शुक्रवार, २२ मार्च, २०२४

👍"शारदोत्सव !": वाचले काय काय ?:👌

👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"शारदोत्सव !":👌 👍"भक्ति पंथेची जावे' !":👌 वाचनासारखा दुसरा कुठला छंद नाही. वाचता वाचता आपणही स्वत:शी संवाद कळत, न कळत करत रहातो, आपलेही अनुभव पडताळून पहातो. नवीन माहिती वा ज्ञान तर मिळतेच, पण माणसांचे स्वभाव, भावभावना ह्यांचेही चित्र, विविध वाचनातून उभे रहाते. 💐 "प्रसन्न सकाळ असावी आणि अंगणातील पारिजातकाच्या झाडाखाली, पांंढर्याशुभ्र नाजूक पाकळ्या आणि लाल चुटुक देठ असलेल्या फुलांचा सडा पसरलेला असावा, त्या फुलांचा मंद सुगंध मनाला ताजेतवाने करत आनंदात आपण न्हाऊन निघावे, हा एक विलक्षण अनुभव असतो. मानवाला अग्नीचा शोध लागण्याआधी एकमेकांची संपर्क साधण्यासाठी शब्द आणि भाषा यांचा शोध लागला ही एक मानव जातीला नव्या वळणावर नेणारी घटना होती शब्दांचे सामर्थ हे शस्त्रापेक्षाही जास्त असते, हे आपण सारे जाणतो. भाषेच्या ज्ञानामुळे वाचन आणि लेखन याद्वारे एकमेकांचा संपर्क अधिक सुलभतेने साधन मानवाची आतापर्यंतची प्रगती झाली असे म्हणता येईल. "वाचा फुला आणि फुलवा !" हे जे म्हटले आहे तेही खरेच आहे. कारण वाचनामुळे आपल्याला विविध अशा अनुभवांचा मागोवा घेत, आपल्या जाणीवांचा परिघ विस्तारला जाऊन मनाला जो आत्मानंद मिळतो, तोही हा अशाच पारिजातकाच्या फुलांच्या मंद सुगंध सारखा असतो. 👍"भक्ति पंथेची जावे' !":👌 💐'भक्ति पंथेची जावे' ह्या पुस्तकाने माझ्या जीवनात एक नवे वळण आणले आणि भीषण 'कोरोनाकाळा' नंतरच्या एकलकोंडेपणाच्या विचित्र अनुभवानंंतर, जी लायब्ररी त्यांनी पूर्वी सुरू करायची नाही, असे ठरवले तीच लायब्ररी पुन्हा कां, कशी सुरू केली, आणि हे पुस्तक आणले. त्या turning point च्या रोमांचक अनुभवाची आणि सोबत पुस्तकाचे परिणामकारक संपादन करणाऱ्या, श्री अरुण घाडीगावकर यांना दिलेला प्रतिसादही जरूर ऐका. त्यासाठी..... पुढील लिंक उघडा..... https://drive.google.com/file/d/1EUvQZjvILUGnCevFOs90-htSLKitHt6i/view?usp=drivesdk या पार्श्वभूमीवर मी आतापर्यंत वसंत वाचनालय गेल्या जुलैमध्ये सुरू केल्यापासून 9 महिन्यात कोणकोणती पुस्तके आणि दिवाळी अंक वाचले त्याची यादी तुम्हालाही असंच काही ना काही नावीन्यपूर्ण वाचायला उद्युक्त करेल अशी आशा आहे :💐 # "दिवाळी अंक": आतापर्यंत मी वाचलेले दिवाळी अंक'23 मधील कोणते ते प्रथम सांगतो: 1मेनका 2 किस्त्रीम 3 धनुर्धारी 4 कालनिर्णय 5 विपुलश्री 6 ग्रहांकित 7मौज 9 अनुराधा 10पद्मगंधा 11 ललित 12 वसंत 13 गृहलक्ष्मी 14 मानिनी 15 जडणघडण 16 लोकसत्ता 17 साधना 18 श्री दीपलक्ष्मी 19 पुढारी 20 मोहिनी मी वाचलेले दिवाळी अंक'22 मधील कोणते ते, ते असे: 21,अक्षर संवेदना 22 ऋतुरंग 23 किस्त्रीम 24 साप्ताहिक सकाळ 25 विपुलश्री 25 माहेर 27 श्री दीपलक्ष्मी 28 प्रपंच (सध्या वाचत आहे) ------------------------ # "पुस्तके": मी वाचलेली पुस्तके आणि त्यांचे लेखक असे 1 'भक्ती पंथेची जावे' संपादक अरुण घाडीगावकर 2 'तेथे कर माझे जुळती' संपादक अरुण शेवते 3 'कट्टा' श्री शिरीष कणेकर 4 'आठवणीतले 'पुल' बाबूमोशाय अर्थात हेमंत देसाई 5 मंतरलेल्या आठवणी श्रीधर माडगूळकर 6 'आत्मरंग' श्री आत्माराम भेंडे 7 'माझी कॉर्पोरेट दिंडी' माधव जोशी 8 'मी बहुरूपी' अशोक सराफ 9 'घातचक्र' दीपक करंजीकर 10 व पु काळे यांचे 'रंग मनाचे' 11,अनुबंध लेखक सुधीर मोघे 12 आयडियलचा कट्टा अशोक बेंडखळे 13 'व्यक्तीरंग' डॉक्टर कुमार सप्तर्षी 14 बकुळ फुले, फुले मोहाची लेखक रवींद्र पिंगे 15 'दरवळ' रंजना पंडित 16 'बंध अनुबंध' कमल पाध्ये 17 'युक्रेनचे युद्ध' अविनाश काळकर 18 'प्रकाशाची खिडकी' लेखक रवींद्र पिंगे 19 'आपलेसे' डॉक्टर अनिल अवचट चंदेरी 20 'सिनेतारे' डॉक्टर राजू पाटोदेकर 21 'नापास मुलांचे प्रगती पुस्तक' अरुण शेवते 22 'चंदेरी सोनेरी' ललिता ताम्हाणे 23 'सर्वोत्तम रवींद्र पिंगे' 24 'चित्र आणि चरित्र' बाबुराव पेंढारकर 25 'व्ही शांताराम' शशिकांत श्रीखंडे 26 'काला पुढती चार पाऊले' 'शंवाकि' यांचे चरित्र सविता भावे 27 'खुल्लम खुल्ला' आत्मकथन ऋषी कपूरचे आत्मकथन 28 'उत्तुंग भाग' पहिला दुसरा सुधीर गाडगीळ 29 'बोलंदाजी' द्वारकानाथ संझगिरी 30 'माझ्या धडपडीचा कारनामा' आनंद करंदीकर 31 'लमाण' डॉक्टर श्रीराम लागू 32 'ढोल ताशे' शिरीष कणेकर 33 'सुखाचे पदर' रवींद्र पिंगे 34 'राम प्रहर' विजय तेंडुलकर 35 'ते' विजय तेंडुलकर 36 'सिनेमा पाहणारा माणूस' अशोक राणे 37 'दरवळे इथे सुवास' अंबरीश मिश्र 38 'सुंदर ती दुनिया' अंबरीश मिश्र 39 'शम्मी कपूर' अनुवाद मुकेश भास्कर 40 'अवघे पाऊणशे वयमान' डॉक्टर मनोहर जोशी 40 'आठवले तसे' दुर्गा भागवत 41 'टाटा स्टोरीज' हरीश भट 42 'ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी, श्रीमती प्रतिभा रानडे (सध्या वाचत आहे) धन्यवाद श्री सुधाकर नातू

सोमवार, ४ मार्च, २०२४

"Different Strokes-8 to 10 !":

💐"Different Strokes-8 !":💐 👍"Collective Character !": Most of our systems & policies are not bad or harmful but their interpretations are different by diverse groups. Moreover, their implementation is faulty & not timely as per the outcomes intended. This happens to be one of the major reasons for today’s turbulent & restive environment throughout the country. If we all follow the Systems & Policies to the T, with total dedication, determination & discipline, we would witness wonders. However for that ,we all need to have a collective character of commitment, honesty & integrity. The real trouble of the day therefore is, this is probably, what is exactly missing !":👍 💐"Different Strokes-9 !":💐 👍"Empty Mindset !":👍 To attain a Mindset of Nothing at all, needs to be gained or Nothing is felt if Anything is lost, happens to be a wonderful but challenging goal.Try it, Best of Luck. 💐"Different Strokes-10 !":💐 👍"Birth of New Ideas !":👍 I have a regular habit of going for a Morning walk; the calm, cool environment ignites creative urge within me and what emerges are interesting fundamental thoughts. I am pleased to share them here from time to time. Please do bear with me. Thank You. Most of our systems & policies are not bad or harmful but their interpretations are different by diverse groups. Moreover, their implementation is faulty & not timely as per the outcomes intended. This happens to be one of the major reasons for today’s turbulent & restive environment throughout the country. If we all follow the Systems & Policies to the T, with total dedication, determination & discipline, we would witness wonders. However for that ,we all need to have a collective character of commitment, honesty & integrity. The real trouble of the day therefore is, this is probably, what is exactly missing. Here is an unanswered Qn: 'We come across 'n' number of guiding thoughts, which, if brought into practice, one can lead an Ideal Life, Ideally. But alas, why is it very difficult, if not next to impossible, to do so? Can any one throw some Light, on this eternal mystery? Sudhakar Natu