नियतीचा संकेत ३:
जन्मपत्रिका=तुमची युनिक आयडेंटी:
नववर्षांत, ज्योतिषशास्त्राची सर्वसामान्यांना उपयुक्त अशी ओळख करून देण्याच्या माझ्या संकल्पाचा हा तिसरा लेख सादर करताना मला आनंद होत आहे.
जन्मतारिख, जन्मवेळ व जन्मस्थळ ह्यांच्या आधाराने जन्मलग्नपत्रिका बनवली जाते. पत्रिकेत चार चौकोन व आठ त्रिकोण, अशी एकुण बारा स्थाने किंवा घरे असतात. वरचा चौकोन हे पत्रिकेचे आरंभ स्थान असते त्याला लग्नस्थान वा प्रथम स्थान म्हणतात आणि घड्याळाच्या काट्यांच्या उलट्या दिशेने-anti clockwise क्रमाने प्रत्येक घरात आकडे लिहीलेले दिसतात. त्यांची सुरवात ह्या आरंभ स्थानापासून होते.
जन्मकुंडली मांडताना जन्मतारीख, वेळ व स्थान लक्षात घेऊन, जन्मवेळी सूर्य पूर्व दिशेला ज्या राशीत असतो, तिला लग्नराशी म्हणतात. पंचांगात प्रत्येक दिवसाची वेळेनुसार लग्नकोष्टके दिलेली असतात. ती पाहून प्रथम कुंडलीचे पहिले-आरंभ स्थान निश्चित केले जाते.
पत्रिकेतील बारा स्थानांतील आकडे, एकदा लग्नराशी निश्चित केली गेली की मांडता येतात. समजा पुढे दिलेली पत्रिका पहा, लग्नराशि सिंह आहे, तर ती पाचव्या क्रमांकाची राशी, बारा राशींच्या राशीचक्रात असल्याने ५ आकडा वरच्या चौकौनांत मांडला जाईल व उलट्या क्रमाने प्रत्येक घरात पुढचे आकडे लिहीले जातील.
ह्या प्रमाणे जन्मलग्नपत्रिकेची रचना पूर्ण झाली की, प्रत्येक ग्रह जन्मतारखेला जन्मवेळी कोणत्या राशीत किती अंशांत आहे, ते त्या त्या वर्षीच्या पंचांगात पाहून काढले जाते. ग्रह ज्या राशीत असेल त्या राशीच्या आकड्यात तो ग्रह मांडला जातो.
ह्यामध्ये, चंद्र तुमच्या जन्मवेळी ज्या राशीत असतो, ती तुमची जन्मरास असते. चंद्र ज्या राशीत, जितके अंश, कला असतो त्यावरून तुमचे जन्मनक्षत्र व चरण निश्चित करता येते. प्रत्येक नक्षत्र १३अंश २०कलांचे, प्रत्येक रास ३०अंश व ९ चरणांची असते. सहाजिकच प्रत्येक चरण हा ३अंश २० कला असतो. ह्यावर आधारीत जन्मचंद्ररास व नक्षत्र चरण ठरविले जाते. त्यावरुन जन्माक्षर समजते. नामकरण व मुंजीच्यावेळी त्याचा जन्मनाव व संध्येतील नांव निश्चित करण्यास उपयोग होतो. विवाहाचे वेळी वधू वरांच्या गुणमेलनासाठी जन्मरास, नक्षत्र चरण आवश्यक असतात.
ह्या माहीतीच्या पार्श्वभूमीवर जन्मलग्नपत्रिका कशी बनवली जाते ते, उदाहरणावरून समजून घेवू:
जन्मतारीख: १९-७-२०१६
जन्मवेळ: ९/१५ सकाळी
जन्मस्थळ: पुणे
येथे प्रथम स्थान, अर्थात जन्मलग्न कोणते ते जन्मतारखेवरून पंचांगातील जन्मलग्नकोष्टकावरून काढू.
ह्या तारखेला पंचांगात सकाळी ८-१८ ते १०-१५ पर्यंत सिंह लग्न आहे. म्हणून पहिल्या लग्न चौकोनात सिंह राशीचा ५ आकडा लिहू. नंतर उरलेल्या ११ स्थानांत उलट्याक्रमाने ६ ७ ... असे आकडे लिहू लग्नाच्या बाजूच्या त्रिकोणात ४ आकडा येईल.
आता पंचांगात प्रत्येक ग्रहाची १९जुलै१६ ला राशीनिहाय दर्शविलेली स्थिती पाहू. ती अशी आहे:
रवि ३ म्हणजे मिथून राशीपर्यत प्रवास पूर्ण करून १अंश५८कला कर्केत आहे. म्हणून पत्रिकेत ४आकडा असलेल्या स्थानी त्रिकोणात र हे रविचे संक्षिप्त रुप लिहीले आहे.
चंद्राने सूर्योदयापर्यंत ४ म्हणजे कर्क राशीपर्यंत प्रवास पूर्ण करुन तो सिंह राशींत ५अंश३२कला येथे होता. सूर्योदयापासून म्हणजे सकाळी ६वा.१२मिनीटे ते जन्मवेळी ९वा१५मिनीटांपर्यंत तीन तास तीन मिनिटात अजून पुढे १अंश३५कला इतका प्रवास करेल. म्हणजे जन्मचंद्र सिंहेत ७अंश७कला येथे असेल. म्हणून पत्रिकेत सिंहेच्या ५ आकड्यात लग्नस्थानी चं हे चंद्राचे संक्षिप्त रुप लिहिले आहे. सिंहेत ७ अंश७ कला ह्याचा अर्थ मघा नक्षत्र तिसरा चरण. पंचांगाप्रमाणे ह्याची नाडी अंत्य, योनि उंदीर व गण राक्षसगण तसेच जन्माक्षर मू.
ह्याच पद्धतीने इतर ग्रहांची ह्या जन्मतारखेला असलेली राशीनिहाय स्थिती ध्यानात घेऊन संपूर्ण पत्रिका सिद्ध केली आहे. येथे ग्रहांची संक्षिप्त रुपे अशी:
मं-मंगळ, बु-बु़ध, गु-गुरु, शु-शुक्र, श-शनी
रा-राहू, के-केतू, ने-नेपच्यून, ह-हर्शल आणि
प्लू-प्लूटो.
येथे चंद्रच जन्मलग्नस्थानी असल्याने जन्मलग्नपत्रिका व जन्मराशीपत्रिका त्याच असतील. जेव्हा अशी स्थिती नसते तेव्हा चंद्र ज्या राशीत असतो त्या राशीला प्रथमस्थानी घेऊन तेथे चं व इतर स्थानांमध्ये आकड्यांप्रमाणे इतर ग्रहांची उपस्थिती जन्मलग्नपत्रिकेप्रमाणे दाखवून राशीकुंडली सिद्ध केली जाते. पुढे तसे उदाहरण पत्रिकांद्वारा दाखविले आहे.:
जन्मपत्रिका बनविण्याचा गणिती क्लिष्ट भाग मी येथे जास्तीत जास्त सोप्या शब्दात मांडण्याचा यत्न केला आहे. अधिकाधिक अशी कोणत्याही जन्मतारीख वेळ स्थळ ह्यांची उदाहरणे घेऊन सवयीने पत्रिका बनवायला शिकता येईल. कोणत्याही तारखेला जन्मवेळ पंचांगातील लग्नस्थित्यंतराचे अगदी जवळपास असेल तर जन्मस्थळाचा विचार करून काय बदल करावा लागतो ते पंचागातील वेगळ्या लग्नसमाप्तीच्या कोष्टकाचा आधार घेऊन करता येतो. परंतु हा थोडासा क्लिष्ट भाग येथे प्रारंभिक अभ्यास असल्याने दिलेला नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा