सोमवार, २७ मार्च, २०२३

"आकाशातील पाळणे": "अभिवाचन मंच-1 ते 5":

!! श्री गणेशा नम: !!

👍"आकाशातील पाळणे":👌

ह्या अभिवाचन मंचाची रूपरेषा:

श्री सुधाकर नातू आणि श्री उदय पिंगळे या दोन ज्येष्ठ नागरिकांनी स्थापन केलेला हा अभिनव अभिवादन मंच आहे.

श्री सुधाकर नातू हे 78 वर्षांचे ज्येष्ठ नागरिक असून ते इंजीनियरिंग ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट मार्केटिंग मॅनेजमेंट या शैक्षणिक पार्श्वभूमीवर 32 वर्ष कॉर्पोरेट क्षेत्रातील अनुभव असलेले हौशी लेखक आहेत आणि त्यांच्या विविध नियतकालिकातील चार दशकांच्या लेखनाचा त्यांना अनुभव आहे शिवाय शिवाय व्हिजिटिंग मॅनेजमेंट फॅकल्टी म्हणून सुमारे दोन दशकांचा त्यांना अनुभव आहे. गेल्या चार-पाच वर्षात त्यांनी ब्लॉगवर चारशे लेखांचे प्रदर्शन केले आहे आणि शिवाय युट्युब वर मॉन्सून ग्रँडसन हा चॅनेल सुरू करून तेथे विद्यपूर्ण असे सुमारे 80 व्हिडिओज प्रदर्शित केले आहे आणि आता नुकताच वर्षभरापूर्वी फेसबुक वर रंगांची दुनिया हा खाजगी समूह प्रस्थापित केला आहे याच औषध धडपडीचा पुढचा भाग म्हणून आकाशातील पाळणे हा अभिनव अभिवाचन मंच त्यांनी प्रारंभ करण्याचा संकल्प सोडला आहे आणि त्यात त्यांना त्यांचे स्नेही श्री उदय पिंगळे हे साथ देणार आहेत आणि बहुश्य हा ध्वनिफिती ध्वनिमुद्रित करण्याचे कार्य स्वतः उदय पिंगळे करणार आहेत त्यांना या क्षेत्रातला चांगला अनुभव आहे.

येथे प्रदर्शित होणार्या ध्वनीफितींचे 

पुढील चार भाग असतील:

१ रंगांची दुनिया: साहित्य, रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा सांस्क्रुतिक जगताचा परामर्ष घेणारे साहित्य.

२ स्पंदने: विविध विषयांवरील विचारमंथन.

३ प्रगतीची क्षितीजे: व्यक्तिमत्व विकास आणि व्यवस्थापनशास्त्रविषयखक अनुभवी बोल.

४ पुढचे पाऊल: उद्याची चाहूल घेणारे ज्योतिषशास्त्राची उपयुक्त ओळख.

ह्या विभागांचे प्रकाशन कालबद्ध वेळापत्रकानुसार दर आठवड्याला रविवारी व बुधवारी होईल. 

आपणा सर्वांच्या प्रोत्साहनपर प्रतिसादाची अपेक्षा आहे.

धन्यवाद

सुधाकर नातू

उदय पिंगळे

(Admins)

#################################

अभिवाचन 1

वाणी आणि शब्दब्रम्ह' ह्या यथोचित ध्वनीफित़ीद्वारे आज श्री गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर आम्ही "आकाशातील पाळणे" ह्या अभिवाचन मंचाचा प्रारंभ करित आहोत. आपले त्यात सहर्ष स्वागत आहे.

धन्यवाद

सुधाकर नातू

उदय पिंगळे

अभिवाचन 2

👍"चारचौघी-काळाच्या पुढची कलाक्रुती !":👌

👍 "जुने ते सोने" या मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ उलगडणाऱ्या डिजिटल लेखसंग्रहातील, काळाच्या पुढचे, स्त्री पुरुष संबंधातील भावभावना अधोरेखित करणाऱ्या 'चारचौघी' ह्या गाजलेल्या, रंगभूमीच्या इतिहासातील एक Miles Stone असलेल्या नाटकाचा रसास्वाद घेणार्या लेखाचे ( तरुण भारत बेळगाव एक नोव्हेंबर 1991 रोजी प्रसिद्ध झालेला लेख ) अभिवाचन आता येथे सादर करत आहोत.

आता लवकरच ह्या तीन दशकांपूर्वी लोकप्रियतेचा कळस गांठणार्या नाटकाचा पुनःश्च शुभारंभ होत आहे. त्यामध्ये सध्याच्या आघाडीच्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हटंगडी, मुक्ता बर्वे यांच्याबरोबर कादंबरी कदम आणि पर्ण पेठे वैविध्यपूर्ण भूमिका सादर करणार आहेत.👌💐

अभिवाचन 3

👍" कल्पना एक अविष्कार अनेक !":💐

मराठी रंगभूमीच्या सुवर्णकाळातील घटनांचा परामर्ष घेणार्या निवडक लेखांचा 'जुने ते सोने' हा डिजिटल लेखसंग्रह आहे. 

त्यामधील नाट्यदर्पणच्या 'कल्पना एक आविष्कार अनेक' ह्या लेखाचे स्वतः लेखक सुधाकर नातू ह्यांनी केलेली अभिवाचन ध्वनीफित पुढे प्रदर्शित करत आहोत.

"नाट्यदर्पण प्रतिष्ठान आणि सुधीर दामले हा एक अविभाज्य असा रसिकांच्या मनातला आनंदाचा ठेवा आहे. त्यांची 'नाट्यदर्पण रजनी' आणि 'कल्पना एक आविष्कार अनेक' ची निवडक दहा एकांकिकांची अंतिम फेरी, हा दरवर्षीचा सुवर्णक्षण रसिकांच्या मनात अजूनही रुजलेला असेल. ह्या अभिवाचनामध्ये, त्यातील तीन सर्वोत्तम एकांकिकांचा रसास्वाद तुम्हाला मिळेल. आपणा सर्वांच्या प्रोत्साहनपर प्रतिसादाची अपेक्षा आहे.

हा whatsapp ग्रुप एकतर्फी आहे त्यावर फक्त ऍडमिन पोस्ट करू शकतील.

धन्यवाद.

श्री सुधाकर नातू 

श्री उदय पिंगळे

(Admins)

👍👍👍👍💐💐

अभिवाचन 4

"रंगांची दुनिया":

।।रसिकता रुजवूया।।

।।रसिकता फुलवूया।।

।।आनंद घ्या, आनंद द्या।।

☺️"हरवले, ते गवसले !"😊

"समस्त मराठी रसिकांच्या मनात केवळ आपल्या आद्याक्षरांनी ओळखले जाणारे, आपापल्या क्षेत्रात अविस्मरणीय अशी कामगिरी करणारे, तीन दिग्गज आणि त्यांची लोकप्रियतेची भरारी यांचा चोखंदळ उहापोह करणारा, हा श्री सुधाकर नातू ह्यांचा खुसखुशीत ललित लेख, आज तुमच्यासाठी श्री उदय पिंगळे सादर करत आहेत. त्यामुळे आपला रविवार अधिकच आनंदाचा जाईल अशी आशा आहे.

अभिवाचन 5

👍" आकाशातील पाळणे या आपल्या अभिवाचन मंचावर 'स्पंदने"-वाचनातून विविध स्पर्शी विचारमंथन, या सदरामध्ये👍"वाचलेलं, रुचलेले !":👌 ही ध्वनिफीत कधीतरी केव्हातरी कुठेतरी वाचलेल्या आणि भावलेल्या गोष्टींमधून खूप खूप काही शिकवून जाणारी अशी आहे. तिचे अभिवाचन श्री सुधाकर नातू यांनी केलेले आहे.

रविवार, १९ मार्च, २०२३

👍"छाप(पड)लेले शब्द-38 !":💐 💐" आठवणीतली साठवण !":👌


"छाप👍, (पड)लेले शब्द-8 !":

"यक्षप्रश्न ?":

उत्तर:'लोभस निवृत्ती !':

😆"नामांकित खेळाडूंच्या सन्माननीय निवृत्ती बद्दल असे म्हटले जाते की, जेव्हा त्यांचे चाहते प्रश्न विचारतात:

"कां म्हणून निवृत्ती ?" 

तेव्हाच ती योग्य. 

आणि कोणाही खेळाडूवर अशी वेळ येऊ नये की चहाते प्रश्न करतील:

'अजून कां म्हणून नाही निवृत्ती?'

आपले जेष्ठ आणि वयस्कर राजकारणी कधी या लोभस निवृत्तिपासून धडा घेणार कां ? 😆

हा कायमचा यक्षप्रश्न आहे !"

##########

"छाप(पड)लेले शब्द!":

"जागतिक वारसा म्हणून आपल्या रेल्वेच्या तीन हिमालयन रेल्वेजना मान मिळाला आहे. त्यातील 'कालका सिमला' रेल्वेलाईनबद्दलची ही माहिती खरोखर कौतुकास्पद आहे. 120 वर्षांपूर्वी आपल्या कुशल व्यवस्थापन व तंत्रज्ञान यांच्या जोरावर ब्रिटिशांनी हा जो रेल्वे मार्ग उभा केला, तो आजही चांगला वापरात आहे. 

जगातली जशी सात आश्चर्ये असतात, तशीच जागतिक वारसा मिळालेली ठिकाणे उद्याच्या जगातली आश्चर्य होऊ शकतात !":

#########



 👍"छाप(पड)लेले शब्द-38 !":💐

💐" आठवणीतली साठवण !":👌

👍"माझे आजोळ आंजर्ले अन् तेच माझे प्रिय जन्मगांव ! त्याच्या मनोहारी आठवणी जागी करणारी माहिती, या वृत्तांत आल्यामुळे, माझ्या बालपणच्या नयनरम्य घटनांची उजळणी झाली....

रमणीय असे निसर्ग सौंदर्य असलेल्या आंजर्ले गावाबद्दल, मी बालपणी एक कविताही केली होती:

'खेडेगावची निसर्ग शोभा असे,

फारच सुंदर, 

कड्यावरचा गणपती आणि  

समुद्रावरचे बंदर ...'

त्याकाळी, आमच्या घरातून सायन ते आंजर्ल्याला जायचं, म्हणजे एक मोठी त्रिस्थळी यात्राच असे. प्रथम चालत स्टेशन, तिथून आगगाडीने मशिदबंदर स्टेशनला उतरायचं. त्यानंतर टांग्यात बसून भाऊच्या धक्क्यावर जायचं. तेथे समुद्रात उभ्या असलेल्या सेंट अंथुनी, रोहिदास वा चंपावती अशा भल्या मोठ्या बोटींमध्ये चढायचं आणि डेकवरून प्रवास करत, समुद्रावरची सुसाट हवा खात, जंजिरा, श्रीवर्धन बंदर घेत, हर्णे बंदराला समुद्रात बोट उभी राहायची. मग पडावात आम्हा बाळगोपाळांना अक्षरश: फेकलं जायचं. तिथून किनाऱ्यावरच्या बसमध्ये बसायचं, धूळ उडवणारं मार्गक्रमण करत आंजर्ल्याला बंदराच्या पलीकडे उतरायचं. पुन्हा 'तरी'वरच्या होडीतून आंजर्ले किनाऱ्यावर उतरायचं व घरी काळोख होईल त्या सुमाराला पाखाडीमधल्या घरी चालत वा बैलगाडीतून जायचं. हा एक विलक्षण अनुभव होता. तेव्हा वीज नव्हती, कंदिलाच्या प्रकाशात, आजी आमची वाट पाहत असायची.

तिथल्या वास्तव्यात, नारळाचे खोबरे व मधुर पाण्यावर ताव मारायचा, हापूसचे आंबे, फणस मनसोक्त खायचे, सकाळी, विहिरीवर आमचा गडी काशा, आपली बैलजोडी घेऊन वाडीचे शिपणे काढायला आला की, रहाटांच्या धो धो पाण्यात डुंंबत आंघोळी करणे किंवा सायंंकाळी डोंगरकड्यावरच्या श्री गणपतीमंंदिराला जाणे, समुद्रावरच्या बंदरावर जाऊन हॉटेलमधली गरमागरम भजी खाणे, असे अनेक उद्योग आमचे असायचे. 

उभाघरच्या दुर्गादेवीच्या यात्रेमध्ये मी बालपणी लोकमान्य टिळकांची 'मी शेंगा खाल्ल्या नाहीत' ही गोष्ट मोठ्या धीटाईने सर्वांसमोर सांगितली होती आणि त्यामुळे आनंदाने आजोबांनी मला खांद्यावर घेऊन घरापर्यंत मिरवत आणले होते ! ही न विसरणारी गोष्ट पुन्हा जागी झाली.

तो काळच अक्षरशः हृदयंगम आणि मनभावन होता. त्याच गावचे हे वृत्त वाचून, तुम्हालाही आंजर्ले गावची यात्रा करावीशी वाटेल !"...💐💐💐

धन्यवाद 

सुधाकर नातू