"काळाचा महिमा !":
"आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार":आपणच आपल्या करणीची फळे भोगत असतो. आपला र्हास किंवा आपला विकास, हा नेहमी आपण काय काय केले, समस्यांकडे कशा दृष्टीने बघितले आणि त्यांतून मार्ग कसा काढला, ह्यावर अवलंबून असतो. रडत राऊंवर कायमच तसे रहाण्याची वेळ येण्याचा धोका असतो.
संकटातून प्रतिकूल परिस्थितीतून देखील संधी शोधणारे, आपली प्रगती करून घेत असतात. त्यांचे अनुकरण करणे आवश्यक आहे. पण ते न करता, आपण अपयशी ठरलो व मागे राहिलो, ह्याचेच केवळ दुःख बाळगत, त्याचे अवडंबर माजवत, अनुकंपा मिळवण्यासाठी झगडत रहाणे, शूरवीरांना शोभत नाही. आपली शक्ती, दयेची क्रुपेची पोटतिडकीने याचना करण्यात वाया घालवणे योग्य नव्हे. त्यापेक्षा आपण आपले प्रामाणिक, आत्मपरीक्षण करून, कुठे चुकले, काय चुकले अन् काय करायला हवे होते आणि आता काय पुढे केले पाहिजे याचा शोध घेणे आवश्यक आहे. नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की, समस्यांना विघ्ने आणि आपली सर्व शक्ती त्या समस्या दूर करण्यासाठी वापरणे जास्त श्रेयस्कर असते.
कोणे एके काळी वैभवात लोळणारे आणि समुदायाचे आपआपल्या गांवाचे नेतृत्व करणारे, केवळ त्यांच्या ऐतखाऊपणामुळे, निष्क्रियतेपायी अथवा आपल्या अहंकारापायी स्वतःचेच नुकसान करून घेणारे सापडतात. जिथे फुले वेचली, तिथे गोवऱ्या वेचायची वेळ कां व कधी आली, ह्याचे भान त्यांना राहत नाही.
केवळ आपल्याच श्रेष्ठत्वाच्या गुर्मीत मग्न राहून जर वेगाने बदलत्या परिस्थितीचा योग्य तो आढावा घेऊन, त्यातून मार्ग काढला नाही, तर आपली वेगाने पिछेहाट होणे अपरिहार्य असते. अनुकंपा मिळवण्यासाठी झगण्यापेक्षा, तशी वेळ आपल्यावर येणारच कशी नाही, ह्याचा सारासार विचार करून त्या मार्गाने जाण्यात, आपले तन मन धन वेचणे गरजेचे असते. ज्यांना असे शहाणपण सुचते, तेच योग्य तो मार्ग चोखाळून नेहमीच आघाडीवर राहतात, आपला विकास भरभराट करत राहतात. अशीही अनेक उदाहरणे आपल्याला दिसतात. तसे जे वागत नाहीत, त्यांच्यावर दुसऱ्यांच्या कृपेवर जगण्याची पाळी येणे अपरिहार्य असते.
काळाचा महिमा हा असाच असतो. असाच रहाणार.
-----------------------------
"सब कुछ, नया नया !"
नयी सोच, नयी खोज.
नयी रात, नयी बात.
नया रास्ता, नयी मस्ती.
नया वास्ता, नयी भूल.
नया सपना, नया छिपना.
नयी नोट, नयी लूट.
नयी कतार, नयी शिकार.
नया वादा, नया सौदा.
नयी अदा, नयी फिदा.
नया कानून, नयी सजा.
सब कुछ नया, नया,
आयी नयी,नयी दुनिया.
'सुदिना' २९/११/'१६
धन्यवाद
सुधाकर नातू