👍"छाप (पड)लेले शब्द !":👌
👍"गगनचुंबी राजधानी !":👍🤣""नकोरे मनोरे, मनोरे नकोरे !":🤣
🤣 'मुंबई शहरातील नागरी सेवा सुविधांचा किती बट्टयाबोळ झाला आहे, त्याचे दर्शन बिचारी जनता सातत्याने घेत आहे. हया तर्हेच्या तक्रारी मारूतीच्या शेपटाएवढ्या लांबच लांब असूनही कोणतीही लक्षणीय सुधारणा नाही.
एके काळी शांत सुंदर असलेली ही मुंबापुरी आज झोपडपट्यांनी वेढलेली, अजस्त्र लोकसंख्येच्या आणि जीवघेण्या प्रदुषणापायी गुदमरत चाललेली एक बकाल नगरी झालेली सगळे उघड्या डोळ्यांनी पहात आहेत.
अशी दारुण अवस्था शहराची असताना गगनचुंबी उंचच उंच मनोरे, झोपडपट्टी निर्मुलन अथवा जुन्या इमारतींचा पुनर्विकास अशा गोंडस नावाखाली, तिचे लौकरांत लौकर, नरकपुरींत रूपांतर केले जात आहे. म्हणूनच आज 'सुंदर मुंबई, हरित मुंबई (?)' ही घोषणा इतिहासजमा जमा झालेली आहे. म्हणूनच आता घोषणा हवी:
नकोरे मनोरे, मनोरे नकोरे!
मुंबईत उंच मनोर्यांच्या इमारती बांधत रहाण्याच्या हव्यासामुळे, आधीच नागरी सुविधांचा बट्टयाबोळ आणि बजबजपुरी झालेल्या शहराची अजूून काय भयानक अवस्था होईल, ह्याचा कोणी विचारच करत नाहीये. ह्या गदारोळांत मूळचे भूमीपुत्र विस्थापीत होऊन पहाता पहाता त्यांचा मागमूस रहाणार नाही, ह्या वास्तवाकडे दुर्लक्ष केले जात आहे. पुनर्विकासाचे गाजर दाखवून अर्धवट अवस्थेतील कितीतरी इमारतींमधील मूळचे नागरिक ना घर, ना घरभाडे अशा दारुण स्थितीत जवळ जवळ देशोधडीला लागून पस्तावत आहेत. त्यांच्या दु:खाला, वेदनांना तुलना नाही.
70 ते 100 वर्षांहून जुन्या चाळी, इमारतींबद्दल पुनर्विकासाची आवश्यकता समजता येऊ शकतो. परंतु सार्याच नागरी सेवा सुविधांची दारुण विदारक अवस्था, आताच कडेलोट झालेली मुंबईची लोकसंख्या आणि प्रदुषणाचा पडलेला विळखा ह्यांचा विचार करता कोणत्याही पुनर्विकास प्रकल्पांमध्ये जास्तीत जास्त सात मजल्यापर्यंतच नव्या इमारती बांधल्या जाणे योग्य ठरेल.
शिवाय आता ही लाट केवळ ३०/४० वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतींचेही पुनर्विकासाचे लोण आले आहे. ह्याचा अर्थ ह्या इमारती योग्य ती काळजी व सामूग्री वापरुन बनविल्या गेल्या नव्हत्या. अशा कमकुवत कामाकडे संबधीतांनी, यंत्रणांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले. आता उत्तुंग मनोरे न बांधता अशा इमारतींचे मजबूतीकरणच करणे हाच उपाय शहाणपणाचा आहे. पण त्याकडे दुर्लक्ष केले जावून मुंबईची धुळधाण लावण्याचा उद्योग चालूच राहील, हे भावी पिढ्ढ्यांचे दुर्दैवच ठरणार आहे.
30 ते 40 टक्के झोपडपट्टयांनी वेढलेल्या मुंबई शहराची अशी लाज वाटावी अशी भयानक अवस्था कोणी केली? कां, कशी झाली आणि त्या करता जे जबाबदार असतील त्यांच्या अशा अक्षम्य अपराधांबद्दल काहीही न करता, झोपडपट्टी निर्मुलन योजना असे गोंडस नांव देऊन आंधळेपणाने उंच मनोर्यांमागून मनोरे बांधणे, हे जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकणेच नव्हे, तर शहराला खड्यांत गाडणे नव्हे कां? झोपडपट्ट्यांना वर्षांमागुन वर्षे अधिक्रुत करत रहाणे, हा सत्तेचा दुरुपयोगच नव्हे कां?
एक विनवणी निश्चित, जरा फक्त स्वत:कडेच न पहाता, भावी पिढ्यांसाठी आपण खेळण्यातल्या सारखी कुरकुर करणार्या खुळखुळ्यासारख्या शहराचा वारसा क्रुपया सोडून जावू नका.
बाबांनो,
🤣"नकोरे मनोरे, मनोरे नकोरे !":🤣
########@####
👍"छाप (पड)लेले शब्द !":👌
🤣 "जगी रे, उलटी सारी तर्हा !": 🤣
👍"कोणे एकेकाळी टोमॅटोला मनाजोगता भाव आला नाही, म्हणून कोणा शेतकऱ्याने रस्त्यावरच ट्रकभर टोमॅटो फेकल्याचे दृश्य आपण पाहिले आहे. तीच गोष्ट कांद्याची ! कांदाही कधी मधी शेतकऱ्यांना रडवतोच. केव्हातरी एक दोन वर्षांपूर्वी कांद्याचे भावही गगनाला भिडल्यामुळे, गृहिणींचेही अंदाजपत्रक बिघडले होते आणि सगळ्यांनाच डोळ्यातून पाणी काढायची वेळ आली होती !
कधी बळीराजा, तर कधी ग्राहकराजा हा 'सीसाॅ'चा खेळ असल्यासारखे वरखाली सुखदुःखात कां बुडतात, याचे कोडे कोणालाच कळलेले नाही. "अन्नदाता सुखी भव !" हा फक्त जप करण्यापुरताच. बाकी सर्व बाबतीत प्रगतीची नवनवीन क्षितिजे आपण पार करत असताना, बिचार्या शेतकऱ्यांसाठी मात्र जे काही धोरण वर्षांमागुन वर्षे आखले जाते, ते त्याला तसेच ग्राहकाला कां नाडते, हा गांभीर्याने घेण्याचा विषय आहे.👌
#######@####
👍"छाप(पड)लेले शब्द !": 👌
👍"आमच्यासारखे आम्हीच !":👌
🤣 "हे असे शीर्षक देण्याचे कारण म्हणजे या सोबतच्या आत्माअनुभवामध्ये 'पोहणे न येणे', आणि 'कार ड्रायव्हिंग' करायला न जमणे, या त्या दोन गोष्टी ! माझ्याही बाबतीत अगदी तशाच म्हणून हे शीर्षक ! हा ललित लेख वाचून मला एक प्रकारचा आनंद झाला आणि वाटले की, जगात मीच असा एकटा नाही की, या दोन गोष्टी ज्यांना येत नाहीत.
अगदी लहानपणी माझ्या आजोबांनी कोकणात दोरीला बांंधूून मला विहिरीत पोहण्यासाठी सोडले होते. परंतु तेव्हा माझ्या नाका तोंडात पाणी गेल्यामुळे मी प्रचंंड घाबरलो, त्यामुळेआजोबाही घाबरले आणि दोरी त्यांंच्या हातातून सुटली आणि मी जगतो कां मरतो, अशी परिस्थिती झाली होती. त्यावेळेला बाजूलाच उभ्या असलेल्या एका शेजाऱ्याने पाण्यात ताबडतोब उडी टाकून मला वाचवले ! तेव्हापासून पाण्याची मला जी भीती लागली की ती कायमचीच ! अनेक वेळा योग आला पोहणे शिकण्याचा, पण काही केल्या ते जमलेच नाही.
माझ्या आईला, मामाला उत्तम पोहता येत असे. एवढेच काय माझ्या धाकट्या बहिणीला दादरला स्विमिंग टॅंकवर पोहणे शिकण्यासाठी खास पाठवले होते आणि ती पण त्यात निष्णात झाली.
आता माझ्या नातवंडांनाही पोहता व car driving देखील येते. पण मला मात्र जी पाण्याची भीती बसली ती कायमचीच. गोव्याला विवाहानंतर पहिल्यांदा आम्ही जेव्हा गेलो, तेव्हा मांडवी नदीच्या प्रवाहातून बोटिंग वगैरे चालू असायचे. सहाजिकच पत्नीलाही वाटत होते बोटीवर जाऊन तो आनंद लुटावा. पण मी मात्र नाही म्हटले आणि आम्ही केवळ किनाऱ्यावरच उभे राहून त्या बोटी पहात राहिलो !
जी गोष्ट पोहण्याची तीच कार ड्रायव्हिंगची. नोकरीत असताना मारे लायसन्स घेतले पण ड्रायव्हिंग करण्याचा कॉन्फिडन्स कधीच आला नाही आणि लायसन्स फुकट गेले. म्हणून चक्क मुलाला तो अठरा वर्षाचा झाल्याबरोबर, त्याला ड्रायव्हिंग शिकवले .पण मला मात्र कार ड्रायव्हिंग कधीही जमलेले नाही.
सोबतच्या वृत्तामुळे मला म्हणूनच माझ्यासारखा कोणीतरी आहे, याचा आनंद झाला. अर्थात हे गृहस्थ प्रयत्न न सोडता, ह्या दोन्ही गोष्टी करणार आहेत, ही एक आनंदाची बाब !":🤣
प्रसन्न सकाळ असावी आणि अंगणातील पारिजातकाच्या झाडाखाली शुभ्र नाजूक पांढऱ्या पाकळ्या आणि लाल चुटुक देठ असलेल्या फुलांचा सडा पसरलेला असावा, त्या फुलांचा मंद सुगंध मनाला ताजेतवाने करत आनंदात आपण नाहून निघावे हा एक विलक्षण अनुभव असतो वाचा फुला आणि फुलवा हे जे म्हटले आहे तेही खरेच आहे कारण वाचनामुळे आपल्याला विविध अशा अनुभवांचा बागोवा घेत आपल्या जाणीव विस्तार जाऊन मनाला जो आत्मानंद मिळतो तोही हा अशाच पारिजातकाच्या फुलांच्या मंद सुगंध सारखा असतो. परंतु सध्याच्या भाऊबंदी वादविवाद उखळ्या पाकोळ्या टोमणे आणि अर्वाच्य शब्द याचबरोबर विलक्षण धक्का देणारे अपघात, अनेक प्रकारच्या गुन्हेगारीच्या बातम्या अशा सगळ्या नैराश्यजनक बातम्यांनी सारा माहुल झाकलेला असताना छाप पडलेले शब्द शोधणे हे एक झुकीरीचे काम असते या पार्श्वभूमीवर अचानक आज एक मनाला उभारी देणारी बातमी आली शब्दकोश निर्मितीचा इतिहास वाचकांसमोर थॉमस मोरेश्वर याने इंग्रजी मराठी मराठी इंग्रजी शब्दांचा परिपूर्ण शब्दकोश निर्माण केला त्याचीच आठवण म्हणून शब्दप्रभू मॉल स्वर या पुस्तकाचे प्रकाशन मॉल्स वरच्या 151व्या स्मृतिदिनी प्रकाशित केले जाणार आहे ही ती बातमी अशा तऱ्हेच्या शब्दकोशांमुळे दोन मने दोन भाषिक एकमेकांना जोडणारे अनंत फुल आपोआप निर्माण होतात आणि अशातऱ्हेच काम परिपूर्ण करणे हे एक खरोखर कठीणातले कठीण काम असते अशी मूळ स्वर सारखी माणसे आगामी पिढीला वर्षानुवर्ष उपयुक्त होईल असे योगदान देत असतात म्हणून प्रगतीचे नाव नावे मार्ग मिळत जातात खरंच अशी माणसे हा इतिहासातला भाव गर्भ ठेवाच म्हणावा लागेल.
#######@####
👍"छाप(पड)लेले शब्द !": 👌
👍"वाचा, फुला आणि फुलवा !":👌
💐 "प्रसन्न सकाळ असावी आणि अंगणातील पारिजातकाच्या झाडाखाली, पांंढर्याशुभ्र नाजूक पाकळ्या आणि लाल चुटुक देठ असलेल्या फुलांचा सडा पसरलेला असावा, त्या फुलांचा मंद सुगंध मनाला ताजेतवाने करत आनंदात आपण न्हाऊन निघावे, हा एक विलक्षण अनुभव असतो.
"वाचा फुला आणि फुलवा !" हे जे म्हटले आहे तेही खरेच आहे. कारण वाचनामुळे आपल्याला विविध अशा अनुभवांचा मागोवा घेत, आपल्या जाणीवांचा परिघ विस्तारला जाऊन मनाला जो आत्मानंद मिळतो, तोही हा अशाच पारिजातकाच्या फुलांच्या मंद सुगंध सारखा असतो. परंतु सध्याच्या भाऊबंदकी, वादविवाद उखाळ्यापाखाळ्या, टोमणे आणि अर्वाच्य शब्द याचबरोबर विलक्षण धक्का देणारे अपघात, अनेक प्रकारच्या गुन्हेगारीच्या बातम्या अशा सगळ्या नैराश्यजनक बातम्यांनी सारा माहोल झाकोळलेला असताना, "छाप (पड)लेले शब्द" शोधणे हे एक जिकीरीचे काम असते.
मानवाला अग्नीचा शोध लागण्याआधी एकमेकांची संपर्क साधण्यासाठी शब्द आणि भाषा यांचा शोध लागला ही एक मानव जातीला नव्या वळणावर नेणारी
घटना होती शब्दांचे सामर्थ हे शस्त्रापेक्षाही जास्त असते, हे आपण सारे जाणतो. भाषा अनेकविध असल्यामुळे दोन भाषांमधील प्रत्येक शब्दाचे अर्थ व साधर्म्य जाणणे हे अत्यंंत गरजेचे असते.
या पार्श्वभूमीवर अचानक आज एक मनाला उभारी देणारे व्रुत्त अवचित नजरेत आली. शब्दकोश निर्मितीचा इतिहास वाचकांसमोर थॉमस मोल्सवर्थ ह्यांनी मराठी-इंग्रजी शब्दांचा अपार कष्ट करून एक परिपूर्ण शब्दकोश निर्माण केला, हे ते व्रुत्त. त्याचीच आठवण म्हणून 'शब्दप्रभू मोल्सवर्थ'
या पुस्तकाचे प्रकाशन मोल्सवर्थच्या 151व्या स्मृतिदिनी प्रकाशित केले जाणार आहे. अशा तऱ्हेच्या शब्दकोशांमुळे दोन मने, दोन भाषिक एकमेकांना जोडणारे अनंत पूल आपोआप निर्माण होतात. अशा तऱ्हेचे मुुलभूूत काम परिपूर्ण करणे, हे एक खरोखर कठीणातले कठीण काम असते. अशी ध्येेयवादी 'मोल्सवर्थ' सारखी माणसे आगामी पिढीला वर्षानुवर्ष उपयुक्त होईल असे योगदान देत असतात, म्हणून प्रगतीचे नवनावे मार्ग मिळत जातात. खरंच अशी माणसे हा इतिहासातला भावगर्भ ठेवाच म्हणावा लागेल !":💐