शनिवार, ६ डिसेंबर, २०२५

"सोमि'वरील माझे योगदान भाग 6 !":👍

👍"सोमि'वरील माझे योगदान भाग 6 !":👍 😁 " वाचाल, तर( च?) वाचाल !":😁 💐 "जी गोष्ट आपल्याला भावते, आवडते, आपल्याला करावीशी वाटते, ती करताना आपण आपले राहत नाही, आपले देहभान हरपते. माझ्या बाबतीत बोलायचे झाले, तर वाचन करायला मला आवडते आणि एखादे आत्मभान विसरून, आत्मसमाधान देणारे पुस्तक वाचायला मिळाले की, "याची देही याची डोळा स्वर्गसुख" मिळाल्याचा आनंद मला होतो. काळाचा महिमा अघाध आहे, आता आयुष्याच्या उतरंडीवर अशा तऱ्हेची एकापेक्षा एक 'जीवा-शिवा'ची भेट घडवणारी पुस्तके, पाठोपाठ वाचायला मिळणे, यासारखे सद्भाग्य नाही ! आणि वाचून झाल्यावर जे अनुभवले, जे रुचले, जे भावले ते असे इतरांसाठी व्यक्त करण्यासारखा मणीकांचन योग नाही ! ह्या पार्श्वभूमीवर नुकतेच एक वृत्त माझ्या वाचनात आले: "शालेय विद्यार्थ्यांचा वाचनाचा छंद किती आहे व त्यांना किती गोडी आहे यासंबंधीचे एक सर्वेक्षण नुकतेच करण्यात आले. त्यामध्ये दुर्दैवाने ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये वाचनाची आवड खूपच कमी विद्यार्थ्यांना आहे हे ध्यानात आले, तसेच ग्रामीण भागातीलही वाचनाची गोडी तितकीशी उत्साहवर्धक नव्हती." मोबाईल संस्कृती आणि तयार उत्तरे देणारी तंत्रज्ञानाची झेप यामुळे भावी पिढ्यांचे कल्पनादारिद्र्य वाढत जाईल आणि म्हणूनच त्यांचे भवितव्य कठीण आहे !":😭 @@@@@@@@@!@@@ 👍"साठवणीतल्या आठवणी !":👍 👍"5 वर्षांपूर्वीचा माझा 'फेबु'वरील संदेश !":👍 😭 "Is it writing on the wall?: बँक टू बेसिक्स?: 1 मालिका भरकटलेल्या, बातम्या काही दम नसलेल्या, चर्चा अर्थहीन आणि जाहिरातींचा अतोनात सुळसुळाट: ईडीयट बाँक्स बंद! रेडिओ चालस ! 2 सोशल मिडीयाच्या वापराचा अतिरेक, माणसा माणसांमध्ये दुरावा, कौटुंबिक शांती समाधानाचा भंग: स्मार्ट मोबाईल फोन बंद! प्रत्यक्ष संपर्काचा सुसंवाद सुरू. 3 आरोग्यासाठी हवे ताजे अन्न: शिळेपाके ठेवण्याचे गोडाऊन-फ्रिज बंद! मोदकपात्राची चलती. 4 बदलत्या जीवनशैलीपायी धोकादायक रोग टाळण्यासाठी: वाँशिंग मशीन, मिक्सर ग्राईंडर आदि ग्रुहोपयोगी गँजेटस् बंद ! रामा गडी व आपली मेहनत बरी !! 5 चढे इंधन दर, मर्यादित जागतिक इंधन साठा आणि ट्रँफीक जँम, प्रदुषणाचा विळखा: कार व टू व्हीलर्स बंद. सायकल आणि दोन पाय झिंदाबाद ! 6 शहरात नागरी सेवा सुविधांचा चुथडा, सिमेंट काँक्रीटीकरण आणि झोपडपट्ट्यांचा, प्रदुषणाचा विळखा, दूध उतू जावं तशी माणसांची गर्दीच गर्दी, घाईच घाई: चला खेड्यांकडे आणि बारा बलूतेदारीकडे ! 7 आणि आणि????: विकासाला खिळ पाडणारी अमर्याद लोकसंख्या म्हणून????: म्हणून मर्यादित आयुष्याचा कठोर कायदा???..."🤣🤣🤣 🤣 "एक वेदनादायी नोंद !":🤣 🙏🏽"एकेक पान लागले गळावयाला":🙏🏽 👍"आज सकाळी नाश्ता करताना मोबाईलवर फेसबुक सर्व्हिंग मध्ये पहिलीच पोस्ट डॉक्टर अच्युत गोडबोले यांची दिसली. त्यांचे आयआयटी मधील सहकारी आणि नंतरचेही अनेक वर्ष स्नेही असलेले आनंद करंदीकर यांच्या निधना निमित्त त्याने वाहिलेली ती श्रद्धांजली वाचून मन हळहळले. आनंद करंदीकरांसारखे सामाजिक बांध असलेले ऑल राऊंड गुणवंत आता आपल्यात नाहीत हे उमजून वाटून गेले की, "एकेक पान लागले गळावयाला !" माझ्या आनंद करंदीकरांसंबंधीची एक आठवण ताबडतोब मला आठवली. त्यांचे एक प्रकारचे आत्मचरित्रात्मक पुस्तक वाचून, मी तेव्हा अगदी भाराहून गेलो होतो. जेव्हा जेव्हा मला काहीही वाचलेले भावते, तेव्हा तेव्हा मी प्रत्येक लेखकाला काही ना काही प्रतिसाद देत आलो आहे. पण त्यांच्या पुस्तकाला मी दिलेला प्रतिसाद हा लिखित स्वरूपात नसून, तो मी ध्वनिफिती रूपात त्यांना व्हाट्सअप वर पाठवला होता ते स्मरले. अशा या सर्वांगीण कर्तृत्व सहजतेने करत राहिलेल्या मनस्वी माणसाला आदरांजली वाहत असताना, त्यांच्या कर्तृत्वाची तोंडओळख करून देणारी माझ्या प्रतिसादाची पुढील ध्वनिफीत उघडून जरूर ऐका... II ओम शांती ओम II II ओम शांती ओम II🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽 #################### आजच्या म्हणी: १. कथा कुणाची, व्यथा कुणा? २. डोंगर पोखरून ऊंदीर काढला! ३. केले 'तुका', झाले 'माका'! ४. ह्या 'गरीब' बिचार्या २०००रु. च्या नोटेला घेवून, सुट्टे देता कां कुणी सुट्टे? ५. नांव मोठे, लक्षण खोटे! ६. बैल गेला आणि झोपा केला. ७. आज उधार, उद्या रोख. ८. आंधळा मागतो ५००, देव देतो २०००. ९. असेल हरी, तर देईल एटीएमवरी! १०. लावली रांग, फिटले पांग, आहेत कां नोटा, सांग! ११. आमचा तो बाब्या, तुमचा तो पाग्या! -------------------- मी कुठल्याही पक्षाचा पाठीराखा नाही. जस जशा घटना घडत जातात, त्यांची, निरपेक्ष बुद्धिने, कार्य-कारणभाव ध्यानांत घेत, मी मीमांसा करतो. राजकारणाकडे मी, व्यक्ती आणि समूह ह्यांच्या अपेक्षा, धोरणे व अंमलबजावणीकडे पहाण्याची मानसिकता, हातावर पोट असणार्या आम आदमीसाठी बरोबर कां चूक आहे ह्यांचा विचार करून माझा संदेश 'सोमि' वर मांडतो. चर्चेला सामोरे जायचे जाणीवपूर्वक टाळून, अनावश्यक ठिकाणी विडीयोद्वारे संवाद साधण्यात भूषण मानणे, किंवा रा़ंगेमधील अश्राप जीवांच्या म्रुत्युकडे असंवेदनशीलतेने दुर्लक्ष करणे,परिस्थितीचे गांभीर्य लक्षांत न घेता होणारे, शाही विवाह सोहळे पाहिल्यावर, मोठ्या खेदाने मी माझ्या वेदना मांडतो. 'पार्टी विथ ए डिफरन्स' असे आपण कुणाला म्हणायचे हा आता मोठा प्रश्नच आहे!राज्यकर्त्यांनी आम जनतेकडे, कसे बघू नये, ह्याचा वस्तुपाठही मिळतोच आहे. चक्रव्यूहांत अडकलेल्या अभिमन्यूचीहि आठवण येते आहे! इत्यलम्!! ------------- १२/९ 'बदला'नंतरची आव्हाने: नित्य बदल, ही निसर्गांतील एकमेव स्थिर गोष्ट आहे. बदल म्हणजे जीवनांतील आव्हाने स्विकारायला लावणारी जीवंत प्रेरणा होय. सुयोग्य वेळी, विचारपूर्वक नंतरच्या संभाव्य परिणामांची रास्त दखल घेवून केलेला बदलच गतीमान विकास व प्रगती घडवत असतो. अवेळी, अविचाराने लादला गेलेला बदल पचविणे, जड जाते खरेच; परंतु अशाही वेळी प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेण्याचा शहाणपणाही अंगी येत असतो. नोटाबंदीच्या निर्णयानंतर निर्माण झालेल्या कष्टकारक अन्यायाकडेही ज्या सकारात्मकतेने सामान्य जनतेने संयम बाळगत प्रतिकूल परिस्थिती स्विकारली, तिला तोड नाही व त्यामधून गरजांचे व खर्चाचे योग्य ते प्राधान्य राखणे शिकत, काटकसरीचा, साध्या रहाणीचा मार्ग स्विकारला आहे. वायफळ नाहक खर्च टाळण्याचा कसोशीने प्रयत्न केला जात आहे. ३०डिसेंबर'१६ नंतर खरी परिक्षा 'नोटाबंदी'चा निर्णय घेणार्यांचीच असणार आहे. प्रथम ज्या उद्देशांसाठी हा कठोर निर्णय घेतला, त्यापैकी कोणती उद्दिष्टे कशी यशस्वी झाली त्यांचा प्रामाणिक लेखाजोखा जनतेला द्यावा लागणार आहे. सर्वांत महत्वाचे म्हणजे, जनतेने प्राधान्यानुसार उपलब्ध पैसा जसा सुयोग्य मार्गाने वापरण्याचा आदर्श दाखवला, तसाच सरकारही आता बँकांम़ध्ये जमा झालेला प्रचंड पैसा सर्व स्तरांतील जनतेच्या अपेक्षांनुसार वापरून 'अच्छे दिन'चे अधुरे स्वप्न आता तरी खरे करू शकते कां, त्याची कसोटी लागणार आहे. शिवाय उपयोगांत आणला जाणार्या पैशाची मध्येच 'भ्रष्टाचारी गळती' न होता, त्यांतील पै अन् पै अंतिम लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल ह्याची काटेखोर दक्षता सरकारला घ्यावी लागणार आहे. घोडामैदानही आता फार दूर नाही. 'सुदिना' ८/१२/'१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा