moonsungrandson
रविवार, १४ डिसेंबर, २०२५
"अरे वेड्या मना, कां तळमळशी !":👍
👍"अरे वेड्या मना, कां तळमळशी !":👍
🤣 "सध्या सुरू करण्यास स्पर्धेमुळे आणि वाढत्या अपेक्षांमुळे, जीवनशैली ताणतणावाची संघर्षाची मतभेदांची झाली आहे. त्याचा परिणाम माणसाच्या आरोग्यावर होतो आणि त्याला ब्लड प्रेशर डायबिटीस किंवा मानसिक नैराश्य अशा सारख्या त्रासाला अन आरोग्याच्या वेगवेगळ्या प्रकारांना तोंड द्यायची वेळ येते कारण काय तर पहिलं कारण म्हणजे आपल्याला जे अपेक्षित असतं त्याला अनुसरून आपण कृती करत असतो आणि त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळत असतो परंतु हे करत असताना आपल्याला इतरांच्या बरोबरी संपर्क येतो आणि प्रत्येकच व्यक्ती वेगळी असल्यामुळे तिच्यापेक्षा तिच्या एकंदर त्यासाठी करायची कृती यांचा एकमेकांशी संघर्ष निर्माण होऊ शकतो आणि बऱ्याच वेळेला मनाविरुद्ध असं व्यावसायिक जीवनात किंवा कौटुंबिक जीवाला करावं लागतं.
आपण येथे व्यावसायिक जीवनाचा विचार नंतर करू शकतो. कौटुंबिक जीवनात विशेषता निवृत्तीनंतर ही वेळ अनेक वेळा येत असते जवळजवळ 24 तास एकत्र असतात त्यापूर्वी जर पुरुष एकटाच जरी नोकरीला असला त्या व्यवसायात तरी दिवसांचे बरेच तास तो बाहेर असतो आणि त्या मानाने दोघांनी एकत्र असण्याचे प्रसंग तासांच्या वेळ विचार करता खूपच कमी असतात त्यामुळे त्या काळामध्ये तेवढे मतभेद जरी झाले तरी त्यांचे प्रमाण कमी असू शकते.
वयाच्या साठीनंतर जेव्हा ज्येष्ठ दांपत्य एकत्र राहायला लागतं तेव्हा सलोख्याने एकमेकांना सांभाळून वागायचं असं दोघांनाही वाटलं तर त्यांच्यामध्ये कुठल्याही तर्हेचे मतभेद होऊ शकत नाहीत. एकमेकांना एकमेकांची जी काही उणीदुणी बाजू असेल त्या बाजूला स्वीकारून त्या व्यक्तीच्या चांगल्या प्रेरणादायी गुणांचा आणि विशेष शक्ती यांचा विचार करून प्रोत्साहन देणे आणि नकोसे आपल्याला न पडणाऱ्या गोष्टींना शक्यतोवर विसरून जाणे अशा तऱ्हेची समजूतीची धारणा ज्या संपत्त्यामध्ये राहते त्यांचे त्यामानाने आयुष्य पुढे सुलभ जातं.
परंतु होतं काय की पुष्कळदा एखादं तरी व्यक्तिमत्व याबाबतीत स्त्रियांचं प्रमाण बहुदाा अधिक आहे आणि त्यामुळे त्यांचा त्रागा, त्यांची कधीही आपल्याला काही कोणी बोललं तर ते आपल्या विरुद्धच काहीतरी कारस्थान करतात असा दृष्टिकोन होऊन त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात. अशा वेळेला सहसा एखाद्या संबंधित डॉक्टरकडे जाण्याची तयारी नसते. आता त्यामानाने ते प्रमाण कसं कमी होत चाललंय लोकांना कळून चुकलं की आपल्याला जर काही मानसिक त्रास शहर Anxiety किंवा ड्युअल पर्सनॅलिटी अशा विविध प्रकारच्या त्रासांना तोंड देण्याची वेळ येत असेल तर आपण काहीतरी मार्ग शोधून डॉक्टर कडे जाणे आवश्यक आहे असं हळूहळू समाजामध्ये झिरपत चाललंय. त्यामुळे पूर्वी कोणीच जाण्यास टाळाटाळ करत असे त्या मानाने आता तेथे उलट मानसिक समस्या हाताळणाऱ्या डॉक्टरकडे रिघ लागते.
रूग्णाला जे संतुलन रासायनिक संतुलन मेंदूमध्ये करायला हवं ते शोधण्याचा प्रयत्न ते डाॅक्टर करतात.
पण होत काय, संबंधित पेशंट त्याप्रमाणे सुचवलेली औषधे घेत नाहीत ह्या कारणामुळे त्यांच्यात तेवढी काही सुधारणा होत नाही आणि अधिकच तर विकोपाला जाऊन शेवटी
Dementia Alzomir Scezenofrenia
यासारखे प्रकार वाढत चालले आहेत. त्यामुळे अशी व्यक्ती कुटुंबामध्ये खरोखर ताण तणाव तर निर्माण करतेच पण शांतता समाधान यालाही त्यामुळे मूठ माती देवू शकते. नाहीतर सुबत्ता असते, तरी ही माणसं दुःखी असतात आणि आपल्याबरोबर इतरांनाही दुखी करतात. सतत बडबडीचा चिडचिडीचा तारस्वरामध्ये जो काही त्यांचा आक्रोश निर्माण होतो, तो सबंध त्या कुटुंबाला हैराण करतो. विशेषतः जोडीदाराची खरोखर कोंडी होते आणि त्याला स्वतःला सांभाळणं कठीण होत जाते. आपली दुःख इतरांकडे व्यक्त करून कितपत योग्य ते समजत नाही आणि त्याचे परिणाम तब्येतीवर होऊ शकतात. काही उपयोग नसतो कारण ही व्यक्ती व्यक्ती स्वतः काय करेल याचा नेम नसतो. पीडित व्यक्तिञएकटी राहिली तर ती काय करेल याचा नेम नसतो. त्यामुळे जोडीदाराला त्याच्या साऱ्या दुःखाबरोबर मन मारून जगायला लागते !":🤣
शनिवार, १३ डिसेंबर, २०२५
" सोमि वरील माझ्या योगदानाची सरमिसळ भाग दोन
👍"असेही एक रंगदर्शन !"😢
😊 "कथा कुणाची, व्यथा कुणा !!"😢
किंवा
👍"केली बेफिकीरी, नुकसान लै भारी !"😢
खूप दिवसांपासून जे नाटक पहाण्याचा योग कर्मधर्मसंयोगाने येऊ शकला नव्हता, तो आज येऊ घातला खरा, पण झाले विपरीतच ! तो अनुभव येथे मांडत आहे:
"Book my show साईटवर जाहिरातीची लिंक आपण जेव्हा उघडतो, तेव्हा उघडणार्या फोटोप्रमाणे, नाटकाचे स्थळ बालगंधर्व नाट्यग्रुह व १३ एप्रिल'२२ ही तारीख फक्त दिसली. परंतु नाटकाची वेळ नाही. ती book ही लिंक उघडल्यावर न पहाता दोन तिकीटे बुक केली गेली. दुर्दैवाने नाटकाची वेळ चक्क रात्री साडेनऊ आहे हे मात्र समजल्यावर पायाखालची वाळूच घसरली.
पश्च्यातबुद्धी अशी की, नाटकाची वेळ आधीच समजणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे पुढे तिकीट आरक्षित करावयाचे की नाही ते ठरवता येऊ शकते. वरील नाटकाची वेळ रात्री साडेनऊ ही गोष्ट न ध्यानात घेता दोन तिकीटे बुक केली गेली. पुण्यातील आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना ज्यांचे स्वतःचे वहान नाही, त्यांनी हे नाटक सुटल्यावर मध्यरात्री घरी कसे जायचे ! त्यात दुर्दैवाने book my show वर तिकीटे रद्द करावयाची सोय नाही.
तेव्हा नाट्यप्रयोगाची वेळ, स्थळ, तारीख ह्याचबरोबर त्यांनी न चुकता द्यावी, अन्यथा तिकीट रद्द करण्याची सुविधा (योग्य ती रक्कम कमी करुन) द्यावी अशी कळकळीची विनंती करणेच फक्त आमच्या हातात आहे. बावधनहून ह्या नाटकाला आम्हा दोघांना जाता येणे केवळ अशक्यच आहे. अक्कलखाती पैसे वाया गेले दुसरे काय ?
ह्यापुढे book my show च्या फंदात न पडणे उत्तम, कारण नाट्यग्रुहावर phone booking फक्त वीस रूपये एका तिकिटामागे सेवाशुल्क आकारले जाते, तर book my show साठी त्याच्या जवळजवळ दुप्पट आकारले जाते.
अखेर "कथा कुणाची, व्यथा कुणा" असा अनुभव म्हणायचा दुसरे काय !
############
# 😢"घडलेलं बिघडतंय !":😢
"घोटाळ्यांमागून घोटाळे, हा अडचणीत, त्याच्या अडचणीत वाढ, हा जेलमध्ये तर अमके तमके लौकरच जाणार जेलमध्ये इ.इ. शिवाय सध्या कोणत्याही बातम्या सहसा प्रसार माध्यमातून प्रसारित होत नाहीत.
नितीमत्ता खुंटीला बांधून ठेवली आहे बिचारी. अजून किती खोलवर रसातळ गांठणार कोण जाणे. सरळमार्गी सज्जन माणसांनी अशा वेळी करायचे ते काय? म्हणूनच इतर कोणत्याही क्षेत्रात प्रवेशासाठी जशा CET अनिवार्य असतात, त्याचप्रमाणे राजकारणात येण्यासाठी, लोकसेवक पात्रता स्पर्धात्मक परिक्षा अनिवार्य कां करू नये ?"
######==
" सोमि वरील माझ्या योगदानाची सर मिसळ
👍 चारदोत्सव--अनुभवाचे बोध !":💐
'Beauty, lies in the eyes of the beholder':
एका नांवाजलेल्या लेखकाचे, तितकेच प्रसिद्ध पुस्तक, मोठ्या हौसेने मी घेतले आणि वाचायला लागलो, तेव्हाच माझ्या ध्यानात आले की, त्यांतील मजकूर खूपच लहान फाँट वापरून छापला आहे. हळुहळू ते पुस्तक चाळताना, मला उमगलं, की त्यामधील विषय आणि मुद्देही आता कालबाह्य झाले आहेत. शेवटी तर, समजून चुकले की, जुन्या काळी गाजलेले, केवळ त्याच्या नांवावरून हातात घेतलेले, हे पुस्तक मी नेट लावून जिद्दीने जर वाचले, तर माझे डोळे निश्चितच बिघडतील. म्हणून, नाईलाजाने मी पुस्तक वाचणे बंद केले आणि शांतपणे डोळे मिटून पडलो.
माझी निवड चुकली, ह्याचा विषाद आणि मनस्ताप व्हायला लागला. पण, अचानक मनात वीज चमकली आणि मला साक्षात्कार झाला की, आपली ही चूक क्लेशकारक तर खरीच, पण आपल्याला ती, अशी चटकन् ध्यानात येणे, हे तर किती तरी फायद्याचेच नव्हे कां?
तथ्यांश हा की, 'नांव' होणे' हे शेवटी कालसापेक्ष असते; कोणतीही निवड वा निर्णय साधक बाधक विचार करूनच घ्यावा; आणि सर्वांत महत्वाचे हे की, काहीही घडले, तरीसुध्दा अंतिमत: ते आपल्या हिताचेच असते, फक्त त्यासाठी आपली द्रुष्टि यथार्थपणे बदलायला हवी!
सुधाकर नातू
//////
प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे !":👌
Looking Back and Forward":
With just around few hours to pass behind, the New Year 2023, is eager to usher in. From 'Known' to 'Unknown' this Journey of Life would go on..and on, what remains is your treasure of experience.
After the never ever horrible & the most challenging experience of combatting the threats of Covid19 pandemic in the year 2020 & 2021, the year 2022 has brought in flow of Hope, teaching us the art of Living. However dark shadows of likely repeatition of sorrows and setbacks of a possible Corona wave looming large on the horizon, with a mixed feelings, I am wishing one & all a Happy New year 2023.
I wish to be different & share the thoughts in my mindset as follows:
"The Learning lessons are":
# Never ever lose hope, Stay Firm ferociously, watch and experience the Bad & Good times with more equal zeal and a balanced mind.
# Do have a definite Goal/s all the time & attempt with your total commitment to achieve, come what may. This is because this process is the best triggering tool for Self Motivation & Satisfaction, possibly adding additional time to your Life.
# But Do learn to adapt and gracefully accept the 'outcomes' as and when they come.
# Moderation is the 'Key' in every such step, for a healthy, smooth passage of this 'really a once in a Life time journey.
# Remember your Life is only, repeat only yours and no one else's and that 'Time' is irreversible and the most precious gift to you. Hence, learn to Use it in such a way, that your life becomes meaningful and Best lived for'.
Finally,
and frankly all the above is to remember that some-one, some-where cares for you, is with you to understand & support you. Therefore
Let’s join minds to welcome the New Year with all our strength & determination ! 👌👌💐💐🎂🎂
""सध्याच्या स्पर्धात्मक जीवनामध्ये सातत्याने प्रयत्न करत राहणे, नवनवीन काही ना काही शिकत राहणे, आणि जे जे चांगले आहे, उपयुक्त आहे ते वेचत राहणे हा मंत्र देणारा, हा व्हिडिओ तुम्हाला देखील प्रगतीचा नवा मार्ग दाखवेल....!":👌
हा विलक्षण प्रेरणादायी व्हिडिओ पहाण्यासाठी......
ही लिंक उघडा.......
https://youtu.be/gbli_FpSAHM
विडीओ आवडला......
तर वरील लिंक शेअरही करा......
" नियतीचा संकेत- शनीची साडेसाती
👍"नियतीचा संकेत-१० !":👌
☺️"शनिमहात्म्य”:😊👌
😢"शनीची साडेसाती !":😢
✴ साडेसाती म्हणजे काय? गोचरीचा शनि जेव्हा भ्रमण करताना तुमच्या कुंडलीतील जन्मस्थ चंद्राच्या मागे ४५ अंशावर येतो, म्हणजेच तुमच्या राशीच्या मागील राशीत येतो, तेव्हा साडेसाती सुरू होते व ४५ अंश जन्मस्थ चंद्रा पुढे शनि जाईपर्यंत, म्हणजेच तुमच्या राशीच्या पुढील राशीनंतर येणार्या राशींत जातो,तोपर्यंत साडेसाती असते.....
उदा: सध्या मकर राशींत शनी आहे, म्हणून आता धनु व मकर कुंभ राशींना साडेसाती आहे. शनी कुंभेत जेव्हा प्रवेश करेल-१७/१/'२३, तेव्हा धनु राशीची साडेसाती संपेल.
✴मेष▪दिनांक २९ मार्च २०२५ रोजी सुरु होईल व दिनांक ३१ मे २०३२ रोजी संपेल.
✴वृषभ▪ ३ जुन २०२७ रोजी सुरु होईल व दिनांक १३ जुलै २०३४ रोजी संपेल.
✴मिथुन▪८ अॉगष्ट २०२९ रोजी सुरु होईल व दिनांक २७ अॉगष्ट २०३६ पावेतो.
✴कर्क▪ ३१ मे २०३२ रोजी सुरु होईल व दिनांक १३ जुलै २०३९ पावेतो.
✴सिंह▪ १३ जुलै २०३४ रोजी सुरु होईल व दिनांक २६ सप्टेबर २०४१ पावेतो.
✴कन्या▪२७ अॉगष्ट २०३६ रोजी सुरु होईल व दिनांक ३० अॉगष्ट २०४४ पावेतो.
✴तुला▪ १० सप्टेंबर २००९ रोजी सुरु झालेली असुन दिनांक २६ ऑक्टोबर २०१७ रोजी संपेली.
✴वृश्चीक▪५ नोव्हेंबर २०११ रोजी सुरु झालेली असुन दिनांक २४ जानेवारी २०२० रोजी संपेली.
✴धनु▪ २ नोव्हेंबर २०१४ रोजी सुरु झालेली असुन दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी संपेल.
✴मकर▪२६ जानेवारी २०१७ रोजी सुरु झालेली असुन दिनांक २९ मार्च २०२५ रोजी संपेल.
✴कुंभ▪२४ जानेवारी २०२० रोजी सुरु व दिनांक २३ फेब्रुवारी २०२८ पावेतो.
✴मीन▪२९ एप्रिल २०२२ रोजी सुरु व दिनांक १७ एप्रिल २०३० पावेतो.
(👍चुक भूल, द्यावी घ्यावी.)
माझा अनुभव असा आहे की, कोणाच्याही आयुष्यात तीनदाच साडेसाती येते व माणूस ८५ वर जगला तर चौथी साडेसाती येऊ शकते जर त्याला जन्मतःच साडेसाती असेल तर.
🛑 तुमची तुमच्या साडेसातीच्या वेळी जी महादशा चालू असते त्याला फार महत्व आहे व दुसरे म्हणजे तुमच्या कुंडलीत जन्मस्थ चन्द्र जर बिघडलेला असेल व चन्द्राचा जवळपास रवी असेल तर शनि त्या दोन्ही ग्रहाना त्रास देतो . चंद्र म्हणजे मन आणि रवि म्हणजे आत्मा. हया दोन ग्रहाना छळणे म्हणजे साडेसाती.
शनीची छोटी साडेसाती:
ही झाली मुख्य शनीची साडेसाती. ह्या शिवाय शनी जेव्हा आपल्या चंद्रराशीपासून चौथ्या किंवा आठव्या स्थानी असतो, तेव्हा शनीची छोटी साडेसातीचा काळ असतो. चौथ्या स्थानी शनी असेल तर मानसिक सौख्य बिघडू शकते अथवा स्थावरविषयक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तर आठवा शनी नुकसान, अपयश, अपघात, आरोग्याचे गंभीर प्रसंग निर्माण होऊ शकतात.
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
वयोमानामुळे वैयक्तिक पत्रिका बघून सल्ला देणे मी आता बंद केले आहे. त्यामुळे त्याकरिता संपर्क साधू नये ही विनंती.
""आजचा मुक्तसंवाद-आजचा प्रश्न असा आहे की वर्तमानपत्र हवीतच कशाला? :
👍""आजचा मुक्तसंवाद!":👌
💐"आजचा प्रश्न असा आहे की वर्तमानपत्र हवीतच कशाला? कां, ते सांगतो:
दररोजची सकाळ वर्तमानपत्र वाचनाने होते. पण चंगळवादाचा अतिरेक होत असताना, आजची वर्तमानपत्रे ही
समाजाभिमुख न होता व्यवसायाभिमुख
प्रचारपत्रे होत चाललेली दिसतात.
वर्तमानपत्राच्या पृष्ठांची वाढ अतोनात झाली खरी. परंतु त्यामध्ये जाहिरातबाजी जवळजवळ 50 ते 60 टक्के इतकी, 20 ते 25 टक्के नकारात्मक 'कुठेतरी काहीतरी चुकलंय', अशा सध्याच्या भ्रष्टाचारी माहोलाची सतत आठवण करून देणाऱ्या वृत्तांनी व्यापलेली, साहजिकच चिमूटभर सकारात्मक, मार्गदर्शक प्रेरणादायी मजकूर असल्याने आजचा प्रश्न असा आहे की,
👍"वर्तमानपत्र हवीतच कशाला ?":👍
🤣 "कालाय तस्मै नम"!: 🤣
😇 "दुसरे काय !":😇
👍 " दररोजच्या पैकी जवळ जवळ अधिक वेळ केवळ वर्तमानपत्र वाचून त्यावरील बऱ्या वाईट वाईट जास्त वृत्तांबद्दल योग्य ती प्रतिक्रिया शब्दरूपात करत ती समाज माध्यमांवर निवडक संदेशांद्वारे पाठवण्यात जात असे. साहजिकच नकारात्मक अशा विचारांची भाऊ गर्दी मनात साठवली जात असे. आज जाऊन साक्षात्कार झाला आणि लक्षात आले की मी माझी मर्यादित उपलब्ध विचार क्षमतेची व कल्पनाशक्तीची ऊर्जा नाहक वाया घालवत आहे.
शिवाय ध्यानात आले ते असे:
स्वातंत्र्यपूर्व काळात आणि नंतरही बहुदा अर्थव्यवस्था खुली होईपर्यंतच्या काळात वर्तमानपत्रे ही निश्चितच समाजाभिमुख असत त्यातून स्वातंत्र्यपूर्व काळात तर पूर्णपणे समाजहित राजकीय जागृती स्वातंत्र्यासाठी आणि त्या दृष्टीने , अनेक समाज दुर्णांनी व थोर व्यक्तीने स्वतः पुढाकार घेऊन वर्तमानपत्रे काढली हा इतिहास विचारता येणार नाही.
ह्यामुळे सध्याच्या स्थितीतील वर्तमानपत्रे हवीतच कशाला हा प्रश्न आणि त्यावरील माझा आजचा मुक्तसंवाद म्हणूनच निर्माण झाला.
आपणही ही पार्श्वभूमी जरूर ज्ञानात घ्यावी.
ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांची प्रतिक्रिया व त्यांच्या मनातील स्पंदने, विचार शब्दरूपात येथे व्यक्त करावीत अशी विनंती !":👍
👍"आजच्या विचारा-वर्तमानपत्र हवीत कशाल? :
दाद प्रतिवाद !":👍
🙏. 🙏 " ह्या उपक्रमाची निवडक व्यक्तिंनी घेतली दखल, यासाठी आभार. आपले प्रतिसाद हे बिंब व प्रतिबिंब न्यायाप्रमाणे दुसर्या बाजू दर्शवितात. आजचा विचार या संकल्पनेचा मूलभूत हेतू तोच आहे. समाज माध्यमांवर नुसती नजर न फिरविता त्याची जेथे आवश्यक आहे तेथे दखल घेऊन प्रतिसाद देत राहणे याच्यातूनच विचारमंथन होऊन, महत्त्वाच्या प्रश्नांना वाचा फूटू शकते.
नकारात्मक बातम्या आणि जाहिरातींचे पिक यामुळे वर्तमानपत्र नकुशी वाटणे हे जरी साहजिक असले तरी त्याला जबाबदार फक्त वर्तमानपत्रांना धरता येणार नाही कारण तेही समस्त लोक समूहाचे व्यावहारिक जगत असे भाग आहेत.
ब्रेन ड्रेन विषयी पुष्कळ काही बोलले गेले आहे प्रथम मध्यपूर्वेला आणि नंतर प्रगत अशा पाश्चिमात्य वापरात्य देशांमध्ये बरीच तरुण मंडळी आपले भवितव्य उज्वल करण्यासारखी साठी जात राहिली हे वास्तव आहे त्यांतील प्रगत देशात सर्वसाधारणपणे बुद्धिमान आणि कर्तबगार उच्च शिक्षित व्यक्ती तिकडे जाऊन भारतात स्वप्नातही विचार करता येणार नाही अशा तऱ्हेची श्रीमंती उत्तरोत्तर मिळवत राहिले. त्यांच्या भारतभेटी मुळे तिकडच्या सुबत्त्याची आणि सुख साधनांची सहज ओळख इथल्या समस्त समाजाला होत राहिली त्यात मुक्त अर्थव्यवस्था 1991 मध्ये सुरुवात झाली आयटी बूम देखील आत्याच्या आसपासच येत राहिले त्यामुळे चंगळवादाची लॉट साऱ्या समाजाला व्यापून राहिली आणि पैसा हेच सर्वात पैसा हेच प्रतिष्ठेचे आणि सुख साधनांचे मूळ अशी धारणा होत गेल्यामुळे जनसामान्यांच्या आकांक्षा वाढत गेल्या आणि प्रत्येकाला कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त कमाई याचे वेड लागले भ्रष्टाचार जो फोफावला तो आधीपासून थोडाफार होता पण नीतिमत्तेची जाड होती. साहजिकच गेल्या दोन-तीन दशकात सारा माहोल हा बिघडून गेला जाहिरात बाजीला ऊत आला. वर्तमानपत्र चालवणे हे समाजप्रबोधनापेक्षा अधिकाधिक नफा मिळविण्याचे साधन झाले. त्याचीच परिणती सध्याच्या भ्रष्टाचारी गोंधळात घोटाळ्या मागून घोटाळे व नकारात्मक अशा बातम्यांचे प्रेम त्यामुळे येत राहिले आहे.
त्यातले त्यात केवळ एकच दिलासा आता वर्तमानपत्रांच्या बाबतीत राहिला आहे तो म्हणजे संपादकीय पान. कारण पुरवणीमध्ये कितीही मनोरंजक समाज प्रबोधन करणारी जागा जरी वापरात येत असली तरी तिथेही जाहिरात बाजी ने बऱ्यापैकी शिरगाव केलेला आहे.
संपादकीय पृष्ठावर नशिबाने जाहिरातीचा ओरखडा ही नसल्यामुळे केवळ तेच एक पान वाचावे असे सजक सुबह सुबुद्ध आणि सज्जन माणसांना वाटले तर चूक काय?
म्हणून जाता जाता एक सूचना करावी अशी वाटते ती म्हणजे अशा माणसांना केवळ तेवढे एकच पान थोड्याफार कमी किमतीत देता आले तर वृत्तपत्र मालकांनी व संपादकांनी त्यावर सकारात्मक विचार करावा.
या साऱ्या विवेचनावर आपल्याही यथायोग्य दाद व प्रतिवादाची अपेक्षा करतो !":🙏. 🙏
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
गुरुवार, ११ डिसेंबर, २०२५
" बदलत्या काळातील भावनांची घुसमट !":
"बदलबदलत्या काळातील भावनांची घुसमत !":
सोशल मीडियावर सरफिंग करताना गवसलेली अनामिक लेखक व लेखिकेची एक रुदयस्पर्शी कथा
सोबत
सकाळी सकाळी कविताला आईचा फोन आला म्हणून ती गडबडली पण आई ठीक होती.
“कवी, मला बरचं सामान आणायचं आहे गं वाण्याकडून. संध्याकाळी जाऊया?” आईला नेहमी काही ना काहीतरी हवं असायचं.
“अगं आई दोन दिवसांपूर्वी तर सगळं सामान आणलय ना! आता काय हवयं अजून?” कणिक भिजवत फोन कानाला धरून कविता नवऱ्याला चहा तयार आहे असे डोळ्याने दाखवत होती..
“अग,परवा बदाम, पिस्ते व कोको वगैरे बरंच काही घ्यायचं राहिलं..उद्या कोकोच्या वड्या कराव्यात म्हणते..शिवाय काही डाळी पण विसरल्या घ्यायच्या” आईला अजिबात घाई नव्हती.
“आई मला लिस्ट दे. मी करते ॲार्डर ॲानलाईन.” कविता नवऱ्याचा चहा व मुलांचं दूध ओतत होती. कोकोच्या वड्या ही कुणालाही करतेय कोण जाणे..स्वत:ला तर डायबेटिस आहे..
आईकडून काही उत्तर आलं नाही..
“आईं.. कविताने फोन चालू आहे का नाही बघितलं. तेवढ्यात आईचा आवाज आला, “ॲानलाईन नको बाई! मला डोळ्यांनी बघून सगळं घ्यायला आवडतं.
कविता बरं म्हणाली. आई मुद्दाम काही गोष्टी यादीमधे लिहित नाही याची तिला खात्री होती. कविताला मुलांचे अभ्यास, ॲाफिसचं काम, स्वयंपाक पाणी यात रात्रीचे सात वाजत असतं आणि जवळच राहणाऱ्या आईला कायम खरेदीला जावसं वाटत असे. कविता संध्याकाळी येते म्हणाली पण ॲाफिसमधे काम संपायलाच सात वाजले.
“आई, उद्या येते ग. अजून ॲाफिसातच आहे”. तिनं फोन बंद करून काम संपवायला सुरूवात केली.
दुसरे दिवशी मात्र ती संध्याकाळी पाच वाजता आईकडे जाऊन पोचली. एका गावात रहात असल्या तरी रहदारीमुळे आईकडे पोचायला चांगला अर्धा तास लागायचा..
आई फोनवर कुणाशी तरी बोलत होती.. टेबलावर कोको, बदाम, पिस्ते, डाळी सगळं आणलेलं दिसत होतं. कविताचा राग अनावर झाला..कळवायचं तरी की मी आणलयं सगळं म्हणून! हेलपाटा पडला ना मला!
“हे बघा, पुष्पाताई, मुली कामात असतात. नुसतं या म्हटलं तर तुम्हाला त्या दोन दोन आठवडे दिसणार नाहीत.. काही निमित्त सांगा म्हणजे येतील पण आजारांचं निमित्त नका सांगू बरका.. मी बरेचदा काही गोष्टी “विसरते” खरेदी करायला! नंतर कवितास विचारते मला घेऊन जाशील का म्हणून! ओरडली तरी भेटते हो! आणि त्यातून मुलगी आली नाही तर वाईट वाटून घेऊ नका बरं.. अहो त्यांना त्यांचा संसार आहे.. “ कविता चमकली.
आईला केवळ आपण सोबत हव्या आहोत..खरच बिचारी आप्पा गेल्यापासून ती एकटी पडली आहे..पण माझ्याकडे ये म्हटलं तर मात्र येत नाही. मी माझ्या घरीच बरी म्हणते..पण एकटेपणानं घर खायला उठत असेल! तिच्या सामानाच्या यादीतील सर्वात महत्वाची गोष्ट आहे “लेकीची कंपनी”! जी गोष्ट कधीच पूर्ण होणारी नाही..एकेकाळी नातेवाईकांच्या गोतावळ्यात राहिलेली बाई ही.. आता माणूस दृष्टीस पडत नाही तिच्या आणि वयानं कुठे एकटं जावसं वाटत नाही.
आईनं चपापून मागे बघितलं. आपलं बोलणं कविताने ऐकलं नसलं म्हणजे झालं म्हणून ती कविताचा अंदाज घेत होती.
“कवी, काल तुला वेळ झाला नाही म्हणून मी समोरच्या नंदूला ॲानलाईन ॲार्डर कर म्हणून हे सगळं मागवलं पण तुलाच कळवायला विसरले.. काय म्हणावं बाई मला तरी!”आई सारवासारव करत होती.
“बरं झाले कळवलं नाहीस ते! आपण भेटलो ना त्यामुळे!
चल मस्त चहा करते.. अगबाई बटाटेवडा केलेस? अगं नको करत जाऊ तळणी एकटी असताना!” कविताने एक बटाटा वडा तोंडात टाकला..
“अहाहा.. काय केलायस ग बटाटा वडा! तुला आठवतंय मी सातवीत असताना बटाटा वडा कर म्हणून तुझ्यामागे लागले होते आणि तुला शाळेतील परीक्षांचे पेपर तपासायचे होते.. मी रडारड केली म्हणून तू बटाटे घेऊन आलीस व वडे केलेस आणि रात्री एक पर्यंत पेपर तपासत बसली होतीस..
“हो ग.. किती छान होते ते दिवस! आप्पांचा आवडता पदार्थ! म्हणायचे - बाईसाहेब तुमच्या हाताची चव इतरत्र कुठेही नाही.. आईचे डोळे भरून आले..
चहा घेत आईनं अनेकदा सांगितलेल्या चार गोष्टी परत तेवढ्याच नवलाईनं सांगितल्या पण यावेळी “माहित्येय ग” हे वाक्य कविता बोलली नाही. तिनं शांतपणे आईचं बोलणं ऐकून घेतलं. आप्पांच्या आठवणीत दोघी रडल्या.. देवमाणूस ग आप्पा.. आई पदरानं डोळे पुसता पुसता आप्पांनी केलेले विनोद सांगून हसत होती.
“पुष्पाताई फार एकट्या पडल्या आहेत. त्यांची लेक दोन दोन महिने गावांत असून त्यांना भेटत नाही कारण तिची नोकरीच तशी आहे.. विशाखाताईंची लेक सिंगापूर मध्ये असते आणि अलाकाताईंची मुलगी अमेरिकेत.. त्या मानाने मी किती नशीबवान आहे बघ.. जेवतेस का? पिठलं भात खाऊ..” आईनं कविता नाही म्हणणार याची तयारी ठेऊन विचारलं.
एक मिनिट थांब.. तिनं घरी फोन करून मुलांना व नवऱ्याला मी आज आईकडेच झोपेन सांगितलं. ॲाफिसमधे दुसऱ्या दिवसाची रजा टाकली व पिठलं भात खात ती आईशी सुखदु:ख बोलत राहिली..गप्पा मारताना रात्री कधी झोप लागली कळलं नाही.
दुसरे दिवशी दोघी पुष्पाताईंकडे गेल्या..
“पुष्पामावशी मस्त शिरा कर ग.. केव्हापासून तुझ्या हातचा शिरा खावासा वाटतो आहे..”
पुष्पाताई उत्साहाने उठून स्वयंपाक घरात जाताना त्यांचे गुडघे दुखले नाहीत! बदाम, वेलदोडे, केशर घातलेला शिरा खात पुष्पामावशीच्या कुशीत शिरून थॅंक्सु ग मावशी म्हणताना शिऱ्यात साखर कमी पडलेली असून शिरा तिला गोड लागत होता..
गप्पागोष्टी करताना तिनं निश्चय केला की ज्यांच्या मुली लांब आहेत अशा आईच्या मैत्रिणींना असचं जाऊन भेटायचं.. त्यांचे सुरकुतलेले हात हातात घेऊन त्यांचं सुखदुःख ऐकून घ्यायचं.. त्यांचे डोळे पुसायचे.. तुमची मुलं असेनात का लांब.. मी आहे ना म्हणायचं..
त्यांचा एक कंटाळवाणा दिवस सोनेरी करायचा..
एक दिवस ती खुर्ची मोकळी असणार आहे..
एक दिवस ते डोळे कुणाचीच वाट बघणार नाहीत..
जे करायचं ते आज आत्ता करायला हवं!
तिनं निर्धार केला
बुधवार, १० डिसेंबर, २०२५
Inside story of Indigo's Shameful Fiasco
https://www.moneylife.in/article/indigo-nation-pays-a-steep-price-for-what-cofounder-rakesh-gangwal-called-pan-ki-dukaan-governance/79062.html
But, in July 2019, Mr Gangwal did something unusual. He sent a detailed letter to market regulator Securities and Exchange Board of India (SEBI), publicly raising what he saw as serious governance lapses at the airline he had built. This was not a private complaint aired in boardroom disputes. This was a co-founder going public with concerns about the institutional integrity of one of India's most successful companies.
@@@@@@@@@@
A forwrded msg noticed on surfing social media. An eye opener indeed on Indigo fiasco...:
"Rahul Bhatia, Chief Executive of IndiGo Airlines, the so called cheap airline in India, after arriving at a hotel in Mumbai, went to the bar and asked for a pint of Guinness.
The barman nodded and said, "That will be ₹50 please, Mr. Bhatia."
Somewhat taken aback, Rahul replied, "That's very cheap," and handed over his money.
"Well, we do try to stay ahead of the competition", said the barman. "And we are serving free pints every Wednesday from 6pm until 8pm. We have the cheapest beer in Mumbai."
"That is remarkable value!" Rahul comments.
"I see you don't seem to have a glass, so you'll probably need one of ours. That will be ₹150 please."
Rahul scowled but paid up.
He took his drink and walked towards a seat. "Ah, you want to sit down?" said the barman. "That'll be an extra ₹150. You could have pre-booked the seat and it would have only cost you ₹100."
"I think you may be too big for the seat sir, can I ask you to sit in this frame please."
Rahul attempts to sit down, but the frame is too small and when he can't squeeze in he complains, "Nobody would fit in that little frame".
"I'm afraid if you can't fit in the frame, you'll have to pay an extra surcharge of ₹250 for your seat, Sir."
Rahul swore to himself, but paid up.
"I see that you have brought your laptop with you," added the barman. "And since that wasn't pre-booked either, that will be another ₹300."
Rahul was so incensed that he walked back to the bar, slammed his drink on the counter and yelled, "This is ridiculous, I want to speak to the manager!"
"I see you want to use the counter.." says the Barman, "that will be ₹200 please."
Rahul's face was red with rage. "Do you know who I am?"
"Of course I do, Mr. Bhatia!"
"I've had enough! What sort of hotel is this? I come in for a quiet drink and you treat me like this? I insist on speaking to a Manager!"
"Here is his E-mail address, or if you wish, you can contact him between 9.00am and 9.01am every morning, Monday to Tuesday at this toll free phone number. Calls are free, until they are answered, then there is a talking charge of only ₹10 per second, or part thereof."
"I will never use this bar again!!" hollers Mr. Bhatia.
"OK Sir, but remember, we are the only star hotel in Mumbai selling pints for ₹50."
And that my friends, is how IndiGo works in India!! 😂😂😂
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)