"शुभ गुढीपाडवा":
"नवे वर्ष, नवी आव्हानेव नव्या विचारांच्या नव्या दिशा":
!! "पुनश्च हरि ओम्" !! !! "फाईट बिगिन्स" !!:
लौकरच येणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्षाचे स्वागत करण्यापूर्वी, दुर्दैवाने सध्या आपण मोठ्या बिकट संक्रमणातून जात आहोत यात वाद नाही. गेले संपूर्ण वर्ष जाऊनही कोरोनाचे संकट अजूनही नाहीसे झालेले नाही, उलट ते अधिकाधिक भीषण होत, वेगाने घोंगावत येणार की काय अशी चिंता वाढत असताना, हा काळ भयानक कसोटीचा, संघर्षाचा व चिंतेचा जात आहे.......
अशावेळी लक्षात ठेवा की,
!! When Time is Tough,
Toughs get going !!
आजच्या विचित्र वळणावर मला अवचितपणे, अंतःप्रेरणेने, स्फूर्तिदायक विचारांची प्रेरणा मिळाली, ती तुम्हाला नक्कीच नवीन दिशा दाखवेल अशी मला आशा आहे. आजच मला हे सारं सुचलं, हा जसा योगायोग, तसंच खूप खूप समाधानाचं लक्षण आहे आणि मला त्याचा मनापासून आनंद झाला आहे.
आता, "पुनश्च हरिओम्" "फाईट बिगिन्स"
सुरू करायचे आहे.
'आजचा दिवस माझा आहे' असं ह्या पुढील प्रत्येक दिवशी सिद्ध करायचं आहे !!
# "एकांतवासाची तपश्चर्या":
मला जाणवलेले अत्यंत महत्त्वाचे असे प्रथम विचार मांडतो. हा विषाणू जोपर्यंत आपल्या शरीराचे कुंपण भेदून, शरीरात प्रवेश करत नाही, तोपर्यंत त्याचा आपल्याला धोका नसतो. साहजिकच आपल्याला त्याच्यापासून सातत्याने दूर राहायला हवे, ही अत्यावश्यक बाब आहे. सहाजिकच मास्क वापरणे, कुठल्याही पृष्ठभागाला जर स्पर्श झाला, तर हात सँनेटाईझ करणे किंवा साबणाने हात धुणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, इतर माणसांचा जितका होईल तितका संपर्क टाळणे, सुरक्षित अंतर राखूनच एकमेकांशी संबंध ठेवणे, हे प्राथमिक व अत्यंत गरजेचे उपाय आहेत.
ही एक प्रकारची तपश्चर्या आहे असे आपण समजायला हवे. पूर्वी जसे तप करणारे, आपला एक पाय गुडघ्यावर ठेवून, एका जागी कुठे तरी हिमालयात वा जंगलात म्हणा उभे राहून विशिष्ट जप करत वर्षानुवर्ष तपश्चर्या करत. आपल्याला हवे ते ध्येय अर्थात परमेश्वराचे वरदान प्राप्त करत, त्याचप्रमाणे आपल्याला ही एक अत्यंत महत्त्वाची अशी तपश्चर्या करायची आहे. म्हणून जणू काही या पुढचे काही दिवस वा महिने आपल्याला जणू एकांतातच शक्यतोवर कोणाचाही संपर्क येणार नाही, अशा परिस्थितीत काढण्याची सवय लावून घेतली पाहिजे.
अर्थात् हे सगळ्यांना शक्य होईल असे नाही, परंतु प्रयत्न त्या दृष्टीने झाला पाहिजे आणि जर संपर्क आला तर स्नान करणे किंवा वाफारे घेणे, दिवसभरात केव्हा तरी हे सातत्याने चालू ठेवायला हवे. सर्वांचे लसीकरण देखील लौकरात लौकर पूर्ण होईल अशी आशा बाळगू या. स्वयंशिस्त पाळत, आपल्या कोणत्याही वागण्यामुळे इतरांना त्रास वा धोका निर्माण होणार नाही, ह्याची प्रत्येकाने काळजी घ्यायलाच हवी, कारण वखत आणिबाणीचा आहे.
थोडक्यात स्वतःचे आरोग्य हेच सर्वोच्च प्राधान्य ह्या पुढच्या काळात ठेवायला हवे. ही प्रमुख बाब मी सुरुवातीलाच तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना, दर्शनास आणतो.
# "सुख, सुख म्हणजे नक्की काय असतं?":
पुष्कळ वेळा अचानक आपल्याला कुठेतरी काहीतरी वाचलेलं आठवतं आणि एकंदरच मनाची विचार करायची जी काही पद्धत असते ती आमूलाग्र बदलून जाते. माझंही तसंच झालं, अचानक माझ्या ध्यानात आलं की, सर्वसाधारणपणे आपल्या सुखाच्या व्याख्या ह्या आजपर्यंत ठरलेल्या होत्या.
सुख, आनंद म्हणजे काय तर हॉटेलिंग करणे, चित्रपट नाटकाला जाणं, किंवा एखाद्या लग्न समारंभ व सांस्कृतिक संगीतमय कार्यक्रमाला सहपरिवार जाणं, किंवा पर्यटनाला एखाद्या चांगल्या ठिकाणी जाऊन निसर्गरम्य तिचा अनुभव घेणे, मित्रमंडळींच्या सहवासात मन रमवणं इ.इ .अशा ठराविक पद्धती म्हणजेच आनंदमय जीवन अशी आपल्याला आतापर्यंत कल्पना झाली होती आणि तीच मनात रुजून बसली होती.
मात्र आता कोरोनारुपी महासंकटाच्या गेल्या वर्षभराच्या न भूतो न भविष्यती अशा आव्हानात्मक विचित्र परिस्थितीमुळे, सगळेच संदर्भ बदलल्यामुळे, कधी नव्हे ती सुख म्हणजे काय याची तपासणी करण्याची वेळ आली आहे. सध्याच्या काळात आपण प्रत्येकाने मनात ठेवावा असा आणि आपआपल्या जीवनमान व जीवनशैलीचा सांगोपांग विचार करून
आपआपल्या सुखसमाधानाच्या भवतालाचा शोध घ्यावा. "जी गोष्ट आपल्याला खूप आवडते व कराविशी वाटते, ती करायला मिळणं, हे खरं सुख", असं निदान मला तरी वाटतं आणि तसा माझा अनुभव आहे.
नाण्याची ही एक बाजू, तर दुसरी बाजू अशी की, तुम्ही जे करता त्यामुळे दुसर्याला आनंद होतो, दुसऱ्याचं काही भलं होतं, हे तुम्हाला जाणवून त्यांनाही ते जाणवणं, ह्यामध्ये देखील एक प्रकारचं वेगळंच सुख असतं. "इतरांचे भले करत राहा" असं म्हणणारं "चांगभलं" हेच शेवटी खरं आणि तीच नाण्याची दुसरी बाजू होय, सुख सुख म्हणजे काय असतं ते सांगणारी !
गुढीपाडवा जवळ आला असताना, ह्या लेखाचे वरील शीर्षक मला अवचित सुचले आणि पहाता पहाता, आता हे जे काही लिहिलं आणि हे लिहिताना जी प्रक्रिया मागे मनाची झाली, तोही एक आनंददायी क्षण आहे, असं मला नव्याने जाणवलं. कारण या साऱ्या शब्द मंथनातून काही ना काही तरी तुम्हाला नव्याने विचार करायला, नव्या दिशांच्या शोधाला प्रेरणा देणारे मिळाले असेल अशी आशा आहे. खात्री बाळगूया की, नकळत सुखाचे क्षण आपल्याला मिळत जाणारच !
# "नवे वर्ष, नवी आव्हाने,
व नव्या विचारांच्या नव्या दिशा":
ह्या ओघात मागे वळून पहाताना, सोशल मिडियावरील निवडक काही माझ्या तर काही माझ्या वाचनात आलेल्या, मार्गदर्शक संदेशांची ही मांदियाळी आपणापुढे उलगडताना मला मनस्वी आनंद व समाधान वाटत आहे.
# 👍👍👍🎂🎂 🎂🎂 🎂🎂
"गुढीपाडव्याचा व नववर्ष स्वागताचा
आनंदोत्सव घरातच जरूर साजरा करा.
आणि ध्यानात ठेवा:
"शेवटी संयम व निग्रह महत्वाचे असतात.
"अती तिथे माती" हे नेहमी खरेच ठरते. कुठे व कां थांबायचे, हे कळणेच शहाणपणाचे नव्हे कां?"
🎂🎂🎂 🎂🎂 🎂🎂 👌👌👌
# ।। "जीवन त्यांना कळले हो"।।
माणूस जेव्हा एकांतात स्वतःशी हृदयसंवाद करायला बसतो, तेव्हा तो मागे वळून आयुष्याचा लेखाजोखा घेतो. काय चुकले, काय मिळाले, काय गमावले, काय भोगले आणि कुठे आलो, कुठे होतो असा त्याच्या जीवनाचा तो जमाखर्च असतो.
असे करताना कळत नकळत त्याच्या मनात विचार येतो, जीवनाचे प्रयोजन काय, अर्थ काय, हे अहंकार राग लोभ गर्वाचे खेळ, सारे कशासाठी, कुणासाठी?
आणि अशा वेळेला, त्याला अचानकपणे, लहानपणी शाळेमधली ती कविता आठवते, आणि त्यातील ते अविस्मरणीय उद्गार त्याला सांगतात:
"जीवन त्यांना कळले हो।
मीपण, ज्यांचे पक्व फळापरी गळले हो।।
# "कसं जगायचं, असं की तसं?!":
शरीर हे एकमेवाद्वितीय साधन,
तर मन आश्चर्यकारक शक्ती; त्यांच्या समन्वयाने,
होतं जीवनाचं सोनं, वा माती !
# "गेले ते दिन, गेले!":
"ईडीयट बाँक्स व मोबाईल नव्हते, तेव्हां किती शांती, सामंजस्य अन् जिव्हाळा होता.
# गुणवंत व कार्यक्षम माणसांची कमतरता
हे पिछेहाटीचे
आणि
अनागोंदी कारभाराचे महत्वाचे कारण असते.
# " चांगुलपणाची साखळी !":
ह्या निमित्ताने जाता जाता, तुम्हाला मी एक नवी द्रुष्टी देतो व सांगतो की, सकाळी दरवाजाला लावलेल्या पिशवीतले दूध काढताना किंवा भाजी बाजारात खरेदी करताना वा मॉलमध्ये आपल्या वस्तू हातगाडीत टाकताना अथवा कुठल्याही रस्त्यावरून, पुलावरून जाताना, एवढंच काय पण आपण ज्या घरात राहतो त्या घराचा विचार करताना, क्रुपया ध्यानात घ्या, ह्या सार्या गोष्टी आपल्याला मिळतात सहजपणे, परंतु त्याकरता किती मंडळींचे हात त्यामागे आहेत, किती लोकांनी घाम गाळला आहे, त्यांचे अपार कष्ट आहेत हे नीट समजून घ्या. त्या साऱ्यांच्या संबंधी कृतज्ञतेचा मनापासून सलाम तुम्ही जर करत राहिलात, तर चांगुलपणाच्या या साखळीला अधिक बळकटी येईल आणि ही कृतज्ञतेची साखळी अशीच अव्याहत पुढे पुढे न्यायची आपल्या जीवनामध्ये सवय लावून घ्या."
असं जर तुम्ही करू शकालात, तर तुमच्याच नव्हे तर त्या हजारो अनामिक 'देणेकर्यांच्याही जीवनात "क्षणा क्षणाला रंग भरू शकाल".

# "कालानुरूप कर्तव्यपूर्तीचे महत्व":
जीवनामध्ये आपले ध्येय काय प्रयोजन काय हे प्रत्येक काळाच्या पायरीत वेगवेगळं असतं. बालपणापासून पौंगडावस्थेत त्यानंतर तारुण्यात, नंतर संसारात पूर्णपणे आणि अखेरीस निवृत्तीनंतर अशा काळाच्या वेगवेगळ्या पायऱ्या जीवनात आपण पार करत असतो. ज्या वेळेला जे कर्तव्य प्रा़धान्याने करायचं, ते जे करतात तेच जीवनात यशस्वी होतातळ पण बहुतेकांचं तसं होतच नाही, नको त्या वेळी नको त्या गोष्टी केल्यामुळे, त्यांना अखेरीस जीवनामध्ये पाहिजे ते मिळत नाही आणि सुखाचा शोध अर्धवटच राहतो. जीवनात अपयश उभं रहातं.
पण गंमत ही अशी की, कोणती गोष्ट कोणत्या वेळी प्राधान्याने करायची, हे सगळ्यांनाच लक्षात येत नाही. हीच तर जीवनाची अतर्क्य कहाणी आहे ! म्हणूनच प्रत्येकाचं आयुष्य आणि गोळाबेरीज वेग वेगळी रहाते. हे प्रारब्ध, प्रारब्ध अथवा पूर्वसंचित म्हणतात, ते कदाचित हेच असावं. कारण तुम्ही त्यापायी तसेच बरे वा वाईट असेच वागता. प्लीज असं वागायला नको होतं किंवा असंच वागायला हवं होतं ते उशिरा ध्यानात येतं.
# ट्रेझर बुक-१": "नववर्षाचे संकल्प":
माझ्या एका अभिनव उपक्रमाच्या अर्थात् ट्रेझर बुकच्या पहिल्याच पानावर २०१४ सालच्या नववर्षाच्या गुढी पाडव्याच्या दिवशी, नववर्षाच्या संकल्पनात मी पुढील नोंद केली होती. आज तिची आठवण पुनश्च जागी झाली. ह्या खास लेखाच्या अखेरीस मी येथे फक्त तिला बदलत्या आव्हानात्मक कालानुरूप संपादित स्वरूप दिले आहे इतकेच:
आपले संकल्प पूर्ण होण्यासाठी,
१ कर्ता-स्वतः,
२ निश्चित ध्येय,
३ प्रत्यक्ष कृती,
४ चिकित्सा सुधारणांचे सातत्य,
५ वेळेतील पूर्तता.
ह्या पंचसूत्री आवश्यक होय.
बहुदा नववर्षाचे संकल्प काही दिवसानंतर वाऱ्यावर सोडले जातात. तसे यंदा होऊ नये. आपले संकल्प मागील सर्व वर्षांचा आढावा घेऊन त्यातील Victory Spots अर्थात ज्यांचा आपल्या गुणांमुळे, कृतीमुळे वा निष्पत्ती मुळे अभिमान वाटावा, तिचे समाधान क्षण म्हणजे Victory Spots. आजच्या कठीण समयी आपल्या जीवनातील अशाच कर्तृत्व सिद्ध करणार्या घटनांची अर्थातच Victory Spots ची उजळणी करणे उचित ठरेल. प्रत्येकाच्या आयुष्यात ते असतातच.
त्या व्यतिरिक्त, जीवनाला वेगळेच नको ते वळण लावणारे Turning Points व सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यामधील आपल्या चुकांचे वा अयोग्य वागण्याचे प्रसंग ध्यानात ठेऊन, आगामी वर्षाचे संकल्प निश्चित करावेत.
प्रातिनिधिक वार्षिक संकल्प असे असू शकतात:
१ अ- शारिरिक मानसिक व भावनिक आरोग्य सर्वोत्तम राखणे, ह्याला सर्वात जास्त प्राधान्य,
१ ब-आळस सोडणे नेहमी क्रुतीशील व उत्साही रहाणे,
२ दुसऱ्यांचा विचार करून त्यांना शक्यतो न दुखवता वागणे,
३ गरज नसताना न बोलणे,
४ प्रत्येक जबाबदारी वेळच्या वेळी पूर्ण करणे,
५ कर्तव्य पूर्ण करण्यात टंगळ मंगळ वा चालढकल न करणे,
६ कोणत्याही प्रसंगाला निर्भयपणे सामोरे जाणे,
७ आर्थिक बाजू भवितव्याचा सांगोपांग विचार करून सतत नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करणे,
८ निश्चित असा आपला दिनक्रम आखून त्याप्रमाणे काटेकोर वागणे,
९ कौटुंबिक कर्तव्ये प्राधान्याने पूर्ण करणे,
१० कुटुंबातल्या व्यक्तींशी सुसंवाद साधत रहाणे व त्यांच्याबरोबरचे संबंध सलोख्याचे राहतील यासाठी कायम दक्ष असणे,
११ परिचय व स्नेहपरिवार वाढवण्याचा प्रयत्न करणे, माणसे निवडताना नीट तारतम्य बाळगणे,
१२ कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न करणे, विशेषतः मोबाईल वापर मर्यादित ठेवणे,
१३ जिज्ञासा आणि काही ना काही तरी नवीन ज्ञान आपण मिळवायचेच, असे ठरवून सतत नवीन शिकत रहाणे, कारण कंटीन्यूअस इम्प्रोवमेंट ही केवळ कंटीन्यूअस लर्निंग मधूनच येत असते. सर्वात महत्त्वाचे,
१४ यापुढील प्रत्येक कृतीमागे, वरीलपैकी कोणत्या ना कोणत्या तरी संकल्पाचा हेतू असेल अशी दक्षता घेणे. म्हणजेच आपले सर्व संकल्प पूर्ण होतील ह्याचा निष्ठापूर्वक प्रयत्न करत रहाणे.
थोडक्यात काळ सातत्याने बदलत असतो, म्हणूनच सध्याचे त्रासदायक दिवसही कायम सोबत करणार नाहीत, हा विश्वास असूं द्या. जीवन हे सुंदर आहे, तो एक कडू व गोड क्षणांचे अनुभव घेण्याचा खेळ आहे. सध्याचा काळ भयानक कसोटीचा जात आहे, हे जरी खरे असले तरी . अशावेळी पुन्हा पुन्हा लक्षात हवे की,
!! When Time is Tough,
Toughs get going !!
तेव्हा,
!! "पुनश्च हरि ओम्" !! !! "फाईट बिगिन्स" !!:
मन उदास न करता, निराश न होता, self motivation च्या जोरावर सर्व सामर्थ्यानिशी संकटकाळाचा सामना करायला प्रारंभ करा. यश आणि येणारा प्रत्येक दिवस तुमचाच आहे !!
!!शुभस्य शीघ्रम् !!
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
पाच एप्रिलच्या मध्यरात्री गुरु मकर राशीतून कुंभ राशीत गेला असल्यामुळे तो शुभफलदायी होईल. शिवाय यानंतर मंगळ १३ एप्रिल रोजी वृषभेतून तो मिथून राशीत गेल्यानंतर, इतक्या दिवसांचा पीडाकारी राहू-केतू मुळे होणारा कालसर्पयोग, देखील समाप्त होणार आहे. त्यामुळे ज्योतिषाच्या अंगाने देखील आपल्याला आशा ठेवायला भरपूर वाव आहे. परिस्थिती निश्चितच हळूहळू सुधारत जाईल अशी आपण मनोमन इच्छा व खात्री बाळगू या....
पुनश्च गुढीपाडव्याच्या व आगामी वर्षासाठी मनःपूर्वक शुभचिंतन.....

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा