'नियतीचा संकेत': १
'ज्योतिष-मानवी मन-प्रयत्नांची फळे:
प्रास्ताविक:
भारतीय ज्योतिष चंद्राला महत्व देते तर पाश्च्यात्य ज्योतिष रविला. त्यामुळे, आपल्या जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो, ती आपली जन्मरास मानली जाते. चंद्र सर्वसाधारणपणे एका महिन्यात बाराही राशींचा प्रवास पूर्ण करतो, त्यामुळे आपली जन्मरास ठरविताना, जन्मतारिख महिना वर्ष व जन्मवेळ माहीत असावी लागते. तर रवि प्रत्येक राशीचा प्रवास एका महिन्यात पूर्ण करत असल्याने त्या संपूर्ण महिन्याच्या कालखंडात जन्मलेल्या सर्वांची रास रवि ज्या राशीत असतो ती असते. सहाजिकच जन्मतारिख व महिना माहीत असला की पाश्च्यात्य ज्योतिष पध्दतीत जन्मरास ठरविता येते. जन्मसाल माहीत नसले तरी चालते. ह्या फरकावरून समजते की चंद्रावर आधारित भारतीय ज्योतिष अधिक सूक्ष्मपणे वस्तुनिष्ठ, तसेच व्यक्तिनिष्ठ विचार करते. त्या तुलनेत, रविच्या भ्रमणावर आधारित पाश्च्यात्य ज्योतिष ढोबळ विचार करते.
आपले आयुष्य ही विशिष्ठ परिस्थितींत घेतलेले वा न घेतलेले निर्णय आणि त्यानुसार केलेली क्रुती वा न केलेली क्रुती ह्यांच्या परिणामांची अखंडीत श्रुंखला असते. परिस्थितीदेखिल नित्य नव्याने बदलत रहात असते. ह्या सर्व घडामोडींमागे आपले मन एखाद्या सारथ्याची भूमिका बजावत असते. मानवी मनावर चंद्रभ्रमणाचा यथोचित परिणाम होत असतो आणि प्रुथ्वीवरील समुद्राच्या भरती ओहोटीचा संबंध चंद्राच्या दररोजच्या भ्रमणावर अवलंबून असतो हे सर्वश्रुत आहे. आपल्या शरिरात सुमारे सत्तर टक्के पाणी असते. सहाजिकच चंद्रभ्रमण आपले विचार निर्णय व क्रुतीवर प्रभाव पाडत असते, हे ओघाने आले. ह्या विचारमंथनामुळे चंद्रभ्रमणाला केंद्रीभूत मानणार्या भारतीय ज्योतिषाविषयी मला कुतूहल वाटू लागले, त्यात तर्कशास्त्राला पटू शकेल असे तथ्य आहे.
जन्मरास व नक्षत्र आणि अवकहडाचक्र-
एकूण १२ राशी अशा आहेत:
१ मेष २ व्रुषभ ३ मिथुन ४ कर्क ५ सिंह
६ कन्या तुळा व्रुश्चिक धनु मकर कुंभ मीन
ह्या बारा राशी एकूण सत्तावीस नक्षत्रांमध्ये विभागल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक राशीत तीन नक्षत्रे असतात. सहाजिकच काही नक्षत्रांचे बाबतीत दोन वेगळ्या राशी संभवतात. प्रत्येक नक्षत्र चार चरणांचे बनलेले असते. नक्षत्र एक पण राशी दोन, अशी नक्षत्रे ही आहेतः
क्रुत्तिकाः मेष 1चरण व व्रुषभ 3 चरण
म्रुग- व्रुषभ 2 चरण व मिथून 2चरण
पुनर्वसु-मिथून 1 चरण व कर्क 3 चरण
उत्तरा-सिंह 1 चरण व कन्या 3 चरण
चित्रा-कन्या 2 चरण व तुळा 2 चरण
विशाखा-तुळा 3 चरण व व्रुश्चिक 1 चरण
उत्तराषाढा-धनु1चरण व मकर 3 चरण
धनिष्ठा-मकर 2 चरण व कुंभ 2 चरण
पूर्वाभाद्रपदा-कुंभ 3 चरण व मीन 2 चरण
पंचांगामध्ये अवकहडा चक्र हे ह्या पूर्ण राशीचक्राची साद्यंत माहीती दिलेली असते. प्रत्येक राशीचा स्वामी वर्ण वश्य तत्व, तसेच त्यामधील नक्षत्रांची नाडी गण योनी दिलेली असते. उदा-
मेष स्वामी मंगळ, वर्ण क्षत्रिय, वश्य चतुष्पाद आणि तत्व अग्नी. मेष राशीतील अश्विनी नक्षत्राची नाडी आद्य, योनी अश्व, गण देवगण.
नाडी व गण तीन प्रकारचे असतात. आद्य मध्य व अंत्य नाडी तर देव मनुष्य राक्षस गण असे तीन प्रकार. ही सर्व माहिती म्हणजे त्या त्या व्यक्तीचा लेखा जोखाच जणु असतो. विवाह जुळवताना गुणमेलन करताना ह्या सर्वांचा उपयोग असतो.
अवकहडाचक्राच्या कोष्टकाप्रमाणे पंचांगात गुणमेलनाचे मार्गदर्शन करणारे एक अत्यंत उपयुक्त कोष्टक दिलेले असते. वर आणि वधुची रास नक्षत्र माहीत असेल तर ह्या कोष्टकावरून त्यांचे किती गुण जमतात ते ताबडतोब समजते. विवाहासाठी मंगळदोष आहे की नाही ते पाहिल्यानंतर ह्या कोष्टकाचा उपयोग करून एकुण किती गुण जमतात ते काढले जाते. ही दोन्ही कोष्टके ज्योतिष अभ्यासाकरिता महत्वाची असतात. विवाह जुळविताना अठरा गुण जमावेच लागतात, त्यापेक्षा कमी गुण असले तर त्या पत्रिका जुळत नाहीत. मंगळदोष व गुणमेलन ह्यांचे संक्षिप्त मार्गदर्शन पुढे दिले आहे. त्याचा यथोचित अभ्यास करावा.
ह्यापुढील लेखांत जन्मलग्नपत्रिका व ग्रहांच्या महादशा ह्यांचा उहापोह करण्याचा मानस आहे, तसेच बाराही राशींची वैशिष्ट्यपूर्ण माहीती ह्यानंतर दिली जाईल. तिचाही अभ्यास व उपयोग करावा.
मंगळ दोष व गुणमेलन:
माझ्या ब्लॉगवर, ग्रहबदलानुसार, अनुकूल गुणांवर आधारित वार्षिक राशीभविष्य असलेल्या लेखाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विवाह जुळविताना मंगळ दोषाचा खूप बाऊ केला जातो. म्हणूनच मंगळ दोष आणि गुणमेलन ह्यांची अत्यंत उपयुक्त माहीती मी खाली देत आहे.

जन्मचंद्रराशी व नक्षत्र ह्यावरुन ती पत्रिका कोणत्या पत्रिकेशी जुळेल, ह्याचे कोष्टकही मी विकसित केले आहे. त्यामुळे घरच्या घरी आपण येणार्या पत्रिकांचे गुणमेलन करू शकाल. त्यामुळे आपला वेळ श्रम व पैसा वाचू शकेल.
गेली चाळीस वर्षे मी विविध मराठी मासिकांत माझे अभिनव राशीभविष्य लिहीत आहे आणि विवाह जुळणी व वैवाहिक सौख्य ह्या विषयी उपयुक्त सल्ला मी देत आहे.
र्वसामान्यांना जोतिषासंबंधी प्राथमिक व नित्योपयोगी माहिती क्रमवार देण्याच्या ह्या अभिनव उपक्रमाचा लाभ अधिकाधिक लोकांनी घ्यावा अशी इच्छा आहे.
धन्यवाद
सुधाकर नातू, माहीम, मुंबई१६
Mb 9820632655

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा