सोमवार, २९ जानेवारी, २०२४
"वैवाहिक सौख्य आणि पापग्रहयोग !"
👍"वैवाहिक सौख्य आणि पापग्रह योग":👍
जन्मपत्रिकेत शनि, मंगळ राहू आणि केतू हे चार पापग्रह त्रासदायक असू शकतात. त्या जोडीला अनाकलनीय असे हर्शल व नेपच्यूनसुद्धा आपला प्रताप दाखवतात. त्याकरता त्यांच्यामधले अनिष्ट योग तपासावे लागतात. सर्वसाधारणपणे या पापग्रहांच्या योगामुळे एखादे किंवा अनेक विशिष्ट एकापेक्षा अधिक विशिष्ट स्थाने आणि त्यांची फळे मनाजोगती मिळत नाहीत. या मुद्द्याला धरून सप्तमस्थान अर्थात वैवाहिक सौख्य व पापग्रहयोगाविषयी,
आम्ही काही उदाहरणे पुढे मांडत आहोत:
1"दोनदा विवाह मोडला":
हा तरुण 35 वर्षाचा असून त्याचे एकदा प्रत्यक्ष बैठकीतच लग्न मोडले, तर दुसऱ्या वेळेला साखरपुडा झाल्यानंतर लग्न मोडले.
त्याच्या जन्मपत्रिकेमध्ये जन्मलग्न वृषभ असून सप्तमेश मंगळ नीचीचा कर्क राशीत आहे, त्याच्या षडाष्टकात दशमात राहू आणि अष्टमात शनी असल्यामुळे सप्तम स्थानाचे अर्थात विवाहस्थानाचे फळ त्याला असे अनिष्ट मिळाले. शिवाय राहू आणि शनी यांचा पापकर्तरी योग होत असून भाग्य स्थान त्यामुळे दूषित झाले आहे.
शुभ ग्रह गुरु द्वितीय स्थानात सप्तम स्थानाची षडाष्टक योगात असून शनीची दृष्टी त्यावर आहे दुसरा शुभ ग्रह शुक्र केतू बरोबर चतुर्थात युती करतो तर बुध त्रुुतीयस्थानात मंगळाबरोबर, शनी तसेेच राहूच्या षडाष्टकात आहे.
2 "जोडीदाराशी दुरावा व त्रासदायक मृत्यू"
ह्या माणसाला विवाहनंतर स्थिरता लाभली नाही आणि कायम पत्नी वियोग सहन करत मनातल्या मनात कुुढत राहावे लागले. त्याचा अनिष्ट परिणाम होऊन असाध्य रोगाने शेवटची दोन वर्षे दयनीय अवस्थेत जाऊन मृत्यू झाला
या उदाहरणाच्या जन्मपत्रिकेमध्ये कर्क लग्नी केतू, राहू सप्तमात आणि सप्तमेश तृतीय स्थानात शनी. मंगळ द्वादशस्थानात राहूच्या षडाष्टक योगात व मंगळ शनीचा केंद्रयोग, त्यामुळे येथेही सप्तम स्थान बाधित झाले आणि अशा तऱ्हेने संसारिक जीवन असमाधानकारक होऊन अष्टमस्थानाच्या षडाष्टकात शनी असल्यामुळे कष्टकारक मृत्यू झाला.
3 "असमाधानकारक वैवाहिक जीवन आणि अकाली मृत्यू":
या तरुणाचा वैवाहिक आयुष्याचा अनुभव त्रासदायक होता आणि तरुण वयातच मृत्यू उद्भवला. जन्म पत्रिकेमध्ये सप्तम स्थानी वृश्चिकेचा नीचीचा चंद्र, षष्ठातील शनी व अष्टमातील मंगळ राहूच्या पापकर्तरी योगात आहे. सप्तमेश मंगळ राहू बरोबर अष्टमात त्याच्यावर षष्ठातली शनीची दृष्टी, द्वितीय स्थानातील केतू, सप्तम स्थानाच्या षडाष्टकात आणि त्याचीही सप्तमेश मंगळावर दृष्टी यामुळे समाधानकारक वैवाहिक जीवन आणि अकाली मृत्यू झाला.
4 /5 "प्रौढ कुमारिका"
रूप शिक्षण आणि इतर सगळ्या गोष्टी अनुकूल असूनही या मुलीचे लग्न काही जुळले नाही आणि पन्नाशी होऊनही विवाहयोग नाही. जन्मपत्रिकेमध्ये वृषभ लग्नात मंगळ केतू आणि सप्तमात राहू बरोबर नेपच्यून, तर षष्ठात हर्षल, कुटुंब स्थानाला पापकर्तरी योग करणारा शनी तृतीय स्थानात, शुभकारक गुरु सप्तम स्थानाच्या षडाष्टकात व्ययस्थानी शनीच्या व मंगळाच्या दृष्टीत. या साऱ्या अपकारक योगांमुळे या मुलीचे आयुष्य जोडीदारा विना जात आहे
प्रौढ कुमारिकांचे ह्या दुसर्या उदाहरणात जन्म लग्न मिथुन असून तेथेच हर्षल व्ययातील राहू मंगळ आणि द्वितीयातील शनि बरोबर पाप कर्तरी योगात आहे. सप्तमेश गुरु शत्रु राशीत पंचमात शनीच्या केंद्रयोगात आणि राहू मंगळाच्या षडाष्टक योगात असल्यामुळे या स्रीला आयुष्यभर विवाहयोग नव्हता.
या लेखाची मूलभूत संकल्पना सुचल्यापासून, नंतर माझ्या संग्रहातील पत्रिकांचा अभ्यास करण्यात आणि हा लेख असा लिहिला जाण्यात, जवळजवळ महिनाभराचा काळ गेला. योगायोग असा की, या मधल्या काळामध्ये परिचितांच्या वर्तुळामधून वैवाहिक सौख्या संबंधीच्या अस्वस्थ करणाऱ्या काही बातम्या कानावर आल्या त्या बहुतेक सर्व विवाह नंतर चार-पाच वर्षातच घटस्फोट झालेल्या दांपत्यांच्या होत्या. कौटुंबिक स्वास्थ्य आणि अवस्था ही जागतिकीकरणानंतर 'साईड इफेक्ट' म्हणून कशी बिघडत चालली आहे, याचेच ते सारे द्योतक होते. समाजामध्ये सुजाण सुबुद्ध आणि सरळ मार्गी नागरिक जन्माला येण्यासाठी सुप्रजाजन होणे अत्यावश्यक आहे आणि त्यासाठी संसारातील जोडीदारांमध्ये योग्य ते सामंजस्य, आपुलकी आणि प्रेम असणे गरजेचे आहे, हेच यावरून अधोरेखित होत आहे. प्रगती सर्वांगीण जरी झाली तरी, जीवनाचा मूलभूत गाभा असलेल्या वैवाहिक सौख्याच्या बाबतीत ही अशी पुच्छ प्रगती होणे, खरंच चिंताजनक आहे असेच म्हणावयाचे !":
बुधवार, २४ जानेवारी, २०२४
💐"Different Strokes !":💐
💐"Different Strokes !":💐
👍"A Moment of Truth !":👍
👍"Compulsive Propaganda and support from the "Haves" is now obviously an eventuality and the Opposition is bound to trumpet the misery of "Haves Not" and the shortcomings.
When the poor man on the street would feel good and comfortable, then only there could be sanctity to the propaganda. This is the only one and only truth.
Tme is not too far off for the inevitable outcome.
Need to wait and watch !":👍
💐"Different Strokes-2 !":💐
👍"Inventing Ideas !":👍
💐"Ideas emerge out of experience, many a times out of a failure, out of a set back, for that all u need is having an eye of self introspection, unbiased outlook of the World around u. They r the engines of growth & development !":💐
💐"Different Strokes-3 !":💐
👍"Thinkers and Doors:👍
👍"There are Two types of People; the First one are the 'Thinkers', while the second are 'Doers'. Thinkers visualise, analyse and form a Concept, while the Doers bring it into reality. The Thinkers look like to be idle and are happy to be left to, all by themselves; while the Doers appear to be active and love to be with their Team. Thinkers' tools are Thoughts; while Doers' tools are Actions. It's like 'Egg' and 'Chiken', or 'Seed' and 'Tree'. To identify and realise, what one is: whether a Thinker or a 'Doer', is an interesting and essential exercise. Please Do, do it, all by yourself, to know you better !":👍
💐"Different Strokes-4 !":💐
👍"The Role Model Goal":
Having excellence as the sole aim of anything that one undertakes & struggles successfully to accomplish, should be everyone’s Role Model goal, in the today’s challenging walk of Life.
This is, because Excellence in what you do, not only showers many a benefits on others who are connected with the said final fruitful outcome but more than that, it gives you-the doer, a feeling of ultimate sublime contentment !":👍
💐"Different Strokes-5 !":💐
👍"Very difficult habit of
knowing & willingly accepting your limitations,
gives a rewarding experience in future !":👍
💐"Different Strokes-6 !":💐
👍"The Challenge in 21st century":👍
👍"Each one has his own speed, pace which attempts to compete with the space, speed of all others with whom he happens to be in contact, at the same time, he has to combat the rapid & ever changing pace, speed of all round vibrant World & it’s environment. This, then IS the real challenge for the man of 21st Century !":👍
💐"Different Strokes-7 !":💐
👍"Calamities come & go; Success & Set-backs happen & vanish; Happiness & unhappiness is felt & evaporated; What continues is your Roller Coaster Ride of Life-Let your Mind be Steady,Calm & Balanced !":👍
शुक्रवार, ५ जानेवारी, २०२४
👍"कावळ्यांची शाळा !": 😊
👍"कावळ्यांची शाळा !": 😊
पूर्वी कधीतरी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांचे "चिंतन", "मुंबई अस्मिता वाहिनी"वर ऐकले होते, निसर्ग आणि आपण यांचे नाते उलगडणारे, अंतर्मुख करणारे विचार, माझे डोळे उघडून गेले होते. अवचितपणे त्याची आठवण झाली.
पहिल्या भागात त्यांनी सांगितले की, माणूस निसर्गावर आपल्या विकासासाठी, सुखासाठी अन्याय करत आहे आणि त्यामुळे कित्येक प्रजाती हळूहळू नष्ट होत आहेत. हा सारा मार्ग विनाशाकडे नेणारा आहे, असा त्याचा सारांश होता. म्हणून माणसाने निसर्गाबरोबर राहायला शिकलं पाहिजे, नाहीतर विनाश अटळ आहे असे त्यांनी ठासून सांगितले.
तर दुसऱ्या भागात त्यांनी दाखवून दिले की, निसर्ग आपल्याला कायम आवडतो, आपण निसर्गाकडे गेलो की आपले मन शांत होते, अनेक कल्पना सुचू शकतात. विचारवंत नवतत्त्वज्ञान निर्माण करू शकतात आणि अध्यात्माकडे जाणाऱ्यांना मुक्तीचा, समाधीचा मार्ग सापडू शकतो, इतका निसर्ग अद्भुतरम्य आहे ! त्याची विविधता थक्क करणारी आहे. आपल्या डोळ्यांचे पाळणे फिटवणारे सामर्थ त्या निसर्ग सौंदर्यात आहे. म्हणून सौंदर्य कुठे इतर ठिकाणी पाहायला जायची गरज नाही. निसर्गामध्ये अनेक अशा सामर्थ्याच्या खुणा आहेत.
निसर्गापासून आपण दूर चाललो आहोत, ते थांबलं पाहिजे. निसर्गाला आपलंसं करा, कारण पंचमहाभूतांनी हा निसर्ग बनलेला आहे, असे भारतीय तत्त्वज्ञान सांगते. आपलाही जन्मसून झाला आहे आणि लय देखील निसर्गातच होणार आहे. यास्तव अधून मधून तरी बाहेर पर्यटनाला जा, निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घ्या असा त्यांचा विचार, आपल्याला देखील एक नवा मार्ग दाखवतो, नवीन प्रेरणा देतो.
साहजिकच आज सकाळी मी चहा पिताना आमच्या गॅलरीतल्या खिडकीतून समोर बघितले, वेगळ्या दृष्टीने. चांगली हिरवीगार झाडी, उंचच उंंच झाडं आमच्या सभोवताली आहेत. त्यावर मला दिसले की, "कावळ्यांची शाळा" भरली होती. सुरुवातीला कुठल्यातरी झाडावरच्या फांदीवर एखाद् दोन कावळे येऊन बसले, मग एकाचे दोन, दोनाचे चार असं करता करता, वेगवेगळ्या झाडांवरच्या वेगवेगळ्या उंचीवरच्या फांद्यांवर जवळजवळ 25 ते 30 कावळे जमा झाले आणि त्यांची शाळा सुरू झाली ! आश्चर्य असे की, वर्गात आपल्या जशी मुलं तासाला आहे तिथेच बसतात, तसं त्यांचं नव्हतं. त्यांना क्षणभर जरी बसलो तरी करमत नसावं. त्यामुळे क्षणाक्षणाला एक कावळा इकडून तिकडे, दुसरा कावळा तिकडून इकडे, असे रमत गमत फिरत होते आणि ते बघणं खरोखर गमतीशीर होतं.
प्रत्येक कावळा किती वेळ एका ठिकाणी बसतो, हे पाहण्यासाठी जणू आपल्याला स्टॉप वॉच वापरायला हवं. काय त्यांचं चालतं देव जाणे ! काळेभोर पिसांनी भरलेले अंग, राखाडी रंगाची मान आणि काळेभोर तोंड व चोच अणकुचीदार. मध्येच टोचायचं फांदीवर, काय वेचायचं देव जाणे आणि इकडे तिकडे मान वळवत राहायचं, भूरकन् उडायचं. अशी त्यांची शाळा पाहत राहिलो, किती वेळ ते कळलच नाही. पण पाहता पाहता बहुदा त्यांचा तास संपला आणि प्रत्येक जण कुठे ना कुठेतरी दूरदेशी उडूनही गेला.
काय काय चालतं त्यांचं कोण जाणे, कुठली त्यांची भाषा ! दिवसभर इकडे तिकडे फिरत असतील, पण रात्री ते कुठे राहतात, त्यांचं घर कसं असतं, ते झोपतात पण कुुठे, काय करतात आणि कसे झोपतात, सारा गुढ प्रकार. खरंच एका प्रजातीचे जर एवढे आगळेेवेेळे खेळ, तर शेकडो नव्हे हजारो प्रजाती सामावणाऱ्या निसर्गामधील विविध प्रजातींचे जग किती वेगळे असेल ! माणसांच्या जगापेक्षा या प्रजातींचे जग, किती अद्भुत असेल, खरंच कल्पनाच करवत नाही. वनस्पती आणि त्यांचे जग, हे तर शिवाय विचारातच घ्यायला हवे. कारण ते सर्वच बिचारे आयुष्यभर एकाच ठिकाणी आपले पाय रोवून असतात !
खरंच, नवल आहे. आज मी वेगळ्याच जगात वावरत होतो आणि असे निसर्गाची नाते जोडणारे क्षण वेचत होतो. अधून मधून तसे तरी क्षण यावेत, ही प्रार्थना करतो. तुम्हीही विचार करा, कधीतरी निसर्गाकडे डोळे उघडून उघडून पहा आणि नव्या जाणीवा, नवनवे अनुभव आपल्या मनामनात रुजवा !
धन्यवाद
सुधाकर नातू
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)