👍"आचारसंहिता एक अत्यावश्यक गरज !":👌
💐"अस्मिता वाहिनीवरील सकाळी साडेसहा वाजता प्रसारित होणारा 'चिंतन' हा कार्यक्रम मी गेल्या काही दिवसापासून सातत्याने ऐकत आहे. त्यापूर्वी सहा ते साडेसहा मधील मंगल प्रभात, जर गाणी ऐकावीशी वाटली तरच ऐकतो. या सवयीमुळे लवकर उठण्याची जशी सवय लागली आहे, त्याचप्रमाणे आदल्या रात्री दहा ते साडेदहाच्या दरम्यान झोपण्याची आपोआपच मला शिस्त लागली आहे. शिवाय 'चिंतन' ऐकल्यावर सात ते सातच्या आसपास पर्यंत मी 'सोमि'वरील सर्विंग करतो, माझा एखादा नवनिर्मित संदेश देखील पाठवतो.
नुकतेच 'चिंतन' या कार्यक्रमात 'कायदा' या विषयावर डॉक्टर संगीता गोडबोले यांचे विचार ऐकले. त्यामधून कायदे हे आपल्या सर्वांच्या संरक्षणासाठी आणि हितकारी पद्धतीने आपले जीवनव्यवहार आपल्याला करण्यासाठी सर्वंकष विचार करून केलेले असतात. त्यासाठी प्रत्येकाने विहित कायदे काटेकोरपणे पाळले पाहिजेत, हे त्यामध्ये आवर्जून मांडले होते.
दुर्दैवाने सध्या कायदे मोडणे ही एक प्रतिष्ठेची बाब समजली गेल्यामुळे समाजातील शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात येत चाललेली आपण पहात आहोत. सर्वसाधारणपणे समाजामध्ये 90% माणसं प्रामाणिकपणे सरळ मार्गी पद्धतीने आपली जीवन प्रमाणात करावी या इच्छेने जगत असतात. कदाचित उरलेले दहा टक्के कायदे पाळण्यात बेेपर्वाही आणि अपराधी प्रवृत्ती असलेले दिसतात. शेवटी, दुधामध्ये जसा एखादा मीठाचा खडा टाकला, तर ते नासून जाते, त्याचप्रमाणे ही अल्पसंख्य गुन्हेगारी वृत्तीची माणसे समाजातील व्यवस्था मोडकळीस आणण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात हे दुर्दैव !
प्रत्येक व्यक्तीने जर कायदे व्यवस्थित पाळले तर शांतता आणि सुव्यवस्था तर राहीलच परंतु अनेक बाबींवरील आपले मनुष्यबळ आणि आर्थिक क्षमता यांची बचत होऊ शकेल. अर्थात असे होणे हे, असे स्वप्नच की जे कधीच प्रत्यक्षात येणार नाही !
या पार्श्वभूमीवर मी माझ्या पुरता सोशल मीडिया मोबाईल फोन आणि एकंदर व्यावहारिक जीवनात बोलणे या विषयांवर आचार संहिता तयार केली असून ती पाळण्याचा माझा यापुढे प्रयत्न राहील आपणही या तीनही आचारसंहिता नजरे खालून घालाव्यात आणि आपल्याही स्वतःच्या अशा याच पद्धतीच्या आचारसंहिता बनवाव्यात, अशी माझी नम्र सूचना आहे !":💐.
############################ 👍"सोशल मिडीया:
माझी (फिसकटणारी?) आचारसंहिता !"::👌
१ दररोज जास्तीतजास्त प्रत्येकी चार स्वनिर्मित उपयुक्त संदेश-फेबु wapp वर पाठविणे.
२ नीट तपासून अत्यावश्यक संदेशच पुढे पाठविणे.
३. ज्यांच्याकडून जेव्हां आपल्याला संदेश येतात, त्यांनाच अनाहूत संदेश पाठविणे.
४ विषयाविना असलेला विडीओ वा फोटो न पहाता डिलीट करणे.
५. ब्लॉग व चँनेल प्रमोशन आठवड्यातून फक्त दोनदाच.
६. राजकीय विषयावर संदेश पाठविणे शक्यतो टाळणे.
७ लोकोपयोगी, विचार, विकास प्रवर्तक असे स्वनिर्मित संदेशच शक्यतो पाठविणे.
८ केवळ उपयुक्त व रास्त संदेश वा विडीओ आँडीओ forward करणे
९ "रंगांची दुनिया" समुहात संदेश वेळापत्रक तयार करून त्यानुसार एक दिवसाची गँप सोडून ते प्रकाशित करणे.
१० आठवड्यात निदान एक दिवस सोमिवर गैरहजरी ठेवणे.
############################
👍"मोबाईल फोनसाठी माझी आचारसंहिता !":👌
# शक्यतो मी स्वतःहून कोणाला फोन करत नाही.
# अगदी नितांत आवश्यकता आणि योग्य ते काम असेल तरच त्या व्यक्तीला फोन करतो.
# पुष्कळदा फोन करण्यापूर्वी व्हाट्सअप करून फोन करू कां असे विचारतो.
# माझ्या संग्रही असलेल्या फोन नंबरचेच आलेले फोन मी घेतो.
#अनाहूत फोनवरून आलेला काॅल मी घेत नाही.
# माझी अपेक्षा: व्हाॅट्सअपवर त्या अनाहूत व्यक्तीने आपले नाव आणि फोन करण्याचे कारण प्रथम संदेशाद्वारे सांगावे, माझा होकार आल्यानंतरच त्या व्यक्तिने मला फोन करावा.
#####################
👍 "फेसबुकवरील फ्रेंड रिक्वेस्टसाठी माझी आचारसंहिता !":👌
# आता मी स्वतःहून सहसा कुणाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत नाही.
# आलेली फ्रेंड रिक्वेस्ट जर परिचय लॉक केला असेल तर शक्यतो स्वीकारत नाही.
# कुठलीही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्यापूर्वी सामायिक परिचित व्यक्ती अर्थात फ्रेंड्स कोण आहेत, ते पाहूनच निर्णय घेतो.
# यापुढे शक्यतोवर कोणीही मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली नाही, तरी चालेल.
#####################
आणि आता सर्वात महत्त्वाची अशी.......
"बोलावे कसे किती या संबंधी माझी आचारसंहिता !":
ही आचारसंहिता तयार करण्यापूर्वी मला आठवले की, केव्हातरी श्री संत तुकाराम यांनी वाणी कशी वापरावी यासंबंधी अभंग लिहिले होते.
फेसबुकवर आणि गुगलवर जाऊन मी ते शोधण्याचा आटापिटा केला आणि अखेरीस माझ्या गुुगलवरील प्रयत्नांना यश आले.
संत तुकारामांचे पुढील अभंग आपल्या सर्वांना बोलण्यासंबंधीची
आचारसंहिता सहजतेने सांगून जातात.....
😆 "घासावा शब्द | तासावा शब्द |
तोलावा शब्द | बोलण्या पूर्वी ||
शब्द हेचि कातर | शब्द सुईदोरा
बेतावेत शब्द | शास्त्राधारे ||
बोलावे मोजके | नेमके ,खमंग ,खमके |
ठेवावे भान | देश ,काळ ,पात्राचे
बोलावे बरे | बोलावे खरे |
कोणाच्याही मनावर | पाडू नये चरे ||
कोणाचेही वर्म | व्यंग आणि बिंग |
जातपात धर्म | काढूच नये ||
थोडक्यात समजणे | थोडक्यात समजावणे |
मुद्देसुद बोलणे | हि संवाद कला
शब्दांमध्ये झळकावी | ज्ञान , कर्म ,भक्ती |
स्वानुभवातून जन्मावा | प्रत्येक शब्द ||
शब्दां मुळे दंगल | शब्दां मुळे मंगल |
शब्दांचे हे जंगल | जागृत राहावं ||
जीभेवरी ताबा | सर्वासुखदाता |
पाणी ,वाणी ,नाणी | नासू नये !"😆
इती संत तुकाराम!
हीच आचारसंहिता म्हणून मी माझ्या परीने प्रयत्न करत राहणार आहे....
##########################
धन्यवाद
सुधाकर नातू