मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

👍"Think, not to Sink !":👌

👍"Think, not to Sink !":👌


# "Perception is the Key":
Most of the observations one makes, are based on the perception of the situation at a given point in time. Human perceptions are amalgam of information available from media and other sources, beliefs, experience of self, others and so on....

Ultimately in a political game of Power, such public perceptions only decide the outcome. Rationality at least in Indian Politics unfortunately, gets a back seat, compared to emotionality, though prudence demands otherwise. In such a case, the outcomes and hence possibly, progress and development possibly could have been much better.

In any case, it's wise that one should therefore, refrain himself from participating in social media, in this complex area of politics.

# "Destiny":
# It’s said that you are the Driver
of your Destiny; but in reality,
you find Destiny drives you.

# "Ultimate Mukti' !":
Alzimer disease is on one side the 'Ultimate Mukti', and on the other it's the Worst punishment, one tends to get. Forgetting who u r, is virtually denying your very existance and that too, by your self.

# "The Real Truth":
The 'Real' conceptual Truth is hidden very deep and is the 'Gloden' or now 'Platinum' Treasure of a Human thought. V need to analyse, probe, think and dissect to get to its 'Route'. Surely, this is very interesting, well-Worth exercise, one can do from time to time. Even though, the Time, endlessly unfolds itself into unknown Future, if you get to the Route and Truth, it wld last for ever and ever.

# "Continuous Learning":
Being curious, and inquisitive is what for all living beings are born. The difference between them, and human beings is the better intellegence, application skills and above all, immence memory. Honestly, from my own experience, to be a student through-out out your life, is an unique self satisfying experience.

# "Creative Thoughts":
Meaningful & creative thinking emerges not only from a sensitive soul but from proper time and an inspiring place. Do you agree? For me, the time is very early morning and place appears to be London. What about you?

# "An art of adjustment":
In life, what one needs is to be always comfortable & be contented in any situation that one comes across; it’s a very difficult task and all one needs is an art of adjustment.

"Look Within":
Spend at least some time every day in thinking within;
it's an excellent exercise for your mind & intelligence.

# "Quiriosity and Inquisitivenss":
The journey of Human race from it's Primitive to Modern age, can be summed up in these mile stones: "Quiriosity and inquisitivenss, The path of search, Gathering and understanding the Mother Nature and surroundings, Exploring and experimenting, The learnt lessons, Innovating and adopting and so on.

As one looks back, he is bound to be astonished to note, where we were and where we all, are now. The inside out, almost total knowledge of the Human body and it's complex functions, has been accomplished and the search goes on and on....

Behind this gigantic voyage, at it's Nucleus is the Human Brain, a super, duper computer with feelings as well. It is high time that instead of fighting amongst ourselves, we ought to remember all those, who must have done value additions from time to time, and hence salute to them with Great Respect and Gratitude.

# "Think not to Sink !":
Decision needs to be taken only after reviewing all angles; many times, we tend to ignore one little point, because for no reason, it just goes out of our mind. The adverse effects of it, result only after action/s are taken based on the decision so made.

Thank you
Sudhakar Natu

रविवार, २६ सप्टेंबर, २०२१

"टेलिरंजन-एक लेखाजोखा !":

 "टेलिरंजन-एक लेखाजोखा !":


छोट्या पडद्यावर सर्वसामान्य आणि सर्वमान्य अशा काही बाबी किंवा गोष्टी आढळतात त्या प्रथम सांगतो.

एकच कल्पना अनेकांना एकाच वेळी सुचू शकते किंवा कदाचित कोणीतरी दुसर्याची कॉपी करतो, असंच काही मालिकांमध्ये अधून-मधून आढळून येतं. झी वाहिनीवरील "मन उडू उडू झालं" मधील दीपू आणि सोनी वाहिनीवरील "वैदेही" या दोन्ही मुली सारख्याच प्रसंगांना सामोर्या जाताना दिसतात. मध्यमवर्गीय कुटुंबातील या दोघी कर्तबगार आणि आपल्या कुटुंबाचे नेहमी हित साधावे म्हणून कष्ट आणि त्याग करणाऱ्या आहेत. मोठ्या बहिणीचे लग्न नीट पार पडावे म्हणून त्या आर्थिक जबाबदारीही घेतात.

दोन्हीकडेही मध्यमवर्गीय वडील आणि त्यांना तीन मुली, फरक इतकाच की, "वैदेही" मालिकूत एक भाऊ जो फुकट गेलेला आहे आणि त्याच्या चोरीमुळे घरात वादळ व संकट निर्माण होते. तर "उडू उडू" मध्ये मास्तर असलेले वडील, त्यांच्या फसवणुकीने दागिने चोराने चोरले जातात इतकेच. पण संकट व वरपक्षाकडील नको इतकी चालबाज मंडळी तशीच दोन्ही मालिकांमध्ये ! अशा कितीतरी साम्य स्थळांनी ह्या दोन्ही मालिका भरलेल्या आहेत. सारखीच दिसणारी एका व्यक्ती सारखी दिसणारी, पाच सहा माणसे जगात असतात असं म्हणतात किंवा "कल्पना एक आविष्कार अनेक", त्याचीच प्रचिती 'उडू उडू' आणि 'वैदेही' मालिकांमधून येते. प्रेक्षकांना उल्लू बनवण्याचा हा प्रकार नव्हे कां?

सोयीप्रमाणे केव्हाही, कोणत्याही पात्राची भूमिका करणारा कलाकार अचानक मालिकांमधून बदलला जातो. पूर्वी निदान आधी पूर्व कल्पना देत असत किंवा नव्या कलाकाराच्या प्रवेशा आधी, तशी कल्पना देत असत. आता तसं राहिलं नाही. अचानक कोणीतरी दुसरा कलाकार भूमिकेमध्ये आपल्याला दिसतो. "स्वाभिमान" मधली मोठी आई अशीच अचानक बदलली गेली आणि दुसरी अभिनेत्री तिथे आपल्याला दिसली. तर "जीव माझा रंगला" या मालिकेमध्ये मोठी बहीण श्वेता अशीच अचानक बदलली गेली आणि जवळजवळ तिच्यासारखी दिसणारी अभिनेत्री श्वेता म्हणून पुढे आली.

"यह हमे मंजूर नही !":
मालिकांमध्ये कधी कधी आपल्याला न पटणाऱ्या अशा गोष्टी दाखवल्या जातात. सर्वसामान्यपणे व्यावहारिक जीवनामध्ये कोणीही व्यक्ती, कशी वागेल याचे काही निकष असतात. त्या निकषांना तडा देईल, अशा तऱ्हेचे काही पात्र वागतात आणि ते आपल्याला पटत नाही. झी वरील "माझी-तुझी रेशीमगाठ" या मालिकेमध्ये उद्योगपतीचा नातू असलेला यश, रस्त्यावरील सिग्नलमुळे गाडी थांबली असताना बाजूच्या स्कूटर वरील मुलीला, केवळ ओझरते बघून तिच्या अखेर प्रेमात काय पडतो आणि तिच्यासाठी वाट्टेल ते करायची त्याची तयारी कशी होत जाते, ते काही केल्या पटत नाही.
तीच गोष्ट, स्टार प्रवाहवरील "आई कुठे काय करते" मध्ये संजनासारखी जणू सवत असलेली स्त्रीने आपल्या नवऱ्याशी विवाह केल्यानंतर, अरुंधती तिच्याबद्दल नको इतकी सहानुभूती कां दाखवते, तिच्या संकटात कां स्वतःहून पुढाकार घेते, वेळोवेळी मदत करण्यासाठी कां झटत असते, तो काही कळत नाही. हा म्हणजे चांगुलपणाचा, आदर्शवादाचा अक्षरशः अतिरेक झाला. केवळ आईच्या भूमिकेतील नायिका, ही नैतिकदृष्ट्या अत्युच्च दाखवण्यासाठी, हा अट्टाहास मनाला काहीही पटत नाही. ही केवळ वानगीदाखल दोन उदाहरणे. अशाच तर्‍हेचे अनेक घटना, पात्रे व प्रसंग मालिकांमधून दाखवले जातात आणि प्रेक्षकांना गृहित धरले जाते.

सोनी वाहिनीवरील, मनू आणि मल्हारच्या अवखळ प्रेमाच्या गोष्टीत त्यांचे पुढे काय होणार, ही उत्सुकता शिगेला पोहोचली असताना, मीरा व आदिराजच्या शिळ्या प्रेमाच्या कढीची उगाचच मध्ये लुडबुड नकोशी आणि अनाकलनीय, अविश्वसनीय वाटते. "आता बरसात नाही रे !

तसेच
"विनोदाची ऐसी तैसी":
😢😢 सोनी हास्यजत्रेचा अक्षरशः सततचा उबग आणणारा हास्यास्पद आविष्कार "अती तेथे माती" असाच आहे. 😢😢 "अति तेथे माती" वरून मला माझा एक जुना अनुभव आठवला. पुष्कळ वेळेला आपल्याला एखादे पदार्थ खायला खूप आवडतात, म्हणून ते नको इतके खाल्ले जातात आणि त्यामुळे पोट बिघडून चार-पाच दिवस बिछान्यावर पडायची वेळ येते. माझ्या बाबतीत हे असे अनेक वेळा झाले आहे. कारण नसताना जास्त खाऊन पोटावर ताण दिल्याने, ही वेळ आली. तीच गोष्ट 'हास्यजत्रे'च्या बाबतीत ठरते. करमणूक करणार्या मालिका अधून मधून दाखवायच्या ऐवजी हा जो बाष्कळ हास्याचा मारा, त्याच त्याच कलाकारांच्या आविष्कारातून दाखवण्याचा अट्टहास केला जातो, तो कां ते खरंच कळत नाही. प्रोग्रॅमिंग करणारे जे कोणी असतील ते याचा विचार करतील, तर चांगलं. कदाचित त्यांच्याकडे मालिकांचा तुटवडा असू शकतो.

झी वरील "चला हवा येऊ द्या" च्या बाबतीतसुद्धा अगदी हेच असेच चालू आहे. विनोदाचा अतिरेक किती करायचा, कां आणि कसा करायचा, याचे तारतम्य सुटले ही पूर्वी लोकप्रिय असलेला हा कार्यक्रम सहाजिकच, आता बहुसंख्य प्रेक्षकांच्या मनातून उतरत चालला असेल.

सरते शेवटी....

"जुने ते सोने, हेच खरे !":
दर रविवारी नेहमीप्रमाणे कार्यक्रम, छोट्या पडद्यावर नसतात, हे लक्षात न आल्यामुळे वेगवेगळ्या कमर्शिअल वाहिन्यांवर सर्फिंग करून झाले. तिथे आठवड्याच्या मालिकांचा रतीब मनपसंत नसल्यामुळे, सहज चुकून सह्याद्री वाहिनीवर रिमोट नेला गेला आणि अवचित आश्चर्यकारक नवल घडले ! तिथे माननीय विद्याधर गोखले आणि भालचंद्र पेंढारकर या मराठी संगीत रंगभूमीला पुनरूज्जीवन देणाऱ्या असामान्य जोडीच्या योगदानाचा, परिचय करून देणारा "एकमेवाद्वितीयौ" हा अप्रतिम कार्यक्रम पहायला मिळाला. जुन्या काळात आणि संगीतमय वातावरणात घेऊन जाणारा तो मंगलमय कार्यक्रम, ज्ञानेश पेंढारकर आणि शुभदा दादरकर यांनी समर्थपणे सादर केला होता. शिवाय त्याबरोबर नवीन तरुण गायक गायकांनी संगीत नाटकांमधील मधुर नाट्यसंगीते गाऊन, श्रोत्यांचे कान त्रुप्त केले. खूप दिवसांनी एक आनंदमयी संगीत कार्यक्रम पाहायला मिळाला हे आमचे भाग्य. दूधात साखर अशी की, त्यापाठोपाठ "मैत्र हे शब्दसुरांचे" हा कार्यक्रम देखील असाच नाट्यसंगीतावर बेतलेला होता.

शेवटी "जुने ते सोने" हेच लक्षात येते आणि कमर्शियल वाहिन्यांपेक्षा, मुंबई दूरदर्शन अर्थात सह्याद्री वरील कार्यक्रम बहुशः कां दुर्लक्षिले जातात हे कळत नाही.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
असेच वाचनीय लेख वाचण्यासाठी........
ही लिंक उघडा...........

https://moonsungrandson.blogspot.com

लेख आवडला.......
तर लिंक शेअरही करा.......

शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१

"सोशल मिडीयावरील शब्दकोडे !":

 "शब्द कोडे":

काही शब्द आपण बरेचदा  जोडीने वापरतो. खाली काही अशा शब्दांचं पहिलं आणि शेवटचं अक्षर दिलं आहे. मधल्या जागा. *-*   ने दर्शवल्या आहेत. ते शब्द ओळखून  लिहा. 

उदाहरणार्थ : न - - ले . नदीनाले. 

१. मा - - - ती 

२. चि - - री 

३. द - - - का 

४. चि - - -  टी 

५. मा - - ड 

६. झा - - - पे 

७. भा - - - री

८. प - - - - - के

९. वि - - डी

१०. सु - - रा 

११. ख - - - ळ. 

१२. हा - - रे 

१३. त - - - ग्गा

१४. मा - - क 

१५. बा - - - ली 

१६. च - - - टी 

१७. छि - - - डा 

१८. कु - - - ल्ली 

१९. प - - - - त्री 

२०. का - - - ळी 

२१. पी - - णी 

२२. सा - - ळी 

२३. वे - - णी 

२४. इ - - डा 

२५. खी - - री

--------------------------------------------------------

👍उत्तर हे आहे:


सोशल मिडीयावरील शब्दकोड्याचे उत्तर:

1 माणिक मोती

2 चिरी मिरी

3  दगा फटका

4 चिठी चपाटी

5 मारझोड 

6 झाडेझुडपे

7 भाजी भाकरी

8 परकर पोलके

9 विडि काडी 

10 सुई दोरा

11 खण नारळ

12 हात वारे ,हारतुरे 

13  तबला डग्गा

14  मार झोड

15 बाळबाटली

16 चमचा वाटी 

17 ??

18 कुलूप किल्ली

19 पळीपंचपात्री

20 काळी सावळी

21 पिकपाणी

22  साडी चोळी

23 वेणी फणी 

24 इडापिडा 

25 खिरपुरी

------------------------------------------

बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१

"सोशल मिडीयावरील माझी मुशाफिरी-२ !":

 "सोशल मिडीयावरील माझी मुशाफिरी-२ !":


सोशल मिडीयावर मी नेहमी स्वनिर्मित संदेश पोस्ट करतो. आज त्यासंबंधीच्या जुन्या आठवणी पहात असताना, मला विशेष नोंद घ्यावेत, असे माझे निवडक संदेश ह्याही लेखात उलगडत आहे. आठवणींची ही साठवण वाचकांना आवडेल, अशी मला आशा आहे.......

# "कोड़े: कधीही न सुटणारे !":
-----------------------
माणूस मरतो, तेव्हाच कां मरतो? कुणी जन्मत:च, तर कुणी बालपणी वा कुणी एेन तारूण्यांत, तर काही प्रौढपणी, तर काही वृद्धापकाळी हे जग सोडून जातात. प्रत्येकाचे मरतेवेळी वय भिन्न असते, असे कां?

आगगाडीतील प्रवास करताना जसा जो तो आपले स्थानक आले की उतरून जातो, तसाच हा सारा प्रकार असतो ! पण आपले 'तिकीट कुठपर्यंतचे आहे ते कुणालाच माहीत नसते. आयुष्य हे क्षणभंगूर आहे ह्याची जाणीव, कुणी मरण पावल्याची बातमी कानी येते, तेंव्हाच होते.

ह्या जगांत प्रत्येकाचे काही विशिष्ट प्रयोजन असावे, तेव्हढे झाले की त्याला 'राम' म्हणावा लागतों ! पुष्कळ वेळी सारी कामे वा आकांक्षा पूर्ण न करता, माणसाला येथून निरोप घ्यावा लागतो. थोडक्यात, जीवन आणि मरण हे कधीही न सुटणारे कोडे आहे !
--------------------------

# 'जादू?:
नुकताच एक संदेश येथे वाचायला मिळाला, हा माणूस लिहीतो: 'मी कधीही छोट्या पडद्यावरच्या मालिकाच बघत नाही, परवा,थोड्या वेळासाठी केवळ अर्धा एपिसोड कसाबसा पाहिला आणि टीवी बंद केला' हे वाचून मी मात्र, अक्षरश:
आश्चर्यचकीत झालो, कारण ह्या मालिकाच, माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकाचा दररोजचा अत्यावश्यक असा खुराक आहेत. सायंकाली ७ ते १० जणु रात्रपाळी असल्यासारखा मी टीवी समोर मालिकाच पहा़त असतो. मालिकांचा आणि माझा संबंध 'तुंझे माझे जमेना आंणि तुझ्यावाचून करमेना' असा आहे !

व्यसनी माणसाला उमजत असते की आपण जे करतो, ते योग्य नाही, हानिकारक आहे, पण तो जसा तरीही व्यसन काही केल्या सोडू शकत नाही, तसेच माझे मालिका पहाण्याच हे वेड मला सोडता येत नाही !

' कॅथार्सिस' मध्ये जसा वेदनेतून आनंद मिळतो, तसाच काही तरी अनुभव मला मालिका पहाताना होतो. मालिका उगाचच लांबलचक केल्या जातात, त्यात 'पाणी' घातले जाते, त्यातील पुष्कळ गोष्टी निरर्थक असतात::::वगैरे वगैरे दुषणे लावत, लावत न चुकता परत मी मालिका पहातच रहातो. कुठे तो मालिकाच न बघणारा किंवा घरी बिलकुल टीवीच न घेणारा आमचा एक दोस्त आणि कुठे रोज़ रोज़ रतीब घातल्यासारखा मालिका पहाणारा मी ! असा वेळ वाया घालवण्यापेक्षा तोच वेळ, दुसर्या एखाद्या विधायक कामात घालवावा, हे पटूनही, काही केल्या वळत नाही, ही माझी खंत आहे ! कोणी सागेल कां ह्या ईडीयट बाॅक्समधे अशी कोणती जादू आहे?
-----------------------------
# "एक सच्चा रयतसेवक ! ":
'अंतर्नाद'आॅगस्ट'१६ मधील 'एक सच्चा रयतसेवक' हा कै. कर्मवीर भाऊराव पाटील हयांच्यावरील हृदयस्पर्शी लेख वाचून मन भरून आले. त्यातील भाऊरावांनी घेतलेल्या दोन शपथांची आठवण, ह्या पहाडाएवढ़या अद्भुत माणसाचे थोरपण दाखवून गेली.

पहिली शपथ, महात्मा गांधीजींपासून प्रेरणा घेऊन जीवनभर, ऊंची कपडयांचा त्याग व अनवाणी चालण्याची शपथ आणि दुसरी, एका ग़रीब, अगतिक महिलेच्या तळतळाटामुळे, जीवनभर बाहेर कधीही दूध न मागण्याची शपथ ! संपूर्ण हयातभर, हया महान कर्मवीराने शिक्षणाची गंगा तळागाळापयँत पोहोचावी, हया हेतूने रयत शिक्षण संस्थेचा सर्वदूरवरचा पसारा ज़िद्दीने उभा केला.
कुठे त्या वेळचे समर्पित भावनेने शिकविणारे शिक्षक व साधे सरलमार्गी विद्यार्थी आणि कुठे आताचा शिक्षणसम्राटांचा विद्यादानाचा बाजार !

जाता जाता, मला अचानक आठवले-ह्याच सच्च्या रयतसेवका़च्या नांवे दिला जाणारा शैक्षणिक विभागांतील सर्वोत्तम पुस्तकाचा माझ्या एकमेव पुस्तकाला-'प्रगतिची क्षितीजे'ला मिलाळेला, काही वर्षांपूवीॅचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार !
हया लेखामुळे माझेही काही ऋणानुबंध, वंदनीय कर्मवीरांशी जोडले गेल्याचे समाधान मला मिलाले.
----------------------------

# "वाचा आणि विचार करा":
"जन्मगांठ?: "नव्हे फसवाफसवीचा लपंडाव?":
मनाविरुद्ध सहजीवनाचे नाटक आणि त्यामधील ताणतणाव सहन करत, किती जोडपी जीवन कंठत असतात, कोण जाणे ! एकाचा स्वार्थ, हा दुसऱ्याच्या दुःखाला कारणीभूत होतो, हे कोणी मुळी लक्षातच घेत नाही आणि फसवणूकीची ही वाटचाल अनेकानेक जन्मगांठीमधून कायम चालू रहाते............
हे निकोप समाजाचे लक्षण निश्चितच नव्हे..........
----------------------------
# " चिंताजनक सद्दस्थिती":

एकीकडे नित्य वाढत्या अपेक्षा, दुसरीकडे संधींचा दुष्काळ आणि त्यांत भर म्हणून मतलबी स्वार्थी राजकारण, हेही पुरेसे नाही म्हणून की काय, अनियंत्रित नोकरशाही, ढासळती प्रशासकीय गुणवत्ता अशा चक्रव्यूहात शास्वत विकास पुरता अडकला आहे. जो पर्यंत सर्वच क्षेत्रात, समस्त स्थरांवर विहीत कर्तव्ये आणि त्यासाठीचे प्रत्येकाचे उत्तरदायित्व समाधानकारकरित्या पूर्ण करण्याची ईर्षा निर्माण होत नाही, तोपर्यंत उत्तरोत्तर भवितव्य अंध:कारमय होणार हे निश्चित.
---------------- ------------
# "मनाचे कोडे":

आपले मन खरोखर कुठे असते, कसे असते, दिसते, माहीत नाही. पण मनांत काय असते, ते मात्र फक्त आपल्यालाच उमजत रहाते. X-ray, MRI CT scan वा सोनोग्राफी मुळे आपल्या शरीरात काय काय घडामोडी चालू आहेत ते दिसते, आपल्याला व इतरांनाही.
पण मनांतले असे इतरांना समजू, उमजू देणारे यंत्र निदान आजपर्यंत तरी अस्तित्वात नाही. ही जगातील, सर्वात महान क्रुपाच आहे. असे अद्भुतरम्य यंत्र जेव्हा केव्हा निघेल, तेव्हा काय हलकल्लोळ होईल, त्याची कल्पनाच करवत नाही.

शेवटी मन हे कोडे आहे आणि ते तसेच, कोडेच राहू दे!
-----------------------------
# "पैसा, ही पैसा !":
लक्ष्मी चंचल असते,तिची देवाण घेवाण सतत चालू असते. हे चक्र न थांबणारे असते. लक्ष्मी नेहमी स्वकष्टांतून,प्रामाणिक मार्गाने यावी. ग़ैर मार्गाने कष्टांशिवाय आलेली लक्ष्मी कधीही चांगली नाही;अशी लक्ष्मी सुख शांती देत नाही. हाच निसगॅ नियम आहे,जो Newton चा पहिलया नियमानुसार आहे. संध्याची अशांतता, ताणतणाव, हिंसा विध्वंसक वातावरण हा भ्रष्टाचाराने बरबटलेलया मार्गांनी येत असलेलया लक्ष्मीचा परिणाम आहे. कारण अशा व्यवहारांत एका बाजूला कर्तव्याचा विसर, फ़क़त हाव असते, तर दुसरया बाजूला अगतिकता असते. कोण, कसा केवहा थांबवणार भ्रष्टाचाराचा हा विदारक भस्मासूर?
----------------------------
# "शाश्वत तत्व":

"स्वार्थ सोडून, निस्वार्थ बुद्धिने चरितार्थ करायचे ठरवले,
तरच जीवनांत खराखुरा चिरस्थायी अर्थ निर्माण होऊ शकतो."

"जगाला फसवले तरी, कुणी
कधीही 
आपल्या मनाला फसवू शकत नाही. देहबोली मनातल्या भावभावना प्रकट करतच असते.

-----------------------------
# "फिरूनी नवीन जन्मेन मी-अर्थात् कर्म सिद्धांत !":
आपल्यामुळे दुसर्‍याचे नुकसान कधी होऊ नये, एवढे जरी व्रत, तुम्ही निष्ठेने जीवनामध्ये पाळले तर तुमच्याकडून अनिष्ट अशी कार्ये होणार नाहीत. त्याउलट शक्यतोवर आपल्यामुळे इतरांना काहीतरी हितकारक असे लाभ होऊ शकतील, अशा तऱ्हेचे जर तुम्ही प्रयत्न केलेत, तर तुमच्या पदरी चांगली कर्मे केल्याचे फळ मिळू शकते.

विज्ञानाचा विचार केला तर न्यूटनचा जो पहिला नियम आहे "अँक्शन इज इक्वल टू रिअँक्शन" तो म्हणजे आपला कर्म सिद्धांत असे थोडक्यात म्हणायला काय हरकत आहे?....
---------------------------

धन्यवाद
सुधाकर नातू

"सोशल मिडीयावरील माझी मुशाफिरी-१ !":

 "सोशल मिडीयावरील माझी मुशाफिरी-१ !":


सोशल मिडीयावर मी नेहमी स्वनिर्मित संदेश पोस्ट करतो. आज त्यासंबंधीच्या जुन्या आठवणी पहात असताना, मला विशेष नोंद घ्यावेत, असे माझे निवडक संदेश ह्या लेखात उलगडत आहे. आठवणींची ही साठवण वाचकांना आवडेल, अशी मला आशा आहे.......

# "आजचा विचार:
माणसाचा स्वभाव अनाकलनीय असतो. व्यक्ती तशा प्रकृती किंवा स्वभाव ! संसारात दोन वेगळ्या स्वभावाची माणसे जोडीने रहाताना मतभेद किंवा वाद होणे सहाजिकच असते. दुसरा असेच का वागतो, ह्याचा विचार त्याच्या दृष्टिकोनांतून समजून घेवून मगच आपण वागले, तर संसारात गोडी येते. आपला संसार सुखाचा करणे, हे अखेर आपल्याच हातात असते. हा सारीपाट खेळणे मोठेच आह्वान असते. तडजोड, समंजसपणा आणि त्याग हया तीन बाजू प्रत्येकाने संभाळल्या तर हा खेळ मनाजोगती फळे देतो.
----------------------------
# "एक उनाड, उजाड दिवस":
एखादा दिवस असा येतो की एका पाठोपाड गोष्टी बिघडू लागतात. सकाळी पाहुणे गावी जाणार तर धो धो पाऊस सरू झाला. वहान मिळणे कठीण झाले. घरी गँस सिलीडर रिकामा झाला व नवीन लावला तर त्याचा गँस लिक होत होता. मेकँनिक आला व वाँल्व्ह लिक होत आहे, हा सिलीडर वापरु नका असे सागून गेला. डिलरला फोन करुन करुन थकलो, तेव्हा कुठे नवीन सिलीडर घेवून माणूस आला. हे सारे ठीक होईतो कपडे धुण्याचे मशिन बिघडले, त्याचा मेकँनिक येतो कधी ती वाट पहावी लागली. विसावा म्हणून चहा गरम करायला घेतला, तर ओव्हनचा नन्ना. काही कामाचे कागद छापायला गेलो तर कार्ट्रीजची शाई सपलेली. अखेर कुणाला तरी फोन करावा तर फोनची बँटरी आऊट व चार्ज करताना फोन गरम.....

संकटे एकटी येत नाहीत, हा विचित्र अनुभव त्या उनाड दिवशी मला आला.
-----------------------------

# "संसाराचा सारीपाट !":
माणसाचा स्वभाव अनाकलनीय असतो. व्यक्ती तशा प्रकृती किंवा स्वभाव ! संसारात दोन वेगळ्या स्वभावाची माणसे जोडीने रहाताना मतभेद किंवा वाद होणे सहाजिकच असते. दुसरा असेच का वागतो, ह्याचा विचार त्याच्या दृष्टिकोनांतून समजून घेवून मगच आपण वागले, तर संसारात गोडी येते. आपला संसार सुखाचा करणे, हे अखेर आपल्याच हातात असते. हा सारीपाट खेळणे मोठेच आह्वान असते. तडजोड, समंजसपणा आणि त्याग हया तीन बाजू प्रत्येकाने संभाळल्या तर हा खेळ मनाजोगती फळे देतो.
----------------------------

# "अती तेथे माती":
मालिकेकडे नुसती करमणूक म्हणून पहाणे असा काही प्रकार नसतो. कारण मालिकेत एक जीवंत वास्तवाचे चित्र उभे होत असते. सहाजिकच तर्काला मान्य न होणारे, असंभाव्य अतिशयोक्त असेल तर त्यावर टीका करण्यात काय चूक? हल्ली बहुतेक मालिका काही काळानंतर लांबविण्याच्या अट्टाहासापायी भरकटत जातात. त्या तुलनेत पूर्वी, मर्यादित भागांच्या मालिकांमध्ये मनाला वास्तवतेचे पटेल असे बरेच काही असावयाचे. त्यामुळे त्यातील बर्याच विश्वासार्ह व स्म्रुतीत रहावयाच्या. टी२० स्पर्धांप्रमाणे आता लौकरात लौकर तशा आटोपशीर मालिकाच येणे अत्यंत गरजेचे आहे, नाहीतर प्रेक्षक मालिकाच पहाणे सोडून देतील.
----------------------------

👍👍"दाद व दादागिरी !":
दाद देण्यासाठी जशी नीरक्षीर विवेकबुद्धी गरजेची तसाच दिलदारपणाही हवाच हवा. त्यातून योग्य त्या व्यक्तीला अनुरुप योगदानासाठी दाद देण्यासाठी सूक्ष्म काकद्रुष्टीही आवश्यक.

सध्याच्या मनस्वी, वेगवान स्पर्धेच्या माहोलांत अहम् भावाला कमालीचे प्राधान्य असताना अशी अचूक "दाद(दा)गिरी जवळजवळ दुर्मिळच!
----------------------------

👌👌"माझे अध्यात्म":
# वाचन हा श्वास,
# लेखन हा निश्वास,
# मालिका पहाणे हा ध्यास.
# घडामोडींचा विचार हा अभ्यास,
#सोशल मिडिया वापरणे हा विकास?
# प्रवास करणे हा त्रास, आणि
# आरोग्य राखणे हा प्रयास
----------------------------

"जुळवू, जोड्या मालिकांच्या":
१.
तुझ्यांत जीव रंगला,
जीव झाला, वेडा पिसा!
२.
अग्ग बाई सासुबाई,
अस्सं सासर सुरेख बाई!
३.
स्वामीनी,
दामिनी!
४.
या गोजिरवाण्या घरात,
काय पाहिलेस तु माझ्यात!
५.
गुंतता, हृदय हे,
जावई विकत घेणे आहे!
६.
आई, कुठे काय करते,
कळत, नकळत!
७.
रंग, माझा वेगळा,
पसंत, आहे मुलगी!
८.
अवघाची संसार,
वादळवाट!
९.
अनामिका,
श्वेतांबरा!
१०.
समांतर,
दिल, दोस्ती दुनियादारी!
आणि,
११.
आभाळमाया,
????

----------------------------

"टेलिरंजन?":
मनू आणि मल्हारच्या अवखळ प्रेमाच्या गोष्टीत त्यांचे पुढे काय होणार, ही उत्सुकता शिगेला पोहोचली असताना, मीरा व आदिराजच्या शिळ्या प्रेमाच्या कढीची उगाचच मध्ये लुडबुड नकोशी आणि अनाकलनीय, अविश्वसनीय वाटते. सोनी मराठी वाहिनीवर "आता बरसात नाही रे !
----------------------------

#"संशयकल्लोळ !":
संशयातीत वर्तन ज्यांच्याकडून कायम अपेक्षित आहे, त्यांच्याबद्दल जेव्हा कुणी संशय निर्माण करतात,
तेव्हां दोघांची मोठी कसोटी असते.

आणि....
शेवटी....

"# "श्रेय घ्यायला नेहमी, पुढे येणार्यांनी,
वेळीच
आपली जबाबदारी मान्य करुन,
झालेल्या चुका पुन्हा होणार नाहीत असे वर्तन ठेवावे."
----------------------------

धन्यवाद
सुधाकर नातू

रविवार, १२ सप्टेंबर, २०२१

"वेचक आणि वेधक !":

 ।।श्री गणपती बाप्पा मोरया।।

"वेचक आणि वेधक !":

श्री गणेश ही विद्येची, ज्ञान-विज्ञानाची देवता. श्री गणरायाच्या कृपेने, हे काही वेचक-वेधक:

# कुठलाही अतिरेक नको. कारण 'अति तेथे माती' ! कुठे थांबायचे, केव्हा, कां आणि कसे थांबायचे, त्याचे नीट ज्ञान हवे. मध्यम मार्ग हा समतोल साधणारा मार्ग असतो.

# काळ नित्य बदलतो आहे, बदलणे हाच काळाचानैसर्गिक स्वभावधर्म आहे. बदलत्या काळाबरोबर जो स्वतःला जुळवून घेतो, तोच पुढे टिकतो, हे शाश्वत सत्य आहे.

# 'जिथली गोष्ट जिथल्या तिथे, जेव्हाचे, तेव्हा आणि ज्याचे त्याला' हा मंत्र जपला, तर कधीही गोंधळ होणार नाही आणि आणि सुलभतेने कामे होतील .

# जे जे चांगले व उपयुक्त, ते ते आपण कायम वेचित जावे, नेहमी नवे नवे ज्ञान मिळवत जावे आणि जे जे मिळवले, त्यातील योग्य ते इतरांना देत राहावे, हा चांगला मार्ग आहे.

# कोणत्याही प्रसंगाकडे, घटनेकडे अथवा संकटाकडे संयमीत, समंजस आणि डोळस दृष्टीने बघायला शिकणे, जरी कठीण असले, तरी ते आत्मसात करणे आजच्या काळात अत्यावश्यक आहे.

# जे आपल्याला मनापासून आवडते, जे आपण उत्तम तऱ्हेने करू शकतो आणि हे ज्यांना नेहमी करायला मिळू शकते, ते खरोखर भाग्यवान. कारण त्यामुळे त्यांच्यासाठी आनंदाने जगायचा वस्तुपाठ निर्माण होतो.

# बुद्धीला चालना देणारे आणि उत्साह निर्माण करणारे असे काही ना काही आपण जर करत गेलो, तर ताण-तणावापासून आपली मुक्ती होऊ शकते.

# जे आपण बदलू  नाही, जे आपल्या बदलण्याच्या शक्ती बाहेर आहे, त्याचा कधीही विचार करू नये. मात्र जी गोष्ट आपण बदलू शकतो, याची आपल्याला खात्री आहे, ती बदलण्याचा अहर्निश प्रयत्न करत राहावा. अर्थात शहाणपणा तोच आहे हे की, या दोन्हीमधला फरक जाण्याचा ! आपण काय बदलू शकतो आणि काय बदलू शकत नाही, हे जाणण्याचा !

धन्यवाद

सुधाकर नातू