अशी अनिष्ट फळे.

व्ययस्थानचा अर्थात बाराव्या स्थानी शनी असेल, तर तो पंचम म्हणजे विद्याभ्यास, संततीस्थानाला आठवा, त्यामुळे शिक्षणात अपेक्षाभंग, संतती विलंबाने त्यांच्याशी मतभेद.
ही फळे विचारात घेताना पत्रिकेतील इतर शुभाशुभ ग्रहयोगांचा सखोल विचार करणेही आवश्यक आहे. वरील निरीक्षणे ही केवळ दिशादर्शनासाठी दिली आहेत
.
शनीचा दाब:
शनिमहात्म्याच्या
ह्या अखेरच्या विवेचनात विवाहजुळणीत शनीचा दाब असणे म्हणजे काय, ते पाहू. गुणमेलन करताना विवाहजुळणीत मंगळदोष असेल, अर्थात पत्रिकेत मंगळ प्रथम, चौथ्या, सातव्या, आठव्या किंवा बाराव्या स्थानी असेल तर अशा वेळी जी पत्रिका अशा पत्रिकेशी जुळवायची असेल तिच्यातही मंगळदोष असावाच लागतो. तसा तो नसेल, तर गुण जमुनही विवाहासाठी ती पत्रिका जुळत नाही. ह्याला फक्त एकच अपवाद आणि तो म्हणजे, जर मंगळदोष नसलेल्या पत्रिकेत जर शनीचा दाब असेल तर ती पत्रिका मंगळदोष असणाऱ्या पत्रिकेशी गुण जुळत असतील तर विवाहासाठी चालू शकते. आता शनीचा दाब म्हणजे पत्रिकेत जर शनी प्रथम, पंचम सप्तम किंवा दशम स्थानी असणे. मंगळदोष शनीचा दाब ठरविताना ह्या दोन ग्रहांच्या पत्रिकेतील स्थानावरून सातव्या अर्थात विवाहस्थानच्या द्रुष्टिचा विचार घेतलेला आढळून येईल.
सुधाकर नातू, माहीम मुंबई१६                                                Mb 9820632655


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा