बुधवार, ३१ ऑक्टोबर, २०१८

सुधा" दिवाळी अंक-२०१८: टेलिरंजन-1

🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

















🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂





🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂



            "सुधा" दिवाळी अंक-२०१८:
                      "टेलिरंजन"I




                                                           🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂




अनुक्रमणिका:
. आगळे वेगळे सगळे.
. अपराधी कौन.
. मल्लीनाथी: छोटा पडदा.
. दिलरुबा मधूर हा!
. पोरखेळ, हे सारे!

सुधाकर नातू           

 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂





                                            श्रीगणेशाय नम:

                           मनोगत:
सादर वंदन.

प्रथम, आपण वेळात वेळ काढून, माझ्या ब्लॉगची ही लिंक उघडून, हा खास दिवाळीचा वैचारिक सांस्कृतिक "फराळ" आस्वादायला सुरवात केलीत, त्याबद्दल तुमचा मी शतश: आभारी आहे. हाच वसा तुम्ही तुमच्या परिचय वर्तुळालाही घ्यायला लावाल, अशी मी आशा करतो.

दिवाळी म्हणजे उत्साह आनंदाचा उत्सव! नूतन दिवाळी आणि आगामी वर्ष, तुम्हा सर्वांना सुखासमाधानाचे, आनंदाचे शांतीचे जावो ही मनोमनी इच्छा.

आज मला माझ्याच ह्या संदेशाची आठवण होत आहे:                                              

"One should always consistantly do that, which one is best at. Respected great Achievers do it, why not You?"

खूप खूप उशीरा कां होईना, मला विचार कल्पना करायला आणि त्या समर्पक शब्दात मांडता येतात आणि तेच मला मनापासून आवडते, समाधान देते ह्याची जाण झाली. सातत्याने दोन वर्षांपासून सुरू असलेल्या माझ्या ब्लॉगमुळे हा आत्मसुखसमाधानाचा शोध असाच चालत रहाणार आहे. त्याचीच परिणती हा एक हाती विविध विषयांवरील, घसघशीत पाच अंकांचा "सुधा" दिवाळी अंक, ही आहे.

आपण पुढील काही दिवस सवड काढून हा 
"
ह्या ह्रदयीचे त्या ह्रदयी सोपवण्याचा प्रयत्न" जरूर अनुभवावा. त्यामुळे, आपल्या जाणीवांच्या कक्षा निश्चितच विस्तारतील, अशी मला आशा आहे.


धन्यवाद.
सुधाकर नातू, माहीम मुंबई१६
/११/२०१८



🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂


1.”आगळे वेगळे, हे सगळे”!

उगाचच लांबवत चाललेल्या मालिकांच्या चक्रव्यूहात गुंतण्यापेक्षा, काहीतरी चांगलं बघायला मिळावं म्हणून एबीपी माझा ह्या वाहिनीवर अचानक एक छान कार्यक्रम पाहायला मिळाला. विख्यात शिल्पकार प्रमोद कांबळे यांची संस्मरणीय मुलाखत  "माझा कट्टा" या कार्यक्रमात शनिवारी सादर झाली.

"माझा कट्टा":
अहमदनगर येथे श्री.प्रमोद कांबळे यांचे सुसज्ज असा studio आणि त्यात त्यांच्या सबंध आयुष्यभराच्या कलाकृती शिल्पे मोल्डस् आणि इतर असे अमूल्य साहित्य होते. अचानक शेजारच्या कंपाउंड मध्ये कोणीतरी जमलेला कचरा जाळत होते आणि त्या आगीची, studio जवळच्या झाडाला धग लागली आणि पाहता पाहता या गुणवंताचा आयुष्यभराचा कलासंसार असलेला studio जळून खाक झाला. अचानक, ध्यानीमनी नसताना, सर्वस्व गमावल्याचे दुःख या माणसाने कसे सहन केले असेल, हे त्याचे त्यालाच माहीत.

आज एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुनश्च जिद्दीने हरिओम करत आपल्या कलाविश्वात उडी घेणाऱ्या या थोर कलावंताच्या तोंडून त्याचीच ही करुण कहाणी त्या कार्यक्रमात ऐकणे म्हणजे खरोखर आपल्या डोळ्याला पाणी आणणारी गोष्ट होती. 'माझा कट्टा" मध्ये दर आठवड्याला प्रमुख संपादक खांडेकर आणि त्यांची टीम उत्सव मूर्तीला प्रश्न विचारते आणि बोलते करते आणि त्यातून त्या त्या उत्सव मूर्ती चा जीवनपट आपल्यासमोर उभा राहतो श्री कांबळे हे मुंबई सोडून आपल्या कलेचा आनंद मिळवण्यासाठी नगरला गेले तिथे त्यांना सात-आठ वर्षे मिळतील ती कामे करावी लागली आणि नंतर त्यांना चार उत्तम कौशल्य होते अशी शिल्पकृतींची कामे मिळू लागली नंतर त्याने मागे वळून बघितले नाही आणि आज अचानक हा वरील घात करणारा प्रसंग उद्भवला हा माणूस किती असामान्य  कलागूण असणारा आहे हे त्यांनी गप्पा मारता मारता पेन्सिलने रेघोट्या खुबीने ओढत, एक सुंदर असे चित्र पाच मिनिटात काढून दाखवले, त्यावरून समजले. हे पुरे नाही म्हणून की काय, नंतर श्री खांडेकरांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, उपस्थित एका तरुणीने श्री. कांबळे ह्यांचे चित्र काढायचा प्रयत्न केला.
नंतर श्री कांबळे ह्यांनी, त्यात पहाता पहाता, सुधारणा दीड मिनिटात करून हुबेहूब आपला चेहरा उभा केला आणि उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला. ही अशी अवलिया माणसे आपल्याला दूरदर्शनवर भेटू शकतात हे आपले भाग्य! श्री. कांबळे यांनी जे गप्पा संपताना सांगितले, ते अधिक महत्त्वाचे: 'प्रत्येकात कोणती ना कोणती कला ईश्वराने दिली आहे, फक्त ती आपण ओळखली पाहिजे आणि प्रयत्नपूर्वक बाहेर काढून तिची जोपासना केली पाहिजे.'! 

श्री.संजय राऊत, स्वानंद किरकिरे, विठ्ठल कामत, आमिर खान सत्यजित भटकळ पाणी फाऊंडेशन .. नामवंत मंडळी माझा कट्टावर आलेली आहेत.
दर आठवड्यात शनिवारी सादर, एबीपी माझा ह्या वाहिनीवर होणारा माझा कट्टा कार्यक्रम, पहायला विसरू नका.

अक्षयकुमारचा गोल्ड चित्रपट गप्पा:
बँक टू बँक एखा़द्याने शतक झळकावे, तस्सा अनुभव एबीपी माझा वर माझा कट्टापाठोपाठ अक्षयकुमारचा गोल्ड चित्रपट गप्पा ह्या कार्यक्रमाने दिला. देशभक्तीपर चित्रपठ सादर करणारा मनोज कुमारच्या पाठोपाठ हा आजचा भारतकुमार खरोखरच पोटतिडकीने बोलला. कोणतीही समस्या अमेरिका सोडवेल हा उगवत्या पिढीमधला समज दूर करून भारत हा सर्वोत्तम देश आहे हे मांडण्याचा विडाच त्याने उचलला. एअरलिफ्ट टाँयलेट आणि आता बरोबर सत्तर वर्षापूर्वी हाँकी मधील गोल्ड मेडल जिंकणार्या भारतीय खेळाडूंची कहाणी त्याने स्वत: प्रमुख भूमिका साकार करत सांगितली आहे. "प्रत्येक भारतीयाने एखादा खेळ निवडावा त्यात रस घ्यावा, कारण आपल्या आरोग्याच्या समस्या त्यामुळे सुटतील" हे अक्षयकुमारचे उद्गार लक्षात ठेवण्याजोगे. सोने पे सुहागा ही बाब की अक्षयचे दिलखुलासपणे चक्क शुद्ध मराठी भाषेत बोलणे!
‘तुझी माझी जोडी’:
‘तुझी माझी जोडी’ हा एखाद्या जोडप्याबरोबरचा मनमोकळ्या गप्पांचा कार्यक्रम एबीपी माझावर दर रविवारी दु./३० वाजता सौ. गिरीजा ओक-गोडबोले सहजतेने सादर करतात“जन्माच्या गांठी स्वर्गात बांधल्या जातात"?  दोन जीवांना एकत्र आणून "जीवनगंगा" अविरत अखंड प्रवाही ठेवणारी "जन्मगांठ", उत्सवमूर्ती जोड्या आपल्यासमोर उलगडतात. सौ. प्रिया मराठे शंतनु मोघे, श्री. महेश सौ.मेघा मांजरेकर, श्री. सौ विठ्ठल कामत श्री.सुनील सौ. अपर्णा बर्वे, श्री.द्वारकानाथ सौ. सुप्रिया संझगिरी,.  ‘तुझी माझी जोडी’ कार्यक्रम एबीपी माझावर आलेले आहेत.
हाही एक उत्तम कथाबाह्य कार्यक्रम जरूर बघावा.

 "अंतरंग":                                                                                              योगायोगाने, तसाच दुसरा एक चांगला कार्यक्रम बाजूला झी 24 तास वर चालू होता. "अंतरंग"कार्यक्रमात श्री. विजय कुवळेकर हे नेहमी एखाद्या दिग्गजाची मुलाखत घेत असतात. ह्या वेळेला हत्ती प्रेमी श्री. आनंद शिंदे यांची मुलाखत प्राणिसंग्रहालयाच्या सांगणे ध्यान घेतली जात होती तिच्यामधून हत्तींच्या बाबत अनेक चित्तथरारक आणि गमतीशीर कहाण्या ऐकायला मिळाल्या. त्यातील हत्तींच्या स्मरणशक्ती बद्दलची काही दोन किस्से हे खरोखर विचार करायला लावणारे होते.
त्या आधी मालिका नको म्हणून जय महाराष्ट्र वर राज मंत्र हा ज्योतिषाची माहिती सुलभ भाषेत सांगणारा कार्यक्रम पाहायला मिळाला होता. एकाच दिवशी एक से बढकर एक असे तीन कार्यक्रम आणि तेही वृत्तवाहिनी वरती पाहायला मिळणे हा एक सुखद धक्का होता.

माणसे एखादा ध्यास कसा काय घेतात आणि त्याच्या मागे आपल्या सर्व आयुष्य कशी काय वेळ असतात हे कोडे आहे हत्ती आणि हत्ती आणि हत्ती हा विषय घेऊन एक तरुण गेली कित्येक वर्ष हत्तींचा अभ्यास करत आहे झी 24 तास वर अंतरंग या कार्यक्रमात विजय कुवळेकर यांनी श्री आनंद शिंदे यांची मुलाखत घेतली तेव्हा या हत्ती माय झालेल्या तरुणांची अंतर्बाह्य ओळख झाली जिजामाता उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयाच्या उद्यानात ही मुलाखत चालू होती. आनंद शिंदे आपला हत्तींचा आणि त्यांच्या जीवनाचा अभ्यासाचा सबंध जो काही इतिहास आहे तो उलगडून दाखवत होते. त्यातील एक वैशिष्ट्य म्हणजे हत्तींची स्मरणशक्ती! त्यांनी, दोन गोष्टी या संदर्भात सांगितल्या. त्या खरोखर चित्तथरारक आहेत. ते म्हणालेकाही वर्षापूर्वी मोठा दुष्काळ पडला नव्हता अशा वेळेला अनेक प्राणी अनेक मरण पावले. पण जगले कोण, तर सगळ्यात ज्येष्ठ म्हणजे साधारण साठ सत्तर वयाचे हत्ती होते, ते जगले. जगण्याचं कारण म्हणजे ते लहान होते पाच वर्षाचे तेव्हा, बहुधा असाच मोठा दुष्काळ पडला असावा आणि त्यांच्या पालकांनी त्यांना जे जलाशय दाखवले ते जलाशय त्यांच्या स्मरणात राहिले आणि आजच्या या दुष्काळात ते आपल्या कळपाला बरोबर येथे घेऊन गेले आणि म्हणून ते वाचले! दुसरी एक गमतीशीर गोष्ट त्यांनी सांगितली: हत्ती, तो कधीही बदला घेऊ शकतो. एका संग्रहालयात एका हत्तीला एका माणसाने खूप टिंगल केली, शेवटी त्या माणसाला त्या संग्रहालयात येण्याची बंदी घालण्यात आली. तो माणूस असा बिलंदर कि चार पाच वर्षानंतर संपूर्ण चेहरा बदलून त्याच्या चेहऱ्यामध्ये सगळे बदलून तो पुन्हा तिथे आला आणि त्या हत्तीच्या नजरेस पडला मात्र, त्याने त्याच्या समोरचा एक धोंडा धरला आणि बरोबर त्या माणसाच्या कपाळावर मारला, म्हणजे किती वर्ष जाऊनहि, हत्तीची स्मरणशक्ती होती, ती होती!

श्री.गणपतराव देशमुख आदेश बांदेकर प्रसाद सावकार,.इ. अंतरंग कार्यक्रमात येऊन गेले आहेत.
दर आठवड्यात शनिवारी सादर होणारा, "अंतरंग" कार्यक्रम, झी 24 तास वर
पहायला विसरू नका.

‘गांव, तिथे झी २४ तास’’
गांव तिथे झी २४ तास हाही एक माहितीपूर्ण उद्बोधक कार्यक्रम दर रविवारी सायं साडेसात वाजता सादर होतो. सुंदरवाडीची सावंतवाडी कशी झाली हा त्यातलाच एक. सावंतवाडी च्या निसर्गरम्य परिसराच्या पार्श्वभूमीवर ह्या संस्थानाचा गेल्या कित्येक शतकांचा इतिहास, लोकाभिमुख राज्यकर्ते, त्यांचा वारसा, शैक्षणिक, सांस्कृतिक सामाजिक, भौगोलिक रचना, जडणघडण, रहाणीमान  समस्या जुन्या बांधणींची टुमदार घरे वाडे राजवाडे असा सर्वांगिण आढावा त्यातून द्रुकश्राव्य रूपात उभा राहिला. पर्यटनाचे द्रुष्टीने हे गांव कम शहर किती महत्वाचे ठरु शकते ते उमजले.

मालिका पाहण्यापेक्षा हे कथाबाह्य कार्यक्रम टीवीवर पहाणेच श्रेयस्कर असे आता आमचे मत बनले आहे. आपणही ह्याचा गंभीरपणे जरूर विचार करावा. व्रुत्तवाहिन्यांनी असे कार्यक्रम फक्त शनी-रविवारी सादर करता सोम-शनी प्राईम टाईमलाही दाखवावेत. मालिकांना रूळावर आणायला हा एक जालीम उपाय होऊ शकेल!
निरर्थक कंटाळवाणी मालिका!                                                                                   टी २० सामन्यांसारख्या मर्यादित भागांच्या मालिका छोट्या पडद्यावर येणे, किती गरजेचं आहे, हेच 'धो धो पाणी' घालून लांबवलेल्या रटाळ मालिका अधोरेखीत करतात.
मालिकांचे आठवड्याचे वेळापत्रक:                                                                झी मराठी, कलर्स मराठी आणि स्टार प्रवाह ह्या वाहिन्यांवरील मालिकांचे आठवड्याचे वेळापत्रक नेहमी पहाणार्या प्रेक्षकांना जणू पाठ असते. मात्रसह्याद्री वाहिनी’’वर कोणती मालिका, कोणत्या वारी केव्हा दाखविली जाते हा एक आँप्शनला टाकण्याजोगा यक्षप्रश्न आहे. कोणे एके काळी तमाम प्रेक्षकांची अनभिषिक्त एकमेव महाराणी असणारी, ही सह्याद्री वाहिनी त्यामुळेच अक्षरश: मनांतून जवळ जवळ, अंतर्धान पावत आहे. एक गोष्ट मात्र त्या वाहिनीची कौतुक करण्यासारखी: मालिकेचा भाग सुरु होण्यापूर्वी श्रेयनामावलीत कलाकारांचीही नांवे दाखवली जातात. पण इतर तीनही वाहिन्यांना ह्याप्रकारचे सौजन्य दाखवायला लाज वाटते. मालिकेतील कलावंत काही अपरिहार्य कारणांमुळे बदलले जातात, पण त्याची कोणतीही कल्पना देता, जुन्या कलाकारांऐवजी नवेच चेहरे अचानक त्या पात्रांची जागा घेतात. प्रेक्षक गेले उडत!
---------------------------------------------------------------------------
                                        2.”अपराधी कौन”?
"एक निरपराध पकडला जाऊ नये म्हणून, शंभर अपराधी सुटले तरी चालतील', हे तत्त्वच आपण मानत नाही".
प्रमुख भूमिकेत आपला ठसठशीत ठसा उमटविणार्या श्री नाना पाटेकरांच्या विविध वाहिन्यांवरील मुलाखतींद्वारे मालिकांमधील कलाकारांनी केलेल्या जाहिरातींद्वारे, मोठ्या गाजावाजाने प्रदर्शित केलेल्या 'आपला माणूस' चित्रपटांतील पोलीस अधिकारी झालेल्या, नानाच्या तोंडचा हा डायलॉग! शशी कपूरचा दीवार मधल्या "मगर मेरे पास माँ है" ह्या डायलाँगसारखा तो फेमस, ह्यात शंकाच नको. विविध मराठी मालिका मात्र "शंभर अपराधी सुटले तरी चालतील" असेच दर्शकांच्या नाकावर टिच्चून दाखवत असतात!

'
राधा, प्रेम रंगी रंगली': 
आदित्यने राधाच्या भावी नवर्याचे-साहिलचे सुलेमानकरवी अपहरण करण्याचा गुन्हा केला. त्याची परिणीती नाट्यमय रितीने राधा प्रेमच्या विवाहात झाली, आदित्यकडून पाच लाख घेऊन, सुलेमानकरवी अपहरणात प्रेमचा हात असल्याचे आरोप होऊन प्रेमला थोडा तुरुंगवासही झाला. प्रेमच्या सावत्र वडिलांचा मि.परांजप्यांचा ह्या प्रकरणात हात होता असे कुभांड आत्याने योजून तिच्याकडून प्रेमकडून ते रहस्य सांगण्याची अव्वाच्या सव्वा किंमतही सुलेमानने उकळून झाली. एवढे सारे महाभारत होऊनही आदित्य,आत्या आणि सुलेमान सारे मोकळेच आणि हे अपहरण नाट्य सोईस्कर आँप्शनला टाकण्याचे बिनदिक्कत नाट्य केवळ अशा मालिकांमधूनच होऊ शकते. जबर शिक्षा मात्र राधेला प्रेमकडून आणि असा जीव घेणा अपराध करूनही, पुन्हा, प्रेम मोकळाच! गुन्हेगारीचे भेसूर रूप दाखवून पुन्हा तिच्याकडे असा काणाडोळा करून कोणते आदर्श आपण टीव्हीसारख्या सर्व लहानथोर कुटूंबियांसमोर माध्यमाद्वारे उभे करत आहोत, ह्याची जराशीही जाणीव वा चाड नसावी हे दुर्दैवी नव्हे कां?

'
घाटगे अँड सून':
इथे नायिका अम्रुताचा कारस्थानी मतलबी काका स्वार्थापोटी दुसर्याच मुलीवर-टीयरावर प्रेम करणार्या अक्षयशी नाट्यमयरितीने तिचा विवाह घडवून आणतो आणि नंतर घाटग्यांच्याच तिजोरीतले सोन्याचे दागिने काय चोरतो, त्याच्याशी घाटग्यांचे थोरले सुपुत्र ह्या चोरीला हातभार काय लावतात सारे विचित्र घातकच! पुन्हा एवढे सारे होऊनही हे काका टीयराच्या वडिलांकडून जेम्स बाँडगिरी करत, पैसेही उकळण्याचे उद्योगही करून नामानिराळेच! चोरीचा विषयही आता सारे विसरूनही गेलेत. घाटग्यांची मोठी सून मुलगा आणि नातूही ह्या काकांसारखेच निर्ढावलेले!! 

'
माझ्या नवर्याची बायको': 
नायक गुरूनाथ आपल्या बायकोची- पर्वा करता बिनदिक्कतपणे शनायाशी संबंध ठेवतो, एवढेच काय तिच्याबरोबर सिंगापूरला जाऊन मौज मजा करत़ो. प्रकरण उघडकीस आल्यावरही राधिकाने घराबाहेर काढल्यावर तिला सोडता प्रथम शेजारीच आणि तर आता पुन्हा राधिकाच्याच घरात शनायाबरोबर रहाण्याचा नादानपणा करतो, ही मात्र परीसिमाच नव्हे कां? हा सारा तमाशा त्याची बायको, आई वडील आणि इतर सर्वजणांनी  मूक प्रेक्षकांप्रमाणे चालवून घेणे अश्लाघ्य नव्हे कां? राधिका नवर्याला घटस्फोट देतही नाही, तर त्याला पुरती अद्दल घडविण्यासाठी अँडल्टरीची केस करून, तुरुंगाची हवा खायला कां लावत नाही, हा यक्षप्रश्न आहे. हा गुन्हेगार मोकाट सुटला आहे, त्याला कोण केव्हा कसा आवरणार?

ह्याच महत्वपूर्ण मुद्द्यावर, इतर मालिकांचा हा धावता आढावा:

'
नकळत सारे घडले':
ह्या मालिकेत नायकाने कायदेशीर घटस्फोट घेताच नायिका नेहाबरोबर दुसरा विवाह केला आहे. त्याचा हा गुन्हा आणि पहिली पत्नी मायाचे मायावी कारनामे कोण लक्षात घेणार?
'
गोठ': बयो आजी आणि नीला ह्यांची दुष्क्रुत्ये, सातत्याने नजरेआड केल्यानंतर, विलासची स्मृती ज्या अपघाताने जाते तो घडवून आणणारा आणि खोट्या सह्या करून विलासचा व्यवसाय धोक्यात आणणारे गुन्हेगार मोकाटच आहेत. नवल असे की म्हापसेकरांचा सगळ्यात थोरला मुलगा, पोलीस अधिकारी आहे आणि तो तर गायबच रहातो.
'
अस्सं सासर सुरेख बाई': खोट्या सह्या आणि कट करून प्रत्यक्ष वडीलांचा व्यवसाय रहाते घर ताब्यात घेणारी आणि कुटूंबाला रस्त्त्यावर आणणार्या  खुनशी विभाला काहीच शिक्षा मिळत नाही.
'
तुझा माझा ब्रेक अप': इथे थोरला जावई मौलीक पैशाची मोठी अफरातफर करून फरार झाला आहे. बहिणीची खोटी सही करणारी मीरा जामिनावर मोकळीच आहे. तिला घराबाहेर काढण्याचे सासूबाई लताची अपराधी क्रुत्ये बिनधास्त वाढतच रहातात.
'
लेक माझी लाडकी': इथल्या सानिकाचे ह्रषिकेशचे तसेच मानसीच्या अपराधांची तर मोजदादच करणे कठीण आहे. मानसिक शारीरिक छळ, अपहरण मारहाण एवढेंच नव्हे तर बनावट दस्तावेज करणे अशी भयानक दुष्क्रुत्ये करूनही उजळ माथ्याने सारे वावरत आहेत. मीराच्या आजोबांनी तिचा जन्म लपविण्यासाठी दादूच्या सहाय्याने केलेली दुष्क्रुत्ये तर सोईस्कर विसरलीच गेली, त्यांचे काय?

‘दुहेरी’: इथे तर कळसच झाला आहे दुष्क्रुत्ये वा एकही गुन्हा केला नाही असे एखादे पात्र शोधणे हे कठीण काम ठरावे अशी स्थिती दिसते. बल्ळाळ परसु हे जर गुन्हेगारांचे शिरोमणी तर सोनिया आणि मैथिलीही हम भी कुछ कम नही अशाच. एवढेच काय सूर्यवंशी कुटूंबीयही धुतल्या तांदुळासारखे स्वच्छ थोडेच आहेत! खलनायकीचा कळसाध्यायच शोभावी अशी दुहेरी मालिका बंद कां केली जात नाही, ते उपरवाला जाणे!

'
तुझ्यात जीव रंगला': ही तशी साधी सरळमार्गी मालिकाही ह्या गुन्ह्यांच्या लाटेपासून दूर राहू शकलेली नाही. प्रथम राणा दादाच्या लबाड लुच्च्या काकाची फसवेगिरी आणि धाकली सून नंदिनीची घरभेदी क्रुत्ये आणि आता मंत्री असलेल्या गायकवाडांना खोट्या नाट्या आरोपाखाली अडचणीत आणणे, ह्या त्यातले त्यात सरळमार्गी मालिकेतही दाखवले जाते, ह्यावरून काय समजायचे ते समजावे.

अशी ताळतंत्र सोडलेली नालायक दुष्ट, अपराध करूनही निगरगट्ट पात्रे पाहून समाजासमोर आपण ह्या अत्यंत उपयुक्त माध्यमाद्वारे किती घातक चित्र उभे करतो आहोत, ह्याकडे संबंधित कधी गांभीर्याने पहाणार? त्यावर उपाय एकच, मालिकांवर प्रसिद्धी पूर्व आवश्यक नियंत्रण ठेवणारी यंत्रणा अनिवार्य करावी हाच होय. समाज जे दाखवले जाते, त्याचे अनूकरण करून दिवसेंदिवस निर्ढावत जात आहे, कां, आधीच निर्ढावलेल्या समाजात जे जे घडते, त्याचेच चित्रण अशा मालिकांमधे दाखवले जाते, हा कोंबडी आधी की, अंडे आधी असाच प्रश्न आहे. गुन्हेगार अखेर पकडले जाऊन त्याना कठोर शासन सत्वर झालेले बघायला मिळेल, तो सुदिन केव्हा अवतरणार, हाच अंतिमतः यक्षप्रश्न आहे! 
शेवटी, अपराधी कौन ह्या सवालाचे उत्तर, अशा गुन्हेगारीला बेमुर्वतपणे दाखविणारे आणि ती सोईस्कर नजरेआड करुन पहाणारेही दोषीच नाही कां? 
--------------------------------------------------------------------------------------------
                               3."मल्लीनाथी: छोटा पडदा"
छोट्या पडद्यावर प्रामुख्याने मी मराठी मालिका आणि इतर कार्यक्रम पाहतो. छोट्या पडद्यावर मालिकांमध्ये इतरत्र काय चाललंय आणि त्यांची काय वैशिष्ट्ये आपल्याला दिसतात त्यावर प्रांजळ भाष्य करणारा "मल्लिनाथी" लेख आहे.
माझा कट्टा:
मालिकांव्यतिरिक्त खरं म्हणजे बातमीपत्र देणाऱ्या वाहिन्यांवर हल्ली जास्त चांगले कार्यक्रम होत असतात, असं मला दिसून आला आहे. विद्या वाचस्पती श्री. शंकर अभ्यंकर यांची मुलाखत एबीपी माझा वाहिनीवर माझा कट्टा या कार्यक्रमात माझ्या मनावर खूप छाप पाडून गेली. हा माणूस अध्यात्म आणि भारतीय संस्कृती परंपरा संतवाणी यांचा गाढा अभ्यासक एवढाच परिचय आतापर्यंत होता, पण त्या मुलाखतीतून कळले की हा माणूस क्रिकेट खेळायचा एवढंच नव्हे तर, क्रीडांगण सारख्या मासिकाचा, तो संपादक देखील होता हे खरोखर आश्चर्य वाटण्याजोगे, त्या कार्यक्रमामुळे लक्षात आले.
कौन बनेगा करोडपती:
सोनी वाहिनीवर दुसरा एक कार्यक्रम म्हणजे अँग्री यंग मॅन सुपरस्टार अमिताभ बच्चन सादर करत असलेला कौन बनेगा करोडपती हा होय बुद्धीला चालना देणारा आणि योग्य त्या टॅलेंटला बक्षीस देऊन सन्मानित केले जाते. अनेक भाग ह्या कार्यक्रमाचे झाले आहेत, त्यामुळे एक प्रकारचा तोचतोपणा आता आला आहे असे वाटते. पूर्वीची उत्सुकता आता राहिली नाही हेही खरे! शेवटी कुठल्याही उत्तमोत्तम कार्यक्रमाचे सुद्धा भवितव्य अधांतरीच राहात असते आणि एखादी गोष्ट नको तितक्या वेळेला समोर येत राहिली, तर त्याचे कौतुक वाटत नाही असेच सध्याच्या या कार्यक्रमाबाबत म्हणणे भाग आहे.
होम मिनीस्टर:
मालिकांव्यतिरिक्त दखल घ्यावा असा स्तुत्य कार्यक्रम म्हणजे भावोजी श्री आदेश बांदेकरांनी ऐन श्री गणेशोत्सवाच्या काळात विविध श्री गणपती मूर्तीकार मंडळींच्या पत्नींसमवेत सादर केलेले होम मिनीस्टरचे भाग. त्यातील दोन शिल्पकलाकारांची करामत खरोखरच आठवणीत रहाण्याजोगे. पहिले केवळ वर्तमानपत्रांचे कागद वापरून पर्यावरण स्नेही श्री गणेशमूर्ती बनविणारे, तर दुसरे कोणतेही अक्षर घेऊन ते योग्य तर्हेने चितारत पहाता पहाता श्री गणेशमूर्तीचे सुंदर चित्र रेखाटणारे हे होय. त्यांनी "आई" तसेच "होम मिनीस्टर" असे शब्द वापरून अप्रतिम श्री गणेशमूर्ती कागदावर चितारल्या. ह्या सार्यावर कळस म्हणजे त्यांनी आदेशजींकडून अक्षर वापरून श्री गणेशमूर्ती चित्र काढून दाखवले आणि भावोजींना भेट म्हणून आदेश सुचित्रा अक्षरे ह्यांचा उपयोग करून चितारलेली श्री गणेशाची फ्रेम दिली!
आपल्या आसपासच असे अनेक प्रतिभावान कलाकार वावरत असतात, अशांची ओळख करून दिल्याबद्दल समस्त महाराष्ट्राच्या भावोजींचे आभार मानावेत कितीही कौतूक करावे तेवढे थोडेच आहे.

डेली सोप हे मालिकांचा धंदा, अर्थात् जास्तीत् जास्त जाहिराती मिळवत राहून आपली सो काँल्ड मनोरंजनाची कसरत कशीही कितीही चालवत ठेवणे हेच ध्येय असते.
आधीच नकोशी झालेली "माझ्या नवर्याची बायको" मालिका नव्या शनायाच्या आगमनानंतर कमालीची दिशाहीन निरर्थक झाली आहे. बंद करा पीडणे.
ह्या नको,बा झालेल्या, "मानबा" ला अखेर एकदाचा उत्तम पर्याय मिळाला:
"
सोनी" मराठी वरील " सारे, तुझ्याचसाठी"!
मालिकांमध्ये, मेव्हण्याला जीजू, ताईला तायू, दादाला दादू तर मामाला मामू आणि आत्याला आतू अशी हाक म्हणजे जणू, आपुलकी अन् जिव्हाळाच!
तुला, पाहते रे":
पोरकटपणाचे हे सारे, खेळ रे!
अजून काय काय पहावे लागणार रे?
"
लोकमान्य" सुबोधला, हे भावते? अरेरे!!

"
तुपारे" मध्ये मोठ्या काँर्पोरेट ग्रुपचा सर्वेसर्वा विक्रांत, सारी कामधामे सोडून, ईशासारख्या नव्या कनिष्ठ रिक्रुटने, त्या बिपीन टिल्लूशी लग्न कां करावे हे सांगायची धडपड करतो!
मालिकेचे शिर्षक "पोरखेळ, सारे पहा रे, असे कां करु नये? सारेपहा..  एकत्र केलं तर चालेल का??  म्हणजे तुपारे ला " पोसारे " म्हणता येईलसुटसुटीत!!
ईशा म्हणजेच गायत्री दातारला तिच्या लहानपणी सुबोध भावेच्या हस्ते बक्षीस मिळाले होते तेव्हा ती म्हणाली होती की मला तुमच्या बरोबर काम करायचे आहे तिची ती इच्छा आता पूर्ण होत आहे!!!!!
केवळ तिची ती इच्छा पूर्ण व्हावी ह्या मर्यादित हेतुने ही मालिका काढली तर नाही? जे काही असंभाव्य तर्कविसंगत घडताना दाखवले जात आहे, त्यावरून तसा प्रश्न मनात येतो. शारदा नाटकाचा दुसरा आधुनिक अवतार, दुसरं काय!

मालिकेकडे नुसती करमणूक म्हणून पहाणे हा काय प्रकार आहे? कारण मालिकेत एक जीवंत वास्तवाचे चित्र उभे होत असते. सहाजिकच तर्काला मान्य होणारे, असंभाव्य अतिशयोक्त असेल तर त्यावर टीका करण्यात काय चूक?
कुठलीही मालिका तर्काला धरून आहेमाझ्या नवऱ्याची बायको’ सिरीयल लोकांनी डोक्यावर घेतली! तिची संकल्पना काय होती  त्यामुळे लॉजिक नीतिमत्ता वगैरे गोष्टी सिरीयल लागू नसतात असे मला मनापासून वाटतं  आणि फारच अर्थहीन वाटत गेले तर मी मालिका बघणे सोडून देतो. टीका करू नका असे नाही, पण मालिकेत फार आशा करण्यात अर्थ नाही हे ही कटू सत्य आहे हे नक्कीच.
चला, आता विश्रांती घेऊ या!:
'
चला हवा येऊ दया' हया कार्यक्रमाचे ४०० भाग यशस्वीपणे पूर्ण झाले, अभिनंदन. आता हया कार्यक्रमाने थोडी विश्रांती घेणे जरूरीचे आहे. ठुकरटवाडीच्या ह्या तमाशांत तोच तोपणा तर येतो आहेच, पण थिल्लरपणा पांचटपणाचाही अतिरेक होत आहें. शिवाय तेच ते चेहरे पहाणे कठीण होते आहे. एखाद्या नाटक वा चित्रपटाची जाहिरात होण्याऐवजी नको ते पहायला लागत आहे. हया संकल्पनेचा नव्याने विचार करावा, थोड़े गांभीर्य आणावे.
किंवा काही काळ विश्रांती घ्यावी!
मी स्टार प्रवाहवरील "ललित २०५" मालिका नेहमी पहातो. तात्पुरता अथवा वेगळ्याच तरुणीशी नायकाचा सोयीपुरता विवाह ही संकल्पना जशी "घाटगे अँड सून" वा "राधा प्रेम रंगी रंगली" .. मालिकांप्रमाणे इथेही तीच गोष्ट उभी केली आहे. मात्र घाटग्यांच्या सूनेपेक्षा इथली सून जास्त विश्वासार्ह आहे, कायम रडूबाई अव्यवहारी राधापेक्षा इथली भैरवी तडफदार व्यवहारी वाटते. तशीच तिथल्या उतारवयातही काळेभोर केस ठेवणार्या आजीपेक्षा, ललित २०५ मधील आजीमुळे मालिकेला चांगली उंची भारदस्तपणा आला आहे.
मराठी मालिकांमधील लक्ष्मी-नारायणाचा जोडा: "नकळत सारे घडले मधील":
"
श्री. सौ. रांगडे-पाटील:(सिनियर)"!
सध्याच्या माझ्या मोस्ट प्रिफर्ड मालिका:
MMPL
अर्थात मराठी मालिका प्रिमियम लिग:
ललित २०५: स्टार प्रवाह,
पाषाणपती: सह्याद्री वाहिनी
जुळता जुळवून जुळतय!: सोनी मराठी
प्रेमा तुझा रंग कसा!: स्टार प्रवाह
नकळत सारे घडले: स्टार प्रवाह
तुमच्या कोणत्या?
मोस्ट प्रिफर्ड मालिका:
MMPL
अर्थात मराठी मालिका प्रिमियम लिग:
कोणकोणत्या मालिका प्रेक्षकांना जास्त आकर्षून घेतात, ते आजमावण्यासाठी एक अभिनव उपक्रम म्हणून, ह्यासंदर्भात एक आढावा घेण्याचे द्रुष्टीने आपल्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. प्रश्न असे:
कोणत्या मालिका आपण पहाता?त्यातील कोणती मालिका सर्वात जास्त आवडते?कां?
. कोणत्या मालिका भरकटत चालल्या आहेत?
.इतर कोणते कार्यक्रम टीवीवर पहाता? एकूण किती वेळ रोज टीवी पहाता?
. टीवीवरील जाहीरातींचा अतिरेक होतो असे वाटते कां?
. नाटक चित्रपटांप्रमाणे टीवी मालिकांसाठी सेन्साँर मंडळाची आवश्यकता आहे कां?
अती तेथे माती:
मालिकेकडे नुसती करमणूक म्हणून पहाणे असा काही प्रकार नसतो. कारण मालिकेत एक जीवंत वास्तवाचे चित्र उभे होत असतेऐ. सहाजिकच तर्काला मान्य होणारे, असंभाव्य अतिशयोक्त असेल तर त्यावर टीका करण्यात काय चूक? हल्ली बहुतेक मालिका काही काळानंतर लांबविण्याच्या अट्टाहासापायी भरकटत जातात. त्या तुलनेत पूर्वी, मर्यादित भागांच्या मालिकांमध्ये मनाला वास्तवतेचे पटेल असे बरेच काही असावयाचे. त्यामुळे त्यातील बर्याच विश्वासार्ह स्म्रुतीत रहावयाच्या. टी२० स्पर्धांप्रमाणे आता लौकरात लौकर तशा आटोपशीर मालिकाच येणे अत्यंत गरजेचे आहे, नाहीतर प्रेक्षक मालिकाच पहाणे सोडून देतील.
दुर्दैवाने "मानबा" सारख्या मालिका जर डोक्यावर घेतल्या जात असतील, तर नीतीमत्ता, सचोटी आदि मूल्ये नाश पावायला वेळ लागणार नाही. ह्याकरताच मालिकांवर पूर्वपरीक्षेचा अंकुश हवा. शेवटी  मी देखील हेच मानतो आहे की अतिरेक झाला तर प्रेक्षकच मालिका प्रकार पहाणे सोडून देतील.
------------------------------------------------------------------------------------------------
                                                          4.दिलरुबा, मधूर हा!":
त्या दिवशी चक्क चमत्कारच घडला. रटाळ मालिका पहाण्याचे टाळून रिमोटशी खेळ करता करता, "एबीपी माझा" वाहिनीवर अवचितपणे लाँटरीच लागल्याचे भाग्य पदरी पडले. त्या कार्यक्रमात श्री. ह्रषिकेश करमरकर-झी युवावरील "संगीत सम्राट" ह्या स्पर्धेतला एक स्पर्धक, दिलरुबा हे वाद्य  ज्या सहजतेने व सुरेल स्वरात हाताळतो ते पहायला व ऐकायला मिळणे, हा एक भावपूर्ण क्षण होता. 

सारंगी, व्हायोलिन आणि दिलरुबा ह्या वाद्यांमधील सूक्ष्म फरक उलगडून सांगता सांगता, त्याच्या हाती असलेल्या सव्वाशे वर्षे जुन्या दिलरुबावर, "एहसान तेरा होगा मुझपर....अशी मेलोडियस गीते त्या होतकरु तरुण कलाकाराने जीवंत करून आमचे कान अन् मन त्रुप्त केले. हातांतील कीमये बरोबर, तो किती ताकदीचा गायक आहे, ते त्याने
"ज्ञानियाचा राजा तू गुरूमहाराज...." हे भजन गाऊन सिद्ध केले. एबीपी माझा सारख्या बातम्या देणार्या वाहिनीवर गुणवंतांची कदर व दखल घेणारे असे सुखक्षणही अनुभवता येतात, हा एक अद्भूत चमत्कारच नव्हे कां?

"संगीत सम्राट" ह्याच कार्यक्रमांत क्लँरिओनेट हे वाद्य लिलया हाताळून मंजुळ सुस्वर गीते सादर करणार्या, श्री. लीलाधर पाटोळे ह्यांची देखील कला "एबीपी माझा" वाहिनीवरच एका मुलाखतवजा भेटीत सादर झाली. 

"झी २४ तास" वाहिनीवर श्री प्रसाद सावकार ह्यांच्या गप्पांच्या कार्यक्रमांतून ह्या ९० वर्षांच्या दिग्गज गायक नटश्रेष्ठाच्या अंतरंगाची खुसखुशीत ओळख झाली. त्यातून नाट्यचित्रपट क्षेत्रातील, अनेकानेक अज्ञात आठवणी जाग्या झाल्या. अशा उतारवयातही सावकारांंची स्म्रती जशी असामान्य, तसाच त्यांचा उत्साहही कौतुकास्पद!

असाच अनुभव "साम व्रुत्त" वाहिनीवर अभंगवारी ह्या कार्यक्रमात आनंद गंधर्व, शौनक अभिषेकी ह्या विख्यात गायकांच्या कारकिर्दीची ओझरती झलक त्यांच्या सुरेल आवाजातील अभंगवाणीमधून ऐकायला मिळाली.

"ताज्या बातम्यां"चे (?) सातत्याने किती, कसे गुर्हाळ चालवत रहायचे, ह्या समस्येमुळे कां होईना टीवी वरील व्रुत्त वाहिन्या बातम्याबाह्य, असे मनोरंजन करणारे प्रयोग सातत्याने करत आहेत. ते दर्शकांसाठी आनंददायी अन् इतर मनोरंजन वाहिन्यांकरता स्पर्धेचे आव्हान असेल.

त्याउलट,
"माझ्या नवर्याची बायको"
"लेक माझी लाडकी",
"राधा, प्रेम रंगी रंगली......
मालिका गोल गोल फिरायला लागल्या....
पाणी घालत घालत 
घसरायला लागल्या........!" 
टीव्ही" अर्थात ईडियट बाँँक्स ही करमणूक, माहीती आणि जाणीव ह्या त्रयींचा एक महासागर आहे. दिवसाचे तास जरी चौविस असले, तरी असंख्य वाहिन्यांमुळे तो जणू शेकडो तास विस्तारला आहे. एखादी मालिका, एकदाची कधी बंद होते असा प्रश्न असंख्य प्रेक्षकांच्या कपाळावर आठ्या न आणता, अरेच्या ती कां बरे बंद झाली असेही त्यांना वाटायला न लावता आपला अवतार संपवू शकते, असे उत्तम व दुर्मिळ उदाहरण कोण कधी दाखवणार?                                                                   
त्याच त्या मालिकांच्या फाफटपसार्याला नाके मुरडून काहीही साध्य होणार नाही. उडदामाजी काळे गोरे निवडावे आणि खरोखर आवर्जून टीवीवर काय काय चांगले व अवश्य पहावे, असे कार्यक्रम शोधण्याची आम्ही धडपड केली. त्या अम्रुतमंथनातून गवसले ते येथे मांडतो:

गेली एकवीस वर्षे "सीआयडी", हा गुन्ह्यांची सफाईने उकल करणारा उत्कंठावर्धक व अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम छोट्या पडद्यावर जवळ जवळ सर्व आबालव्रुद्धांमध्ये लोकप्रिय आहे. त्यातील एसिपी प्रद्युमन अर्थात श्री. शिवाजी साटम ही एक कल्ट फिगर अथवा ब्रँड तयार झाल्याचं सर्वश्रुत आहे. वास्तववादी वेगवान चित्रण आणि आधुनिक तंत्रज्ञान ह्यांचा अनोखा संगम येथे पहायला मिळतो. गुन्हेगारी विश्व व गुन्ह्यांची उकल ह्या जाँनरचे क्राईम पँट्रोल, सावधान इंडिया, इ.इ. कार्यक्रम अनेकजण विविध वाहिन्यांवर आवर्जून पहातात.

झी"मराठी वरील "होम मिनीस्टर" हा घरोघरी विलक्षण लोकप्रिय झालेला कथाबाह्य कार्यक्रम, "भावोजी" थोडे थोडके नाही, चक्क तेरा वर्ष त्याच उत्साहात व जोशात सादर करत आहेत हे एक नवलच! दर भागात पैठणी कोण जिंकणार असे साकडे घालत दोन वहिन्यांमधील खेळांच्या स्पर्धा, प्रेमविवाह झालेल्या, ज्येष्ठ नागरिक असलेल्या, नामवंत कलाकार दांपत्यांच्या  मुलाखती, सध्या शिक्षक ग्रुहिणींच्या घरी अशा विविध प्रकारच्या कल्पना राबवून हा कार्यक्रम आदेश भावोजी उत्तरोत्तर टिकवून ठेवत आहेत, हा एक विक्रमच होय.

"कौन बनेगा करोडपती" सारखा बुद्धीची परिक्षा पहाणारा कार्यक्रम श्री. अमिताभ बच्चन ह्यांनी वर्षानुवर्ष आपल्या खास शैलीत तुफान लोकप्रिय केला. त्याचे पुढील पर्व लौकरच छोट्या पडद्यावर येणार अशी बातमी आहे. ह्या तर्हेच्या बुद्धिचापल्याची परिक्षा घेणारा "स्टार प्लस"  वाहिनीवरील,"सबसे स्मार्ट कौन"कार्यक्रमांत, दोन गटातील स्पर्धकांना एखादे द्रुष्य दाखवून त्यावर चकवा देणारा प्रश्न विचारला जातो. पाच पायर्यांमध्ये अखेर ही स्पर्धा जिंकणारा गट घसघशीत बक्षिसाचा धनी होतो. ह्या कार्यक्रमाचा चटपटीत बोलणारा अँकरच मुळात चांगलाच स्मार्ट आहे. सहाजिकच आवर्जून बघावा असाच हा स्पर्धात्मक खेळ आहे.

"झी युवा"वरील तरुण गायकांच्या मधूर आवाजाचा कस पहाणारा "संगीत सम्राट पर्व२ हा एक श्रवणीय कार्यक्रम, जुन्या लोकप्रिय "नक्षत्रांचे देणे" ची आठवण थोडी फार जागी करणारा आहे.

तशाच तर्हेने वरील कार्यक्रमांव्यतिरिक्त   विविध वाहिन्यांवरील पहाण्याजोगे निवडक कार्यक्रम असे आहेत:

हिंदी कार्यक्रमांच्या वाहिन्या:
सब: तारक मेहताका उल्टा चष्मा
सोनी: क्राईम पँट्रोल
स्टार भारत: सावधान इंडिया
कलर्स मराठी: "बिग बाँस"
स्पेस ब्लँक: जुनी हिंदी चित्रपट गीते

मराठी कार्यक्रमांच्या वाहिन्या:
सह्याद्री: दुसरी बाजू, सह्याद्रीच्या पाऊलखुणा
झी युवा: बापमाणूस
Star Pravah :नकळत सारे घडले
Colour: कुंकू टिकली आणि टँटू
Zee:  राधा प्रेम रंगी रंगली

अखेर,👌पसंद अपनी अपनी, खयाल अपने अपने"!  हेही खरेच!
----------------------------------------------------------------------------
                                   5."पोरखेळ हे सारे":
'तुला पाहते रे'-'तुपारे' ह्या मालिकेच्या प्रोमो पाहून खूप कुतूहल व आशा निर्माण झाली होती की एक दर्जेदार मालिका पहायला मिळेल. पण अगदी पहिल्या भागापासून जे काय असंभाव्य धेडगुजरी दिसत राहिले त्यातून मनात अनेक प्रश्न आणि शंका निर्माण होत रहातात:
हे असं कधी असतं?:
हेलिकॉप्टरने येणारा गडगंज श्रीमंत उद्योगपती विक्रांत सरंजामे खाली उतरल्यावर सायकलने काय जातो, ती पंक्चर काय होते, नंतर ईशाच्याच रिक्षांत  त्याला लिफ्ट काय मिळते मग शेअर रिक्षाचे पैसै देण्यावरून त्याच्याकडे मोबाईल वा पैसेच नसल्यामुळे दो रुपये भी बहोत चीज है बाबूचा ड्रामा काय घडतो. सारा पोरखेळ!
नंतर हाच अतर्क्य सिलसिला प्रत्येक भागात चालूच रहातो. विक्रांत नवख्या अर्ध्या वयाच्या ईशाबरोबर तिची पार्टी म्हणून दिवसभर ती नेईल तिथे तिथे काय जातो, टपरीवजा हाँटेलात चहा काय पितो सारे. नवलच! कोणता सीईओ असा कधीतरी वागेल कां?
प्रचंड श्रीमंत कुटुंब दाखवलं आहे विक्रांत सरंजामे यांचं अशा कुटुंबांमधले नोकर अतिशय अदबशीर असतात. पण इथे विक्रांतच्या आईसाहेब काम करणाऱ्या बाईला बदामाची सालं काढायला सांगतात, तेव्हा ती ' अतीच असतं तुमचं' असं म्हणते... नाक उडवून बोलते.
ब्रेकफास्ट टेबलवर विक्रांत सगळ्यांना ' चला, आपण मस्त गप्पा मारुया' म्हणतो. त्याच्या वहिनीचा जो हेल्पर आहे, तो वेड्यासारखी गाणी ऐकवत रहातो!
कंपनीच्या मालकाला नवीन जाॅईन झालेली मुलगी स्लॅमबुक भरायला सां"पोरखेळ हे सारे"!:
गते. विक्रांत ते घेऊन भरतोही व तिला देतोही!
ईशाची आई वेळीअवेळी त्याला फोन करुन काहीही बोलत रहाते.
ईशाच्या वडलांचे चाळे तर विचारायलाच नकोत. दुकान गमावलेला हा फाटका माणूस दुकानात टाईम पास करायला आलेल्या पुरंध्रींसमोर साडी काय नेसतो, नंतर विक्रांतने दिलेल्या. पार्टींत दारू ढोसून स्टेजवर तसाच तमाशा काय करतो, नवलच! विक्रांत बरोबर ईशाला एकटीने तिची पार्टी साजरी करण्यासाठी बाप म्हणून परवानगी कशी काय देतो, सारी कमालच!
बिपीन टिल्लू आणि त्याचे वडील त्यांचा बिझनेस सोडून असे त्याच्या आत्याच्या घरी वाटेल तेवढे दिवस राहू शकतात का?
"ईशाच्या विवाहाला या" एवढ्या निमंत्रणावर, तो सारे संबंधित टिल्लू लग्नाचा मुहुर्त काढायला बसले असता, अचानक कसा व काय म्हणून आपले उद्योग सोडून येतो नवलच!
विक्रांत सरांच्या डोक्यात दोन भोवरे आहेत का हे पहायला ईशा त्यांच्या मागे जाऊन उभी रहाते!
"शारदा" नाटकाचा असा आधुनिक अवतार दाखवायचे ज्यांना सुचले, त्यांच्यापुढे हातच जोडावे लागतील!
अशा अनेक गोष्टी आहेत, सांगू तेवढ्या थोड्याच! एकाच मालिकेत सातत्याने न पटणारे एका पाठोपाठ एक प्रसंग दाखवणारी "तुपारे" ही पहिलीच मालिका म्हणावी लागेल. ती तशी शेवटचीच ठरो!
हे नक्की काय आहे?
प्रेक्षकांना मूर्ख समजून हे लिहीलं जातं का?
बरं, लेखकाने असं धेडगुजरी लिहीलं तर ते दुरुस्त करणारं कोणी नसतं का? एकालाही हे तर्कविसंगत आहे, हे लक्षात येत नाही का?
पण हे सगळं बघताना अस्वस्थ वाटतं
आपण फार गृहीत धरले जातोय असं वाटतं किंवा एकूणच प्रेक्षकांच्या आयक्यूबद्दल लेखकांना शंका असावी किंवा ते बेफिकीर असावेत असं वाटतं.
हे सगळं खूप त्रासदायक आहे
' प्रपंच', ' आनंदवन' सारख्या मालिकांमधे काम केलेल्या शर्वरी पाटणकर यांना ' दर्जा' म्हणजे काय हे निश्चितच माहिती आहे, त्यांच्याकडून अशा संवादांची अपेक्षा नाही.
बरं गुणी माणसांची वानवा नाही.

मग हे तेच तेच लोक का पाठोपाठ लिहीत रहातात? 'जशी मागणी तसा पुरवठा' हे उत्तर योग्य नाही. तसंच 'पटत नसेल तर रिमोट वापरा' हे म्हणणेही अयोग्यच. जे काय पेश कराल ते काहीतरी तर्कसुसंगत असायलाच हवे. ह्याकरता पूर्वपरिक्षणाचा अंकूश मालिकांना हवाच हवा! मोकाट सोडलं की काय दिवे लावतात ते गांभीर्याने विचारात घ्यायला हवे.

प्रेक्षकांना ' रुद्रम' सारखं उत्तम काही दाखवलं की समृद्ध वाटतं. आपण उत्तम द्यावं ही आंच कमी झाली आहे कां? किंवा आपण कसंही वाढून पुढ्यात दिलं तरी भुकेची वेळ झाली की प्रेक्षक तेच चघळणारेत, हा अति आत्मविश्वास होत नाही का?
सुबोधसारख्या उमद्या अभिनेत्याचा पुरेपूर वापर करुन घ्यावा असं कोणालाही कसं वाटत नाही? शिवाय त्याच्यासारखा चोखंदळ माणूस बिनबोभाट हे पोरखेळ चालवून कसे घेतो हा प्रश्न आहे. म्हणूनच ह्या सार्या तमाशापायी खूप त्रास होतो आहे आणि हे चित्र तातडीने बदलायलाच हवं असं वाटतं आहे............

कहर म्हणजे आगांतुकासारखा ईशाच्या विवाहजुळणीच्या बैठकीत हजर झालेला विक्रांत तिच्या सांगण्यावरून घाण्याच्या तेलाचे दोन वजनदार डबे धापा टाकत निमकरांकडे आणतो आहे. काय म्हणावयाचे ह्या प्रकाराला!
आता कदाचित ईशाच्या लग्नाला त्याच्या कर्जतच्या घरापासून विवाहस्थळापर्यंत विक्रांत, रस्त्यावरून साष्टांग नमस्कार घालीतही आलेला ही मंडळी दाखवतील!
त्यांचा काही म्हणून काही नेमच नाही मुळ्ळी!!

"तुपारे" मध्ये जे अकलेचे तारे रोज तोडले जाताहेत, ते पाहून वाटते की, लेखक कुठल्या जगात वावरतोय? काम करणारे कलाकार केवळ पैशासाठी नंदी बैलासारखे कां हे सारं चालवून घेतात? त्यांत सुबोध सारखा साक्षेपी मँच्युअर अभिनेता सुद्धा!

असं कां?:
"तुपारे" मध्ये जर २४ तास ईशाला भेटायचेच नव्हते, तर लगेच विक्रांत सरळ दिल्ली वा लंडनला कां गेला नाही?
थोडा धडा घ्या की!:
"चिनी कम" चित्रपटातील वयस्कर नायक व तरूण मुलगी ह्यांची प्रेमकथा सहजतेने व खेळकरपणे उलगडत गेलेली भासते. त्यामुळे ती पहाताना काही गैर घडतंय असे न वाटता समाधानच वाटत रहाते.
ह्या उलट "तुपारे" मधली नायिका ईशा, ही वयस्कर कायम दुर्मखलेला चिंताग्रस्त विक्रांतच्या हात धुवून मागे लागली आहे असे वाटते. सहाजिकच इथे घडू नये ते घडत रहातंय असे भासून मनांत संतोषा ऐवजी संताप येत रहातो. त्यांतून सर्वथैव अविश्वसनीय प्रसंगांमुळे ही प्रेमकथा तिटकारा आणणारा पोरखेळ झाली आहे.
"पुरे झाले आता पोरखेळ"!:
"पोरखेळ हे सारे"नव्हे "तुला पाहते रे!" मालिकेमध्ये कसेही व काहीही, न पटेल असे आणि अक्षरश: अव्यवहार्य असे प्रसंग दाखविण्याचा सिलसिला चालूच आहे. 

ईशा बसमधून ठरल्याप्रमाणे बंगलोरला जात असताना, एखाद्या झपाटलेल्या माणसासारखा,  विक्रांत आपल्या मोटरमधून त्या बसमागे सुसाट काय जातो आणि बस अडवून ती थांबवून ईशाच्याच बरोबर बसमध्ये बसतो. एवढे पुरे नाही म्हणून ईशाचा बंगलोरला जायचाच हट्ट आणि विक्रांतचा दोघांनी उतरून परत जायचा घोषा सारेच असंभाव्य. 

नंतर दोघांनी खाली बसमधून, उतरल्यावर हाँटेलमधे खोली घेताना विक्रांतसारख्या सुशिक्षित श्रीमंत माणसाने त्याच्याजवळ ओळखपत्र वा पैसेही नाहीत असे सांगणे ही परिसीमा झाली. जो माणूस स्वत: कार चालवून आलेला आहे त्याच्याजवळ ओळख म्हणून ड्रायव्हिंग लायसन्सही नसणे कसे शक्य आहे? शिवाय ईशा जी पूर्ण तयारीनिशी बंगलोरला चालली आहे, तिच्याजवळ तर ओळखपत्रं असायलाच हवीत. कशाकरता अशी लपवाछपवी? महामार्गावर फोनला रेंज नाही हे शक्य आहे, परंतु एकदा हाँटेलवर आल्यावर तिथे फोन चार्ज करून घरी फोन करणेही अशक्य नव्हते. विक्रांत भांबावलेला त्रासलेला माणूस वाटतो, तो प्रेमात पडल्याचे एकही चिन्ह त्याच्या त्या अवस्थेत वाटत नाही. त्या उलट ईशा त्याच्याकडून आपल्यावर प्रेम व्यक्त करून घ्यायचेच अशा ईर्षेनेच सतत वागताना दिसते.

म्हणूनच व्यवहार सोडून ही दोन्ही पात्रे सातत्याने आपल्या मनाला पटेल असे कधीही वागताना दिसतच नाहीत. मुक्त स्वातंत्र्याचा असा प्रेक्षकांना उल्लू बनविण्याचा हास्यास्पद पोरखेळ निदान इतके झाल्यावर तरी थांबेल अशी भोळीभाबडी आशा बाळगणेच आपल्या हाती आहे. एका चाकोरीबाहेरच्या प्रेमसंबंधासारख्या विषयाचा ही मालिका विपर्यास करत आहे, दुसरे काय?
"चिनी कम" पासून थोडा तरी धडा घ्या की! 
प्रेक्षकांनी ह्या मालिकेवर बहिष्कार टाकला तरच काही, ह्या मंडळींच्या डोक्यात प्रकाश पडेल.
भरकटलेल्या "तुजीरं" आणि "मानबा", तसेच "घावसू" मालिका आम्ही आता आँप्शनला टाकल्या. तेवढ्यापुरते आमचे "आकाश" मोकळे झाले!
                                                            
"प्रेमा तुझा रंग कसा"?:
"सातुसा" मधील, तरुण गायक कार्तिक आणि बाँक्सर श्रुतीचं प्रेम, हळूवारपणे, स्लो मोशननं फुलत जातं, ते पहाणं कुठे, तर त्या उलट, "तुपारे" मधल्या कायम चिंतातूर असलेल्या उद्योजक विक्रांत व त्याच्याहून अर्ध्या वयाच्या हट्टी लाडावलेल्या ईशाची विक्रांतवर जणु हक्क असल्यासारखी, न शोभणारी दादागिरी, पहाणं कुठे! प्रेम एक शोभणारे व दुसरे बिल्कूल न शोभणारे!!
"राधा प्रेम रंगी रंगली" मध्ये सुरवातीपासून शीर्षकगीताचे वेळी, प्रेम सोबत कारमधून उतरताना श्री. संजय मोने नेहमी दिसतात. आता मालिका संपायची वेळ आली, तरी प्रत्यक्षात मालिकेत ते कधी दिसणार? आणि निंबाळकर मालिकेत घरी येण्याचा व गायब होण्याचा लपंडाव कधी थांबवणार?

"तुपारे" मध्ये अवघे पंचेचाळीस वयमान असलेल्या उद्योजक विक्रांत सरंजामेंचा, "शारदा" ईशाला व सर्व वर्हाड्यांना घेऊन पहाटेचा, जबरदस्तीचा किळसवाणा जाँगींगचा तमाशा पाहिल्यावर, इतर कोणतीही अगदी नकोशी "मानबा" मालिका पहाणेही सोपे वाटायला लागले! 
बंद करा बाबांनो हा मूर्खपणा!!
"सह्याद्री" वाहिनीवरील कोकणच्या नयनरम्य पार्श्वभूमीवर घडत असलेली नात्यांमधली गुंतागुंत उलगडणारी..........
"पाषाणपती" मालिका अचानक कुठे गायब झाली?
क्या, अब जमाना बदल रहा है?!:
मालिकांमधल्या
नायकांच्या दोन दोन बायका?:
'मानबा': गुरुनाथ-राधिका-शनाया,
'घांवसू': अक्षय-अम्रुता-टियरा,
'राप्रेरंर': प्रेम-राधा-दीपिका,
'नसाघ': प्रताप-नेहा-माया,
'लसमं': मल्हार-लक्ष्मी-आर्वी.
यह क्या हो रहा है छोटे पर्देपे?!
"मानबा" कधी संपणार?
मध्यमवर्गीय राधिकाचा घरगुती मसाला बनवण्याचा व्यवसाय आजूबाजूच्या ग्रुहिणी जमवून कसाबसा चालत होता, ती एकदम तीनशे कोटींच्या उद्योगाची मालकीण "मानबा" मालिकेत होते. ती इतक्या वेळा बनेल नवर्याने फसवले तरी त्याला सोडत नाही. त्यांच्या घटस्फोटाचा खटला अजून किती आठवडे कां महिने पुढे ढकलला जाईल ते अशी हास्यास्पद पोरखेळ करणारी मालिका सादर करणारेच जाणतील. आज कधी नव्हे तो इंधनदर वाढायचा थांबला, तशी ही "मानबा" मालिकाही अचानक थांबणार कां?
पुन्हा येरे माझ्या मागल्या!:
खमक्या राजाध्यक्ष आजींच्यामुळे मानवी नात्यांतील गुंतागुंत नाट्यमय रितीने उलगडली जात असताना, कुठे माशी शिंकली कोण जाणे, "ललित २०५" मालिकेने भूतभविष्य भ्रम ह्या भलत्याच वळणावर येऊन, घसरायला सुरवात केली. हे पाहून वाईट वाटले, अपेक्षाभंग झाला.

मालिकांचे तंत्र व मंत्र:
मालिका पुढे पुढे नेण्याचे एक विशिष्ट तंत्र वा कीमया असते. तिचा पब्लिकला कंटाळा येतो आहे असे कळले की नवनवी पात्रे ठराविक अंतराने आणावयाची आणि घटनांना भलतेच वळण द्यायचे. "नकळत सारे घडले" मध्ये नेहा माया ह्या प्रतापच्या आजी माजी बायकांची नाटके झाल्यावर, फोडणी म्हणून वाघमारे नांवाचे पात्र काही काळ धुमाकूळ उडवून गेले. त्यानंतर प्रतापच्या मायच्या लाडापायी वाया गेलेल्या छोकरा अक्षयचे कारनामे झाले. तो रूळावर आल्यावर प्रिन्सच्या लग्नाचा नाट्यमय फार्स झाला. आता, एकदम बापाच्या वळणावर गेलेली नाटकी व बनेल नवी सून मेधा आपले एकसे बढकर एक कारनामे रांगडे-पाटलांच्या घरात करत नेहाला जेरीस आणत आहे. नवा गडी नवा राज असा प्रकार जवळ जवळ प्रत्येक भरकटणार्या, पाणी घालणार्या मालिकांमध्ये सर्हास चाललेला दिसेल.
सगळ्यात खतरनाक कोण?:
१ "लेमाला": ह्रषिकेश
२ "नसाघ": धवल
३ "छोमा": अण्णासाहेब
४ "मानबा": गुरुनाथ
सगळ्यात वेडी कोण?:
१ "लेमाला": मीरा
२ "घाअँसू": अम्रुता
३ "मानबा": राधिका
४ "राप्रेरंरं": राधा
५ "लसमं": आर्वी
सर्वात जास्त पीडा देणारी जोडी?:
१ "लेमाले": मीरा व ह्रषिकेश
२ "घाअँसू": अम्रुता व अक्षय
३ "मानबा": राधिका व गुरुनाथ
४ "नसाघ": नेहा व प्रताप
५ "तुपारे": ईशा व विक्रांत.
सँडिस्टिक लूनँटिक ह्रषिकेशने एकदाचा 'राम' म्हटल्यावर, कशीही कितीही भरकटत जाणार्या "लेमाला" मालिकेनेसुद्धा अखेरचा राम राम केला! सगळेच सुटले!
प्रेक्षकांची ऐशी तैशी, म्हणूनच घोषवाक्य:
"पोरखेळ हे पहा सारे"  
--------------------------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------------------------------
                
लेखक: सुधाकर नातू