सोमवार, ३ नोव्हेंबर, २०२५
" सोमी'वरील मुक्तसंचार !":
[23/10, 8:44 AM] Sudhakar Natu: 👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच!:👌
👍" हृदयसंवाद-वाचा फुला आणि फुलवा !":👌
" अभिवाचन क्रमांक 411 !":
💐" बेताल
विधीनिषेधशून्य
वाचाळवीरांचे सध्या पिक
आले असताना, वाचन संस्कृती लयाला जात असताना आणि
प्रतिभासंपन्न लेखन दुर्मिळ होत असताना, शब्द विचार वाचन, भाषाशैली आणि लेखन या
पंचपरमेश्वरांसंबंधी
श्री सुधाकर नातू यांच्या संग्रहातील हा "हृदयसंवाद" आपल्यालाही अंतर्मुख करून जाईल.
चांगलं लेखन करता येण्यासाठी, पुष्कळ
वाचायला हवं. उत्तम साहित्य हे विलोभनीय अनुभवांचं प्रकटीकरण असतं. अशा साहित्यातून संस्कृती घडत जाते. शब्द विचार आणि अनुभव त्यात प्रतिभा मिसळली की, वाचनीय साहित्य बनू शकते. कसे? त्यासाठी...
पुढील लिंक उघडा...
https://youtu.be/y5yXVszsF2Y?si=uw2JlS5NjXJV1OxT
[23/10, 8:46 PM] Sudhakar Natu: 😇 "इकडे तिकडे वाकडे तिडके !":😇
😭 "कुठेतरी काहीतरी चुकतंय !":😭
II विकसित भारताची स्वप्ने II
II ही तर चकवणारी खेळी II
[23/10, 10:21 PM] Sudhakar Natu: https://moonsungrandson.blogspot.com/2025/10/my-date-with-meta-ai.html
[24/10, 8:06 AM] Sudhakar Natu: "मुक्तसंवाद- बोलायचं
कुणाशी किती कसं कां कुठे तेव्हा ?":
त्यासाठी पुढील लिंक उघडा....
https://youtu.be/mtGLEl3h-rg?si=PuqGtyXUYseZC3GU
[25/10, 3:30 PM] Sudhakar Natu: " इकडे तिकडे वाकडे तिडके !":
" कुठेतरी काहीतरी चुकतंय !":
" अध:पाताच्या धोक्याच्या घंटांचा ठणठणात वाजताय !":
[25/10, 3:54 PM] Sudhakar Natu: " इकडे तिकडे वाकडे तिडके !":
" कुठेतरी काहीतरी चुकतंय !":
" अध:पाताच्या धोक्याच्या घंटांच्या ठणठणात,
माणसांचे राक्षस बनतायत !":
[25/10, 4:22 PM] Sudhakar Natu: https://youtube.com/shorts/864DUlAINJk?si=rSGenu9YkZ61hdsQ
[25/10, 5:51 PM] Sudhakar Natu: "साठवणीतल्या आठवणी भाग 3 !":
मी जिथे जन्माला येतो आणि नंतर जिथे जिथे माझे वास्तव्य झाले, त्या गावांचे वा शहरांचे, माझ्या आयुष्याच्या जडणघडणीत, प्रगती वा अधोगतीचा काय संबंध, याचा थोडक्यात मी घेतलेला आढावा जरूर पुढील ध्वनिफीत उघडून ऐका.
आपणही तशाच तऱ्हेचे, तुमच्या आयुष्यातील वास्तव्यस्थळांचे अवलोकन करून पहा....!":
[26/10, 9:10 AM] Sudhakar Natu: 👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच!:👌
👍"आहे मनोहर तरी-भाग 49 !":👌
" अभिवाचन क्रमांक 412 !":
💐"ह्या आत्मचिंतनात्मक भागात श्रीमती सुनीताबाई देशपांडे यांनी, वैविध्यपूर्ण बहुरूपी असे सर्वांगीण कौशल्ये असणारे, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेले त्यांचे पतीराज 'पुल- उर्फ भाई यांचा परिचय झाल्यापासून त्यांच्या परस्परसंबंधाची वाटचाल कशी फुलत गेली, त्यापूर्वीच्या विद्यार्थी दशेत राष्ट्रसेवेची उर्मी
सुनिताबाईंनी कशी अनुभवली, याशिवाय रत्नागिरीमधील कौटुंबिक नातीगोती आणि घरातले वातावरण कसे होते, याचा मनमोकळेपणाने उलगडा केला आहे.
ह्या संस्मरणीय अभिवाचनासाठी वाचकस्वर दिलेल्या अनामिकेचे आभार.
ऐकण्यासाठी पुढील लिंक उघडा....💐
https://drive.google.com/file/d/12D8wZFamjUmWwahH6pSCMHrVhQVhXElD/view?usp=drivesdk
[26/10, 9:17 AM] Sudhakar Natu: 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍" स्वरानंद 126 ! ":👌
💐 "आनंदमयी दीपोत्सवाच्या साजरा केल्यानंतर आता, पुढील लिंकस् उघडून सुमधुर गीते श्रवण करा:
1 काल पाहिले मी स्वप्न खरे.....
https://youtu.be/Vmo_nV_BYNw?si=AWfBP4ImFxyS5qMJ
2 देव जरी मज कधी भेटला.....
https://youtu.be/gp55sRf1Dcg?si=J5jSEedWXkrsOB3Q
3 चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा....
https://youtu.be/5YcUC7M82vw?si=ne_3JZh0OVwyCB99
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
[26/10, 12:33 PM] Sudhakar Natu: 😆" कधी मधी अमृतकाळी सुचलेले !":😆
😀 "झी टीव्ही मराठी वर दोन भाग आधीच प्रचंड गाजून गेलेल्या
आता तिसरे पर्व
"देवमाणूस मधला अध्याय !"
या सध्या गाजत असलेल्या मराठी मालिकेमध्ये, इन्स्पेक्टर जामकर हे पात्र त्याच्या प्रवेशावेळीच अंतरंगी, इतरांना धक्का देणारे वा चक्रावून टाकणारे विचार बोलत असते. त्यामुळे समोरचे सारे गर्भगळीत होतात, त्यांना, विलक्षण भीती वाटते ! नंतरचे थोडा वेळ गेल्यावर त्याचे उद्गार असे:
" विनोद केला असाच विनोद मी अधून मधून करत असतो !"
तसं मला कधीमधी पहाटे अमृताकाळी जाग येऊन अधून मधून अफलातून विचार अवचितपणे सुचतात. नुकताच मला पहाटे त्यावेळी मनात आलेला मुद्दा असा:
"द ग्रेट इंडियन ××× सर्कस !"
अशा पूर्वी सर्कशींच्या जाहिराती असत.
तसंच सध्याचा वीट आलेल्या राजकारणाच्पा चिखलातील
वाचाळवीरांचा माहोल पाहता म्हणावेसे वाटते...
" द ग्रेट महाराष्ट्र राजकीय कॉमेडी सर्कस !":🤣
[28/10, 7:44 PM] Sudhakar Natu: 👍" वाचता वाचता वेचलेले, भावलेले!":👌
😇 "कुठलाही शब्द हा काही ना काही तरी मनातील भावनांचा उलगडा करणारा असतो. पण मला असे विचार करायला लावण्यासाठी एक कारण घडले ते म्हणजे मी सध्या डॉ. अंजली कीर्तने यांनी लिहिलेल्या 'आठवणींचा पायराव- हे पुस्तक वाचत आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या जीवनात विशेषत: साहित्यिक वर्तुळात आलेल्या अनेक दिग्गजांच्या संबंथी अनुभवांच्या आधारावर शब्दभावना अप्रतिमपणे मांडल्या आहेत. साक्षेपी दिग्गजांविषयी संपादक श्री पु भागवत आणि
ज्ञानपीठ विजेते प्राध्यापक विंदा करंदीकर
यांच्या संबंधित मनाला भिडणारी शब्दशिल्पे मी नुकतीच नुकतीच वाचली. त्यामधील विंदांनी पत्रातून त्यांंच्या 'विरूपिका' या काव्यसंग्रह संबंधी
व्यक्त केलेल्या अर्थवाहित्व' ह्या शब्दांने माझे लक्ष वेधले.
तसे करताना मला उमजले की, मराठी भाषेत असेच आगळे वेगळे पण अर्थपूर्ण शब्द असतात. त्यातीलच तशाच घाटाने जाणाऱ्या माणसाबद्दल एक अफलातून शब्द मी आठवू लागलो. परंतु काही केल्या तो मनात येईना. 'अ' पासून सुरुवात एवढे फक्त जाणवत होते. विंदांच्या '
'अर्थवाहित्व' या शब्दाने मला दिशा दाखवली. 'अर्थवाहित्व' म्हणजे असा एक शब्द, जो आपल्या मनात जी अर्थाबद्दल प्रतिमा आहे तिच्याशी अचूक मिळता जुळता असा चपखल शब्द ! अचानक वीज चमकावी तशी मी स्मरणशक्तीला ताण देऊन आठवत असलेला शब्द समोर आला:
'अतरंगी' !":😇
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा