"मुंबई-पुणे-मुंबई 3"-एक जीवाभावाचा प्रवास:
"Marathi films have come of age" असं जे म्हटलं जातं ते बहुदा आँस्कर वारी करणार्या "श्वास" चित्रपटापासून! पूर्वी पाटील तमाशा आणि लावण्या यांच्यात मराठी चित्रपट गुरफटला होता, त्यानंतर विनोदी चित्रपटांची लाट आली होती. परंतु श्वासनंतर जीवनातल्या वेगवेगळ्या भावनिक आणि कौटुंबिक पेचप्रसंग प्रश्न आणि वातावरण यांच्या बाबतीत विस्ताराने काही बरे वाईट दाखवणारे चित्रपट येऊ लागले. त्यामुळे हिंदी चित्रपटांच्या तुलनेत मराठी चित्रपट हे निश्चितच आगळेवेगळे आणि विचारप्रवर्तक तसेच करमणूकप्रधान ही भासू लागले. विशेषतः अलीकडच्या काळात मराठी चित्रपटांची घोडदौड चांगली चालू आहे. हिंदी चित्रपटांपेक्षा मल्टिप्लेक्सेस् मराठी चित्रपटांना प्राधान्य देत आहेत, ही एक चांगली गोष्ट आहे.
आता आम्ही या लेखामध्ये मुंबई पुणे मुंबई 3 ह्या चित्रपटाविषयी आमचे अनुभव सांगणार आहोत.
सर्वसाधारणपणे एखादा चित्रपट जेव्हा यशस्वी होतो, तेव्हा त्याच्या पुढच्या आवृत्त्या काढण्याचा मोह सर्वांना होतो. नाटकांच्या बाबतीत देखील आपण नुकतेच "एका लग्नाची दुसरी गोष्ट" हा प्रकार बघितला. सर्वच दुसरे व तिसरे प्रयत्न यशस्वी होतात असे नाही. मात्र "एम पी एम" च्या बाबतीत पहिले दोन प्रयोग तरी भरघोस यश मिळवून गेले. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या उत्सुकतेने तिसऱ्या भागाची वाट पाहिली गेली आणि आता तिसरा भाग प्रकाशित झाला. हा एका जीवाभावाच्या प्रवासाच्या अनुभवाचा प्रवास आहे. त्यामध्ये मुंबईकर पुणेकर या दोन्ही शहरांमध्ये विरोधाभास ह्यांतले काहीही नाही. सहाजिकच पहिल्या दोन भागांमध्ये जे जसे होते तसे येथे नाही, इथे आहे ह्या दाम्पत्याची- गौरी आणि गौतमची विवाहानंतर ची कहाणी.

हा वेगळा विषय वेगळ्या तऱ्हेने हाताळणारा हा चाकोरीबाहेरच्या विश्वाचा चित्रपट आहे. सहाजिकच, तो पहाण्यासाठीचा प्रेक्षकवर्ग देखील मर्यादित असू शकतो. विशेषता प्रत्येक नवदाम्पत्याने हा चित्रपट बघावा अशा तर्हेचा आहे. मात्र ज्याला युनिव्हर्सल अपील किंवा लहान-थोर प्रेक्षक मिळवून चित्रपट यश मिळवू शकेल अशा तर्हेची करमणूक वा प्रसंग मात्र ह्या चित्रपटात नाहीत.
सर्वच कलावंतांनी आपापल्या भूमिका समरसून केल्या आहेत. विशेषतः नायक स्वप्नील जोशी व नायिक मुक्ता बर्वेने कमाल केली आहे. हा चित्रपट जवळ जवळ दोन घरांत घडत असल्यामुळे, तो बंदिस्त वाटतो. पहिल्या दोन भागां इतका, हा बोलपट तेवढे यश मिळवेलच ह्याची खात्री देता येत नाही. बाळंतपणासारख्या जिव्हाळ्याच्या विषयावर चित्रपट काढण्याचे धाडस श्री. सतीश राजवाडे ह्यांच्यासारख्या प्रतिभावान आणि गुणवंत दिग्दर्शकाने करावे, त्याचे कौतुकच आहे. म्हणूनच मराठी चित्रपटांच्या नव्या लाटेत हा चित्रपट आपले स्वतःचे वेगळे स्थान कायम राखून राहील असे म्हणावेसे वाटते.
"मुंबई-पुणे-मुंबई 3 चा धडा":
स्त्रीचे महती अगाध आहे. तिची जेवढी किंमत ठेवली जावी, तेवढी ठेवली जात नाही, उलट बिचारीला कायमच दुय्यम भूमिका पत्करावी लागते. दुर्दैव आहे की, तिच्या खरोखर आश्चर्य वाटावे अशा multy tasking ability बद्दल कुणीच काही लक्षात घेत नाही. एवढी ती हुशार असते की, घरामध्ये एखाद्या निष्णात मटेरियल मॅनेजरने लाजावे, इतक्या कुशलतेने ती काय हवं काय नको ह्यांची बरोबर नोंद घेऊन, घराचे घरपण अबाधित राखीत असते. काँर्पोरेट सीईओ प्रमाणे ती एकंदरच घरातील माणसांमध्ये नातेसंबंध आपुलकीचे राहावे ह्याबद्दल नेहमी जागरूक असते आणि तिच्यामुळेच संसारामध्ये गोडी कायम राहते.
"गृहिणी सचिवः सखी मिथ: प्रियशिष्या ललिते कलाविधौ" असे स्रीच्या बाबतीत म्हटलं जातं, ते खोटं नाही. आता तर, ती घराबाहेर पडून करियर वुमन झाल्यामुळे, पुरुषापेक्षा जास्त उच्च प्रतीचे योगदान संसारामध्ये देत असते. पण दुर्दैवाने तिला जो मान मिळायला हवा, जे स्थान तिला द्यायला हवे, ते दिले जात नाही.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवनाचा हा प्रवाह अव्याहत राहण्यासाठी ती जो त्याग व जे काही करते ते खरोखर कुणालाही जमण्यासारखे नाही. मूल जन्माला घालणं ही काही सोपी गोष्ट नव्हे. नऊ महिने तिचे काय काय त्रास हाल-अपेष्टा होतात व ती येणाऱ्या "बाळ-अंत-पण" ह्या जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जाते, ते खरोखर शब्दा पलीकडचे आहे. पण ही जाणीव कुणालाच नाही. पुरुष त्या मानाने भाग्यवान. अर्थार्जन आणि कुटुंबाचे संरक्षण ह्या पलीकडे त्याच्या वाटेला विशेष जबाबदार्या येत नाहीत. पण स्त्रीला मात्र मूल जन्माला घालणं आणि त्याच्यावर संस्कार करणे, त्यांना घडवत मोठे करणे अशी जबाबदारी जास्त येते.
ह्या चित्रपटातली गौरी नऊ महिने जे शारीरिक हाल व मानसिक भावनिक ताणतणाव सहन करते ते पाहिल्यामुळे आपला कोणत्याही स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा असा आमूलाग्र बदलून जातो. तिला सलाम करावा आणि स्री ही देवी आहे असे मान्यच करावे, असे विचारमंथन संवेदनशील प्रेक्षकांच्या मनात निर्माण होते. हेच ह्या चित्रपटाचे यश आहे. म्हणूनच हा चित्रपट एक मैलाचा दगड ठरावा.
“बकेट मध्ये "बकेट लिस्ट"!:
महाराष्ट्रात यंदा पुरेशा पावसाळ्याच्या अभावी तीव्र दुष्काळ असला तरी, मराठी चित्रपटांचे मात्र मोठे पीक आलेले दिसते. त्यामुळे एकाच वेळी अनेक चित्रपट प्रकाशित होत आहेत आणि त्यापायी बहुधा निर्मात्यांचे खूप नुकसान होते आहे.

ह्या पार्श्वभूमीवर "बकेट लिस्ट" हा चित्रपट थिएटर मध्ये कधी आला, कधी गेला हे आठवत पण नव्हते आणि तेव्हा मी तो पाहिलाही नव्हता. आज टीव्हीवर तो चित्रपट दोनदा असल्यामुळे, मी दुपारी तो पहाण्याचे धार्ष्ट्य दाखवले खरे, पण खरोखर घोर निराशाच झाली.
प्रारंभापासूनच हे काय चाललंय याची कल्पनाच येईना. सुरुवातच मुळी झाली ऑपरेशन टेबलवर! ऑपरेशन व्हायच्या आधीच डॉक्टरला थांबवून नायिका काय काय करायचं, त्याची लिस्ट बडबडू लागली, तेव्हाच समजले की पुढे काय ताट वाढून ठेवले आहे! दोन-तीन मिनिटातच ऑपरेशनचा त़ो खेळ संपला आणि काही काही वेळानंतरच्या संवादातून लक्षात आले की, हे म्हणे हार्ट ट्रान्सप्लांट होते, ते पाहून मी अक्षरश: उडालोच!
अजून खूप धक्के पुढे खायचे होते, कारण जीने कोणी तिला आपले ह्रदय दिले ते नायिकेला समजते. हे म्हणजे सिनेमँटिक लिबर्टीची हद्द झाली! नायिका त्या डोनर व्यक्तीच्या घरी जाते, हा जेव्हा प्रकार मी बघितला तेव्हा मला कळेना आता काय करावे बरे?
सहाजिकच नंतर तो चित्रपट न पाहताच मी आंतल्या खोलीत झोपी गेलो. तास दीड तासानंतर चित्रपट संपायच्या वेळेला बहुधा मला जाग आली अन् मी बाहेरच्या खोलीत आलो. टीव्ही चालूच होता व माझ्यानंतर तो चित्रपट पहाणारी माझी पत्नीही चक्क डाराडूर झोपून गेली होती. चित्रपटाचा हा सगळा काय प्रकार होता, ह्याचा मला तरी काही अर्थ कळला नाही. त्यामुळे चित्रपट पुढे न बघितल्याचे दुःख मुळीच झाले नाही.

असा चित्रपट कशाकरता काढतात हे कळणे कठीण आहे. चित्रपटात जवळ जवळ सतत प्रत्येक फ्रेममध्ये नायिकाच दिसावी, ह्या उद्देशाने तो चित्रपट काढला गेला असावा असे मानण्यास जागा आहे.
आज रात्री सोनीवर पुन्हा तो चित्रपट असल्यामुळे तो बघितला नाही तरी चालेल हे कळावे, म्हणून हा लेखन प्रपंच. नावाप्रमाणेच "बकेट लिस्ट" ला मी बकेट मध्ये टाकून दिले
आहे !
तुम्ही काय करायचं ते तुमचं तुम्हीच ठरवणे उत्तम!
सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा