"विचारधन !":
मुंंबई अस्मिता वाहिनीवरील चिंतन कार्यक्रम ऐकल्यानंतर मला दररोज प्रातःकाळी प्रेरणा मिळून मी स्वनिर्मित आणि अनुभव सिद्ध असे विचारधन न चुकता सोशल मीडियावर दररोज सामायिक करत असतो. त्याचीच झलक या खास लेखात आहे आणि ती तुम्हाला देखील अंतर्मुख करून तुुमच्या जाणीवा समृद्ध करेल अशी आशा आहे....
# 👍"भूतकाळाचे कांटे उलटे फिरविणे, केवळ अशक्यच असते. त्यांतून कुणी अट्टाहासाने तसे करायचा प्रयत्न केलाच, तर ते आत्मघातकी ठरू शकते. कालप्रवाहाबरोबर, वर्तमान जसजसे रुप घेईल ते खुल्या दिलाने स्विकारणेच अंतिमतः शहाणपणाचे ठरते !":👌
#👍"माणसाचं आयुष्य नशिबाच्या धनुकलीवर पिंजलं जात कुठे कसं वाहत जाईल, ते कळतच नाही. त्याचे गुण त्याला प्रकाशातले यश, तर अवगुण एखाद्या जहरी विषारी नागासारखे अपयशाचे फूत्कार काढत, त्याच्या र्हासाला कारणीभूत ठरतं !":👌
#👍"The Era of Mind Power !:👌 "Data, when analysed, is Information and such Information when properly introspected, is Knowledge and Applying Knowledge to accomplish set goal is The Mind Power !":👌
# 💐"Most of the times, Information contains an Opportunity. One must try to identify such Opportunity and it's relation with his own needs to achieve the desired goal !":💐
#👍"माणसाचं जीवन हा बहुरंगी नात्यांचा अनुभव घेत, ती निभावून नेण्याचा स्वतंत्र प्रयोग असतो. त्याचे यशापयश प्रत्येकाच्याच हातात असूनही, त्याकडे काणाडोळा केला जातो !":👌
#👍"माणसाचे डोळे अन् देहबोली हे त्याच्या मनाचे आरसे असतात. ज्यांना माणसं वाचता येतात, त्यांनाच त्यांतील प्रतिमा दिसतात.....👌
#👍" जेव्हा आपण आपल्याला आवडणारे काम समाधानकारक रीतीने पूर्ण करतो त्या वेळेला आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जेच्या लहरी निर्माण होतात हे असे घडणे आपल्या आरोग्याला अत्यंत हितकारक असते !":👍
#👍"आज अचानक चमत्कार घडावा तसे जाणवले की, आमचे आडनाव 'नातू' हे किती प्रेरणादायी आहे ते ! 'नातू' म्हणजे इंग्रजीत 'Grandson' अर्थातच चांगली मुले-नातवंडं-अर्थातच दुधावरची साय जशी !":👍
#👍"आजही कालच्याच सारखे जाणवले की, आमच्या आईचे माहेरचे आडनाव 'विद्वांंस', हे देखिल किती अर्थपूूर्ण आहे ! 'विद्वांंस' अर्थातच विद्वान, बुद्धिमान माणसं !":👍
#"अर्थ" हाच सर्वार्थ आणि कमी श्रम जादा दाम ह्या प्रर्व्रुत्तीचे विदारक चित्र आपल्याला ठायीठायी नजरेस येते. आपण कुणाचे भले जरी करू शकलो नाही, तरी निदान आपण जे काही करतो, त्यामुळे इतरांचे जराही नुकसान होताच कामा नये" हा निदीध्यास जेव्हां, समस्तजन घेतील तोच सुवर्णदिन!":
# "तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे सायबर क्राईमस् सारखे भयानक भस्मासूर आपल्यासमोर उभे राहिले आहेत. अशावेळी अक्षरशः सावधानता किती आवश्यक आहे याची प्रचिती सर्वांनाच येत आहे. मुद्दा मात्र वेगळा आहे, अशी गुन्हेगारी करायला दुसऱ्यांना फसवायला माणसे कां तयार होतात, याचे सखोल संशोधन मानसशास्त्रज्ञांनी व समाजशास्त्रज्ञांनी करावे अशी वेळ आली आहे."
# "नटवर्य बाबूराव पेंढारकरांचे 'चित्र आणि चरित्र' हे आत्मकथन मी नुकतेच वाचले. त्यामधील एक नोंद दखल घेण्याजोगी ! एके काळचा सुप्रसिद्ध प्रभात स्टुडिओ हा पुण्यामधील ज्या जागी होता, ती जागा पुण्याचे सरदार नातू यांची ! ती सुमारे 11 एकर आणि त्या जागेचे त्या काळात खरेदीखत 17 हजार रुपयात करून प्रभात स्टुडिओची उभारणी केली गेली. विष्णूपंत दामले हे प्रभातच्या संस्थापकांपैकी एक !:"
#👍"सुख क्षण हातात काही पकडून ठेवता येत नाहीत, जसे गुलाबी थंडी मध्ये पानावरील दंवबिंदू घरंगळत जातात, तसेच सुख क्षण हातातून क्षणार्धात कधी निसटून जातत, ते कळतच नाही !":👍
#👍"प्रात:काळच्या समयी मातीला आणि आसमंताला एक आगळावेगळा सुगंध असतो, निळ्याशार आकाशातील गुलाबी प्रकाशशलाका मंद गतीनेभवताल उजळत जात असतात आणि मंद सुगंधी वारा मनामनाला नव आशेची दुलई पांघरून जात असतो !":👌
#👍" सारे समजून उमजून न समजल्यासारखे जे करतात, अशा माणसांसमोर कुठलाही वाद घालणे व्यर्थ असते. मौनं सर्वार्थ साधनम् !":👌
#👍""एखादं पुस्तक वाचताना जेव्हा सद्भावनांमुळे सन्मतीमुळे आणि सत्क्रुत्यांमुळे सद्गतीत होऊन जेव्हा अश्रू येतात, ते म्हणजे आनंदाचे आत्मसमाधानाचे व क्रुतार्थतेचे अश्रू असतात. त्यांचे मोल, अमोल असते. म्हणूनच जे पुस्तक अशा तऱ्हेने तुम्हाला रडायला लावते, ती श्रेष्ठ, उत्तम कलाकृती !":👌