शुक्रवार, ५ डिसेंबर, २०२५

" मल्लिनाथी भाग 3 !":

👍"मल्लिनाथी !":👌 😚 "गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रात अनेेक खळबळजनक आणि वेदनादायी अशा सामुहिक गद्दारी, पक्ष फोडी, अशा तऱ्हेच्या अनेेक अनाकलनीय घटना घडत राहिल्या. आमदार अपात्रतेचा आणि पक्षांच्या चिन्हांचा कुठलाही न्यायनिवाडा न होता, निवडणुकही झाली. परंतु राक्षसी बहुमत मिळून सरकार स्थापन झाल्यापासून जवळ जवळ दररोज नीतीमत्तेचे धिंडवडे ऊडवणार्या एकापेक्षा एक मान खाली घालवणार्या घटना घडत आहेत. लाज, शरम वाटेनाशी झाली आहे. अशा पार्श्वभूमीवर शासन प्रमुखांच्या आणि नेत्यांच्या उठसूठ जणू टॅक्सीने बांद्रा-मंत्रालय, मंत्रालय-बांद्रा अशा मुंबई-दिल्ली, दिल्ली -मुंबई, विमानाने ज्या वाऱ्या चालल्या आहेत, आधीच महाराष्ट्र राज्य कर्जबाजारी असूनही, या वाऱ्यांचा खर्च कोण करतो, कुठे आणि कसा नोंदवला जाणार आहे माहित नाही ! परंतु एकीकडे जर 'डिजिटल इंडिया' करायच्या वार्ता चालल्या असल्या, तर नेत्यांनी असे प्रत्यक्ष भेटण्याऐवजी, व्हिडिओ मीटिंगज् घेता येणार नाहीत कां ? त्यामुळे वेळ, श्रम आणि पैसा यांचा योग्य तो विनियोग होणार नाही कां? उगाचच नेत्यांच्या बिचाऱ्या तंगडतोडीला तरी आळा घालता येणार नाही कां ?":😚 ------ टोका'ची भूमिका घेणे, हे, सत्तेचा 'गुळ' न सोडता आल्यामुळे विसरले, करून करून भागले अन् 'देव' पुजेला लागले'! ----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा