शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०१९

"पुढचं पाऊल":"आगामी आठवड्याचे वैशिष्ट्यपूर्ण राशीभविष्य: २७ आँक्टोबर'१९ ते २ नोव्हेंबर'१९:


 "पुढचं पाऊल":
अर्थात्
"आगामी आठवड्याचे वैशिष्ट्यपूर्ण राशीभविष्य:
२७ आँक्टोबर'१९ ते २ नोव्हेंबर'१९:

प्रथम आगामी दिवाळी व नववर्ष तुम्हा सर्वांना सुख समाधानाचे, प्रगतीपर व शांतीचे जावो ही सदिच्छा.

"रोमांचकारी घटना घडणार?":

मागील आठवड्यात, "पुढचं पाऊल" साप्ताहिक राशीभविष्यामध्ये मी, २१ ऑक्‍टोबरला होणाऱ्या चार ग्रहांच्या केंद्र योगांचे परिणाम, मोठी उलथापालथ होईल असे मांडले होते. अगदी त्याचाच अनुभव आता येत आहे आणि असे म्हणण्याची वेळ आली आहे की:

"हीच ती वेळ"
"हाच तो क्षण"
"अभी नही, तो कभी भी नही!"

ह्याच आठवड्यात देखिल, असेच दखल घेण्याजोगे तीन षडाष्टक आणि एक केंद्रयोग होत आहेत! त्यांचा परिणाम कोणकोणत्या नाट्यमय घटना घडवून आणतो, ते लवकरच दिसेल. हे तीन षडाष्टक म्हणजे २९ तारखेला मंगळाचा-नेपच्यूनशी, तर ३० तारखेला चंद्राचा हर्षल व राहूशी षडाष्टक योग; तर केंद्रयोग ३१ तारखेला चंद्र आणि नेपच्यूनचा, असे ते कुयोग आहेत.
बघु या काय काय रोमांचकारी घडते ते!

"एकमेकाद्वितीय अनुकूल गुणपद्धत":

अगदी आगळेवेगळे असे हे राशिभविष्य आहे. अशा अभिनव पद्धतीचे राशीभविष्य तुम्ही कुठेही कधी, वाचले वा पाहिले नसेल. कारण येथे आम्ही ज्योतिषाचा उपयोग ग्रह बदलानुसार प्रत्येक राशीला ग्रहांच्या शुभ दिवसाप्रमाणे अनुकूल गुण देऊन तुमच्या राशीच्या नशीबाला संख्यात्मक रूप दिले आहे.

जीवन म्हणजे बारा राशींच्या माणसांच्या नशीबाची जणु शर्यतच असते. नशीबाच्या परिक्षेत ग्रहबदलानुसार कुणाला किती अनुकूल गुण, कुणाचा, कोणता गट, ह्याच्या चर्च्या व गप्पा
आँफीस कँटीनमध्ये प्रवासांतल्या गप्पांमध्ये.....
आणि कुठे कुठे......
उत्तरोत्तर कुतूहल वाढवत लोकप्रिय होणारे हे साप्ताहिक राशीभविष्य!

"तुम्हीच तुमच्या नशीबाचे शिल्पकार!":

स्पर्धात्मक जीवनात इतर राशीची माणसे कुठं होती व येत्या आठवड्यात त्यांचे नशीबाचे तुलनेत आपले काय स्थान आहे, ते सारे ह्या गुणांमुळे तुम्हाला समजू शकेल. त्या प्रमाणे तुम्ही आपले अपेक्षा व प्रयत्न विषयक, धोरण ठरवू शकता.
ह्यासाठी आम्ही म्हणतो:
"तुम्हीच तुमच्या नशीबाचे शिल्पकार!":

"नशीबाच्या परिक्षेचा निकाल":

येत्या आठवड्यातील प्रमुख ग्रहबदल: शुक्र २८ तारखेला तुळेतून व्रुश्चिक राशीत. तर चंद्राचा प्रवास कन्या, तुळा, व्रुश्चिक व धनु राशी असा होणार आहे.

ह्या आठवड्यात, एकंदर ग्रहमानात सुधारणा होत असल्याने अनुकुल गुणात राशीनिहाय तशीच वाढ होणार असून, आघाडी कायम ठेवणारी कर्क रास व त्यामागोमाग तुळा व कुंभ राशी नशीबवान ठरतील.

उत्तरोत्तर असेच अधिकाधिक मार्गदर्शक बदल आम्ही करत जाणार आहोत. आपल्याला काय अनुभव येतात ते जरुर टिप्पणींत लिहावे. आमच्या ह्या ज्योतिष संशोधन प्रयोगाला दिशा मिळू शकेल.

१. "राशीनिहाय नशीबाची गटवारी":

२७ आँक्टोबर'१९ ते २ नोव्हेंबर'१९ ह्या आठवड्यातील ग्रहस्थितीनुसार बाराही राशींच्या नशिबाचे गुण व गटवारी ही अशी आहे:

पहिला उत्तम गट: कर्क

दुसरा शुभ उजवा गट: तुळा, कुंभ

तिसरा मध्यम गट: व्रुश्चिक, कन्या, मेष व मीन

चौथा कष्टाचा डावा गट: मिथून, व्रुषभ, धनु व सिंह

पाचवा कटकटींचा तळाचा गट: मकर

२. "राशीनिहाय नशीबाचा अनुकूल गुणतक्ता ":

आता मागच्या आठवड्याचे तुलनेत येणार्या आठवड्याचे, वरील पद्धतीने अनुकूल गुण व क्रमांक प्रथम, तर कंसात मागील आठवड्याचे गुण व बारा राशीत क्रमांक असे आहेत:
(एकूण ४९ गुणांपैकी)

चंद्र राशी   अनुकूल गुण       बारा राशीत

                                     क्रमांक
१ मेष          २६ ( २३ )            ६ ( ७ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणांत व क्रमांकात समाधानकारक स्थिती. नोकरीतील प्रगती व विरोध काबूत ठेवाल. आर्थिक जमाखर्च संभाळला जाईल. प्रवासात घाईगर्दी नको. कौटुंबिक वातावरण मात्र नरम गरम.

२ व्रुषभ       २२ (२० )            ९ ( १० )

मागच्या आठवड्यापेक्षा गुण किंचीत वाढले. राशींच्या स्पर्धेत क्रमांकात एक पाऊल पुढे गेले. नोकरी व्यवसायात वरिष्ठांशी जुळवून घ्या व आर्थिक नियोजन करा. कौटुंबिक आजारपणे प्रवासात अडचणी.

३ मिथून    २४ ( २४ )                 ८ ( ६ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुण तितकेच पण इतर स्पर्धेत राशींना अधिक त्यामुळे क्रमांकात घसरण.
आर्थिक व्यवहारात गफलत होऊ शकेल, सावध रहा. नोकरी व्यवसायात धावपळ झाल्याने तब्येतीवर अनिष्ट परिणाम. जोडीदाराचा सहकार.

४ कर्क          ४० ( ३८ )             १ ( १ )

मागच्या आठवड्यासारखीच आघाडी. नोकरीत प्रगती व अर्थव्यवहार आनंददायी. दूरचे प्रवास होतील व नवीन ओळखी लाभदायक. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे.

५ सिंह           २२ ( २० )             ११ ( ११ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुण तसे इतरांच्या तुलनेत कमीच. स्पर्धेत अजून निराशाजनक स्थिती. नोकरी व्यवसायात वाढतील. आर्थिक ओढाताणीमुळे मानसिक चिंता. संततीच्यि तब्बेतीची काळजी घ्या.

६ कन्या       २७ (२५ )                ५ ( ५ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणांत व क्रमांकात थोडी वाढ आपण स्पर्धेत प्रयत्न यशस्वी. नोकरीत व्यवसायात कामाचा बोजा सफाईने वेगळा कराल. अर्थार्जन सुधारेल. मात्र आपल्या कुटुंबातील वडिलधाऱ्यांकडे वेळीच लक्ष द्या.

७ तुळा         ३० ( २८ )             २ (  २ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणात वाढ, त्यामुळे क्रमांक तोच राखाल. तब्येतीत चांगली सुधारणा व उत्साहाने नोकरी व्यवसायात तुमच्यावरील महत्वाची जबाबदारी पार पाडाल. कौटुंबिक सुख समाधान.

८ व्रुश्चिक    २७ ( २५ )                  ४ ( ३ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुण वाढले खरे, पण वाढत्या स्पर्धेमुळे क्रमांकात एक पायरी खाली याल. नोकरी व्यवसायात अनुकूल घटना, त्यांचा लाभ घ्या. आर्थिक व्यवहार चोख होतील कौटुंबिक मंगल प्रसंग.

९ धनु        २२ ( २१)                 १०  (  ९ )  

मागच्या आठवड्यापेक्षा गुणांत किंचीत वाढ परंतु क्रमांकात घसरण. नोकरीत बोलणी खावी लागतील, कसाबसा टिकाव धरू शकाल. आर्थिक चिंता व एकंदर मानसिक अस्वस्थता. प्रवास काळजीपूर्वक करा.

१० मकर       १३ ( ११ )              १२ ( १२ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुण वाढले तरी क्रमांक,
पुन्हा शेवटचा! कारण इतरांना अधिक सुलभ शुभ ग्रहमान. नोकरी व्यवसायात खुप धावपळ व कष्ट. प्रवासात एखादी अप्रिय घटना. कौटुंबिक वातावरण ताणतणावाचे. जोडीदाराच्या तब्येतीची चिंता

११ कुंभ       २९ ( २५ )                  ४ ( ४ )

मागच्या आठवड्यापेक्षा नशीबाच्या गुणात व क्रमांकात उत्तम सुधारणा. नोकरी व्यवसायात अर्थलाभ प्रमोशन तसेच यशदायी प्रवास. स्थावर विषयक प्रश्नी लाभ. कौटुंबिक खेळीमेळीचे वातावरण.

१२ मीन      २५ ( २२ )                    ७ ( ८) 

मागच्या आठवड्यापेक्षा गुणात व क्रमांकात थोडी वाढ. नोकरीतील अडचणी खुबीने दूर केल्या तरी आर्थिक व्यवहारात नुकसान तब्येतीची हयगय नको. प्रवासात वादविवाद टाळा.

( ) कंसांत मागील आठवड्याचे गुण व क्रमांक

स्पर्धात्मक जीवनात आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता मागच्यापेक्षा कसे प्रयत्न करावे लागतील, त्याचा अंदाज वरील गुणतक्ता दाखवू शकतो.

आपण आपल्याला येणाऱ्या अनुभवांचा योग्य तो प्रतिसाद आम्हाला जरूर कळवावा.

ही अभिनव व एकमेकाद्वितीय पद्धत लोकप्रिय होत आहे. आपणही तिची माहिती इतरांना जरुर द्यावी.

दर शनिवारी, माझ्या ब्लॉगवर, ग्रहस्थितीनुसार आपल्या आगामी आठवड्याचे अनुकूल गुणांवर आधारित, हे अभिनव राशीभविष्य मी असेच आपल्या उपयोगासाठी मांडत जाणार आहे.

शिवाय you tube वरील

moonsun grandson

ह्या माझ्या चँनेलवर तसा विडीओही प्रदर्शित केला जाईल. त्याचा आवर्जून लाभ घ्या. तशी सवय लावून घ्या.

आता पुढील आठवड्यात माझा एक हाती काढलेला वार्षिक राशीभविष्य व इतर विविधरंगी साहित्याची मेजवानी असलेला "सुधा" डिजिटल दिवाळी अंक'१९-वर्ष तिसरे, मी प्रसिद्ध करणार आहे.

त्यातील अनोखी गोष्ट':
## हा अंक आपणास मिळाल्यानंतरच, अपेक्षित मानधन रू ७५/-फक्त आँनलाईन पेमेंटद्वारे करा...
क्रुपया आपला होकार प्रतिसादात वा मेसेंजरवर अथवा whatsapp 9820632655
तुमचे नांव गांव आणि ईमेल देऊन कळवावा.

तसेच वरील चँनेलवर राशीनिहाय संपूर्ण राशीभविष्याचे विडीओज् मी प्रकाशित करणार आहे... त्यांचा जरूर लाभ घ्या.

माझ्या ब्लॉगची लिंक आहे:

http//moonsungrandson.blogspot.com

ही लिंक नेहमी उघडा, शेअरही करा.....

धन्यवाद.

लेखक: प्रा. सुधाकर नातू

२५/१०/'१९




शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

"पुढचं पाऊल": "एकमेवाद्वितीय साप्ताहिक राशीभविष्य: २० आँक्टोबर'१९ ते २६ आँक्टोबर'१९:


 "पुढचं पाऊल":
अर्थात्
"आगामी आठवड्याचे वैशिष्ट्यपूर्ण राशीभविष्य:
२० आँक्टोबर'१९ ते २६ आँक्टोबर'१९:

प्रथम आगामी दिवाळी व नुतन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समाधान प्रगतीपर व शांतीचे जावो ही सदिच्छा.

"एकमेकाद्वितीय अनुकूल गुणपद्धत":

अगदी आगळेवेगळे असे हे राशिभविष्य आहे. अशा अभिनव पद्धतीचे राशीभविष्य तुम्ही कुठेही कधी, वाचले वा पाहिले नसेल. कारण येथे आम्ही ज्योतिषाचा उपयोग ग्रह बदलानुसार प्रत्येक राशीला ग्रहांच्या शुभ दिवसाप्रमाणे अनुकूल गुण देऊन तुमच्या राशीच्या नशीबाला संख्यात्मक रूप दिले आहे.

जीवन म्हणजे बारा राशींच्या माणसांच्या नशीबाची जणु शर्यतच असते. ह्या आमच्या अनुकूल गुण पद्धतीमुळे जीवन स्पर्धेत कोण 'हुशार' व कोण 'ढ' हे आता येथेच समजणार आहे!

"तुम्हीच तुमच्या नशीबाचे शिल्पकार!":

स्पर्धात्मक जीवनात इतर राशीची माणसे कुठं होती व येत्या आठवड्यात त्यांचे नशीबाचे तुलनेत आपले काय स्थान आहे, ते सारे ह्या गुणांमुळे तुम्हाला समजू शकेल. त्या प्रमाणे तुम्ही आपले अपेक्षा व प्रयत्न विषयक, धोरण ठरवू शकता.
ह्यासाठी आम्ही म्हणतो:
"तुम्हीच तुमच्या नशीबाचे शिल्पकार!":

अशा एकमेवाद्वितीय कल्पनेचे हे उपयुक्त राशिभविष्य उत्तरोत्तर विलक्षण लोकप्रिय होत आहे.

"नशीबाच्या परिक्षेचा निकाल":

येत्या आठवड्यातील प्रमुख ग्रहबदल: बुध २३ तारखेला तुळेतून व्रुश्चिक राशीत. तर चंद्राचा प्रवास मिथून, कर्क सिंह व कन्या राशी असा होणार आहे. ह्या आठवड्याचे वैशिष्ट्य म्हणजे २१ तारखेला होणारे चार अनिष्ट केंद्रयोगः
रवि-चंद्र, चंद्र-बुध, मंगळ-राहू आणि मंगळ-केतू. उलथापालथ घडविणारे हे चमत्कारिक कुयोग मीन मिथून धनु व कन्या राशींसाठी त्रासदायक व अडचणी वाढविणारे आहेत. त्यांनी मनावर संयम ठेवावा.

ह्या आठवड्यात, वरील केंद्रयोग सोडता बाकी ग्रहमानात किंचीत सुधारणा होत असल्याने अनुकुल गुणात राशीनिहाय तशीच वाढ होणार असून, आघाडी कायम ठेवणारी कर्क रास व त्यामागोमाग तुळा राशी नशीबवान ठरेल.

उत्तरोत्तर अधिकाधिक मार्गदर्शक बदल आम्ही करत जाणार आहोत. आपल्याला काय अनुभव येतात ते जरुर टिप्पणींत लिहावे. आमच्या ह्या ज्योतिष संशोधन प्रयोगाला दिशा मिळू शकेल.

१. "राशीनिहाय नशीबाची गटवारी":

२० आँक्टोबर'१९ ते २६ आँक्टोबर'१९ ह्या आठवड्यातील ग्रहस्थितीनुसार बाराही राशींच्या नशिबाचे गुण व गटवारी ही अशी आहे:

पहिला उत्तम गट: कर्क

दुसरा शुभ उजवा गट: तुळा

तिसरा मध्यम गट: व्रुश्चिक, कुंभ,कन्या मिथून व मेष

चौथा कष्टाचा डावा गट: मीन, धनु व्रुषभ व सिंह

पाचवा कटकटींचा तळाचा गट: मकर

२. "राशीनिहाय नशीबाचा अनुकूल गुणतक्ता ":

आता मागच्या आठवड्याचे तुलनेत येणार्या आठवड्याचे, वरील पद्धतीने अनुकूल गुण व क्रमांक प्रथम, तर कंसात मागील आठवड्याचे गुण व बारा राशीत क्रमांक असे आहेत:
(एकूण ४९ गुणांपैकी)

चंद्र राशी   अनुकूल गुण       बारा राशीत

                                     क्रमांक
१ मेष          २३ ( १६ )             ७ ( १० )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणांत व क्रमांकात समाधानकारक स्थिती. नोकरीतील अडचणी व वादविवाद काबूत ठेवाल. आर्थिक जमाखर्च संभाळा. घाईगर्दी नको. तब्येत नरम गरम.

२ व्रुषभ       २० (२१ )            १० ( ७ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुण थोडे घसरले. राशींच्या स्पर्धेत क्रमांकात पाऊल मागे गेले. नोकरी व्यवसायात स्पर्धा वाढेल व आर्थिक घडी विसकटेल. कौटुंबिक सारे आलबेल नाही. प्रवासात नुकसानीचा फटका बसू शकेल सावध रहा.

३ मिथून    २४ ( १८ )           ६ ( ८ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणांमध्ये वाढ.
आर्थिक व्यवहारात सुखद घटना. नोकरी व्यवसायात जैसे थे. धावपळ झाल्याने तब्येत नरम गरम. जोडीदाराच्या अपेक्षा ध्यानात ठेवा.

४ कर्क          ३८ ( ४१)              १ ( १ )

मागच्या आठवड्यासारखीच आघाडी. नोकरीत प्रगती व अर्थव्यवहार मनाजोगते. कौटुंबिक आनंददायी घटना. प्रवासात नवीन ओळखी लाभदायक. भविष्यासाठी आत्ताच तरतूद करा.

५ सिंह           २० ( १५ )             ११ ( ११ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुण तसे इतरांच्या तुलनेत कमीच. स्पर्धेत अजून निराशाजनक स्थिती. नोकरी व्यवसायात नको ती कामे व अडचणीत भर पडेल. मानसिक चिंता वाढतील. आर्थिक नुकसानीकडे लक्ष द्यावे.

६ कन्या       २५ (२७ )             ५ ( २ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणांत व क्रमांकात थोडी घसरण. आपण स्पर्धेत प्रयत्न अपुरे पडतील. नोकरीत व्यवसायात जास्त कामाचा बोजा. अर्थार्जन सुधारेल. मात्र आपल्या आजारांकडे वेळीच लक्ष द्या.

७ तुळा         २८ ( २५ )             २ (  ३ )

मागच्या इतक्या आठवड्यापेक्षा गुण व क्रमांकात सुधारणा. नोकरी व्यवसायात तुमच्यावर महत्वाची जबाबदारी व मान. कौटुंबिक आनंदवार्ता.

८ व्रुश्चिक    २५ ( २२ )             ३ ( ६ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुण व क्रमांकात सुधारणा. नोकरी व्यवसायात वरिष्ठांची मर्जी त्याचा लाभ घ्या. आर्थिक व्यवहार वेळीच पूर्ण करा. कौटुंबिक शांती.

९ धनु        २१ ( २३)          ९  (  ५ )  

मागच्या आठवड्यापेक्षा गुणांत व क्रमांकात घसरण. नोकरीत अपमान. कसाबसा टिकाव धरू शकाल. संततीविषयक चिंता व एकंदर मानसिक अस्वस्थता.

१० मकर       ११ ( १२ )           १२ ( १२ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुण कमी आणि क्रमांक पुन्हा शेवटचा! नोकरी व्यवसायात वरिष्ठ नाराज. प्रवासात अप्रिय घटना. कौटुंबिक वातावरण ताणतणावाचे. तब्येत संभाळा.

११ कुंभ       २५ ( १७ )            ४ ( ९ )

मागच्या आठवड्यापेक्षा नशीबाच्या गुणात व क्रमांकात उत्तम सुधारणा. नोकरी व्यवसायात उत्साहवर्धक स्थिती. आर्थिक लाभ. कौटुंबिक खेळीमेळीचे वातावरण.

१२ मीन      २२ ( २४ )             ८ ( ४ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणात व क्रमांकात थोडी घसरण. नोकरीत अडचणी आर्थिक व्यवहार जपून करा. संततीच्या तब्येतीची चिंता. कौटुंबिक वादविवाद टाळा.

( ) कंसांत मागील आठवड्याचे गुण व क्रमांक

स्पर्धात्मक जीवनात आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता मागच्यापेक्षा कसे प्रयत्न करावे लागतील, त्याचा अंदाज वरील गुणतक्ता दाखवू शकतो.

आपण आपल्याला येणाऱ्या अनुभवांचा योग्य तो प्रतिसाद आम्हाला जरूर कळवावा.

ही अभिनव व एकमेकाद्वितीय पद्धत लोकप्रिय होत आहे. आपणही तिची माहिती इतरांना जरुर द्यावी.

दर शनिवारी, माझ्या ब्लॉगवर, ग्रहस्थितीनुसार आपल्या आगामी आठवड्याचे अनुकूल गुणांवर आधारित, हे अभिनव राशीभविष्य मी असेच आपल्या उपयोगासाठी मांडत जाणार आहे.

शिवाय you tube वरील

moonsun grandson

ह्या माझ्या चँनेलवर तसा विडीओही प्रदर्शित केला जाईल. त्याचा आवर्जून लाभ घ्या. तशी सवय लावून घ्या.

आता पुढील आठवड्यात माझा एक हाती काढलेला "सुधा" डिजिटल दिवाळी अंक'१९-वर्ष तिसरे मी प्रसिद्ध करणार आहे, त्यात असेच अनुकूल गुण आधारित वार्षिक राशीभविष्य आहे. तसेच वरील चँनेलवर राशीनिहाय संपूर्ण राशीभविष्याचे विडीओज् मी प्रकाशित करणार आहे... त्यांचा जरूर लाभ घ्या.

माझ्या ब्लॉगची लिंक आहे:

http//moonsungrandson.blogspot.com

ही लिंक नेहमी उघडा, शेअरही करा.....

धन्यवाद.

लेखक: प्रा. सुधाकर नातू

१९/१०/'१९




शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१९

"पुढचं पाऊल": आगळेवेगळे राशीभविष्य: १३आँक्टोबर'१९ ते १९आँक्टोबर'१९:


 "पुढचं पाऊल":
अर्थात्
"आगामी आठवड्याचे वैशिष्ट्यपूर्ण राशीभविष्य:
१३आँक्टोबर'१९ ते १९आँक्टोबर'१९:

"एकमेकाद्वितीय अनुकूल गुणपद्धत":

अगदी आगळेवेगळे असे हे राशिभविष्य आहे. अशा अभिनव पद्धतीचे राशीभविष्य तुम्ही कुठेही कधी, वाचले वा पाहिले नसेल. कारण येथे आम्ही ज्योतिषाचा उपयोग ग्रह बदलानुसार प्रत्येक राशीला ग्रहांच्या शुभ दिवसाप्रमाणे अनुकूल गुण देऊन तुमच्या राशीच्या नशीबाला संख्यात्मक रूप दिले आहे.

जीवन म्हणजे बारा राशींच्या माणसांच्या नशीबाची जणु शर्यतच असते. ह्या आमच्या अनुकूल गुण राशीनिहाय काढण्याच्या पद्धतीमुळे जीवन स्पर्धेत कोण 'हुशार' व कोण 'ढ' हे आता येथेच समजणार आहे!

"तुम्हीच तुमच्या नशीबाचे शिल्पकार!":

अनुकूल गुण पद्धतीचा उपयोग, आपण मागच्या आठवड्यात कुठे होतो, आता येणार्या आठवड्यात काय नशीब आहे, तसेच स्पर्धात्मक जीवनात इतर राशीची माणसे कुठं होती व येत्या आठवड्यात त्यांचे नशीबाचे तुलनेत आपले काय स्थान आहे, ते सारे ह्या गुणांमुळे तुम्हाला समजू शकेल. त्या प्रमाणे तुम्ही आपले अपेक्षा व प्रयत्न विषयक, धोरण ठरवू शकता.
ह्यासाठी आम्ही म्हणतो:
"तुम्हीच तुमच्या नशीबाचे शिल्पकार!":

अशा एकमेवाद्वितीय कल्पनेचे हे उपयुक्त राशिभविष्य उत्तरोत्तर विलक्षण लोकप्रिय होत आहे.

"नशीबाच्या परिक्षेचा निकाल":

येत्या आठवड्यातील ग्रहबदल हा रवि १७ तारखेला तुळेत जातो व चंद्राचा प्रवास मीन मेष व व्रुषभ रास असा होणार आहे. त्यामुळे अनुकुल गुणात राशीनिहाय विशेष उलथापालथ होणार नसून, आघाडी कायम ठेवणारी कर्क रास सोडता बाकी सर्व राशींना मागील आठवड्याप्रमाणेच कष्ट अधिक व अपेक्षा कमी ठेवाव्या लागणार आहेत.

राशीनिहाय अनुकूल गुणांच्या पाच गटातील विभागणीवरून आपल्या नशीबाचे चक्र फिरवायला मदत होईल अशी आशा आहे. उत्तरोत्तर अधिकाधिक मार्गदर्शक बदल आम्ही करत जाणार आहोत.

१. "राशीनिहाय नशीबाची गटवारी":

१३ आँक्टोबर'१९ ते १९ आँक्टोबर'१९ ह्या आठवड्यातील ग्रहस्थितीनुसार बाराही राशींच्या नशिबाचे गुण व गटवारी ही अशी आहे:

पहिला उत्तम गट: कर्क

दुसरा शुभ उजवा गट: कोणतीही रास नाही.

तिसरा मध्यम गट: कन्या तुळा मीन धनु व व्रुश्चिक

चौथा कष्टाचा डावा गट: व्रुषभ मिथुन कुंभ व मेष

पाचवा कटकटींचा तळाचा गट: सिंह व मकर

२. "राशीनिहाय नशीबाचा अनुकूल गुणतक्ता ":

आता मागच्या आठवड्याचे तुलनेत येणार्या आठवड्याचे, वरील पद्धतीने अनुकूल गुण व क्रमांक प्रथम, तर कंसात मागील आठवड्याचे गुण व बारा राशीत क्रमांक असे आहेत:
(एकूण ४९ गुणांपैकी)

चंद्र राशी   अनुकूल गुण       बारा राशीत

                                     क्रमांक
१ मेष          १६ ( १९ )            १० ( ७ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणांत व क्रमांकात घसरण. कौटुंबिक अडचणी व वादविवादांमुळे चिंता. नोकरी व्यवसायात दमछाक होईल. संयम व कष्ट वाढवावे लागतील.

२ व्रुषभ       २१ (१८ )         ७ ( ८ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुण सुधारले व राशींच्या स्पर्धेत क्रमांकात एक पाऊल पुढे गेले तरी सारे आलबेल नाही. तब्येत नरम गरम.
नोकरी व्यवसायात नुकसान वा नव्या समस्यांना तोंड द्यावे लागेल. कौटुंबिक असमाधान.

३ मिथून    १८ ( १६ )           ८ ( ९ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणांमध्ये किंचीत वाढ.
आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. नोकरी व्यवसायात वरिष्ठ नाराज. चौथा उणा गट आहे, हे ध्यानात ठेवा.

४ कर्क          ४१ ( ४४)       १ ( १ )

मागच्या आठवड्यासारखीच उत्साहवर्धक स्थिती. अव्वल क्रमांकामुळे नोकरीत प्रगती व अर्थव्यवहार फायदेशीर. कौटुंबिक स्वास्थ सुधारेल. पुढच्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करण्यासाठी. आत्ताच तरतूद करा.

५ सिंह          १५ ( १२ )          ११ ( १२ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणांमध्ये थोडी सुधारणा. पण स्पर्धेत अजून निराशाजनक स्थिती. नोकरी व्यवसायात घाई गर्दीमुळे अडचणीत भर पडेल. शारिरीक अस्वास्थ्य. आर्थिक कुचंबणा.

६ कन्या        २७ (२३ )            २ ( ५ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणांत व क्रमांकात सुधारणा. आपण स्पर्धेत प्रयत्न योग्य कराल. नोकरीत व्यवसायात युक्तीने यश. अर्थार्जन सुधारेल मात्र कौटुंबिक आजारांकडे ध्यान द्या.

७ तुळा          २५ ( २३ )           ३ (  ४ )

मागच्या इतक्या आठवड्यापेक्षा गुण व क्रमांकात माफक सुधारणा. प्रवास फलदायी. नोकरी व्यवसायात तुमच्या शब्दाला मान. जोडीदाराशी मतभेद टाळावेत.

८ व्रुश्चिक    २२ ( २२ )            ६ ( ६ )

मागच्या आठवड्याप्रमाणेच गुण व क्रमांक. नोकरी व्यवसायात वरिष्ठांशी जुळवून घ्या. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. कौटुंबिक वातावरण समाधानकारक.

९ धनु         २३ ( २४ )            ५ (  ३ )  

मागच्या आठवड्यापेक्षा गुणांत व क्रमांकात किंचीत घसरण. पण इतर राशींचीही स्थिती तशी वेगळी नाही. म्हणून स्पर्धेत कसाबसा टिकाव धरू शकाल. नवे आर्थिक प्रश्न उभे रहातील. मानसिक अस्वस्थता.

१० मकर        १२  ( १५)          १२ ( १० )

मागच्या आठवड्यापेक्षा गुण कमी आणि क्रमांक पुन्हा शेवटचा! नोकरी व्यवसायात त्रासदायक घटना. कौटुंबिक वातावरण बिघडून तुमच्या ताणतणावात भर पडेल. संयम व प्रयत्न वाढवा.

११ कुंभ         १७ ( १५ )           ९ ( ११ )

मागच्या आठवड्यापेक्षा नशीबाच्या गुणात व क्रमांकात थोडी सुधारणा. नोकरी व्यवसायात सहकारी त्रस्त करतील. आर्थिक निर्णय नीट अभ्यास करुन घ्या. तब्येतीची चिंता.

१२ मीन      २४ ( २६ )            ४ ( २ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणात व क्रमांकात थोडी घसरण. स्पर्धेत प्रयत्नांची पराकष्टा करावी लागेल. आर्थिक व्यवहार योग्य तर्हेने कराल. संततीकडून उत्साहवर्धक बातमी. कौटुंबिक सुख समाधान.

( ) कंसांत मागील आठवड्याचे गुण व क्रमांक

स्पर्धात्मक जीवनात आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता मागच्यापेक्षा कसे प्रयत्न करावे लागतील, त्याचा अंदाज वरील गुणतक्ता दाखवू शकतो.

आपण आपल्याला येणाऱ्या अनुभवांचा योग्य तो प्रतिसाद आम्हाला जरूर कळवावा.

ही अभिनव व एकमेकाद्वितीय पद्धत लोकप्रिय होत आहे. आपणही तिची माहिती इतरांना जरुर द्यावी.

दर शनीवारी, माझ्या ब्लॉगवर, ग्रहस्थितीनुसार आपल्या आगामी आठवड्याचे अनुकूल गुणांवर आधारित, हे अभिनव राशीभविष्य मी असेच आपल्या उपयोगासाठी मांडत जाणार आहे.

शिवाय you tube वरील

moonsun grandson

ह्या माझ्या चँनेलवर तसा विडीओही प्रदर्शित केला जाईल. त्याचा आवर्जून लाभ घ्या. तशी सवय लावून घ्या.

माझ्या ब्लॉगची लिंक आहे:

http//moonsungrandson.blogspot.com

ही लिंक नेहमी उघडा, शेअरही करा.....

धन्यवाद.

लेखक: प्रा. सुधाकर नातू
१२/१०/'१९




गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१९

"मनांतले जनात-२":


"मनांतले, जनांत-२":

"आज हरलो, पण उद्या जिंकणार नाही कशावरून?"
ह्या जाहिरातीच्या धर्तीवर,
"काल हरलो, पण आज जिंकणार नाही कशावरून?

# "घराणेशाही होती, आहे आणि रहाणारच आहे.
अगदी 'घराणेशाहीला नाकं मुरवडणार्यांकडे'ही!"

# "बिचारी लाचारी":
स्वाभिमानाच्या राणा भीमदेवी थाटात वल्गना करत, लाचारी एकदा स्विकारली की, ती सुटता सुटत नाही.

आपल्या अकार्यक्षमतेची आपणच दिलेली ती कबुली असते. परिस्थितीवर धैर्याने मात करणं आपल्याला अशक्य असल्याची ती दवंडी असते.

लाचारांची जागा, नेहमीच घराबाहेर असते.

# "तोट्यात जाणार्या खाजगी उद्योगांप्रमाणे, सद्यस्थितीत सरकारी नोकरांचीही योग्य त्या प्रमाणात नोकर कपात केली जाणे,
आवश्यक आहे कां?"

# राजकीय वळणाचे संदेश "सोमि" वर लिहावयाच्याच नाहीत हा माझा निग्रह गेले काही दिवसच टिकला. पण आर्थिक आघाडीवर सर्वसामान्य जनतेचे हाल करणारे घोटाळे व जे काही अप्रिय घडतंय ते पाहून संयम सुटला. आज परिस्थिती आता हाताबाहेर लौकरच जाणार अशी भीती निर्माण झाल्याने हा विचार प्रदर्शित करत आहे. तो योग्य कां अयोग्य हे ज्याचे त्याने ठरवावे. नाहीतर एक विडंबनात्मक साहित्यक्रुती समजून दुर्लक्ष करावे!:

"करायला गेले एक आणि झाले भलतेच!
द्यायला गेले नोकरी, पण भडकली की हो बेकारी!
करायला गेले नोटबंदी, पण झाली 'व्यवसायबंदी'!!
ज्यांना काल निंदती , पायघड्या त्यांना आज घालती!!!
दाखवले स्वप्न 'अच्छे दिन'चे,
पण आता तोंड कुठे कसे बरे लपवायचे?!"

# ब्रेकची गरज?
कोणत्याही सार्वजनिक उत्सवांना सध्या उन्मादाच्या अतिरेकापायी जे बाजारु, अश्लाघ्य स्वरुप आले आहे, ते पहाता खरोखरच सार्वजनिक ठिकाणी काय व कशाकरता किती दिवस कोणताही उपक्रम चालू ठेवावा, ह्याचा गांभीर्याने, सर्वांनीच विचार करण्याची वेळ आली आहे. केवळ अनेकानेक उत्सवातले धांगडधिंगे, मौज मजा आदी गोष्टीत कितीतरी करोडो मनुष्य-तास आपण वाया घालवून काय भले साधतो, ह्याचाही त्या अनुषंगाने आढावा घेणेही गरजेचे झाले आहे. तसे आताच केले नाही, तर सर्व नीतीमूल्यांचा र्हास होऊन भवितव्य अंध:कारमय व्हायला वेळ लागणार नाही. हा वेक अप् काँल आहे.

# "घडतंय, ते ते बिघडतंय!":
एखादा दिवस असा येतो की एका पाठोपाठ गोष्टी बिघडू लागतात. सकाळी पाहुणे गांवी जाणार तर धो धो पाऊस सरू झाला. वहान मिळणे कठीण झाले. घरी गँस सिलीडर रिकामा झाला व नवीन लावला तर गँस लिक होत होता.

मेकँनिक आला व वाँल्व लिक होत आहे, हा सिलीडर वापरु नका असे सागून गेला. डिलरला फोन करुन करुन थकलो, तेव्हां कुठे नवीन सिलींडर घेवून माणूस आला. हे सारे ठीक होईतो कपडे धुण्याचे मशिन बिघडले! त्याचा मेकँनिक येतो कधी, ती वाट पहावी लागली. विसावा म्हणून चहा गरम करायला घेतला, तर ओव्हनचा नन्ना.
काही कामाचे कागद छापायला गेलो, तर कार्ट्रिजची शाई सपलेली.

अखेर कुणाला तरी फोन करावा, तर फोनची बँटरी आऊट व चार्ज करताना फोन गरम,,,..
"जे जे घडतंय, ते ते बिघडतंय!"

# जगाला फसवले तरी,
कुणी, कधीही,
आपल्या मनाला फसवू शकत नाही.
देहबोली मनातल्या भावभावना प्रकट करतच असते.

# समस्या तसेच गरजा, नेहमी आव्हान उभे करतात. नवकल्पना निर्माण होतात,अशाच आव्हानांतून सुचतात. छोट्या बदलातून अधिक फायदा वा सोय कशी होईल, हे प्रयत्नपूर्वक शोधणे, हयाकरता आपण जरूर काही वेळ रोज द्यावा आणि येथे ती कल्पना शेअर करावी, ही विनंती. निरीक्षणशक्ति, विचार आणि बुद्धि, ह्या जोडीला कल्पकता वापरून दैनंदिन जीवनात अधिक सुलभता व सोयी त्यामुळे निर्माण होऊ शकतील. विचारमंथनाला नवी दिशा देत, ह्या संदेश माध्यमाचा चांगला उपयोग, हा हेतु आहे. उदाहरण म्हणून, माझा स्पिड पोस्ट वरील संदेश पुन्हा वाचा.

# "लेखन व वाचन ह्यांची आवड माणसाला स्वत:च्या विश्वात गुंतवून ठेवू शकते."

# सार्वजनिक ठिकाणी बिनदिक्कतपणे धुम्रपान करणारे, आपल्या आनंदासाठी इतरांच्या आरोग्याची हानी कां करत रहातात?
कधी व कसे,
ते सुधारणार?

# जे सुधारणे आवश्यक व शक्यही आहे,
अशा मुद्दयांवर
"सोमि" मध्ये विधायक संदेश प्रदर्शित करणे, सार्वजनिक हिताचे द्रुष्टिने गरजेचं आहे.

# जन्म आणि मरण ह्यांत,
असतं फक्त एका श्वासाचं अंतर.

तर, आवडणारा संदेश आणि दखलच न घेतला जाणारा संदेशामध्ये काय असूं शकतं?
संघर्ष करणारे आपण एकटेच नसतो.
लहान थोर सारेच संघर्षयात्री असतात.
अडचणीच कर्तबगार माणसं घडवतात.

# अनेक सुलभ अँपस् उपलब्ध असूनही काहींचा, "सोमि" वर मराठी,
धेडगुजरी इंग्रजीतून लिहीण्याचा अट्टाहास कां?
इतका आळस बरा नव्हे!


सुधाकर नातू
१०/१०/२०१९

शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०१९

"पुढचं  पाऊल": अर्थात् "आगामी आठवड्याचे वैशिष्ट्यपूर्ण राशीभविष्य: ६ आँक्टोबर'१९ ते १२ आँक्टोबर'१९:


 "पुढचं  पाऊल":
  अर्थात्
"आगामी आठवड्याचे वैशिष्ट्यपूर्ण राशीभविष्य:
६ आँक्टोबर'१९ ते १२ आँक्टोबर'१९:

"एकमेकाद्वितीय अनुकूल गुणपद्धत":

अगदी आगळेवेगळे असे हे राशिभविष्य आहे. अशा अभिनव पद्धतीचे राशीभविष्य तुम्ही कुठेही कधी, वाचले वा पाहिले नसेल. कारण येथे आम्ही ज्योतिषाचा उपयोग ग्रह बदलानुसार प्रत्येक राशीला ग्रहांच्या शुभ दिवसाप्रमाणे अनुकूल गुण देऊन तुमच्या राशीच्या नशीबाला संख्यात्मक रूप दिले आहे.

घोड्यांच्या शर्यतीत, अनेक घोडे जीवाच्या आकांताने दौडत असतात. त्यामध्ये कोण पहिला तर कुणी दुसरा तर कुणी तिसरा चौथा....असे आप आपल्या कुवतीनुसार चेकपोस्टवर पोहोचतात. तसंच जीवन म्हणजे बारा राशींच्या माणसांच्या नशीबाची जणु शर्यतच असते. ह्या आमच्या अनुकूल गुण राशीनिहाय काढण्याच्या पद्धतीमुळे जीवन स्पर्धेत कोण 'हुशार' व कोण 'ढ' हे आता येथेच समजणार आहे!

"तुम्हीच तुमच्या नशीबाचे शिल्पकार!":

अनुकूल गुण पद्धतीचा उपयोग, व्यवस्थापन शास्त्र, संख्या शास्त्र आणि ज्योतिषज्ञान ह्यांचा त्रिवेणी संगम घालत पाच गटांद्वारे जीवनात प्रयत्न व अपेक्षा ह्यांची योग्य ती सांगड घालून समाधान मिळवण्याचा मार्ग मी येथे दाखवला आहे.

ही एक प्रकारची आमूलाग्र सुधारणा व अगदी प्रगतिशील दृष्टी आहे. Value engineering व application. ह्यांची यथातथ्य सांगड येथे आम्ही साधली आहे.

आपण मागच्या आठवड्यात कुठे होतो, आता येणार्या आठवड्यात काय नशीब आहे, तसेच स्पर्धात्मक जीवनात इतर राशीची माणसे कुठं होती व येत्या आठवड्यात त्यांचे नशीबाचे तुलनेत आपले काय स्थान आहे ते सारे ह्या गुणांमुळे तुम्हाला समजू शकेल. प्रयत्न व अपेक्षा ह्यांची योग्य ती सांगड घालून आपण समाधान मिळवू शकता.

अशा एकमेवाद्वितीय कल्पनेचे हे उपयुक्त राशिभविष्य उत्तरोत्तर विलक्षण लोकप्रिय होत आहे.

"नशीबाच्या परिक्षेचा निकाल":

येत्या आठवड्यातील ग्रहबदल हा फक्त चंद्राचा धनु मकर कुंभ व मीन रास असा होणार असून आहे. त्यामुळे अनुकुल गुणात राशीनिहाय खुपच उलथापालथ होणार असून, कर्क रास सोडता बाकी सर्व राशींना धडपड करत कष्ट अधिक उपसावे लागणार आहेत.

राशीनिहाय अनुकूल गुणांच्या पाच गटातील विभागणीवरून आपल्या नशीबाचे चक्र फिरवायला मदत होईल अशी आशा आहे. उत्तरोत्तर अधिकाधिक मार्गदर्शक बदल आम्ही करत जाणार आहोत.

१. "राशीनिहाय नशीबाची गटवारी":

२९ सप्टेंबर'१९ ते ५ आँक्टोबर'१९ ह्या आठवड्यातील ग्रहस्थितीनुसार बाराही राशींच्या नशिबाचे गुण व गटवारी ही अशी आहे:

पहिला उत्तम गट: कर्क

दुसरा शुभ उजवा गट: कोणतीही रास नाही.

तिसरा मध्यम गट: मीन, धनु तुळा कन्या व व्रुश्चिक

चौथा कष्टाचा डावा गट: मेष व्रुषभ मिथुन मकर व कुंभ

पाचवा कटकटींचा तळाचा गट: सिंह

२. "राशीनिहाय नशीबाचा अनुकूल गुणतक्ता ":

आता मागच्या आठवड्याचे तुलनेत येणार्या आठवड्याचे, वरील पद्धतीने अनुकूल गुण व क्रमांक प्रथम, तर कंसात मागील आठवड्याचे गुण व बारा राशीत क्रमांक असे आहेत:
(एकूण ४९ गुणांपैकी)

चंद्र राशी   अनुकूल गुण       बारा राशीत

                                     क्रमांक
१ मेष          १९ (२६ )       ७ ( ९ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणांत खुप घसरण.
पण क्रमांक सुधारेल. आर्थिक व्यवहार संभाळून करा. संततीची काळजी घ्या.

२ व्रुषभ       १८ (२७ )          ८ ( ८ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुण घसरले तरी राशींच्या स्पर्धेत क्रमांक राखणार.
नोकरीत कटकटी, कौटुंबिक अस्वस्थता.

३ मिथून    १६ ( २८ )          ९ ( ७)

मागच्या आठवड्यापेक्षा गुणांमध्ये पुष्कळ घसरण.
आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. नोकरी व्यवसायात वरिष्ठ नाराज.

४ कर्क          ४४ ( ४२)        १ ( २ )

मागच्या आठवड्यापेक्षा चांगली स्थिती. अव्वल क्रमांकामुळे उत्साह वाढेल. नोकरीत प्रगती व व्यवहार फायदेशीर. कौटुंबिक आनंददायी घटना.

५ सिंह          १२ ( १० )          १२ ( १० )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणांमध्ये थोडी सुधारणा. पण स्पर्धेत तळाचा क्रमांक. नोकरी व्यवसायात मनस्ताप वाढेल. मानसिक अस्वास्थ्य. आर्थिक ओढाताण.

६ कन्या            २३ (३१)           ५ ( ५ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणांत घसरण. पण स्पर्धेत तोच क्रमांक. नोकरीत व्यवसायात कष्ट उपसाल. अर्थार्जन सुधारेल मात्र कौटुंबिक कलह.

७ तुळा          २३ ( ४३ )            ४ (  १  )

मागच्या इतक्या आठवड्यात तुम्ही अव्वल होता, पण आता प्रतिकूल ग्रहमान त्यामुळे गुणात सर्वाधिक घसरण. प्रवास कराल. नोकरी व्यवसायात स्पर्धा वाढेल. तब्येत नरम गरम.

८ व्रुश्चिक    २२ ( ३५ )             ६ ( ४ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणात लक्षणीय घसरण. नोकरी व्यवसायात आर्थिक नुकसान. कौटुंबिक वातावरण कुछ खट्टा, कुछ मीठा असे.

९ धनु         २४ ( २८ )              ३ (  ६ )  

मागच्या आठवड्यापेक्षा गुणांत किंचीत घसरण. पण इतर राशींचीही तशीच स्थिती. म्हणून स्पर्धेत पुढे राहू शकाल.स्थावर विषयक प्रश्न मार्गी. नोकरी व्यवसायात धडपडीने मार्ग काढाल.

१० मकर        १५  ( १८ )          १० ( १२)

मागच्या आठवड्यापेक्षा गुण थोडे कमी झाले, पण क्रमांक सुधारला हीच एक बरी गोष्ट. प्रवास त्रासदायक. कौटुंबिक वाद विवाद. नोकरी व्यवसायात कसा बसा टिकाव धराल.

११ कुंभ         १५ ( ४० )            ११ ( ३ )

मागच्या आठवड्यापेक्षा प्रतिकूल स्थिती. नशीबाच्या गुणात व क्रमांकात पूर्ण घसरण. नोकरी व्यवसायात अडचणी वाढून आर्थिक नुकसान. जोडीदाराच्या तब्येतीची चिंता.

१२ मीन      २६ ( १९ )              २ ( ११ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणात थोडी व क्रमांकात उत्तम सुधारणा. स्पर्धेत बाजी माराल.
आर्थिक देणी द्याल. कौटुंबिक सुख समाधान.

( ) कंसांत मागील आठवड्याचे गुण व क्रमांक

स्पर्धात्मक जीवनात आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता किती जास्त प्रयत्न करावे लागतील, त्याचा अंदाज वरील गुणतक्ता दाखवू शकतो.
त्यानुसार आपण आपल्याला येणाऱ्या अनुभवांचा योग्य तो प्रतिसाद आम्हाला जरूर कळवावा.

ही अभिनव व एकमेकाद्वितीय पद्धत लोकप्रिय होत आहे. आपणही तिची माहिती इतरांना जरुर द्यावी.

दर शनीवारी, माझ्या ब्लॉगवर, ग्रहस्थितीनुसार आपल्या आगामी आठवड्याचे अनुकूल गुण आधारित, हे अभिनव राशीभविष्य मी आपल्या उपयोगासाठी मांडत जाणार आहे.

शिवाय you tube वरील

moonsun grandson

ह्या माझ्या चँनेलवर तसा विडीओही प्रदर्शित केला जाईल. त्याचा आवर्जून लाभ घ्या. तशी सवय लावून घ्या.

माझ्या ब्लॉगची लिंक आहे:

http//moonsungrandson.blogspot.com

ही लिंक नेहमी उघडा, शेअरही करा.....

धन्यवाद.

लेखक: प्रा. सुधाकर नातू

५/१०/'१९