👍"छाप(पड)लेले शब्द !":👌
👍"चाकोरी बाहेरचा धाडसी उपक्रम!":👌
😜 "सजीवांमध्ये नर आणि मादी किंवा
मनुष्यमात्रांमध्ये स्त्री आणि पुरुष एवढी दोन लिंग आपल्या परिचयाची असतात आणि अजून काही वेगळा प्रकार असू शकतो, याची सहसा दखल घेतली जात नाही. त्या तिसर्या वर्गाला वाळीत टाकल्यासारखी वागणूक पुष्कळदा असते, हे आपण पाहत आलो आहोत.
अशा वेळेला हे धक्कादायक वृत्त नजरेसमोर आले आणि मी अचंबित झालो.
त्या दखल न घेतल्या जाणार्या पारलिंगी (हा शब्दही आगळावेगळा) समूहासाठी काही वेगळे असे करावे हे रुईया
महाविद्यालयासारख्या, (ज्याचा मी देखील कोणी एकेकाळी विद्यार्थी होतो) त्यांनी हे धाडस करावे, हे खरोखर काळापुढचे पाऊल होय. ज्याप्रमाणे कोणी एकेकाळी रधों कर्वे यांनी कुटुंब नियोजनाच्या बाबतीत समाजाचा प्रखर विरोध पत्करून प्रयत्न चालवले, त्याची आठवण झाली. महाराष्ट्राला समाज सुधारणेच्या माध्यमातून काळाच्या पुढे नेणाऱ्या समाज सुधारकांच्या मांदीयाळीच्या परंपरेतील हा प्रयत्न आहे असे वाटते.
काळ झपाट्याने पुढे चालला आहे आणि त्याबरोबरच समाज देखील बंदिस्त वातावरणामधून अधिकाधिक मोकळा होत चालला आहे, हेच या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल !:😜
👍"छाप(पड)लेले शब्द !":👌
👍"वाचाल, तरच वाचाल !":👌
वाचनसंस्क्रुती हळू हळू लयाला जात
चालली आहे, माणसाला स्वतंत्रपणे विचार करायला लावणारी वाचनाची सवय इतिहासजमा होण्याचा धोका आहे. हे चांगले नव्हे. दुर्दैवाने सोबतचे वृत्त चिंताजनक असेच आहे. उत्तरोत्तर मराठी वाचनाची जी दुर्दशा झाली आहे त्याचे निदर्शक असे हे वृत्त आहे
"प्रसन्न सकाळ असावी आणि अंगणातील पारिजातकाच्या झाडाखाली, पांंढर्याशुभ्र नाजूक पाकळ्या आणि लाल चुटुक देठ असलेल्या फुलांचा सडा पसरलेला असावा, त्या फुलांचा मंद सुगंध मनाला ताजेतवाने करत आनंदात आपण न्हाऊन निघावे, हा एक विलक्षण अनुभव असतो.
वाचनातूनही असाच सुखद अनुभव येत असतो. वाचनासारखा दुसरा कुठला छंद नाही. वाचता वाचता आपणही स्वत:शी संवाद कळत, न कळत करत रहातो, आपलेही अनुभव पडताळून पहातो. नवीन माहिती वा ज्ञान तर मिळतेच, पण माणसांचे स्वभाव, भावभावना ह्यांचेही चित्र, विविध वाचनातून उभे रहाते. माणसाच्या जाणिवा विस्तारित आणि समृद्ध करण्यासाठी वाचनासारखा जसा छंद नाही.
पण आज संगणक, मोबाईलचा अती वापर ह्यामुळे माहितीचा महासागर, बोटाच्या एका क्लिकवर मिळत असल्याने, हातात एखादे पुस्तक घेवून ते वाचायचे कुणी कष्ट घेत नाही. शिवाय जीवन अधिक धकाधकीचे, स्पर्धेचे झाले आहे. सहाजिकच सारे वेगाने, झटपट हवे असते आणि ते नवतंत्राच्याद्वारे मिळू शकते. वर्तमानपत्रे,पुस्तके, काय अडले, ते ते संगणक वा मोबाईलवर उपलब्ध असते. म्हणूनच आजकाल वाचनालयांचे सभासद प्रौढ माणसेच असलेली दिसतात. फेसबूक, वाँटस्अँप इ.इ... अशांसारख्या सोशलमिडीयांमुळे तर सर्वांना अक्षरश: वेड लावले आहे.
मला एक सुचना कराविशी वाटते: पुस्तके मासिके वाचली की आपण घरातच न ठेवता इतरांना देत जावी. त्यामुळे वाचनसंस्कृती वृद्धिंगत होऊ शकते. मी शक्य होईल तशी, पुस्तके अथवा दिवाळी अंक इतरांना वाचल्यावर देत आलो आहे. त्यातही मला आनंद व समाधान मिळवून गेले आहे......"
धन्यवाद
सुधाकर नातू
"वाचा फुला आणि फुलवा !" हे जे म्हटले आहे तेही खरेच आहे.
कारण वाचनामुळे आपल्याला विविध अशा अनुभवांचा मागोवा घेत, आपल्या जाणीवांचा परिघ विस्तारला जाऊन मनाला जो आत्मानंद मिळतो, तोही हा अशाच पारिजातकाच्या फुलांच्या मंद सुगंध सारखा असतो. परंतु सध्याच्या भाऊबंदकी, वादविवाद उखाळ्यापाखाळ्या, टोमणे आणि अर्वाच्य शब्द याचबरोबर विलक्षण धक्का देणारे अपघात, अनेक प्रकारच्या गुन्हेगारीच्या बातम्या अशा सगळ्या नैराश्यजनक बातम्यांनी सारा माहोल झाकोळलेला असताना, "छाप (पड)लेले शब्द" शोधणे हे एक जिकीरीचे काम असते.
मानवाला अग्नीचा शोध लागण्याआधी एकमेकांची संपर्क साधण्यासाठी शब्द आणि भाषा यांचा शोध लागला ही एक मानव जातीला नव्या वळणावर नेणारी
घटना होती शब्दांचे सामर्थ हे शस्त्रापेक्षाही जास्त असते, हे आपण सारे जाणतो. भाषा अनेकविध असल्यामुळे दोन भाषांमधील प्रत्येक शब्दाचे अर्थ व साधर्म्य जाणणे हे अत्यंंत गरजेचे असते.
या पार्श्वभूमीवर अचानक आज एक मनाला उभारी देणारे व्रुत्त अवचित नजरेत आली. शब्दकोश निर्मितीचा इतिहास वाचकांसमोर थॉमस मोल्सवर्थ ह्यांनी मराठी-इंग्रजी शब्दांचा अपार कष्ट करून एक परिपूर्ण शब्दकोश निर्माण केला, हे ते व्रुत्त. त्याचीच आठवण म्हणून 'शब्दप्रभू मोल्सवर्थ'
या पुस्तकाचे प्रकाशन मोल्सवर्थच्या 151व्या स्मृतिदिनी प्रकाशित केले जाणार आहे. अशा तऱ्हेच्या शब्दकोशांमुळे दोन मने, दोन भाषिक एकमेकांना जोडणारे अनंत पूल आपोआप निर्माण होतात. अशा तऱ्हेचे मुुलभूूत काम परिपूर्ण करणे, हे एक खरोखर कठीणातले कठीण काम असते. अशी ध्येेयवादी 'मोल्सवर्थ' सारखी माणसे आगामी पिढीला वर्षानुवर्ष उपयुक्त होईल असे योगदान देत असतात, म्हणून प्रगतीचे नवनावे मार्ग मिळत जातात. खरंच अशी माणसे हा इतिहासातला भावगर्भ ठेवाच होय.