शनिवार, २ फेब्रुवारी, २०१९

"गोळाबेरीज"-जानेवारी'१९:


"गोळाबेरीज"-जानेवारी'१९:
मी दररोज कोणती महत्त्वाच्या व आवडत्या गोष्टी, माझ्याकडून झाल्या याची थोडक्यात नोंद घेत असतो. आता त्यातूनच कल्पना सुचली की जानेवारी'१९ महिन्यामध्ये आपल्याला दखल घ्यावी अशा कोणत्या गोष्टींची पूर्तता झाली, त्याची गोळाबेरीज करावी.
माझ्या मते मला आवडणारी कामे वा गोष्टी म्हणजे वाचणे आणि लिहिणे किंवा नाटक वा चित्रपट पहाणे ही होत. त्या अनुषंगाने मी ह्या महिन्याचा आढावा घेतला, तो थोडक्यात असा:
"वाचाल' तर वाचाल":
मला अतिशय आवडलेली अशी, मी वाचलेली पुस्तके ही आहेत:
१. "हरवलेले स्नेहबंध" लेखक निव्रुत्त न्यायाधीश श्री. नरेंद्र चपळगावकर
२. "अबीर गुलाल" लेखक श्री. मधु मंगेश कर्णिक
३. ,"राजीव व सोनिया गांधींच्या सहवासात" लेखक श्री. राम प्रधान
४ /५ दोन दिवाळी अंक'१८-"ऋतुरंग"आणि
,"महाराष्ट्र टाइम्स"
६. त्याशिवाय इंग्रजीमधला The Week ह्या नियतकालिकाचा Double Anniversary issue हा खरोखर संस्मरणीय असाच होता. अशा जपून ठेवण्याजोग्या वाचनाची दखल, मी रसास्वाद घेऊन काही लेखांमध्ये देखील ह्याच महिन्यात मी केली आहे.

"माझा ब्लॉग":
http//moonsungrandson.blogspot.com
ब्लॉगवर लिहिण्याचा जर विचार केला तर जवळजवळ दहा विविधांगी लेख माझ्याकडून जानेवारी'१९ मध्ये प्रसिद्ध झाले. त्यापैकी
'राहू व केतू'चे राश्यंतराचे परिणाम' ह्या माझ्या लेखाला प्रचंड प्रतिसाद मिळून, माझ्या ब्लॉगची viewership आठ दिवसात चक्क १५ वरून १८ हजारावर गेली!
दुसरं महत्त्वाचं असं ब्लॉग संबंधी काम म्हणजे मी 'सुधा' दिवाळी महाअंक'१८ जसा मराठीमध्ये काढला तसाच "Sudha" New Year'19 issue- इंग्रजीमधील बारा लेखांचा खास अंक मी जानेवारीमध्ये काढला. ही एक दखल घेण्याजोगी व कौतुकास्पद बाब.

अजून एक काम ह्या दृष्टीने चांगलं झालं, ते म्हणजे माझा १८० पृष्ठांचा 'टेलिरंजन', 'विचारमंथन', 'शारदोत्सव', 'नियतीचा संकेत' आणि 'संपूर्ण वार्षिक राशिभविष्य पुढचे पाऊल' अशा दिवाळी महाअंकाची पीडीएफ फाईल मी बनवली. त्या रुपांतराकरिता माझ्या मुलाचे चि.समीरचे चांगले सहाय्य झाले. ह्या डिजिटल अंकाची विनामूल्य प्रत मी ज्यांना पाहिजे त्यांना देण्याची इच्छा फेसबुकवरून व्यक्त केली आणि तिला उत्तम प्रतिसाद मिळून सुमारे शंभर ते सव्वाशे दिवाळी अंक मी त्यांना पाठवू शकलो.
"You tube
वर माझा moonsun grandson चँनेल:"
डिसेंबर'१८ मध्ये हा चँनेल मी प्रयत्नपूर्वक उघडला आणि त्या वेळेला प्रत्येक राशीचे वार्षिक राशीभविष्य आणि संक्षिप्त वार्षिक भविष्य असे अनेक व्हिडिओज मी स्वत: बनवून प्रदर्शित केले होते. त्यांची viewerships जानेवारी महिन्यात उत्तम होऊन कुंभ राशीची सोळा हजारांवर आणि बाकीच्या राशींचे विडीओज् एक हजाराच्या जवळ येण्याजोग्या अशा उत्साहवर्धक अवस्थेला जाऊन पोहोचल्या. ह्या जानेवारीच्या पहिल्याच दिवशी मी "जन्मगांठीचे रहस्य" या माझ्या विडिओ मालिकेची सुरुवात केली आणि पहिला व्हिडिओ प्रदर्शित केला. त्याला उत्तम प्रतिसाद मिळून त्याची viewership महिन्यातच चार हजारापर्यंत गेली. दुसरा एक विडिओ "ओम पुनर्जन्म" असा प्रदर्शित केला. त्यालाही हळूहळू चांगला प्रतिसाद मिळत आहे.
"रंगांची दुनिया":
जशी लेखन-वाचनाची मला आवड आहे तशीच चित्रपट नाटकं बघण्याचीही. ह्या महिन्यांमध्ये
१. "पुलं"वरती आधारित असा "भाई' चित्रपट,
२. त्यानंतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चरित्रावर आधारित "ठाकरे" हा चित्रपट
बघितला शिवाय,
३. "तिला काही सांगायचंय"
४. "आरण्यक" ही दोन नाटके ही बघितली. नाटकांवरील माझ्या रसास्वादाला उत्तम प्रतिसाद फेसबुकवरून मिळाला आणि त्याप्रमाणे लेखही मी ब्लॉग वर प्रदर्शित करु शकलो.
"मागे वळून पहाताना":
एकंदर, एक निव्रुत्त ज्येष्ठ नागरिक म्हणून, आता मागे वळून पाहताना माझ्या असे लक्षात येते की, उत्तमरीतीने मी मला स्वतःला समाधान देतील अशा विविध गोष्टींमध्ये, माझा वेळ व्यतीत करू शकलो. त्याचप्रमाणे अनेक अनभिज्ञ व दूरवरच्या हजारो वाचक व प्रेक्षकांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून मी माझे योगदान पोहोचवू शकलो, ही एक चांगली जमेची बाब आहे.
थोडक्यात ही संकल्पना-अशा तऱ्हेने प्रत्येक महिन्याच्या आपल्या संचिताची "गोळाबेरीज" जमवून ती व्यक्त करणे हे देखील एक चांगलं काम आता माझ्याकडून घडत आहे. आणि त्याचा मला आनंद आणि अभिमान आहे.

ह्याच संकल्पनेचाच पुढचा भाग म्हणून आता लिहीता लिहीता मला कल्पना सुचते की, संपूर्ण १९१८ हे वर्ष आपण कसे घालवले त्याचीही एक गोळाबेरीज जमवावी आणि अशाच तर्हेने मी ती व्यक्त करावी, इतरांबरोबर शेअर करावी.
बघू या कसं जमतयं ते!
Post Script:
1. I now realise that such monthly review of what concrete and constructive achievements, has the power to trigger an inner urge to go on accomplishing every month better than the last month, months after months!
2. Having said so, I dare to suggest to you, to follow this idea of Monthly Review, I can assure you it would be a rewarding experience for you, too months after months!
सुधाकर नातू
माहीम मुंबई'१६
Mb 9820632655

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा