सोमवार, २९ जानेवारी, २०२४
"वैवाहिक सौख्य आणि पापग्रहयोग !"
👍"वैवाहिक सौख्य आणि पापग्रह योग":👍
जन्मपत्रिकेत शनि, मंगळ राहू आणि केतू हे चार पापग्रह त्रासदायक असू शकतात. त्या जोडीला अनाकलनीय असे हर्शल व नेपच्यूनसुद्धा आपला प्रताप दाखवतात. त्याकरता त्यांच्यामधले अनिष्ट योग तपासावे लागतात. सर्वसाधारणपणे या पापग्रहांच्या योगामुळे एखादे किंवा अनेक विशिष्ट एकापेक्षा अधिक विशिष्ट स्थाने आणि त्यांची फळे मनाजोगती मिळत नाहीत. या मुद्द्याला धरून सप्तमस्थान अर्थात वैवाहिक सौख्य व पापग्रहयोगाविषयी,
आम्ही काही उदाहरणे पुढे मांडत आहोत:
1"दोनदा विवाह मोडला":
हा तरुण 35 वर्षाचा असून त्याचे एकदा प्रत्यक्ष बैठकीतच लग्न मोडले, तर दुसऱ्या वेळेला साखरपुडा झाल्यानंतर लग्न मोडले.
त्याच्या जन्मपत्रिकेमध्ये जन्मलग्न वृषभ असून सप्तमेश मंगळ नीचीचा कर्क राशीत आहे, त्याच्या षडाष्टकात दशमात राहू आणि अष्टमात शनी असल्यामुळे सप्तम स्थानाचे अर्थात विवाहस्थानाचे फळ त्याला असे अनिष्ट मिळाले. शिवाय राहू आणि शनी यांचा पापकर्तरी योग होत असून भाग्य स्थान त्यामुळे दूषित झाले आहे.
शुभ ग्रह गुरु द्वितीय स्थानात सप्तम स्थानाची षडाष्टक योगात असून शनीची दृष्टी त्यावर आहे दुसरा शुभ ग्रह शुक्र केतू बरोबर चतुर्थात युती करतो तर बुध त्रुुतीयस्थानात मंगळाबरोबर, शनी तसेेच राहूच्या षडाष्टकात आहे.
2 "जोडीदाराशी दुरावा व त्रासदायक मृत्यू"
ह्या माणसाला विवाहनंतर स्थिरता लाभली नाही आणि कायम पत्नी वियोग सहन करत मनातल्या मनात कुुढत राहावे लागले. त्याचा अनिष्ट परिणाम होऊन असाध्य रोगाने शेवटची दोन वर्षे दयनीय अवस्थेत जाऊन मृत्यू झाला
या उदाहरणाच्या जन्मपत्रिकेमध्ये कर्क लग्नी केतू, राहू सप्तमात आणि सप्तमेश तृतीय स्थानात शनी. मंगळ द्वादशस्थानात राहूच्या षडाष्टक योगात व मंगळ शनीचा केंद्रयोग, त्यामुळे येथेही सप्तम स्थान बाधित झाले आणि अशा तऱ्हेने संसारिक जीवन असमाधानकारक होऊन अष्टमस्थानाच्या षडाष्टकात शनी असल्यामुळे कष्टकारक मृत्यू झाला.
3 "असमाधानकारक वैवाहिक जीवन आणि अकाली मृत्यू":
या तरुणाचा वैवाहिक आयुष्याचा अनुभव त्रासदायक होता आणि तरुण वयातच मृत्यू उद्भवला. जन्म पत्रिकेमध्ये सप्तम स्थानी वृश्चिकेचा नीचीचा चंद्र, षष्ठातील शनी व अष्टमातील मंगळ राहूच्या पापकर्तरी योगात आहे. सप्तमेश मंगळ राहू बरोबर अष्टमात त्याच्यावर षष्ठातली शनीची दृष्टी, द्वितीय स्थानातील केतू, सप्तम स्थानाच्या षडाष्टकात आणि त्याचीही सप्तमेश मंगळावर दृष्टी यामुळे समाधानकारक वैवाहिक जीवन आणि अकाली मृत्यू झाला.
4 /5 "प्रौढ कुमारिका"
रूप शिक्षण आणि इतर सगळ्या गोष्टी अनुकूल असूनही या मुलीचे लग्न काही जुळले नाही आणि पन्नाशी होऊनही विवाहयोग नाही. जन्मपत्रिकेमध्ये वृषभ लग्नात मंगळ केतू आणि सप्तमात राहू बरोबर नेपच्यून, तर षष्ठात हर्षल, कुटुंब स्थानाला पापकर्तरी योग करणारा शनी तृतीय स्थानात, शुभकारक गुरु सप्तम स्थानाच्या षडाष्टकात व्ययस्थानी शनीच्या व मंगळाच्या दृष्टीत. या साऱ्या अपकारक योगांमुळे या मुलीचे आयुष्य जोडीदारा विना जात आहे
प्रौढ कुमारिकांचे ह्या दुसर्या उदाहरणात जन्म लग्न मिथुन असून तेथेच हर्षल व्ययातील राहू मंगळ आणि द्वितीयातील शनि बरोबर पाप कर्तरी योगात आहे. सप्तमेश गुरु शत्रु राशीत पंचमात शनीच्या केंद्रयोगात आणि राहू मंगळाच्या षडाष्टक योगात असल्यामुळे या स्रीला आयुष्यभर विवाहयोग नव्हता.
या लेखाची मूलभूत संकल्पना सुचल्यापासून, नंतर माझ्या संग्रहातील पत्रिकांचा अभ्यास करण्यात आणि हा लेख असा लिहिला जाण्यात, जवळजवळ महिनाभराचा काळ गेला. योगायोग असा की, या मधल्या काळामध्ये परिचितांच्या वर्तुळामधून वैवाहिक सौख्या संबंधीच्या अस्वस्थ करणाऱ्या काही बातम्या कानावर आल्या त्या बहुतेक सर्व विवाह नंतर चार-पाच वर्षातच घटस्फोट झालेल्या दांपत्यांच्या होत्या. कौटुंबिक स्वास्थ्य आणि अवस्था ही जागतिकीकरणानंतर 'साईड इफेक्ट' म्हणून कशी बिघडत चालली आहे, याचेच ते सारे द्योतक होते. समाजामध्ये सुजाण सुबुद्ध आणि सरळ मार्गी नागरिक जन्माला येण्यासाठी सुप्रजाजन होणे अत्यावश्यक आहे आणि त्यासाठी संसारातील जोडीदारांमध्ये योग्य ते सामंजस्य, आपुलकी आणि प्रेम असणे गरजेचे आहे, हेच यावरून अधोरेखित होत आहे. प्रगती सर्वांगीण जरी झाली तरी, जीवनाचा मूलभूत गाभा असलेल्या वैवाहिक सौख्याच्या बाबतीत ही अशी पुच्छ प्रगती होणे, खरंच चिंताजनक आहे असेच म्हणावयाचे !":
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा