👍"छाप(पड)लेले शब्द-41 !":💐
😗 "मन चंचल, तर कृती अमंगळ !":😗😴 "याचे हृदय अगदी कोमल आहे, किंवा तमक्याचं हृदय म्हणजे दगड आहे, असे आपण अधून मधून ऐकतो. पण हृदयात मन नसते, तर ते मेंदूत असते डोक्यात असते हे आपण दुर्लक्षित करतो.
सध्या शारीरिक अन आरोग्याबरोबर मानसिक रोगांचे प्रमाण प्रचंड वाढत आहे त्यातील पायपुलर डिसऑर्डर हा महत्त्वाचा असा रोग आहे त्यामध्ये माणूस क्षणात नैराश्य तर क्षणात असेल मूड चेंजेस करत राहतो.
या व्यतिरिक्त,
OCD -'ऑफसेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर' हा मानसिक
रोग आहे. त्यामध्ये एखादी व्यक्ती सातत्याने तीच तीच गोष्ट सतत करत राहते, त्याशिवाय तिला करमत नाही. झेपणार नाही एवढे भटकणे किंवा वाटेल तशी खरेदी करत राहणे आणि दुर्दैवाने सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, कुणाला, आपल्याला काहीतरी होत आहे म्हणून, सातत्याने डॉक्टरकडे गेल्याशिवाय चैन न पडणे. या जोडीला प्रचंड हट्टीपणा, मनमानीपणे वागत राहणे, दुसऱ्यांचे बिलकुल न ऐकणे अशीही काही माणसे असतात. तर कुणी
स्वभावामुळे, जे पदरात पडले त्यात आनंद न मानणे असेही दिसतात. त्या पायी सगळ्यांनाच मनस्ताप होत आहे, ह्याची त्यांना पर्वाच नसते.
थोडक्यात
"मन चंचल, तर कृती अमंगळ !"
###############
👍"छाप(पड)लेले शब्द-42 !":👌
👍" वाचावे ते प्रेरणादायी नवलच !":👌
💐"माणसांमधली साहसी वृत्ती आणि नवीन जगावेगळे काहीतरी आपण करत राहावं अशी इच्छा, काय अचाट करू शकते, ते दर्शविणारे हे वृत्त आहे.
एका आयटी क्षेत्रातील तरुणीच्या मनातली कल्पना आपल्या सहकाऱ्यांबरोबर तिने कशी प्रत्यक्षात मेहनतीने आणली, ते वाचून थक्क व्हायला होते. या आठ जणांच्या समूहाने चक्क सायकलवरून 'के टू के' म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास मोठ्या जिद्दीने पूर्ण केला.
दररोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये, एखादी उत्साहाची, नवनिर्मितीच्या प्रेरणेची लहरच येते, ती अशा वेधक बातम्या वाचल्यामुळे !
असे हे 'छाप(पड)लेले शब्द', शोधक नजरेने वेचून मांडण्याचा माझा हा अनोखा उपक्रम, आता बाळसे धरू लागला आहे, हो, ना"?
################
👍"छाप(पड)लेले शब्द-43 !":👌
😊"अती तिथे माती-पुरे झाले हे गौरव सोहळे !"😢
☺️ "Filmfare awards ceremony सारखे, गेली दोन दशके आपण "झी मराठी"चे गौरव सोहळे पहात आलो आहोत. आता त्यात इतर वाहिन्या व अन्य माध्यमांचेही तसेच सन्मान/ पुरस्कार कार्यक्रम गाजावाजा करत उतरले आहेत. परंतु दुर्दैवाने ह्या सगळ्याच जल्लोषात, उपस्थित ठराविक प्रेक्षकांंत तोच तोपणा आलेला दिसतो. ठराविक पात्रांची सो काँल्ड विनोदी प्रहसने, तोच तो विविध गीत संगीत आधारित सेलिब्रिटींच्या न्रुत्यांंचा धांगडधिंगा, तशीच विविध मानांकने ते सन्मानचिन्हे प्रदानांची साचेबद्ध कवायत आणि प्रेक्षकवर्गातही नटून थटून आलेले तेच ते मिरवायला आलेले चेहरेमोहोरे, मोठ्या उसन्या आवेशानिशी साजरे केले जातात.
सोबतच्या, Filmfare marathi पुरस्कारांसंबंधीच्या वृत्तामुळे 'गोदावरी', 'गोष्ट एका पैठणीची', 'पाॅडिचेरी' 'वाय', झाॅलीवूड असे चित्रपट, पुरस्कार मिळवते झाले आहेत खरे ! पण हे चित्रपट थिएटरमध्ये आले कधी, गेले कधी, याची शंका यावी, अशी परिस्थिती आहे. थोडक्यात जे 'क्लासेसना आवडतं, ते मासेस'ना नाही, हेच सातत्याने सिद्ध होत आहे.
पूर्वी ज्या उत्सुकतेने तमाम मराठी रसिक गौरव सोहोळ्याची आतूरतेने प्रतिक्षा व्हायची, ती धुंदी आता संपूर्ण नाहीशी झाल्याचे चित्र आहे. म्हणूनच वाटते,
'कशाला इतके हवे हे कंटाळवाणे पुरस्कार सोहळ्यांंचे खेळखंडोबे ?
सार्या प्रसारमाध्यमांनी एकत्र येऊन फक्त एकच गौरव सोहळा नव्या दमाने, नव्या आटोपशीर रुपांत साजरे करण्याचा कां विचार करू नये ?👍👌💐
################
👍"छाप (पड)लेले शब्द !":👌
💐"वर्तमानपत्रातील नेहमीच्या घोटाळे, भीषण अपघात, राजकीय उखाळ्या पाखळ्या, आदी नको असलेल्या बातम्यांच्या रखरखीत वाळवंटात, अचानक हा असा कर्तृत्ववान व्यक्तीच्या समर्पित जीवनाचा आल्हाददायक पट नजरेत येतो, तेव्हा मन भरुन येते.
आज पासून जनता शताब्दी सुरू होणाऱ्या प्राध्यापक, प्राचार्य, कुलगुरू राम जोशींचा शिक्षण क्षेत्रातील अलौकिक योगदानाचा विस्त्रुत आलेख या लेखात आहे. त्यांना 'शिक्षणमंत्री व्हा' असा आग्रह असूनही आपल्याला कायम शिक्षक करायचे आहे, असा निर्णय घेणारा माणूस विरळाच. मुंबई विद्यापीठाची सध्या जी घसरगुंंडी चालू आहे, त्या पार्श्वभूमीवर कुलगुरू म्हणून त्यांनी दिलेले योगदान निश्चितच उठून दिसते.
प्रखर बुद्धिमत्ता, ध्येयासक्ती अमोघ वक्तृत्व आणि देखणे व्यक्तिमत्व लाभलेल्या प्रा राम जोशींच्या स्मृतीला मनापासून वंदन. शतकातून, अधून मधून कां होईना, अशी आदर्श व्यक्तिमत्वे निर्माण होतात, आपल्या असीम कर्तृत्वाचा ठसा उमटवत समाजाला दिशा देतात, हे आपले भाग्य !"💐💐💐
#############
👍"छाप(पड)लेले शब्द-44 !":👌
😊"बकेट लिस्ट-मनामधली स्वप्ने !":💐
👍"प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या 'बकेट लिस्ट' या चित्रपटापासून 'बकेट लिस्ट' हा परवलीचा शब्द, दररोजच्या वापरात येऊ लागला. प्रत्येक जणच आपली 'बकेट लिस्ट', अर्थात मनामधली स्वप्ने पाहू लागला, त्यांची यादी करू लागला. जीवनामधली आपली 'यशाची शिखरे'आणि 'कसोटीचे खडतर प्रसंग' यांची आपोआपच उजळणी करून, त्यांचा जमाखर्च मांडू लागला. नेहमी सकारात्मक विचार करणारे, आपली पुरी न झालेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धडपडू लागले. ही एक खरोखर आनंदाची गोष्ट आहे.
याच संकल्पनेवर आधारित महाराष्ट्र टाइम्स च्या पुरवणी मध्ये अधून मधून 'बकेट लिस्ट, च्या कहाण्या देखील आपल्याला आता वाचायला मिळतात. त्यामधली ही सोबतची 'बकेट लिस्ट'. अंगभूत आत्मविश्वास आणि आपल्या मधील गुणांचा योग्य तो विकास कसा होईल याची तळमळ असल्यामुळे पाहता पाहता पूर्ण देखील कशी होत गेली हेही समजते. प्रथम वर्तमानपत्रांना पत्रे लिहिणे, यापासून सुरुवात झालेली, वेगवेगळी आव्हाने स्वीकारत लेखक, नाट्यक्षेत्रातील समीक्षक आणि अखेर चक्क, पुरस्कार विजेत्या माहितीपटांचा निर्माता अशा आश्चर्यकारक
हनुमान उड्या आपल्याला येथे वाचायला मिळतात. निश्चितच एक आत्मविश्वास वाढवणारे आणि आपणही असेच काहीतरी करत राहिला व्हावे अशी ईर्षा, या वृत्तामुळे निर्माण होते.
ज्याने त्याने जर जे जे आपल्याला आवडते, चांगले जमते त्याचा सातत्याने पाठपुरावा करत राहिले तर, विविधरंगी योगदानांच्या गगनालाही हात लावू शकतो असेच म्हणावयाचे !":💐