👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐👍"शारदोत्सव: 'शब्द- रंगढंगगंध !":
👍आयडियलचा कट्टा'-अनोखी साहित्य जत्रा !":👌
💐"मी 'भक्ती पंथेची जावे' या पुस्तकाच्या प्रभावामुळे दादरचे वसंत वाचनालय
सुरू केले, त्याला आता दोन अडीच महिने झाले. अशा वेळेला अचानक माझ्या हाती श्री अशोक बेंडखळे यांनी लिहिलेले 'आयडियलचा कट्टा' हे पुस्तक हाती आले आणि मला जणू अनोख्या साहित्य जत्रेे भाग घेतल्याचा विलक्षण अनुभव आला !
'आयडियल बुक डेपो' हा दादर मधील जुना प्रतिष्ठित असा बुक डेपो आहे. त्याचे कांताशेठ नेरुरकर आणि अशोक बेंडखळे या दोघांनी मिळून साहित्यिक गप्पांचा
आयडियलचा कट्टा हा रोमांचक सिलसिला आठ जानेवारी 1993 रोजी मोठ्या आव्हानात्मक स्थितीत सुरू केला. तेव्हापासूनच्या घडामोडींची माहितीपूर्ण मनोरंजक, अशी लेखक प्रकाशक वाचक आणि अर्थातच स्तंभलेखक पत्रकार यांच्या गप्पांंच्या मेळाव्याची ही अद्भुत कहाणी आहे.
जवळजवळ 50 हून अधिक मान्यवर असे साहित्य क्षेत्राशी संबंधित व्यक्तींच्या दरमहा गप्पांचा आणि त्यांच्या पुस्तकांचा हा आढावा म्हणजे गेल्या जवळजवळ तीन दशकातील मराठी सारस्वताचा जणू एक
जीताजागता इतिहासच आहे, असे मला जाणवले अन् मी प्रभावीत झालो.
'लक्षवेधी नोंदी' हे हाताने लिहिण्याचे माझे जे प्रयत्न होते ते पुनश्च या पुस्तकामुळे, मी पुनरुज्जीवीत करू शकलो. माझे हे पुस्तक वाचून झाल्यावर, ताबडतोब केेवळ एका दिवसात, मी त्यावरील माझा अनुभव आणि रसास्वाद थोडक्यात हा एकटाकी हाताने लिहून काढला. ज्या हाताने माझी बोटे वयोमानपरत्वे थरथरत असल्यामुळे, मला साधी सही करता येत नव्हती, त्याच हाताने मी जवळजवळ सहा पृष्ठे लिहून काढली हे नवलच आणि त्यामागे या पुस्तकाची प्रत्यककारी प्रेरणा आहे.
असे संग्राह्य पुस्तक माझ्या हाती आले हे माझे अहो भाग्यच ! वसंत वाचनालयाबरोबरचा माझा हा ऋणानुबंध असाच वृद्धिंगत होत जाणार असा मला विश्वास आहे. माझ्या त्या हस्तलिखित नोंदी पुढे दिल्या आहेत, त्यात आपण जरूर नजरेखालून घालाव्यात":💐
चुकभूल द्यावी, घ्यावी.
धन्यवाद
सुधाकर नातू
दादरचे वसंत वाचनालय सुरू केल्यापासून गेल्या तीन महिन्यात मी वाचलेली पुस्तके:
1 भक्ती पंथेची जावे- संपादक अरुण घाडीगावकर
2 तेथे कर माझे जुळती- संपादक अरुण शेवते
3 कट्टा- लेखक शिरीष कणेकर
4 आठवणीतले 'पुल'
5 बाबूमोशाय-हेमंत देसाईंंचे पुस्तक:
बॉम्बे टॉकीज
6 अक्षरसंवेदना दिवाळी अंक'22
7 आत्मरंग-लेखक आत्माराम भेंडे
8 मंतरलेल्या आठवणी- लेखक श्रीधर माडगूळकर
9 ऋतुरंग दिवाळी अंक 22
10 माझी कॉर्पोरेट दिंडी-लेखक माधव जोशी
11 मी बहुरूपी- लेखक अशोक सराफ
12 घातचक्र दोन भाग- लेखक दीपक करंजीकर
13 किस्त्रीम दिवाळी अंक 22
14 'वपु' काळ्यांचे रंग मनाचे
15 साप्ताहिक सकाळ दिवाळी अंक'22 16 अनुबंध- लेखक सुधीर मोघे
17 विपुलश्री ऑगस्ट 23 अंक
18 व्यक्तीरंग-लेखक डॉक्टर कुमार सप्तरची
19 अनुराधा दिवाळी अंक'22
20 आयडियलचा कट्टा-संपादक लेखक अशोक बेंडखळे
21 विपुलश्री दिवाळी अंक'22
22 फिल्मफेअर ऑगस्ट'23
23 बकुळफुले, फुले मोहाची- लेखक रवींद्र पिंगे
धन्यवाद
सुधाकर नातू