रविवार, १२ सप्टेंबर, २०२१

"वेचक आणि वेधक !":

 ।।श्री गणपती बाप्पा मोरया।।

"वेचक आणि वेधक !":

श्री गणेश ही विद्येची, ज्ञान-विज्ञानाची देवता. श्री गणरायाच्या कृपेने, हे काही वेचक-वेधक:

# कुठलाही अतिरेक नको. कारण 'अति तेथे माती' ! कुठे थांबायचे, केव्हा, कां आणि कसे थांबायचे, त्याचे नीट ज्ञान हवे. मध्यम मार्ग हा समतोल साधणारा मार्ग असतो.

# काळ नित्य बदलतो आहे, बदलणे हाच काळाचानैसर्गिक स्वभावधर्म आहे. बदलत्या काळाबरोबर जो स्वतःला जुळवून घेतो, तोच पुढे टिकतो, हे शाश्वत सत्य आहे.

# 'जिथली गोष्ट जिथल्या तिथे, जेव्हाचे, तेव्हा आणि ज्याचे त्याला' हा मंत्र जपला, तर कधीही गोंधळ होणार नाही आणि आणि सुलभतेने कामे होतील .

# जे जे चांगले व उपयुक्त, ते ते आपण कायम वेचित जावे, नेहमी नवे नवे ज्ञान मिळवत जावे आणि जे जे मिळवले, त्यातील योग्य ते इतरांना देत राहावे, हा चांगला मार्ग आहे.

# कोणत्याही प्रसंगाकडे, घटनेकडे अथवा संकटाकडे संयमीत, समंजस आणि डोळस दृष्टीने बघायला शिकणे, जरी कठीण असले, तरी ते आत्मसात करणे आजच्या काळात अत्यावश्यक आहे.

# जे आपल्याला मनापासून आवडते, जे आपण उत्तम तऱ्हेने करू शकतो आणि हे ज्यांना नेहमी करायला मिळू शकते, ते खरोखर भाग्यवान. कारण त्यामुळे त्यांच्यासाठी आनंदाने जगायचा वस्तुपाठ निर्माण होतो.

# बुद्धीला चालना देणारे आणि उत्साह निर्माण करणारे असे काही ना काही आपण जर करत गेलो, तर ताण-तणावापासून आपली मुक्ती होऊ शकते.

# जे आपण बदलू  नाही, जे आपल्या बदलण्याच्या शक्ती बाहेर आहे, त्याचा कधीही विचार करू नये. मात्र जी गोष्ट आपण बदलू शकतो, याची आपल्याला खात्री आहे, ती बदलण्याचा अहर्निश प्रयत्न करत राहावा. अर्थात शहाणपणा तोच आहे हे की, या दोन्हीमधला फरक जाण्याचा ! आपण काय बदलू शकतो आणि काय बदलू शकत नाही, हे जाणण्याचा !

धन्यवाद

सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा